Sunday, December 28, 2025

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.
             खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण त्या निम्मित बराच अभ्यास,वाचन करता आले. अनेक व्यक्तींचे भाषणे, बौद्धिक देखील ऐकले. 
             आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळेच हिंदू धर्म टिकला आणि वाढला हे आपण नक्कीच मानतो. तसेच पंजाब, राजस्थान, दिल्ली येथे देखील गुरुतेगबहादुर, गुरू गोविंद सिंह जी आणि त्यांच्या चार मुलांच्या शौर्य आणि बलिदाना मुळे हिंदू धर्म टिकला. हे सर्व प्रसंग, त्यावेळचं राजकारण, धर्मकारण नक्कीच सर्व इतिहास वाचण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. 
           अभ्यासात एक संदर्भ मिळाला तो म्हणजे सन १६६६ मध्ये शिवाजी महाराज हे आग्र्याच्या कैदेतून सुटले आणि त्याच वर्षात म्हणजे सन १६६६ मध्ये गुरु गोविंद जी यांचा जन्म झाला. कदाचित पुढील आयुष्यात या दोन महान व्यक्तीचा परिचय झाला होता का? काही पत्र व्यवहार, किंवा या दोघांना एकमेकांची काही माहिती असेल का? असे काही प्रश्न उपस्थित झाले. इतिहास अभ्यासकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.
        धर्माच्या नावावर हिंदू लोकांचे  छळ,हाल,अमानुष हत्या, मंदिरे,मुर्त्या फोडणे, बळजबरीने धर्मांतर करणे हे सर्व बाबर, जहांगीर, औरंगजेब यांनी केले हा इतिहास मनाला वेदना देणारा तर आहेच पण सर्व गुरुंच्या शौर्य आणि त्यागातून कायम प्रेरणा देणारा देखील आहे. 
       गुरुअर्जुन देव, गुरु तेगबहादुर, गुरु गोविंद सिंह जी, त्यांचे चार बाल वीर अजित सिंह, जुझार सिंह, जोरावर सिंह, फत्तेह सिंह. माता गुजरीदेवी यांचा धर्मासाठीचा त्याग खूप मोठा आहे..
         १४ व्या शतकात सुरू झालेली ही परंपरा आज पर्यंत म्हणजे २०२५ सालात देखील पहायला मिळते. 
फैजपूर येथील छोटा दहा वर्षांचा मुलगा श्रवण सिंह याने तर कमालच केली. ऑपरेशन सिन्दुर सुरू असताना त्याने आपल्या गावात आलेल्या भारतीय सैनिकांना चहा, ताक, लस्सी देऊन त्यांची सेवा केली..याचा कोणताही मोबदला देखील घेतला आहे..ही राष्ट्र भक्ती इतकी आहे की त्याने आपण मोठे होईन सैन्य अधिकारी होणार आहोत हेच ध्येय नक्की केले आहे.
म्हणूनच या परंपरेतील सर्व वीरांना विनम्र अभिवादन🙏🏻🚩

निखिल देविदास वझे 
आवडल्यास लाइक आणि शेअर करावे

Sunday, December 14, 2025

पुणे पुस्तक महोत्सव २०२५



 मागील दोन वर्षांपासून सुरू झालेल्या **पुणे पुस्तक महोत्सवाचे** हे यंदाचे तिसरे वर्ष 📚

आज दिनांक १४/१२/२५ रोजी सकाळपासूनच—अगदी **१०.३० वाजता**—सपत्नीक **फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारात** दाखल झालो.

पुस्तकांच्या आकाराच्या भव्य कमानीतून, जणू **मराठी भाषेच्या अभेद्य किल्ल्यात** प्रवेश केल्यासारखे वाटले 🏰📖

प्रवेश करताच डाव्या-उजव्या बाजूला सुंदर अशा विविध **कलाकृती**, आणि डोक्यावर अप्रतिम कलाकुसर केलेल्या **छत्र्या, माळा व अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे असलेले छत** पाहून मन प्रसन्न झाले ✨🎨


पुढे गेल्यावर उजव्या बाजूला **भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त** आयोजित केलेले आदिवासी समाजाचे भव्य प्रदर्शन पाहायला मिळाले 🌿. त्यांची **बोलीभाषा, दैनंदिन वस्तू, घरे, वर्णमाला** यांचे अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रभावी सादरीकरण होते. ते सर्व वाचण्यात आणि पाहण्यात आमचा बराच वेळ गेला. नेहमीप्रमाणे बायकोने आपला अभिप्राय लिहिला 📝 आणि मग आम्ही मुख्य पुस्तक प्रदर्शनाकडे वळलो.

तेथे उजव्या हाताला **बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’** या पुस्तकाचा स्टॉल होता. नोंदणी करून ते पुस्तक **भेट स्वरूपात** स्वीकारले 📘. यावर्षी **‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षाचे** औचित्य असल्याने हे पुस्तक मिळणे खूपच आनंददायी ठरले 🇮🇳

गेली कित्येक वर्षे स्वतः पुस्तक विक्री करताना अशा प्रदर्शनात स्टॉल असतो, तेव्हा इतर स्टॉल पाहणेही होत नाही. यावर्षी ती जबाबदारी नसल्यामुळे मात्र **फक्त आणि फक्त पुस्तके पाहणे, जुने प्रकाशक, पुस्तक व्यावसायिक मित्रांना भेटणे**—हाच विचार मनात होता 😊

इतक्या मुक्तपणे प्रदर्शन पाहिले की **तीन कधी वाजले ते समजलेच नाही** ⏳

**राजहंस, रोहन, मनोविकास, विश्वकर्मा, डायमंड, माय मिरर, विवेकानंद, विवेक, पद्मगंधा, इंद्रायणी साहित्य, छत्रपती सेवा प्रतिष्ठान NBT, गमभन, प्रसाद, रायगड स्मारक, भारत इतिहास मंडळ, रामकृष्ण मठ, नाविन्य प्रकाशन, दिलीपराज** अशा कितीतरी प्रकाशन संस्था व पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल पाहिले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या 💭 तसेच काही मान्यवर देखील भेटले अच्युत गोडबोले,अनय जोगळेकर( MH 48 यूट्यूब चॅनेल), अरविंद गोखले सर, मनोज अंबिके सर, मुख्य संयोजक श्री राजेश जी पांडे

खरंच, सर्व वाचकांनी या प्रत्येक स्टॉलवर जाऊन पुस्तके पाहिलीच पाहिजेत आणि शक्य असेल तेव्हा ती विकतही घेतली पाहिजेत 🙏

एक स्टॉल उभा करण्यामागे प्रकाशक आणि विक्रेते खूप मेहनत घेत असतात. त्यांची माफक अपेक्षा इतकीच असते की वाचकांनी **लावलेला डिस्प्ले पाहावा आणि पुस्तकांशी संवाद साधावा** 📚❤️

या पुस्तक महोत्सवात **लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत** सगळ्यांसाठी भरपूर काही आहे 👶👨‍🦳

म्हणूनच सर्वांनी आवर्जून भेट द्यावी.

फक्त एक छोटी **विनंती**—

पुस्तकांचे दोन मोठे दालन आहेत. त्यापैकी **E, F, G, H सिरीजमधील दुसऱ्या मांडवातील स्टॉल** नक्की पाहा 👀

बहुधा पहिल्या मांडवातील **A, B, C, D सिरीज** पाहून अनेक जण थकून परत जाताना दिसले.

पण दोन्ही मांडव पाहिल्याशिवाय अनेक **विषय, लेखक, विचारवंत आणि प्रकाशन संस्था** आपल्या लक्षात येणार नाहीत.

पूर्ण दिवस काढून जाता आला तर उत्तमच 🌞

डोक्याची **वैचारिक भूक भागवणारी** अनेक दालने आहेत, तसेच पोटाची भूक भागवण्यासाठीही खाद्यपदार्थाची भरपूर स्टॉल उपलब्ध आहेत 🍽️😄


**मग तुम्ही कधी जाताय?** 🤔📚


ता. क.

आज आम्ही घेतलेली पुस्तके **फोटोसोबत जोडली आहेत*📸📖




Thursday, October 16, 2025

"तुम्ही या वर्षी गिरनार ला जाणार आहात का?"

 

"तुम्ही या वर्षी गिरनार ला जाणार आहात का?" दर वर्षी प्रमाणे अनेकांनी हा प्रश्न विचारला. असे प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक दत्त भक्तांना घेऊन जायचे ठरवलेले असते. पण ते शक्य होत नाही. का कोणास ठाऊक वेळ जुळत नाही, रेल्वेचे तिकीट मिळत नाहीत,माहीत नाही. पण अशा सर्वांना पुढील वर्षी तरी नक्की घेऊन जावे असे मनात दत्त महाराज सुचवतात हे नक्की. त्याच मुळे दर वर्षी किमान एक नवीन दत्त सेवक घेऊन जात येत आहे. कदाचित महाराजांची तशी इच्छा असेल.

     गिरनार पर्वत हा असा पर्वत आहे जिथे प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या संजीवन पादुका आहेत. जिथे त्यांचा अखंड वास आहे. ते क्षेत्र केवळ अनुभूती घेऊनच लक्षात येते. पहिल्यांदा जेव्हा सेवा घडली तेव्हाच त्या सगळ्या गोष्टी पाहून हे नक्की समजायला लागले की आपण जो काही विचार करतो, जे काही संकट,जी काही चांगली वाईट घटना अनुभवतो त्याचा पक्का अभ्यास आणि त्याला तोंड देण्याची खरी ऊर्जा या ठिकाणावरून मिळते. 

      आपले दर्शन घेऊन झाले तरी मनाला समाधान/तृप्ती मिळत नाही,परत लवकरात लवकर यावे असे दर्शन घेऊन जेमतेम १० पायऱ्या उतरल्या वरच वाटते हे असे का होते हे देखील एक मोठे कोडे आहे?

मागील काही वर्षात मंदिरातील सुवास(अत्तर, धूप) पादुका, मूर्ती पाहून नकळत डोळ्यात पटकन पाणी यायला लागले आहे. कदाचित आईची ओढ लागलेल्या बाळाला आई तिच्या घट्ट मिठीत घेते तेव्हा दोघांच्या डोळ्यात पाणी येते न अगदी तसेच काहीसे होत आहे. अशीच भावना आपल्याला देखील तिथे गेल्यावर अवश्य येईल. कदाचित आपण ज्या दर्शनासाठी इतके कष्ट घेऊ शकलो आणि त्यांच्या कृपेनेच दर्शन घेऊ शकलो आहोत, त्यांच्याच मुळे ही भावना जागी होत असेल. आपल्यातील अहंकार,(सोप्या भाषेतील सांगायचे तर माज) एका क्षणात उतरवला जातो अशी जिवंत जागा दुसरी नसेल असेच वाटते. 

         गिरनाराची पहिली पायरी ते गुरु शिखर येथील पादुका याचे अंतर किंवा दिशा पाहिल्या तर लक्षात येते की आपण सुरुवात अशा ठिकाणावरून करतो जिथून जायचे कोठे आहे हे दिसत नाही किंवा गुरू शिखर दिसत नाही. फक्त मधले टप्पे दिसतात ( नेमिनाथ,गोमुख तीर्थ, अनेक लहान लहान मंदिरे) ते टप्पे पार करून चढून आल्यावर जेव्हा मध्यापेक्षा जास्त अंतर संपते (७,००० पायऱ्या) तेव्हा कुठे गुरूशिखर दिसते. हे सगळे आपल्या आयुष्यातील घटनांना समोर ठेवून केलेली योजना आहे असे वाटत नाही का? जन्माला आल्यावर शेवट हा निश्चित आहे. आयुष्याच्या मध्यावर आल्यावर मागील केलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवतात जसे पायऱ्या चढून वर आले की रात्रीच्या अंधारात गिरनार पायथ्या कडील फक्त light दिसत राहतात आणि पुढे पाहिले तर अजून बराच प्रवास करायचा बाकी आहे. हे लक्षात येते. गिरनार पर्वतावरील चढण, उतार हे सगळे आपल्या आयुष्याची वाटचाल दाखवणारे क्षेत्र आहे. आपल्या बुद्धीला याची सांगड घालता आली तर पटकन अनेक विषय लक्षात येतील...

        आपल्याला गुरूंकडून हिच शिकवण मिळते. आंतरिक ओढ जितकी जास्त तितके दर्शनाचा अनुभव जास्त हे देखील लक्षात यायला लागले. 

       खूप काही लिहिता येईल,खूप काही सांगता येईल पण याचा उद्देश एकच आहे. जास्तीत जास्त गुरुसेवा अखंड घडत राहावी. दर वर्षी किमान एकदा तरी त्या संजीवन पादुकांचे दर्शन घडत राहो.



जय गिरनारी

Sunday, March 30, 2025

एका तपाची सुरुवात बुक शेल्फ (Book Shelf)

 


#bookshelf 

#9011096250

गुढी पाडवा, सन 2014 मध्ये खूप विचार करून एक नवीन व्यवसाय सुरू केला. पूर्वी पुणे महानगर येथे शाखेचे काम करत असताना आम्ही दरवर्षी गणपतीत पाच दिवस राष्ट्रीय विचारांचे पुस्तक विक्री केंद्र चालवायचो. त्या केंद्राचा प्रमुख अशी जबाबदारी देखील सांभाळली आहे.

त्या आधी पारनेर येथे दर वर्षी होणाऱ्या उत्सवात पुस्तके विक्री केली होती...

असे दोन छोटेखानी अनुभव पाठीशी होते. ह्याच अनुषंगाने, शिक्षणाचा फायदा घेत व्यवसाय सुरू करू हे नक्की केले. पण आपल्या विचारांशी कोणतीच तडजोड करायचे नाही हे मनात अगदी पक्के केले होते आणि यातूनच स्वतःच्या आवडीचा व्यवसाय निवडला. 

 *बुक शेल्फ ( Book Shelf)*

*पुस्तक विक्री आणि प्रदर्शन* 

हे नाव देखील असेच सुचले. एकदा बाबांनी विचारले होते की तुला हे नाव कसे सुचले? या नावाबाबत माझ्या मनात एक संकल्पना होती ती म्हणजे लोक पुस्तक खरेदी करून घरी नेतील तेव्हा, जर त्यांना वाटेत किंवा घरी कोणी विचारले की पुस्तके कुठून आणली? तर ते वाचक म्हणतील की आम्ही *बुक शेल्फ* मधून आणले आहेत. त्यांच्या बुक शेल्फ मधून आपल्या घरातील बुक शेल्फ ( कपाट) मध्ये

इतके ते वाचकांना आपले आहे असेच वाटावे असा त्या मागे उद्देश होता.

वाचकांना हवे ते एक एक पुस्तक मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचे समाधान मी पाहिलेले आहे.... असे अनेक प्रसंग आहेत. तळेगाव दाभाडे मध्ये स्वतंत्र पुस्तक विक्री आणि प्रदर्शन असे कोणी केलेले नव्हते. त्यामुळे लोकांचा देखील प्रतिसाद उत्तम होता. आम्ही वर्षातून दोन प्रदर्शन करायला सुरुवात केली. बाल साहित्य प्रदर्शन मध्ये तर खूप लहान मुले त्यांचे आई वडील येऊन हवी तितकी पुस्तके सवलतीत घेऊन जायचे. 


पुढे हळू हळू व्यवसायात गती मिळाली आणि परगावी देखील पुस्तक विक्री आणि प्रदर्शन सुरू करता आले. आजही त्या त्या गावांचे वाचक अगदी संपर्कात आहेत. या पुस्तकाच्या व्यवसायात असंख्य लहान मुलांपासून ते अगदी आजोबांच्या वयातील सर्व वाचक भेटले. तेव्हा पासून त्यांच्या सोबत मैत्री, नाती तयार झाली ती आज पर्यंत तशीच टिकून आहेत. ह्याचे मात्र एक विक्रेता म्हणून कधी कधी नवल वाटते. प्रदर्शनातील तर असे अनेक अनुभव आहेत की ज्यावर लिखाण होऊ शकेल. कोविड काळात सगळ्याच व्यावसायिकांची वाताहत झाली त्यात आम्हाला देखील काही फटका बसला..... पण नियती असते. परत सुरुवात करता आली...यात घरांच्यांचा मोठा वाटा आहेच...तेव्हा वाचक म्हणून आपण देखील पाठीशी उभे राहिलात. त्यावेळी पहिले ऑनलाईन पुस्तक प्रदर्शन देखील घेतले.

आज पाहता पाहता *बुक शेल्फ* ला अकरा वर्षे पूर्ण होऊन एका तपाची सुरुवात झाली. आता साधने बदलली पण सेवा तशीच आहे. असेच काम होत राहो आणि वाचक देखील कायम सोबत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🏻



https://whatsapp.com/channel/0029VaxFfZq2f3EJPLxoxB2U

निखिल देविदास वझे 

9011096250

Thursday, January 18, 2024

विश्वासराव तुम्ही गेलात यावर विश्वास बसत नाहीये!

 


*विश्वासराव तुम्ही गेलात यावर विश्वास बसत नाहीये!!!*


कोणते वर्ष नीट आठवत नाहीये..पण कदाचित २००३ असेल असे वाटते आहे. विद्यार्थी दशेत होतो आणि त्यावेळी अक्षरशः विद्यार्थी विस्तारकाप्रमाणे संघ काम करत होतो. रूम होती शनिवार पेठ ( संघदृष्ट्या कसबा भाग )  मध्ये आणि संघ काम घडत होते नळ स्टॉप ( संघदृष्ट्या संभाजी भाग) 

'पंत ( श्रीधर पंत फडके) कसे आहात?' नेहमी प्रमाणे मोतीबाग कार्यायलात पंत दिसल्यावर मी प्रश्न विचारला.

पंतांनी मायेन हात धरत नेहमी प्रमाणे त्यांच्या कुर्त्याच्या खिशात हात घातला 'हे घे ' असे म्हणून माझ्या हातावर एक संत्रा गोळी ठेऊन बाकावर बसवत विचारले ..' कसा काय आलास? आज काय नवीन वाचलं?'

'काही विशेष नाही सहज आलो..जरा मधे रिकामा वेळ होता..म्हणून तुम्ही आहेत का, ते पाहायला आलो.' मी आपले त्यांना मोघम उत्तर दिले. आमच्या अशा अनेक विषयांवर गप्पा चालू होत्या तितक्यात एक उंच, सडपातळ, डोक्यावर अर्धे टक्कल, असे प्रचारक तिथे आले. मी त्यांना पहिल्यांदाच पाहिले होते. तितक्यात मोतीबागेतील चहापानाची वेळ झाली. त्यामुळे आम्ही तिघे पण चहा घेण्यासाठी अन्नपूर्णा (भोजन कक्ष) मध्ये गेलो..

चहा घेता घेता त्या प्रचारकांनी माझी सगळी चौकशी केली, मी कोण? कुठून आलो? इथे काय करतो? कुठले कॉलेज? मूळ गाव कुठेलं?..इत्यादी.. हे सगळे विचारून ते चहा न घेताच निघून गेले.

मला प्रश्न पडला की हेच मला चहा घेण्यासाठी घेऊन गेले आणि यांनी तो घेतला नाही आणि निघून गेले. 'पंत यांचा परिचय काय?' मी पंतांना ते मोतीबागेतून निघाल्यावर विचारले.

'अरे हे विश्वासराव ताम्हणकर, तुझ्याच परभणीला प्रचारक होते.तेव्हा तुझा जन्म पण झाला नसेल. उर्दूचा खूप अभ्यास आहे त्यांचा' पंतांनी त्यांच्या बद्दल माहिती दिली.

'मग त्यांनी माझे मूळ गाव हे सगळे विचारले तेव्हा ते का म्हणाले नाही की ते माझ्या गावी प्रचारक होते.' मी उदास पणे प्रश्न विचारला.

उत्तरा दाखल पतांनी फक्त स्मित हास्य केले.

मग मात्र अनेक दिवसांनी मी फक्त विश्वासराव ताम्हणकर यांनच भेटायला मोतीबाग आलो होतो. कारण पण तसेच होते..मला 'उर्दू शिकवता का?' हा प्रश्न मी विचारताच ते एकदम आनंदी झाले मला चांगले आठवते त्यांचे वाक्य ' का नाही, अरे तरुणांनी नाही शिकला तर आपण सावध कसे होणार, आणि हे काम कसे वाढणार, ये ये मी नक्की शिकवेन अजून दोन तीन मित्र पण घेऊन ये. ' त्यांची इतकी तयारी होती. त्यामुळे मी काही दिवसच जाऊ शकलो, कारण आवड होती पण CA चा अभ्यास आणि त्यामुळे त्यांची वेळ आणि माझी वेळ जुळून येईना झाली..आणि माझे त्यांच्या कडे शिकण्यासाठी जाणे कमी कमी होऊ लागले. सुरुवात झाली पण पुढे शिक्षण घडले नाही. ही खंत आज पण आहेच..

पण नियती कशी असते पहा. काही कारणासाठी CA अर्धवट राहिले पण मागील दोन वर्षांपासून सांस्कृतिक वार्तापत्रची जबाबदारी घेतली तशी विश्वासराव ताम्हणकर यांची परत भेट सहवास , गप्पा, चर्चा, परभणीच्या त्यांच्या जुन्या आठवणी हे सगळे त्यांच्या कडून ऐकायला मिळाले. त्यांचे थेट आणि स्पष्ट मते देखील समजली..वाचन, लिखाण, यांचे अनुभव ऐकायला मिळाले. ऑफिसच्या कामात कायम प्रवास करत असल्यामुळे त्यांची वारंवार भेट होत नव्हती, पण जेव्हा व्हायची तेव्हा ते नेहमी म्हणायचे ' अरे वा,  आज भेट झाली तुझी ' त्यांचा तो आत्मीय स्वर आज पण आठवतो आहे. जरा जड पण खार्ज्यातला आवाज कानात त्यांचा कायम कानोसा घेत राहील. सांस्कृतिक वार्तापत्र मधील ' मुस्लिम मनाचा कानोसा ' हे सदर उर्दू ते मराठी अनुवाद तेच करत असत.

माझी आई गेली तिच्या अंतिम काळात तिची सेवा घडली..त्यांना आईची अवस्था,माझी आणि बायकोची अवस्था,आमची ओढाताण याची पूर्ण कल्पना होती. आई गेल्यावर मी काही दिवसांनी ऑफिसला गेलो, तेव्हा त्यांनी मायेने पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले ' नशीबवान आहेस, आईची सेवा घडली, तुम्ही दोघांनी तिचे खूप केले हे मला समजले, पण तुमच्या भेटीला तेव्हा येता आले नाही. त्याचा राग मनात ठेऊ नकोस हं ' इतका सात्विक आणि संघभाव कसा काय येतो हाच त्यावेळी आपण मला प्रश्न पडला होता. 

असे प्रचारक आम्हाला पाहायला, अनुभवयाला मिळाले हे केवळ काहीतरी पूर्वजन्मचे संचित असेल म्हणून या ईश्वरी कार्याची एक भाग होता येत आहे.

त्यांच्या दीर्घ आजारात मला एकही दिवस त्यांना भेटायला, पाहायला जमले नाही कदचित त्यांची ती अवस्था मला सहन झाली नसती. त्यांचा सतेच, करारी आणि थेट तोंडावर बोलणारा चेहरा माझ्या कायम मनात पक्का रहावा म्हणूनच त्यांची शेवटची भेट घेता आली नसेल...आज पण त्यांच्या जाण्याची बातमी मला प्रवासात असतानाच समजली. हे काम अखंड चालू ठेवावे हीच त्यांची अंतिम इच्छा असेल म्हणून त्यांचे अंत्यदर्शन देखील मला घेता आले नाही. 

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कडून अखंड संघ काम आणि हिंदुत्वाचे काम करण्याची प्रेरणा मिळो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना..

निखिल देविदास वझे 🙏🏻

Thursday, April 27, 2023

सोन चाफ्याची फुलं...

    शनिवार पेठेतील जीर्ण वाड्यातून आम्ही खोली सोडण्याची वेळ आली...! आम्ही मित्रांनी मिळून नारायण पेठेत आधीच्या मानाने बरी... अगदी थ्री स्टार रूम  पाहिली ( तशी मित्रांनी पाहिली..... आम्ही फक्त मम्...म्हंटले ! आणि सगळे सामान हलवले.)

    आमच्या शनिवारातील मालकांना जाताना का होईना आमच्या बद्दल जरा जिव्हाळा निर्माण झाला होता. त्याच जिव्हाळ्या पोटी त्यांनी आम्ही या खोलीत यायच्या आधी जितकी खोली स्वच्छ नव्हती, त्यापेक्षा अनेक पटीने आमच्याकडून ती स्वच्छ करवून घेतली...आणि त्यांच्या नेहमीच्या खर्जातील आवाजात म्हणाले "तुमचे २ मित्र जास्तीचे राहून गेले." यावर आम्ही इतकेच सांगितले " हो ! पण त्या बदल्यात आम्ही खोली साफ केली आहे" 

असे "साफ" साफ सांगून आम्ही 'आयुष्य काटकसरीने, कमी साधने वापरून कसे जगायचे?' हे शिकवणारा वाडा सोडला.

    नवीन जागेत आलो आणि आमच्या खोलीची परत रूम (थ्री स्टार) झाली. त्यात काका (मालक) पण अतिशय मायेचे होते. त्यांची एकच अट होती! " तुम्ही अभ्यास करा, CA व्हा. माझे अपूर्ण राहिलेले स्वप्न तुम्ही पूर्ण करा". ते पण CA करत होते,पण पानशेतचे धरण फुटले आणि त्या पाण्यात त्यांची पुस्तके आणि स्वप्न दोन्ही वाहून गेले. असे प्रेमळ काका आम्हाला लाभले.

    हा पण तसा जुना बंगला होता, खाली एक ऑफिस, समोर आणि मागे दार असलेले काकांचे बंद घर, मागील बाजूला सुंदर पारिजातकाचे झाड (हे झाड मला खूप आवडायचे, श्रावणात त्याच्या फुलांचा सुंदर सडा पडत असे) आणि मागे एक खोली त्यात तीन जणांचे (काका,काकू,आणि त्यांचा मुलगा ) कुटुंब राहत असे.

                                        

    मागील बाजूनेच पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी १०-१२ पायऱ्या असलेला लोखंडी जिना होता..... एकदम मजबूत! मी मगाशी रूम ला थ्री स्टार म्हणालो कारण या रूम मध्ये एक नाही तर चक्क दोन सीलिंग पंखे होते. घर सोडल्या नंतर पहिल्यांदाच पंखा असलेली रूम मिळाली. तसेच ५ कॉट, २५-३० कप्पे असलेले मोठे लाकडी कपाट, २ मोठे लोखंडी रॅक,२ मोठे टेबल असे रूम मधील सामान देखील होते.कारण आमच्या आधीच्या खोलीत हे असे काहीच नव्हते. याच साठी मला ही रूम थ्री स्टार वाटायची.

    या पहिल्या मजल्यावर रूम मधे छतासाठी पत्रे होते, पण खाली रूम मध्ये गरमी होऊ नये म्हणून एक रचना केलेली होती....आताच्या फॉल सीलिंग सारखी. आम्ही रूम मध्ये रहायला आलो. सगळे नित्य आयुष्य सुरु झाले. आधी डेक्कन... मग शनिवार पेठ....आणि आता नारायण पेठ....त्यामुळे नवीन जागा, नवीन रस्ते, नवीन माणसं, फिरण्याचे नवनवीन ठिकाणं असे अनुभवण्यात काही दिवस गेले. आपल्या जगण्यात नित्य नूतनता किती आवश्यक असते हे त्यावेळी प्रकर्षाने जाणवले.


    या रुमच्या छतावर, शेजारच्यांच्या अंगणामधील सोनचाफ्याच्या झाडाच्या फांद्या पसरल्या होत्या. ते झाड जेव्हा फुलांनी गच्च भरलेले असे तेव्हा झाडांच्या हिरव्या हिरव्या पानां मधून डोकावणारी सोनचाफ्याची फुलं मनमोहक,आकर्षक दिसत...आणि त्यांचा सुगंध तर मनाला वेड लावत असे.

    मी सोनचाफा पहिल्यांदा पुण्यातच पाहिला. परभणीला कधीच हे सुवासिक फुलझाड पाहिलं नव्हतं. शनिवार पेठ मधील वाड्यात प्रत्यक्ष झाड पाहायला मिळाले. नाव, रंग आणि सुवासावरून हे फुल एकदम राजेशाही वाटायचे. या फुलाला किती बाजार भाव आहे हेही मला तेव्हा समजले. नगावर विक्री पाहून तरं मी अजून चकित झालो. या फुलांच्या अत्तराला देखील जगभरातून मोठी मागणी असते.

    आमच्या शनिवार पेठेतील वाड्यातही असेच झाड होते,पण त्याची फुलं तोडण्याचा आम्हाला अधिकार नव्हता, तेथील मालकांना ते आवडायचे नाही. पण इथे तसे नव्हते...या जागी फुले तोडण्याचे स्वातंत्र्य आम्हाला अनुभवायला मिळत होते. ही फुलं तोडण्यासाठी, मी एक दिवस येंनकेन प्रकारे पत्र्यावर चढलो, त्या पत्र्यावरून ती सगळी फुलं सहज हाताला यायला लागली, मग काय २५-३० फुलं पटापटा तोडली. आपल्या पूर्ण ओंजळीत ती सुंदर फुलं घेतली.पण आता छतावरून खाली जायचे कसे? दोन्ही हात तर फुलं सांभाळण्यात मग्न..., मग काय! शर्ट काढला, त्याचं एक छोटे गाठोड केलं आणि वरून खाली आलो. खाली आल्या आल्या तळमजल्यावरील काकूंना एक ओंजळ सोनचाफा दिला. त्यांनी लगेच तो देवाला वाहिला.

    या एका छोट्याशा फुलांच्या ओंजळी मुळे त्या घरातील व्यक्तींची ओळख तर झालीच आणि त्या घराशी नातेही जोडल्या गेले. रक्ताची नाती तर असतातच पण काही नाती त्या पलीकडची असतात याचा परत एकदा प्रत्यय आला. 

    या राजेशाही फुलांचा मोह स्वाभाविक आहे. आजही या सोनचाफ्याचा मोह मला सुटत नाही. प्रत्येक वेळी सोनचाफा पाहिला की तो विकत घेतला जातोच. कुठल्याही झाडावर फुलं दिसले की आपोआप तोडले जातेच. एक फुलं आपोआप देवाला वाहिले जातेच. कदाचित म्हणूनच हे देखणे आणि सुवासिक फुलं दत्त महाराज यांच्या पायी देखील आपोआप वाहिले जात असावे. 

    सुवर्ण मृगाचा मोह जसा सीतेला आवरला नाही....तसाच या सुवर्ण फुलाचा मोह मलाही काही केल्या आवरता येत नाही.

©निखिल देविदास वझे 

९०११०९६२५०

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation

   Time has come for us to leave the dilapidated mansion in Shaniwar Pethe...! We along with friends saw a good... even 3 star room at Narayan Peth ( as seen by friends..... we just said Mmm... ! and moved all the stuff.)

     At least our Saturday owners had a bit of a warm feeling about us. With the same cordiality, he cleaned the room from us many times more than it was before we came into it...and said in his usual raspy voice "Your 2 friends are left over." To this we simply said "Yes! But in return we have cleaned the room".

    By stating this "clean" we are asking 'how to live life frugally, using less tools?' This teacher left the castle.

     Came to the new place and our room was changed back to a room (three star). The uncle (owner) was also very dear. They had only one condition! "You study, become a CA. You fulfill my unfulfilled dream". He was also doing CA, but the Panshet dam burst and both his books and dreams were washed away in that water. We got such a loving uncle.

    It was the same old bungalow, an office downstairs, uncle's closed house with front and back doors, a beautiful Parijatka tree at the back (I loved this tree, its flowers bloomed beautifully in Shravan) and a room at the back for three people (uncle, Aunt, and her son) family lived.

    At the back there was an iron staircase with 10-12 steps leading to the first floor..... very sturdy! I called the Magashi room a three star because this room had not one but two ceiling fans. For the first time after leaving home, we got a room with a fan. Also there were 5 cots, a large wooden cupboard with 25-30 compartments, 2 large iron racks, 2 large tables in the room. Because our previous room had nothing like this. That's why I thought this room was three star.

     On this first floor there were sheets for the ceiling in the rooms, but a design was made to keep the heat out of the rooms below....like the fall ceiling of today. We came to stay in the room. All routine life started. First Deccan...then Shaniwar Peth....and now Narayan Peth....so spent few days experiencing new places, new roads, new people, new places to visit. At that time it was strongly felt that how much constant innovation is necessary in our life.

    On the ceiling of this room, the branches of the Sonchapha tree in the neighbor's yard were spread. When that tree was full of flowers, the golden flowers peeping through the green leaves of the trees looked charming, attractive...and their fragrance was mind-blowing.

     I saw Sonchafa for the first time in Pune. Parbhani had never seen this fragrant flower. A real tree was seen in the palace in Shaniwar Peth. From the name, color and fragrance, this flower seemed absolutely royal. I also realized then how much the market price of this flower is. I was even more surprised to see the sale on Nagara. This flower perfume is also in great demand from all over the world.

     There was a similar tree in our mansion in Shaniwar Peth, but we had no right to cut its flowers, the owners didn't like it. But that was not the case here...we got to experience the freedom of plucking flowers in this place. To cut these flowers, one day I climbed on the sheet in Yenken way, from that sheet all those flowers started coming easily, then cut about 25-30 flowers at a time. He took those beautiful flowers in full swing. But now how to go down from the roof? Both hands are busy taking care of flowers..., then what! Took off his shirt, tied it in a small knot and came down from above. She came down and gave the aunts on the ground floor a warm blanket. He immediately offered it to God.

     Due to this small flower arrangement, the persons of that house were identified and the relationship was also connected with that house. Once again it was confirmed that there are blood relations but some relations are beyond that.

    The fascination with these royal flowers is natural. Even today I can't get rid of the temptation of this gold. Every time Sonchafa is seen, it is bought. As soon as flowers are seen on any tree, it is automatically cut. A flower is automatically dedicated to God. Perhaps that is why these beautiful and fragrant flowers are automatically offered at the feet of Dutt Maharaj.

     Just as Sita could not stop the temptation of the golden deer, I too cannot stop the temptation of this golden flower.

©Nikhil Devidas Vaze

9011096250

Wednesday, April 12, 2023

आपण पण या समजाचे काही देणे लागतो/We also owe something to this understanding

 



  

      ही घटना तशी नेमकी किती सालातील आहे हे आता नीट आठवत नाही.पण प्रसंग आजही एकदम काल परवा घडला असाच आहे. तो दिवस होता १४ एप्रिल, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती. 

    शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळी एकदम निवांत उठलो असेन. घरात आज सगळ्यांनाच सुट्टी असल्यामुळे काहीच गडबड नव्हती, त्यावेळी फक्त पेपर आणि दूरदर्शन इतकेच असल्यामुळे सकाळी दात घासत घासत पेपर पाहत होतो. 

"राजू अटप पटपट" आजीच्या अतून आवाज आला

"होsss" तोंडातील ब्रश तसात ठेऊन आजीला उत्तर दिले

"झाले का रे दात घासून?" आता आईचा आवाज आला

बापरे आज एकदम दोघींनी आवाज दिला म्हणजे ? मनात प्रश्न पडतच तोंड धुतले

"झाले, काय घाई आहे आज. सुट्टीच तर आहे की?" कृष्णाने निवांत प्रश्न केला.

"अरे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून सगळ्यांना सुट्टी आहे याचा अर्थ उशीर करायचा असा होत नाही"बाबांची पूजा आता संपत आलीच होती त्यामुळे ते पण कृष्णाला समजवत होते.

"मग काय झाले? त्यात काय वेगळे?" कृष्णा वैतागून म्हणाला

"बाबसाहेब यांचे कार्य तुला आता नाही समजणार, मोठा झाला की समजेल तुला" आई म्हणाली... आणि विषय अर्धवट सुटला


"अगं अगं बातमी समजली का?" बाबा गडबडीत बोलत घरात येत म्हणत आले. "कृष्णा कुठे आहे? त्याचे मित्र कुठे आहेत?"

काळजीने प्रश्न विचारता बाबा अंगण ओलांडत आत आले.

"काय झाले? इतकी काय गडबड? काय झाले आहे?" आईने बाबांना विचारले. 

"राजू घरातच आहे की, जाईल आता मित्रांसोबत खेळायला अजून बराच उजेड आहे."आजीने जुन्या काळातील घड्याळ वापरून बाबांना सांगितले.

"आज नका पाठवू त्याला बाहेर. हवे तर अंगणात खेळायला सांगा सगळ्यांना" बाबा काही तरी लपवत म्हणाले.

"अरे काय झाले ते तर सांग आधी" आजी बाबांना विचारती झाली.

"आई, आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक सुरू झाली... ती मिरवणूक पुढे पुढे सरकत गावातील सरकारी मैदान या भागात आली आणि...एक मोठा आवाज झाला...वाटले की तो कुढल्या तरी स्पोटाचा असेल पण तो ट्रकचा आवाज निघाला...या ट्रकवर अनेक लहान मुले, स्त्रिया होते आणि ट्रकची डिझेलचा टाकी आपोआप फुटली,कदाचित उन्ह खूप असेल किंवा अन्य काही कारण असेल पण ते अजून समजले नाहीये. गावात सगळीकडे पळापळ, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि काही प्रमाणात दंगल असे सुरू झाली आहे. म्हणून काळजीने घरात निरोप द्यायला आलो. मी परत जाणार आहे. काही मदत लागली तर..." बाबा आले आणि निरोप देवून लगेच घटनास्थळी निघाले देखील... आजी त्यांना अडवत असून देखील ते निघाले हे लहान कृष्णाने भिंती अडून पाहिले होते.




    काय झाले? कशामुळे झाले याचा नीट अंदाज काही त्याला येत नव्हता पण भीषण आणि भीतीदायक काहीतरी मोठ्ठे झाले हे त्याच्या लक्षात आले. 

    दुसऱ्यादिवशी पेपर मध्ये काल झालेली घटना त्याचे फोटो आले तेव्हा सविस्तर बातमी सगळ्यांनी एकत्रित वाचली... यात काहींना त्यांचा जीव गमवावा लागला, तर काहींना जन्मभराचे अपंगत्व आले. घटना भयावह होती आणि दुःखत पण होती. माणसांनी पूर्ण गच्च भरलेला ट्रक पेटला होता. जीव वाचवण्यासाठी चेंगराचेंगरी झाली होती... अनेक जणांनी लगेच सेवाकार्य सुरू केले होते.त्यात रा.स्व.संघ अग्रणी होताच...

    लहान वयात संघ शाखा, घरातील संस्कार आणि पुढे संघकामाची गोडी यामुळे समरसता, सर्व समाजाचा एकरूपभाव सुखात दुःखात मदतीला धावून जाणे हे लहान असताना बाबांनी कृतीतून दाखवून दिलेला संस्कार तसेच संघाचा एकत्रितपणे समाजाचे काम करण्याची मानसिक शारीरिक तयारी हे गुण आपोआप कृष्णा यायला सुरुवात होऊ लागली..आपण पण या समजाचे काही देणे लागतो ही भावना लहान वयातच कळली. 

    या तून हेच नक्की लक्षात येईल की सगळ्यांनी आपल्या मनात कायम समजासाठी काम करावे ही भावना ठेवावी. हाच यामागचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

( क्रमशः)

© निखिल देविदास वझे

९०११०९६२५०

________________________________________________

English Translation

I don't remember exactly how many years ago this incident happened. But the incident still seems like it happened yesterday. That day was April 14, Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar Jayanti.

I would have woken up very relaxed in the morning as it was a school holiday. There was no disturbance in the house as everyone was on holiday today, at that time there was only paper and television, so in the morning I watched the paper while brushing my teeth.

"Raju atap patpat" came the voice of the grandmother

"Ho " answered the grandmother, keeping the brush in her mouth

"Did you brush your teeth?" Now mother's voice came

Bapre, today both of them gave their voice? He washed his face as the question came to his mind

"Done, what a rush today. Is it a holiday or not?" Krishna asked calmly.

"Oh, today is a holiday for Dr. Babasaheb Ambedkar's birth anniversary, it doesn't mean to delay" Baba's worship was about to end, so he was explaining to Krishna.

"So what happened? What's different about it?" Krishna said annoyed

"You will not understand Babasaheb's work now, you will understand when you grow up" said mother... and the topic was partially solved


"Hey guys, did you get the news?" Baba came into the house talking in confusion. "Where is Krishna? Where are his friends?"

Baba crossed the courtyard and came in, asking questions with concern.

"What's wrong? What's all the fuss? What's wrong?" Mother asked father.

"If Raju is at home, it's still light enough to play with friends." Grandma told Baba using the old time clock.

"Don't send him out today. If you want, ask everyone to play in the yard," said Dad hiding something.

"Oh tell me what happened first" Aji asked Baba.

"Mother, today the birth anniversary procession of Dr. Babasaheb Ambedkar started... The procession moved forward and reached the area of ​​the government ground in the village and... there was a loud noise... I thought it would be a rumble but it turned out to be the sound of a truck. ..there were many children, women on this truck and the diesel tank of the truck burst spontaneously, maybe it was too hot or some other reason but it is not yet understood. All over the village there is a stampede, fire engines and some riots. So worried. To say goodbye to the housecame I'm going back. If you need any help..." Baba came and immediately left for the spot after saying goodbye... Little Krishna watched from the walls as he left even though his grandmother was stopping him.

what happened He couldn't quite figure out what it was but he could sense a feeling and something bigger.

On the second day, when the photos of yesterday's incident came in the paper, everyone read the detailed news together... In this some lost their lives, some were disabled for life. The incident was horrifying and sad. A truck full of people was on fire

There was a stampede to save lives...many immediately began to serve. As soon as Rashtriya Swayam Sangh took the lead in it...

Sangh Shakha at an early age, family rituals and later the taste of Sangh work, harmony, the unity of the whole community, running to help in times of happiness and sorrows are the Sanskars demonstrated by Baba in action at a young age, as well as the mental and physical inculcation of the Sangh to work together in the society.

This quality of preparation automatically started coming to Krishna.. We also got the feeling that we owe something to this understanding at an early age.

From this it will be clearly realized that everyone should always keep the feeling of working for understanding in their hearts. This is the sincere effort.

(respectively)

©Nikhil Devidas Vaze

9011096250

Thursday, August 25, 2022

"आज का तो बाबा ने दिया हैं, कल का कल देखेंगे?"



        हाराजांचे एकदम स्ट्राँग बोलावणे आल्यामुळे त्यांच्या इच्छेने आणि कृपेने परिक्रमा पूर्ण झालीच होती. आता रात्री गिरनार पर्वत चढून जायचा आणि गुरू पादुकांचे दर्शन घ्यायचे याच गोष्टीचा मनाने ध्यास घेतला होता.(https://muktalikhan2021.blogspot.com/2022/01/Maharajanche-Bolavane-Aale-aahe.html)

    आपली इच्छा शक्ती आणि महत्वाचे म्हणजे समर्पण हे पक्के असेल तर बाकी (ते) महाराज आपल्याकडून सेवा करवून घेतात. या बाबत या पूर्वीच सविस्तर लिहिले आहे.

    आम्ही सगळे गिरनार परिक्रमा, गुरुशिखर दर्शन घेऊन दुपारी पायथ्याला परत आलो अगदी काहीच वेळ विश्रांती केली आणि सर्व साहित्य, बॅग अवरून लगेच स्टेशनला जायला निघालो.

    एकतर गिरनार पायथा ते जुनागड स्टेशनला जायला किमान तीस मिनिटे तरी लागतात. त्यामुळे गाडीच्या वेळे आधी जाणे सोईचे होते. उगाच उशीर करणे आणि मग गडबड करणे हा आमच्या कोणानाच स्वभाव नाही. त्यामुळे जरा लवकरच पोहचू या हेतूनं आम्ही निघालो.

"हे लो भाई" मी रिक्षाचे पैसे त्या रिक्षचालकांना दिले

"जय गिरनारी, फिर आना भाईजी" तो पण पैसे घेत घेत म्हणाला.

"जय गिरनारी" आम्ही सगळ्यांनी त्याला हात वर करून प्रतिसाद दिला.

    मला काही काही गावं, स्टेशन, बस स्टँड यांच्या कडे पाहिले की असे वाटते की, त्यांना बहुदा ओळखच तेथील तीर्थ क्षेत्र किंवा प्रसिद्ध वास्तू यांच्या मुळे मिळते. उदा, श्री विठ्ठल - पंढरपूर, योगेश्वरी देवी- अंबेजोगाई अगदी तसेच जुनागडचे पण आहे. त्यामुळे प्रवासी दिसले, म्हणजे गावातील लोक गिरनारला येणाऱ्या भाविकांना आपोआप ओळखतात आणि स्वतःहून "जय गिरनार" असा उद्घोष करतात.

    आम्ही गाडीच्या वेळेआधी आल्यामुळे स्टेशन बाहेरच थांबलो होतो. तशी यावेळी गर्दी नव्हतीच कारण गाडीला अजून वेळ ही होता.

    आम्ही सगळे एका भल्या मोठ्या कडुलिंबाच्या झाडाच्या 

    सावलीत उभे होतो.सगळेच परिक्रमा करून आणि गिरनार पर्वत चढून, गुरुशिखराचे दर्शन घेऊन आलो होतो. तरी आता परतीचा प्रवास याचे वेध लागले होते. आम्ही उभ्या उभ्या गप्पा करत होतो तितक्यात मला अचानक बिडीचा उग्र दर्प आला, खरं तर मला सिगरेट, दारू, बिडी यांचे दर्प सहन होत नाहीत. म्हणून रागानेच आजूबाजूला पाहू लागलो.

"क्या ढूंढ रहा हैं, बच्चे?" असा असल्ल हिंदीत साद आला.

मी त्या आवाजाच्या कडे वळलो.

"काहा देख रहा है बच्चे?" परत आवाज आला मागे वळून झाडाला उजवीकडे वळसा घालून मी पुढे गेलो तर एक वयोवृद्ध साधू म्हणा किंवा संन्यासी निवांत जमिनीवर बसले होते. शरीर अतिशय कृश, रंग तांबूस जणू काही उन्हाने रापलेले शरीर दिसावे तसा होता, कंबरेला एक मांडी पर्यंत येईल इतका पंचा गुडळलेला, तोही अतिशय अस्वच्छ, वरचे शरीर पूर्ण उघडे, खपाटीला गेलेले पोट, छातीचा अगदी पिंजरा झालेला, गळ्यात अनेक माळा, त्यात रुद्राक्ष माळा जास्त, गाल पण अगदी आत गेलेले, काहीच दात शिल्लक असतील असा तोंडावळा आणि पांढरी दाढी. डोक्यावर वाढलेले असता व्यस्त पांढरे केस त्याचा छोटा बुचडा असे ते साधू आपल्या उजव्या हातात बिडी चिलमी सारखी धरून पित बसले होते.

    त्यांनीच मला आवाज दिला होता, मी त्यांच्या कडे हळू हळू पावल टाकत होतो. तसे ते माझ्या कडे बघून गालात हसत हसत म्हणाले

"जय गिरनारी बाबाss"

"जय गिरनारी" मी पण हात वर करून उद्घोष केला.

"क्या नाम है बच्चे, सब बाबा का है और सब बाबा के लिये चालता है" त्यांच्या उजव्या हातातील विडी जमिनीत विझवत ते बोलत होते.

    खरं तर त्यांचे बोलणे माझ्या पार डोक्यावरून जात होते , पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यात मज्जा येत होती. त्यांचे असे अगम्य आणि आपल्याच भाव विश्वात गुतून गेलेले भान हे माझ्या साठी त्यांच्या बाबत कुतूहल वाढवत होते.

"आपका नाम क्या है, बाबा?, एक काहावत है, नदी को उसका मुल स्थान और संन्यासी को उसका कुल नही पूछते, लेकीन फिर भी पूछ रहा हू" 

"नाम मैं क्या है बच्चे, सब तो कर्म ही होता है, जो कर्म करोगे वही पावोगे" असा कर्माचा सिद्धांत सांगत माझ्या कडे मायेने पाहत ते बोलत होते.

    त्यांच्या आणि माझ्यात बरेच संभाषण झाले, गाडीला वेळ होताच त्यामुळे मी अनेक प्रश्न विचारले त्यावर इतकेच समजले की त्यांनी खूप तरुण वयात संन्यास घेतला आणि भारत भ्रमण करत आता दर वर्षी गिरनार परिक्रमा करत होते.

    आमचे बोलणे सुरू होतेच, तेवढयात स्टेशनचा परिसर स्वच्छ करणाऱ्या एक बाई लांब सडक झाडू घेऊन जमीन झाडत झाडत आमच्या दिशेला येताना दिसली.

"लो बाबा..." तीने आपला हात पुढे करत कागदात गुंडाळून काही तरी त्यांच्या हातात देऊ केले.

"लाss बेटाss" अस म्हणत त्यांनी उजव्या हातात तो कागदी पुडा घेतला. ती महिला तो पुडा देऊन वळली तितक्यात बाबांनी तिला परत आवाज दिला

"रुको बेटी, ये लोsss" असे म्हणत त्यांनी तिला एक विसची नोट पुढे सरकवली,

"नहीं नहीं बाबा, ये नही चाहिए, रखलो आप" असे म्हणत त्या बाईंनी पैसे घेण्याल्या नकार दिला.

"अरे बेटा, ले ले, आज का तो बाबा ने दिया हैं, कल का कल देखेंगे? आज बाबाने दिया हैं कल का बाबा ही जाने!!!" वर आकाशाकडे पाहत ते म्हणाले आणि पुढे म्हणू लागले "आज तो हात मैं पैसे है, तो क्यू मोफत खाऊ, कल अगर नहीं होगा, तो देखेंगे?"

    खरचं त्यांच्या या दोन वाक्यात किती आशय होता. पैसे आवश्यक आहेतच, पण किती? हे पण तपासले पाहिजे. मी त्यांचा निरोप घेऊन मित्रांकडे आलो आणि विचार करू लागलो. देणारे ' ते ' च, परत घेणारे ही ' ते ' च,मग माझे किंवा आपले काय? काही काही नाही!!! आपल्याला उगाच असे वाटत असते की हे मी मिळवले, माझ्या मुळे हे झाले, वैगरे वैगरे....पण सत्य हेच आहे 

"आज का तो बाबा ने दिया हैं, कल का कल देखेंगे?"

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०




Friday, August 19, 2022

"छत्री शिरा"

             

 कृष्णाची काही महिन्यांपूर्वीच मुंज झाली होती (https://muktalikhan2021.blogspot.com/2021/06/Shankar.html) पण बाबांच्या म्हणण्यानुसार अजुन त्याचा अल्लड आणि खोडकर स्वभाव काही कमी होत नव्हता. तो पूर्वी सारखाच गडबड गोंधळ करतच होता.

"अरे दामोदर, होईल तो शांत हळू हळू... अजून मुंज होऊन सहा महिने पण झाले नाहीयेत, आहे त्याला समज, होईल तो शांत" आजीने नेहमी प्रमाणे कृष्णाला पोटाशी घेत म्हटलं.

"हो ग, मला ते कळत नाही का आई? पण याने आता जरा तरी शांत व्हायला हवे. तरी बरं घरा बाहेरचे लोक अजून यांच्या काही खोड्या घरा पर्यंत घेऊन आले नाहीयेत" बाबा जरा वैतागून म्हणाले.

    आजी मागं उभा राहून कृष्णा हे सगळे ऐकत होता. त्याला नीट समजेना? म्हणजे, मुंज झाली की असा काय बदल होतो आणि का बदल होतो? हे त्याच्या लक्षात येत नव्हते.

"कृष्णा, बाबा काय म्हणतायत हे येतय का लक्षात?" आता आई पण या चर्चेत सहभागी झाली.

    आता मात्र कृष्णाने आपली मान सकारात्मक ( म्हणजे आपण हो म्हणाताना जशी हलवतो तशी) हलवली. पण त्याच्या मनात अनेक प्रश्न होतेच. पण एकदाची मान हवी तशी हलल्यामुळे सर्वांचे समाधान झाले.

    यातच आणखीन महिने गेले. आता पावसाळी दिवस सुरू झाले. सगळीकडे पाऊस सुरू झाला. कधी कधी तर रात्र रात्र भर पाऊस पडू लागला होता. पण पावसाला पण मुलांची अडचण समजत असावी. बरोबर नळ बंद केल्यासारखा सकाळी शाळेत जायच्या वेळी पाऊस बंद व्हायचा आणि शाळेत प्रार्थना झाली की, मुलं वर्गात बसले म्हणजे काही वेळाने परत सुरू व्हायचा. या पावसाची गंमतच होती.

    

    मधल्या सुट्टीत पोरं शाळेजवळ तयार झालेल्या पाण्याच्या डबक्यात वहीच्या मागील पानातील कागद फाटून मनसोक्त नावा करून त्यात सोडत... पण एक दिवस शेवटचा तास सुरू होता आणि पावसाचा जोर अचानक वाढला... पाहता पाहता रस्त्यावरून अगदी पायाच्या घोट्या एवढे पाणी वाहू लागले. नाले ओसंडून वाहू लागले. शाळेच्या मैदानात अगदी गुडघ्या इतके पाणी साढले, पावसाचा जोर कायम होता. दुपारी शाळा सुटायची वेळ जवळ येत होती, पण पाऊस काही केल्या कमी होत नव्हता. आता मात्र शिक्षक, विद्यार्थी जरा धास्तावले होते. शाळा सुटल्यावर सगळे घरी कसे जाणार हा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला. 

"सर्व शिक्षकांनी ताबडतोब मुख्याध्यापक खोलीत यावेss...सर्व शिक्षकांनी ताबडतोब मुख्याध्यापक खोलीत यावे. कोणत्याही वर्गातील मुलांनी गोंधळ करू नये..." अशा माईक वरून सूचना यायला लागल्या. 

    पण पोरंच ती...वर्गात शिक्षक नाही म्हंटले की मग काय? गप्प बसणार होय?झाला लगेच दंगा, मस्ती, चेष्टा, आरडाओरडा सुरू!!! काही वेळ सगळ्याच वर्गात असेच सुरू होते. 

"काय गोंधळ सुरू आहे रे?" चौधरी सर वर्गात येत म्हणाले. 

    खरं तर हे सर वर्गातील सगळ्यांचे आवडते होते. त्यामुळे सगळी मुलं पटकन शांत झाली आणि सर काय म्हणतायत त्याच्या कडे लक्ष देऊ लागली. 

                            


"मुलांनो, पटापट एक एक वहितील पान काढा, आणि त्याची सुंदर नाव तयार करा. सगळ्या नावा तयार करून झाल्या की माझ्या टेबल वर आणून द्या, त्यातील सर्वात छान नाव जो तयार करील त्याचा नंबर येईल" चौधरी सर मुलांकडे पाहत सांगत होते. 

    हे सर नेहमी लहान मुलांना खेळवत खेळवत, गोष्टी सांगत शिकवायचे, ते कृष्णाच्या वर्गाला गणित विषय शिकवत असायचे.

    इकडे मुलं मन लावून नावा करण्यात गुंतले होते कारण चांगली नाव तयार झाली तरच नंबर मिळणार होता. एक एक नाव तयार होत होती आणि सगळ्यांचे लक्ष कोणाचा नंबर येईल कडे लागले होते. त्यामुळे शाळा सुटायची वेळ कधीच टळून गेली हे त्यांच्या ध्यानात पण आले नाही. 

"चला, झाल्या का सगळ्या नावा? कोणी नाही न राहिले आता?"सरांनी प्रश्न विचारला,

एका सुरात सगळे ओरडले "नाही सरssss ,झाल्या"

    टेबल वरच्या सगळ्या नावा एक एक उचलून सर पाहू लागले . त्यांनी त्या सगळ्या नावांमधून एक नाव उचलली,

                                        

" ही कोणी केली आहे ?" हातावर उचलून सरांनी ती नाव सगळ्यांना दाखवत प्रश्न केला.

"सर,ती माझी आहे" कृष्णा उभा होत म्हणाला.

"शाब्बासsss, सुरेख!!! मन लावून केली आहेस नाव. कोणी शिकवली तुला?"

"सर, आई ने" 

"छान, आता या नावेत बसून मी घरी जाणार आहे.बाहेर पाहिले न किती पाणी साठले आहे ते? नावेत बसून पेनाने ती वल्हवत, डोक्यावर सायकल ठेवून मी आता घरी जाणार आहे." गमतीत पण तितकेच चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवत सर बोलत होते आणि मुलेही ते ऐकत होती.

    तिकडे पाऊसही काही प्रमाणात कमी होत होता. मुख्याध्यापक सरांनी सर्व शिक्षकांना बोलावून हेच सागितले होते की पाऊस कमी होई पर्यंत जरा मुलाला गुंतवून ठेवा. त्यानुसार चौधरी सरांनी छान जबाबदारी घेतली होती. पाऊस थोडा कमी झाल्यानंतर सरांनी सांगितले

" बाहेर पाऊस अजून थांबला नाही....तुम्ही घरी जाईतो तुमचे दप्तर भिजेल त्यामुळे ज्यांना आपले दप्तर वर्गात ठेऊन घरी जायचे असेल त्यांनी घरी जावे. दप्तर वर्गात आपल्याच बाकावर ठेऊन जाता येईल"     

    त्यानुसार वर्गातील बऱ्याच मुलांनी दप्तर बाकावर ठेवले. पावसाचा जोर अचानक इतका वाढेल हे कोणाच्या ध्यानी मनी नसल्यामुळे बरेच मुलं, शिक्षक यांनी छत्री,रेनकोट काहीच सोबत आणले नव्हते. 

    कृष्णा देखील दप्तर बाकावर ठेऊन मित्रांसोबत वर्गातून बाहेर पडला...तसा पाऊस सुरूच होता , फक्त जोर कमी झाला होता. शाळेच्या अंगणात तर तळे साठले होते. त्यामधून उंच मुलं सहज निघू शकले, पण कृष्णा आणि त्याच्या उंचीच्या मुलांना जवळजवळ कंबरे इतक्या पाण्यातून वाट काढत शाळेच्या गेट बाहेर पडावे लागले.  आपल्याला चक्क शिक्षकांनी पावसात भिजायला परवानगी दिली म्हटल्यावर सगळेच आनंदात होते. सगळे वाट काढत गेट बाहेर पडले आणि भिजत घरी निघाले.

    इकडे कृष्णाची घरी यायची वेळ कधीच टळून गेल्यामुळे, आजी आणि आई काळजीत पडल्या होत्या ... बाबा तर अजून ही ऑफिस मध्येच होते. 

"आई, कृष्णा अजून कसा हो आला नाहीये?" आईचे घराचे दार उघडत पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत आजीला प्रश्न केला.

    पण उत्तरा दाखल आजीने फक्त हातातील जप माळेतील एक मणि खाली खेचत देवाच्या फोटो कडे पाहिले.

आई दार लावून घरात आली तसा घराच्या गेट वर ओलाचींब झालेला कृष्णा आवाज देतच घराच्या अंगात प्रवेश करत म्हणाला

"आईssआलोss मी, आजीssआलोss मी "

"काय रे किती भिजला आहेस, कशाला आलास भिजत? आणि दप्तर कुठे आहे?"आईने रागावत विचारले.

"अग,आधी डोकं पुस त्याचे," आजी काळजीने म्हणाली.

"चल लवकर घरात..."आई त्याला घरात घेऊन आली आणि त्यांचे अंग पुसत म्हणाली.

    आवरता आवरता कृष्णाने शाळेतील सर्व घटना सविस्तर दोघींना सांगितली... "अगं आई म्हणून मी माझे दप्तर वर्गात बाकावर ठेवले,नाही तर सगळे दप्तर भिजले असते"

    दुपारचे जेवण झाले तरी पावसाचा जोर कायम होताच. आता घराच्या अंगणात देखील पाणी साठायला सुरुवात झाली होती. अंगणातील झाडांचा पाला, गवत,चिखल पाण्यासोबत वाहून येत होता. त्यामुळे अंगणातील पाणी वाहून जावे म्हणून तयार केलेले चर आणि त्याचे पन्हाळे बंद होत होते. आता त्यातील अडकलेला कचरा बाहेर काढणे आवश्यक झाले.

"अगं, अंगणात पाणी बघ किती साठले आहे" आजी आईला पाणी दाखवत म्हणाली

"आई मी काढून येऊ का तो गाळ" कृष्णा उत्साहात म्हणाला. त्याला तेवढीच पाण्यात मस्ती करायची संधी मिळणार होती.

"जमेल का तुला?" आईने काळजी पोटी विचारणा केली.

"हो जमेल गं"

तितक्यात आजीने एक जुनी छत्री त्याच्या हातात दिली.

"ही छत्री ने राजू सोबत, म्हणजे जास्त भिजणार नाहीस" 

छत्री एकदम जुन्या स्टाईल ची होती आणि छत्री वर काही तरी पुसटशी अक्षरे होती..... ना....द....

"आजी हे काय लिहलेले आहे ग?" कृष्णाने अक्षरे पाहत विचारले. 

"सांगते, पण जा पटकन..... अंगण रिकामे करून ये, म्हणजे चरात अडकलेला गाळ काढून ये"     

    आता संध्याकाळचे पाच वाजत आले होते. कृष्णा चटकन पाण्यात उतरला, त्याने आपली मान डाव्या बाजूला वाकवून डाव्या खांद्याच्या आधाराने छत्री धरून ठेवली होती, त्यामुळे ती जरा डावीकडे कललेली दिसत होती, त्यामुळे त्याला उजवीकडून थोडा पाऊस लागत होताच पण फक्त डोकं मात्र भिजत नव्हते. छत्री पण अगदी जुन्या स्टाईल ची होती, दांडा वाकवून इंग्रजी मधील जे ( J )अक्षर असावा तसा, छत्रीच्या काड्या अगदी स्टीलच्या आणि छत्रीचा वरच्या टोकाला टोकदार असे टोक. अशी छत्री घेऊन कृष्णा पटपट काम करत होता.

    गाळ आणि साठलेला कचरा काढल्यामुळे पाण्याचा निचरा सुरू झाला तसे अंगणात साठलेले पाणी भराभर ओसरू लागले. काम संपवून अर्धवट भिजत धावत कृष्णा घरात आला.

"शाब्बास..., आज बाबा आले की सांगेन मी.... तू काम केलं ते, होतो आहे तो शांत आणि समजूतदार आमचा कृष्णा" आई कृष्णाला घरात येता येता म्हणाली.

"डोकं पुस आणि खूप भिजला असशील तर कपडे पण बदलून घे" आजी ने डोक्यावर हात फिरवत कृष्णाच्या हातातील छत्री घेत सूचना केली. 

                                    


    कृष्णा कपडे बदलायला घरात पळाला तसे आजीने तिच्या हातातील छत्री उघडी करून कोरडी होण्यासाठी जमिनीवर ठेवली. ती कृष्णाच्या आजोबांची छत्री होती आणि त्यांच्या नावाची आद्याक्षरे त्यावर लिहलेली होती. पूर्वी जवळजवळ सगळ्यांकडेच एक सारख्या छत्र्या असल्यामुळे कदाचित असे लिहणे सोईचे होत असावे.

    कृष्णा कपडे बदलून बाहेरच्या खोलीत आला तसा आईने त्याच्या हातात गरमागरम शिऱ्याची प्लेट दिली.

"अरेsss वाs,शिरा...! मला भूक लागलीच होती" कृष्णा हातातील प्लेट कडे पाहत म्हणाला.

"अरे होssआम्हा दोघींना पण वाटलेच होते की तुला भूक लागली असेल."

कृष्णाला आजीने उघडी करून ठेवलेली छत्री दिसली तसा तो त्या छत्रीच्या आडोश्याला जाऊन बसला. 

"चला आज मी छत्री शिरा खातो...म्हणजे छत्रीतील शिरा फस्त करतो"

त्याचा तो अल्लड आणि आनंदी चेहरा पाहून आजी आणि आई दोघीही म्हणाल्या

" खाss खाss छत्री शिरा खाsss"आणि तिघेही हसू लागले.

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation

Krishna had already had a stroke a few months back (https://muktalikhan2021.blogspot.com/2021/06/Shankar.html) but according to Baba, his mischievous and mischievous nature was still not diminishing. He was making the same fuss as before.

"Oh Damodar, he will calm down slowly... It's not even been six months since he got sick, he understands, he will calm down" Grandma said as usual, holding Krishna on her stomach.

"Yes, I don't understand that, mother? But it should calm down a bit now. Well, people outside the house haven't brought some of their pranks to the house yet," said Dad a little annoyed.

    Aji was standing behind and Krishna was listening to all this. Does he not understand well? That is, what changes when the mujja occurs and why does it change? He did not notice it.

"Krishna, do you understand what Baba is saying?" Now mother also participated in this discussion.

    Now, however, Krishna moved his neck in a positive (i.e. the way we move when we say yes). But he had many questions in his mind. But once the neck moved as it should, everyone was satisfied.

    More months passed. Now the rainy days have started. It started raining everywhere. Sometimes it started raining all night long. But rain should also understand the problem of children. Just like turning off a faucet, the rain would stop in the morning while going to school and after the school prayers, the children would sit in the classroom and it would start again after some time. This rain was fun.
"Krishna, do you understand what Baba is saying?" Now mother also participated in this discussion.

    Now, however, Krishna moved his neck in a positive (i.e. the way we move when we say yes). But he had many questions in his mind. But once the neck moved as it should, everyone was satisfied.

    More months passed. Now the rainy days have started. It started raining everywhere. Sometimes it started raining all night long. But rain should also understand the problem of children. Just like turning off the faucet, the rain would stop in the morning while going to school and after the school prayers, the children would sit in the classroom and it would start again after some time. This rain was fun.

    During the mid-term break, the boys used to tear the paper from the back page of the notebook and leave it in the pool of water formed near the school. But one day, the last class was starting and the rain suddenly increased. The streams began to overflow. The school grounds were knee-deep in water, the rain continued. It was getting close to the time to leave school in the afternoon, but the rain didn't stop. But now the teachers and students were a bit scared. The question of how everyone will go home after the school ended appeared on everyone's face.

"All teachers should come to the principal's room immediately...All teachers should come to the principal's room immediately. Children of any class should not disturb..." the instructions started coming from the mic.

    But what if the boys say that she is not a teacher in the class? Are you going to be silent? Immediately riots, fun, jokes, shouting started!!! Some time it starts like this in all the classes.
"What's the fuss?" Choudhary sir came to class and said.

    In fact this sir was everyone's favorite in the class. So all the children quickly calmed down and started paying attention to what sir was saying.

"Boys, take a page from the book one by one, and create his beautiful name. Once all the names are ready, bring them to my table, the one who creates the most beautiful name will get the number" Chaudhary sir was saying looking at the children.

    This sir used to teach children by playing and telling stories, he used to teach mathematics to Krishna's class.

    Here the children were engaged in naming with their hearts because only if a good name was formed, the number would be given. One by one name was being prepared and everyone's attention was on whose number would come. Therefore, they did not even notice that the time to leave school never passed.

"Come on, are all the names gone? No one is left now?" Sir asked the question,

Everyone shouted in unison "No sirssss, it's done"

    Sir started looking at all the names on the table one by one. He picked one name out of all those names,

"Who did this?" Taking it on his hand, sir showed that name to everyone and questioned.

"Sir, she is mine" said Krishna standing up.

"Shabbass  you have done the name with your heart. Who taught you?"

"Sir, by mother"

"Good, now I will go home in this boat. How much water has accumulated without looking outside? I will go home now sitting in the boat, touching it with a pen, with a bicycle on my head." Sir was talking jokingly but equally with a serious expression on his face and the children were also listening to him.
The rain was also reducing to some extent there. The headmaster sir called all the teachers and told them to keep the child engaged till the rain subsides. Accordingly Chaudhary sir had taken great responsibility. Sir said after the rain subsided a bit

"Outside the rain has not stopped yet....when you go home your notebook will get wet so those who want to leave their notebook in the class and go home should go home. You can leave the notebook on your own bench in the classroom"

    Accordingly, many children in the class kept their notebooks on the bench. Many children and teachers did not bring umbrellas and raincoats as no one had any idea that the rain would suddenly increase to such an extent.

    Krishna also left the class with his friends leaving his notebook on the bench...as the rain continued, only the intensity had decreased. Ponds were stored in the school yard. Taller boys could easily get out of it, but Krishna and boys of his height had to wade through waist-deep water to get out of the school gate. Everyone was happy when the teacher allowed us to get wet in the rain. Everyone left the gate and went home soaking wet.

    Since Krishna's time to come home was never missed, grandmother and mother were worried... Dad was still in the office.

"Mother, how come Krishna has not come yet?" Predicting the rain falling when opening the door of mother's house, questioned the grandmother.

    But Grandma Uttara Dharka only looked at the photo of God pulling down one of the beads from the japa mala in her hand.

As the mother came into the house after closing the door, Krishna, who was wet on the gate of the house, entered the house with a sound and said.

"I'm here, Grandma I'm here"
"What the hell are you wet, why are you wet? And where is the notebook?" asked the mother angrily.

"Oh, wipe his head first," Grandma said worriedly.

"Let's go home soon..." Mom brought him home and said wiping his body.

    Again and again Krishna narrated all the happenings in the school in detail to both of them.

    Even after lunch, the rain continued. Now water had started accumulating in the courtyard of the house as well. Leaves of trees, grass and mud in the yard were flowing with the water. Due to this, the grooves and its shafts, which were made to drain the water in the courtyard, were closing. Now it is necessary to take out the garbage stuck in it.

"Hey, look how much water is stored in the yard" said grandmother showing the water to her mother

"Mother, can I remove the mud" said Krishna excitedly. He would have just as much fun in the water.

"Can you?" Mother asked worriedly.

"Yes, you can."

Meanwhile, the grandmother handed him an old umbrella.

"With this chhatri ne Raju, so you won't get wet"

The umbrella was of very old style and there were some faint letters on the umbrella..... na.... the....

"Grandma, what does it say?" Krishna asked looking at the letters.

"Says, but go quickly..... come and empty the yard, that is, remove the silt stuck in the ditch"
Now it was five o'clock in the evening. Krishna quickly got into the water, bending his neck to the left side and holding the umbrella by the support of his left shoulder, so that it looked slightly tilted to the left, so that he was getting a little rain from the right side but not only his head was getting wet. The umbrellas were of very old style, with a bent pole like the letter J (J) in English, the poles of the umbrella being of steel and a pointed tip at the top of the umbrella. Krishna was working hard with such an umbrella.

    Due to the removal of silt and accumulated waste, the water accumulated in the courtyard began to recede. After finishing his work, Krishna came home running half wet.

"Well done..., I will tell you when Baba comes today.... You have worked, he is calm and sensible our Krishna" mother said to Krishna as she came into the house.

"Wipe your head and if you are very wet, change your clothes too" Aji suggested taking the umbrella from Krishna's hand while moving her hand over her head.

    As Krishna ran into the house to change his clothes, Grandma opened her umbrella and placed it on the floor to dry. It was Krishna's grandfather's umbrella and his initials were written on it. It may have been convenient to write like this because earlier almost everyone had the same umbrella.

    As soon as Krishna changed his clothes and came to the outer room, his mother handed him a plate of hot veena.

"Aresss, Shira... I was hungry" said Krishna looking at the plate in his hand.

"Oh Hoss, we both thought you might be hungry."

As soon as Krishna saw the umbrella that his grandmother had opened, he went and sat under the umbrella.

"Let's eat chhatri shira today...that means pop the chhatri vein"

Seeing his cheerful and happy face, grandmother and mother both said

"Khass khass Chhatri Shira khasss" and all three started laughing.

©Nikhil Devidas Vaze
9011096250

Thursday, August 04, 2022

"महाराजांचे लय स्ट्राँग बोलावणे आले आहे"

 "काय रे!!!व्यवसायची काही कामे बाकी आहेत का?" समोरून मामाचा फोन वर प्रश्न आला.

"आहेत जरा..पण बोल न काय ते?" मी त्याला प्रती प्रश्न विचारला.

"उरक...काम...आणि ये मंगळवारी तळेगावला दुपारी दोन पर्यंत"

अशा तुटक निरोपामुळे मी पण जरा अचंबित होऊनच, पण तरी त्याला परत विचारले..."अरे काय ते नीट सांग की?"

"महाराजांचे लय स्ट्राँग बोलावणे आले आहे" तो आनंदात म्हणाला.

    खर तर तो गिरनार बाबत बोलत होता. दर वर्षी कार्तिक एकादशी (तुळशी विवाह) ते पौर्णिमा अशा पाच दिवसात श्री गिरनार परिक्रमा असते. पूर्ण जंगलातून होणारी ही परिक्रमा मागील वर्षी करोनामुळे झाली नव्हती. पण जसे महाराष्ट्रात कोणाला निरोप न देता आपोआप वारकरी आळंदी आणि देहू येथे जमायला सुरुवात करतात आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटायला पायी वारी करून जातात. तसेच काहीसे या गिरनार पर्वताच्या परिक्रेमेसाठी सर्व साधू, संन्यासी, स्थानिक भक्त, बाहेर गावी असलेले दत्त उपासक असे सगळे गोळा होतात. 

    मामा आणि त्याचे मित्र जाणार होतेच. पण मला उशिरा समजले आणि माझा नंबर लागला नाही. स्वतंत्रपणे गाडीचे आरक्षण मिळवण्याचा मी बराच प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही आणि यावर्षी जाता येणार नाही अशी मनाची समजूत करून शांत बसलो आणि आपल्या उद्योगाला लागलो. पण त्या दिवशी त्याचा फोन आला तेव्हा परत एकदा गुरूंची ताकद कळाली आपली फक्त इच्छा शक्ती पाहिजे, बाकी सर्व 'ते'( श्री गुरुदेव दत्त) करून घेतात हे मी कुठे तरी वाचले होते. त्याची आज प्रचीती आली.

                                            

     गिरनार तसे पाहिले तर एक गुरुशिखर,सेवा,समर्पण, अध्यात्म, ट्रेक, निसर्ग असे अनेक प्रकारात मोडते. महाराष्ट्राच्या लागून असलेल्या गुजरात राज्यात जुनागड संस्थानात हे क्षेत्र येते. सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीतून भारतात विलीन झालेले असे हे संस्थान आहे.

"माझा कसा काय नंबर लागला रे?"मी मामाला निघताना विचारले.

"एक जण गळाला, त्याचे तिकीट होतेच...आणि महाराजांनी सेवा करू घ्यायला बोलावले बसss...आता चला" पाठीवर थाप देत मामा म्हणाला.

    खरंच आमच्या कुटुंबात ही दत्तसेवा, गुरूभक्ती, आणि गुरूसेवा ही मागिल तीन चार पिढ्यांपासून आलेली आहे. आजोबा, बाबा आणि आता मी. सर्व जण गुरुचरणी कायम लिन आहोत. गुरुचरित्र पारायण, गुरुसेवा ही कदाचित आमच्या मूळ पुरुषाकडून आली असावी. 


     श्री गुरुचरित्र मध्ये एका अध्यायात एका व्याधी ग्रस्त विप्राला महाराज शुष्क काष्ट याची सेवा करायला सांगून त्याला व्याधीमुक्त करतात( अध्याय ४०वा) तो विप्र म्हणजेच    ' गार्ग्य' गोत्र, हेच आमचे गोत्र आहे. म्हणजेच कदाचित मूळ पुरुषाचा उद्धार झाला आणि आमच्या गोत्रत गुरुभक्ती सुरू झाली असावी. म्हणून कदाचित आम्हा सर्वांना ही गुरुसेवा करण्याची संधी, बुध्दी मिळाली असेल.

    कोण्या एका पुस्तकात वाचले होते की तुम्ही फक्त मनःपूर्वक दत्त महाराजांना शरण जावे आणि मला गिरनारला घेऊन जावे असे मागणे मागावे...बाकी सर्व कामे आणि मार्ग ' ते ' च दाखवतात. अगदी तसाच हा प्रवास सुरू झाला. रेल्वेचे तिकीट होते, पण ते कन्फर्म नव्हते. त्यामुळे गाडीत प्रवेश मिळाला खरा, पण दारात बसून प्रवास सुरू झाला. वापी स्टेशन आले तसे एक एक बर्थ रिकामा होत गेला आणि चक्क सगळ्यांना पुढील प्रवास झोपून करता आला. गिरनारला जाण्यासाठी पुणे किंवा मुंबई येथून रेल्वेने जुनागडला उतरावे लागते. चांगला पंधरा ते अठरा तास प्रवास करावा लागतो. रिझर्व्हेशन असेल आणि ते पण कन्फर्म असेल तर कसलाच त्रास होत नाही. या प्रवासात अगदी मुबलक खायला, प्यायला मिळते. एकतर महाराष्ट्रची हद्द ओलांडली की सर्व गुजराती समोसे, फाफडा, असे सगळे खमंग पदार्थ मिळतात. प्रवास सुरू झाला आणि मी जरा मागच्या आठवणीत रमलो. 

    तशी पाहिली तर माझी ही गिरनारची चौथी वारी होती. पण उत्सुकता अगदी पहिल्या प्रमाणेच होती. या दत्त क्षेत्राची ओढच अशी आहे की, का कोणास ठाऊक आपण खेचलेच जातो. पहिल्या वेळी जे पाहिले, अनुभवले, जे दिसले, जी लोकं भेटली, बोलली हे सगळे सगळे वेगवेगळे असते. मी अनेक वर्षांपासून सिंहगडावर जातो आहे. जसा तो (सिंहगड) मला प्रत्येक वेळी वेगवेगळा भासला, दिसला आहे, अगदी तसेच गिरनार बाबत आहे. पहिल्या मातीचा सुगंध वाचता, पाहता येत नाही. तो फक्त आणि फक्त पहिल्या पावसात अनुभवता येतो. हे ही अगदी तसेच आहे. गुरूची सेवा, त्यांची भक्ती केल्या शिवाय आपल्यात चांगले बदल होत नाहीत.

    जुनागड स्टेशन बाहेर आपल्या स्वागतासाठी अनेक रिक्षा असतात आम्ही सगळे सामान सुमान घेऊन स्टेशन बाहेर आलोच होतो. 

" गिरनारी जावसेsss? कितनी सवरीss?"तोंडात भरलेल्या तोब्र्याने रिक्षावाले भाई( हो गजरात मध्ये सगळे भाई असतात) विचारता झाला.

आम्ही हलणाऱ्या टूलणाऱ्या रिक्षेच्या टपावर सामान टाकून एक विशेष चहा जूनगडच्या स्टेशन बाहेर मिळतो "भट्टी चहा" हा चहा प्रवासाचा ताण जरा कमी करतो आणि पुढील प्रवासासाठी तरतरी आणतो. म्हणून तो पिणे आवश्यक आहे. जुनागड ते गिरनार फक्त आठ ते दहा किलोमीटरचे अंतर जेमतेम रिक्षाने अर्ध्या तासात कापून गिरनार पायथा गाठता येतो.                                            

        गिरनारला जमिनीवर पाय ठेवलाकीच आपण कुठल्या तरी वेगळ्या जागी आलो आहोत याचा भास नक्की होतो. जर आपल्याला अध्यत्मिक गोडी, रुची असेल तर हे नक्की जाणवते. रिक्षेतून उतरलो की गिरनार पर्वत अगदी सहज नजरेस पडतो. पर्वत पाहताच कोणत्याही भक्ताचे हात आपोआप जोडल्या जातातच.

    गिरनार पर्वत आपल्याला पायथ्यावरून जो दिसतो तो फक्त या मोठ्या शक्तीचा फक्त एक भाग आहे. कळस काठायला आधी कासवाचे दर्शन घ्यावे लागते, अगदी तसेच आहे. आपण कोणत्या वेळी कोणत्या वातावरणात गिरनारला जातोय यावर पायथ्यावरुन हा पर्वत दिसणे नदिसणे अवलंबून आहे. 

    गिरनार पायथ्याला अनेक मठ, हॉटेल आहेत जिथे आपली राहण्याची उत्तम सोय होते. आम्ही नेहमीच्या मठात बॅगा टाकल्या आणि आराम सुरू केला. खरतर परिक्रमा जेव्हा असते तेव्हा या सर्व परिसरात अगदी जत्रा भरते. जिकडे तिकडे माणसंच माणसं , नागा साधू, महंत, त्यांचे अनुयायी, सामान्य भक्त, सेवक अशांनी परिसर  गजबजून जातो. पण मागील एक दोन वर्षात म्हणजे करोना काळात याला बंधने आले आहेत. शासन आणि स्थानिक प्रशासन यांचे अजून अनेक निर्बंध याहीवर्षी होते. 

    गिरनार परिक्रमा म्हणजे, संपूर्ण पर्वताला जंगलातून प्रदक्षिणा मारावी लागते. हे जंगल वनविभागाच्या ताब्यात असल्याने त्यांचे नियम आणि शिस्त पाळून परिक्रमा करावे लागते. माझी ही पहिलीच वेळ असल्यामुळे पराकोटीची उत्सुकता मनात होतो. तसे पाहिले तर पूर्वी या परिक्रमेत काही लाख लोक येत होते. जागो जागी चहा, प्रसाद, वाटप करण्याची सेवा करत होते. तसेच काही लोक रात्री मुक्कम पण करत होते. अशी मान्यता आहे की या परिक्रमेत प्रत्यक्ष देव देखील दत्त गुरूंची सेवा करतात. हा ज्याच्या त्याच्या अनुभूतीचा विषय आहे. 

    वनविभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या नियमानुसार बरोबर पहाटे चार वाजता परिक्रमा मार्गावर प्रवेश मिळणार असल्यामुळे आम्ही पहाटे तीन पासून गेट जवळ जाऊन उभे होतो. न जाणो गर्दी असेल तर आमचा नंबर लवकर लागावा हाच उद्देश. परिक्रमा मार्गासाठी आधी एक लहानशी लोकवस्ती लागते. चांगला डांबरी रस्ता आपल्याला जंगलाच्या पोटात घेऊन जातो. तसा रात्रीचा काळोख होताच, पण वस्तीतून रस्त्यावरील दिवे होते. आम्ही सर्व लोक आतल्या भागातील गेट जवळ उभे होतो कारण अजून वेळ व्हायची होती. खरतर परिक्रमा याही वर्षी होणार नव्हती पण संत,साधू, स्थानिक भक्त यांनी तहसीलदार,शासन यांना सर्व सहकार्य करून परिक्रमा घ्यावी अशी विनंती केली आणि महाराजांनी तहसीलदार तशी बुध्दी दिली. मी जसे म्हणलो की अनुभूती आली कीच शक्तीची ताकद समजते. कोणत्याही घटनेकडे आपण कसे पाहतो म्हणजे सकारात्मक किंवा का घडले? असा विचार केला की समजू लागते.

    तर बरोबर चार वाजता जंगलातील वाटेवर प्रवेश मिळाला. तसा आत अंधार होताच पण सोबत विजेरी असल्यामुळे त्याचा प्रकाश अंधाराला काही अंतर कापत होता. वाटेत चार पाच लहान मोठे ओढे वाहतात. या परिक्रमा मार्गाची मला खूप गंमत वाटली. आधी सरळ सिमेंटचा अगदी घडाच्या घडा रस्ता ( रॅम्प), मग तसाच एकदम तीव्र उतार असलेला रस्ता( ९० अंश)...मग पाऊल वाट. या वाटेवर एक मंदिर आहे दत्त मंदिर,आश्रम आहे. आलेल्या सर्व भक्तांना कोणतीही मनात अभिलाषा न ठेवता नाश्ता, चहा पिवून पुढे जाण्यासाठी ताकद देणारे शब्द असे मिळतात.

"आवो बच्चाss" नागा साधूने मंदिराच्या बाहेरील बाजूला मला अडवले.

खरतर माझ्या सोबत अजून दोन जणं होते पण त्यांना ते काहीच म्हणाले नाहीत. मलाच का अडवले या विचारत असतानाच...

"कुच भी डाल...परंतु नोट ही डालना...खुला नही लुंगा, नहीं तो तुझेss जाने नाही दुंगाss" असे म्हणत त्यांनी आपले भिक्षा पात्र माझ्या समोर केले. हे पण ते हसत म्हणत होते.

    मी आधीच त्यांच्या हातात सापडलो असे वाटत असताना त्यांचा हा आदेश आला. काय त्यांचे रूप होते!!! कोणाला पण त्यांची भीती वाटेल. जटा वाढलेल्या, पूर्ण अंग उघडे,शरीरावर कोणतेच वस्त्र नाही, सर्वांगाला भस्म लावलेले, त्यावर कपाळावर लाल रंगाचे मोठे नाम लावलेले, गळ्यात अनेक माळा, आणि...आणि...चक्क डाव्या हाताने तलवारीने आपले गुप्त अंग त्याला गुंडाळलेले, उजव्या हातात भिक्षा पात्र.

    हे सगळे पाहून सामान्यपणे कोणतीही व्यक्ती एकतर घाबरेल किंवा त्याला किळस तरी वाटेल.पण या पैकी मला काहीही वाटले नाही. कदाचित माझे पूर्व संचित आणि काही पूर्व कर्म असेल म्हणून तिघात फक्त मलाच आडवले. मी शांतपणे पाकिटात हात घातला आणि एक नोट बाहेर काढून त्यांच्या भिक्षा पत्रात टाकली

"जय होsss बाबा गिरनारी सुखी रखेss" माझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी आशीर्वाद दिला आणि माझ्या कपाळी भास्माचा टिळा लावला.

    गेली अनेक वर्षे श्री गुरुचरित्र पारायण होत आहेत. त्यात पण अध्याय आहे ज्यात एका स्त्रीला मागील जन्मातील धनको पैशासाठी त्रास देत असतो. पण त्या अबला स्त्रीची सुटका महाराज करतात. मी पण माझ्या बाबतीत हाच विचार केला. कदाचित मला मागील कोणत्याही ऋणातून मुक्त करायचे असेल. हा विचार डोक्यात आला आणि मी मार्गस्थ झालो.

    गिरनार परिक्रमा हा एक विलक्षण अनुभव आहे. वाट पण साधी सरळ नाही. आधी सांगितले तसे रस्ता पार करून एक भले मोठे दगडा दगडातील खडे आणि नागमोडी असे चढण लागले. हा रस्ता बरोबर गुरुशिखराच्या मागच्या बाजूला आहे मग ही वाट सोपी कशी असेल. वाट चढून वर आलो की वन विभागाची चेक पोस्ट आहे. हे चढण पार करून वर येताच अजून खोल खोल नेणाऱ्या सिमेंटच्या बांधिव बऱ्याच पायऱ्या लागतात. म्हणतात न आपल्याला आयुष्यात चढ आणि उतार, चांगले आणि वाईट दिवस अशा सगळ्यांना तोंड द्यावे लागते. तसेच काहीसे या परिक्रमेत जाणवत होते. संपूर्ण वाटा या अशाच आहेत. 

    परिक्रमा मार्ग जवळ जवळ ३८-४० किलो मिटरचा आहे. वाटेत मठात प्रसाद मिळतो.तोच आपल्याला वाटचालीत आधार देतो. बाकी आपल्या सोबत काही खाद्य असेल तर उत्तम. पूर्ण परिक्रमा करायला साधरण चालीने कमीत कमी चौदा पंधरा तास तरी लागतात. पण जर खूप गर्दी असेल तर मग कितीही वेळ लागू शकतो. त्यामुळे आपला वेळ आणि दिवस राखून यावे हे उत्तम आहे.

    गिरनार हे प्रामुख्याने श्री दत्तक्षेत्र आहे. तसे पाहिले तर श्रीदत्तक्षेत्र फक्त तीनच आहेत. जे प्रत्यक्ष त्यांनी निर्माण केलेली आहे. माहूर, गिरनार आणि पांचाळेश्वर. यापैकी गिरनार यावर दत्तप्रभुंचे वास्तव्य असल्यामुळे अनेक योगी, तपी, मुनी, महंत हे आपली साधना करतात. खरतर गिरनार हे हिंदू, जैन, मुसलमान अशा वेगवेगळ्या संस्कृतीचे संगम आहे. गिरनारची उंची साधारण ३६०० फूट पेक्षा उंच आहे. यात एकूण एकवीस शिखरे आहेत. तसे पाहिले तर पाच शिखरे मुख्य मंदिरे आहेत. जसे नेमिनाथ, अंबामाता,गोरख (गोरखनाथ), गुरुशिखर आणि कालिकामाता. नेमिनाथ हे जैनांचे क्षेत्र आहे. अंबामाता शिखर येथे अंबाजी देवीचे मंदिर आहे. एकावन्न शक्तीपिठामधील हे एक पीठ आहे. गोरख शिखर येथे गोरक्षनाथ यांनी तपस्या केली होती. ' दत्त प्रबोध ' या अनंतसुत विठ्ठल यांच्या ग्रंथात त्यांनी गिरनारचे महात्म्य सांगितलेले आहे.

    गिरनारला एकूण दगडी दहा हजार पायऱ्या आहेत. हा फक्त एक आकडा आहे. 'ते' (महराज) आपोआप पार करायला आपल्याला बळ आणि शक्ती तर देतातच आणि आपला अहंकर देखील कमी करतात. मी काही मोठा अधिकारी व्यक्ती नाही पण माझा अनुभव हाच आहे कि गिरनारला नेहमी नेहमी का जावे किंवा ' ते ' का घेऊन जातात याचे मला सापडलेले किंवा त्यांनी समजून दिलेलं एकमेव कारण म्हणजे आपला मी पणा, अंहकार हे असेल वाईट दोष गळून पडावेत आणि सेवा, समर्पण, अनुभूती आपल्या अंगात यावी याचसाठी आपल्याला बोलावतात असे वाटते.

    गिरनार दिवसा चढणे जरा कठीण आहे. एकतर उन, त्यात चढण यामुळे हैराण व्हायला होते. असे असून देखील अनेक लोक दिवसा पण गिरनार चढतात. आम्ही आपले नेहमी रात्रीच चढणे सोईचे मानतो. दर महिन्याच्या पौर्णिमेला गिरुशिखरावरील मंदिर होय, श्री गुरुदेवदत्त यांच्या जेथे पादुका आहेत त्या डोंगराला गुरुशिखर म्हणतात. यावरील मंदिर पौर्णिमेला रात्रंदिवस दर्शनासाठी सुरू असते. इतर वेळी रात्री दहा ते पहाटे सहा यावेळी मंदिर सगळ्यांसाठी बंद असते.

    मगाशी म्हंटल्या प्रमाणे, रात्री आम्ही निघालो. गिरनार पर्वत आणि पायऱ्या जिथून सुरू होतात.तिथे एक कमान आहे. 



    ज्यावर गुजराती मध्ये लिहलेले आहे. ही कमान ओलांडून आत गेलो की आपल्या डाव्या हातात एक मारुती मंदिर लागते. याच मारुतीला नारळ वाढवून पुढे जाण्याची प्रथा आहे. कदाचित मारुतीराया कडून बळ मिळावे आणि या पायऱ्या चढून जाता याव्यात हीच प्रेरणा यातून मिळावी म्हणून ही प्रथा सुरू झाली असेल. 

    गिरनार पर्वतावर जायला दगडी बांधीव अशा पायऱ्या आहेत. साधारण आठ ते दहा इंच असतील. पण आपल्याला जेव्हा पायऱ्या चढून वर जायचे असते त्यावेळी पहिल्या पायरीची आपल्या आपल्या शक्ती प्रमाणे पूजा करावी. त्याचे कारण असे की वर जाताना समर्पण भाव आणि एकच मागणे करावे " मला वर घेऊन चला, मी आपला आहे, तुम्ही मला मार्ग दाखवणार आणि मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन समर्पण करत आहे." हे असे मागणे मागून पहिल्या पायरीला डोके टेकवून नमस्कार केला की पुढील वाट सुखकारक होते. तसे अजून एक आवश्यक आधार म्हणजे काठी किंवा दंड सोबत असेल तर अजून उत्तम होते. 

सगळे जणांनी चढायला सुरुवात केलीच. रात्री चढताना आपल्याला विजेरी आणि अधून मधून दिसणारे विजेचे दिवे त्यात जर पौर्णिमा असेल तर चंद्राचा प्रकाश एवढे सगळे असेल तर चढताना खूप उपयोग होतो. हा चंद्राचा प्रकाश आपल्याला वाटेत नक्कीच साह्यभूत होतो. मजल दर मजल करत नेमिनाथ मंदिर आले. खर तर गिरनार पर्वत जसा भक्तीचा आहे तसाच तो मानसिक शक्तीचा पण आहे असे मला वाटते. एकदा आपण त्यांना शरण गेलो आणि पुढील वाट सुखकारकपणे पार करून सेवा करून घ्या हे मागणे केले की नकारात्मक विचार मनात न आणता मार्गक्रमण करत राहावे लागते. सुरवातीच्या हजार दोन हजार पायऱ्या आपली मानसिकता तपासणाऱ्या आहेत. 

"बस आता मला नेमीनाथ मंदिर काठायचे आहे" असाच विचार करत पायऱ्या चढल्या की आपल्यात काय बदल आणि फरक पडतो हे प्रत्यक्ष अनुभव घेतानाच समजेत. या पहिल्या पायऱ्या फक्त आपला निग्रह आणि मानसिकता तपासून घेतात. हळू हळू आपला मी पणा गळून पडायला लागतो आणि शरीर पुढील वाटचालीसाठी हलके वाटायला लागते. 

"काय मस्त वाऱ्याची झुळूक आले रे" मी मामाला म्हणलो.

"हो रे, खूप वेळानी आले वारे" मामा पण घाम पुसत म्हणाला.

    आम्ही दोघे पण घामाने चिंब भिजलो होतो. कारण या पहिल्या तीन हजार पायऱ्या चढताना दम तर लागतोच आणि डोंगराचा खालील भाग असल्यामुळे वारा पण नसतो. म्हणून जरा दमछाक होते. पण आपल्या डोक्यात हे पक्क हवं की या नेमीनाथ मंदिरा पर्यंत काही झाले तरी "मला जायचेच आहे" ही मानसिक शक्ती अवश्य उपयोगी पडते. 

    या सुरवातीला खूप दम लागतो कारण अचानक शरीराची खूप जलद गतीने हालचाल सुरू होते. आपण नेहमी जर नियमित जिना चढ उतार करत असू तर मग जरा सवय असते. पण अचानक इतकी हालचाल, वाहणारा घाम आणि वारा नसणे हे आपल्याला जरा भीती आणि नकारात्मक विचार मनात आणून बसवतात...पण मन पुढे जाऊ असे म्हणते. अशा वेळी बुध्दी आणि भक्तीने विचार करून पुढे चालत राहिले की काम अतिशय सोपे होते. असा माझा नेहमीचा अनुभव आहे. याही वेळी तोच विचार डोक्यात नक्की केला होता. " बस मला तीन हजार पायऱ्या चढून नेमीनाथ मंदिर गाठायचे आहे."

    नेमीनाथ मंदिराला डाव्या हाताने वळसा घालून आपण परत पायऱ्या चढायला लागतो. वाटेत एक दोन मंदिरे, मठ लागतात पण यात एक गंमत आहे. वाटेवर एक गोमुख धाम लागते. इतक्या उंचीवर तरी साधरण चार एक पायऱ्या चढून गेल्यावर हा धाम आहे. येथे एका मोठ्या कुंडात( हौद) सतत पाणी पडत राहते. हे पाणी अगदी स्वच्छ, नितळ आणि चवीला गोड आहे. 

                                 

"आssओss,पानी पिओss" असे अग्रहानी आपल्याला तेथील सेवेकरी सांगत असतात. हे पाणी बारमाही असते. पौर्णिमेला इथे श्रद्धाळू गरमगरम प्रसाद पण वाटप करतात आणि तेही कोणताही मोबदला न घेता!! फक्त सेवा आणि समर्पण बाकी काही नाही....

    मुळात गिरनार हेच आपल्यात सेवा भाव निर्माण करणारे आणि असलेला सेवा भाव वाढविणारे असे क्षेत्र आहे. गोमुख धाम मधील ताजे, गार पाणी पिल्यावर आपल्याला एकदम तरतरी येते. त्यामुळे येथील पाणी आणि असेल तर प्रसाद अवश्य घ्यावा. असेच गोमुख धाम डाव्या बाजूला ठेऊन पायऱ्यांनी वर चढले की आपण आता      'अंबाजी माता' शिखरावर येतो. तसे पाहिले तर आता इथपर्यंत यायला रोपवे ची सोय झाली आहे. पण हा रोपवे सकाळी सातला सुरू होतो. अंबाजी माता येथे प्रचंड वारा आणि गारवा आपल्याला जाणवतो. अतिशय सुरेख मंदिर आहे. पण आपण रात्री जर येथे आलो तर ते बंद असते. त्यामुळे आपल्याला याचे दर्शन परतीच्या प्रवासात घ्यावे लागते. उत्तम आणि प्रशस्त असे हे मंदिर आहे. आत गाभाऱ्यात माहूरच्या देवी सारखेच देवीचे रूप आहे. अनेक महिला आवर्जून देवीची ओटी भरतात.

    मंदिराच्या मागे काही हॉटेल, टपऱ्या, आहेत जिथे रात्री पण चहा किंवा काहीतरी खायला मिळते पौर्णिमा असेल तर, इतर दिवशी मिळेलच असे नाही. मंदिर मागे ठेऊन आपण असेच पुढे गेलो की आपल्या डाव्या हाताला दोन पर्वत शिखर दिसतात. पहिले उंच शिखर म्हणजे 'गोरख' आणि त्यांच्या मागे पण उंचीने जरा लहान शिखर म्हणजे 'गुरू शिखर' हे गिरुशिखर दुरून जरी दिसले तरी डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या होतात. ज्यासाठी एवढे कष्ट घेतले ते आता आपल्या समोर असते म्हणून समाधान वाटते. 

                         


      तसेच दोन डोंगर एका दगडच्या पुलाने जोडलेला आहे. रात्री हे दिसत नाही पण जेव्हा उजेडते तेव्हा आपण कोणत्या मार्गाने आलो हे पाहून मन धक्क होते. हा पूल ओलांडून वर आलो की गोरखनाथ मंदिर, धूनी मठ, आणि एक पिर पण आहे.आता या वास्तूंचा कायापालट झाला आहे. मला जेव्हा पहिल्यांदा जायला मिळाले होय इथे आपण जातच नसतो. तेच घेऊन येतात याच पोटी असे शब्द लिहले जातात. तर सांगत होतो की तेव्हा आधार म्हणून घेतलेल्या काठीचा पण काही उपयोग होत नव्हता. असे प्रचंड वारे त्यावेळी होते. एकतर हे शिखर चारी बाजूंनी मोकळे आहे. त्यामुळे वारा मुक्त पणे वाहत असतो. मनात आपण कल्पना करा आत्ताच हे असे वार आणि थंडी आहे. मग जेव्हा गोरखनाथ यांनी येथे साधना केली असेल तेव्हा काय परिस्थिती असेल!!!

    येथे एक धुनी धाम आहे. या धुनी धाम मधून अवश्य धुनी(अंगारा) घ्यावा आणि पुढे आता मात्र पहिल्यांदा आपल्याला पायऱ्या उतराव्या लागतात.पायऱ्या पण खूप आखीव रेखीव आणि बांधीव आहेत. दोन्ही बाजूला दगडी कठडे आहेत. ते पण एकदम मजबूत. मी आणि मामा आता एक एक पायरी उतरत उतरत खाली आलो. आयुष्यात कायम कोणती वाट निवडावी असे अनेक प्रसंग येत असतात. काहींना कमी, काहींना अनेक असे प्रसंग येतात. येथे पण असे दोन रस्ते येतात. दोन्ही रस्त्यांची कमान समान आहे. डावीकडचा रस्ता गुरू शिखरचे दर्शन घडवतो आणि उजवीकडील खाली जाणारा रस्ता आपल्याला धुनी धाम कडे नेतो. 

                                

    आम्ही ज्याप्रमाणे अगदी पहिल्या पायरीला डोके टेकवून नमस्कार केला तसाच नमस्कार या गुरू शिखर  पायरीवर केला. 

"हेच ते हेच शेवटचे चढण" असे भाव मनात होते. बरेचदा कार्य संपत आले कीच आपण अधीर होतो तसेच काहीसे या सर्व शेवटच्या पायऱ्या पाहून आपले होते. त्याच जोशात आपण या सर्व पायऱ्या चढून वर येतो. 
"काय मस्त वारा आला रे"मामा म्हणाला

    या वाटेवर एक अतिशय मोक्याच्या ठिकाणी एक खिडकी आहे. ही खिडकी एका क्षणात आपली मरगळ, थकवा असा काही गायब करते, की लागलेला दम हे काही काही जाणवत नाही. मामाच्या वाक्याने मला पण तो वारा मनाला आनंद देऊन गेला.

    आता मुख्य गुरुशिखराच्या काहीच पायऱ्या शिल्लक राहिल्या होत्या पण मनाची गुरू पादुका पाहण्याची ओढ इतकी होती की त्या पायऱ्या पण लवकर चढून वर जावे असे वाटत होते. पण पौर्णिमा असल्यामुळे जरा लोक जास्त होते.म्हणून चक्क रांगेत लोक डाव्याबाजूला उभे होते. आम्हीपण रांगेत उभे राहिलो.

"जय गिरनारीss, जय गिरनारीss"असा उद्घोष करत मंदिरात प्रवेश केला. हात जोडून श्लोक म्हणत
"काषायवस्त्रं करदंड धारिणं |कमंडलुं पद्मकरेण शंखम् | चक्रं गदाभूषितभूषाणाढ्यं | श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ||"

    मनोभावे सगुण पादुकांचे दर्शन घेतले. पादुकांच्या मागे अतिशय सुंदर आणि हसरा चेहरा असणारी संगमरवरी श्री गुरुदेव दत्त मूर्ती आहे. ज्यावर आता अतिशय नाजूक आणि कलाकुसर असलेली सोन्याची प्रभावळ (कमान) लावलेली आहे. हे सगळे रूप आणि पादुका डोळ्यात साठवून प्रदिक्षणा पूर्ण करून लगेच खाली उतरावे लागले. जागेअभावी अगदी कमी वेळेत आपल्याला मंदिराच्या बाहेर पडावे लागते. त्यावेळी आपण जे कष्ट घेतले त्याचे फलित मिळाले असेच वाटत असते.

                                                    

    दर्शन घेऊन आम्ही कमंडलु तीर्थ किंवा धुनी कडे जायला निघालो. वरती लिहले त्याप्रमाणे ज्या दोन कमान लागल्या त्यातील आता दुसऱ्या कमानी मधून खालील पायऱ्या उतरून गेलो की हा धुनी मठ लागतो. या साधारण पाचशे पायऱ्या असतील. खाली मठात प्रत्यक्ष दत्त महाराज यांनी साधनेच्या वेळी प्रज्वलित केलेली धुनी आहे. दर सोमवारी यातील भस्म बाहेर काढून भक्तांना लावण्यासाठी ठेवलेलं असते. या धुनी मठात महाराजांची अनेक आयुधे आहेत. पण ती आतील गर्भगृहात आहेत. मठात किती ही आणि केव्हाही भक्त आले तरी त्यांना पोटभर प्रसाद मिळतो. हा प्रसाद घेणे आवश्यक आहे. त्याची दोन कारणे. एक म्हणजे हा श्री दत्त महाराज यांचा आशीर्वाद आणि दुसरे म्हणजे ज्या पायऱ्या चढून आपण आलो त्या आता उतरून जाण्यासाठी ताकद मिळण्यासाठी हा प्रसाद अवश्य सेवन करावा. 

    माझा अनेक वेळी जाण्याचा हाच अनुभव आहे की हा प्रसाद तुम्हाला खूप खूप समधान आणि ताकद देऊन जातो. अनेक भक्त आपल्या शक्ती नुसार येथे दान करतात. तेथील कोणतेच सेवेकरी त्याला पैसे समजत नाहीत किंवा ते सेवेकरी पैसे हातात देखील घेत नाहीत. त्यांच्या साठी ते फक्त एक कागद आहेत. मी याबाबत काही अनुभव घेतलेले आहेत. 

    धुनी माठातून आपण परतीचा प्रवास सुरू करतो. त्यावेळी सकाळ झालेली असते.सगळे कडे पर्वत, पायऱ्या, ढग असे दिसत असते आणि सकाळचा आल्हाददायक वारा आपल्याला एकदम ताजं करत असतो. रात्री अंधारात जे पाहता आले नाही ते सगळे आता स्पष्ट दिसत असते. तेव्हा समजते की आपण काय दिव्य आणि किती वर चढून वर आलो आहोत.                             


       जसे वर चढणे कठीण तसेच उतरणे पण कठीण आहे. आपल्याला उतरताना घुडग्यांवर खूप ताण आणि दाब पडतो. पण जर नीकॅप असेल तर त्याचा फायदा होतो. पण मी यावेळी मुद्दम त्या घेतल्या नव्हत्या. म्हणून एकदम सावकाश सावकाश खाली येत होतो. 

"झाले बाबाss एकदाचे" शेवटची पायरी उतरत मनात म्हणालो. शेवटची पायरी उतरून खाली आलो आणि डोके टेकवून फक्त एकच मागणे केले.

"महाराज अशीच सेवा नित्य घडो, परत लवकर नक्की बोलवा"

    गिरनार हे खरचं एक अतिशय मनोहर ठिकाण आहे. आता सोय झाल्यामुळे किमान रोपवे ने वर जाऊन गुरुशिखराचे दर्शन घेणे सोईचे झाले आहे. अबाल आणि वृद्ध यांना जर खाली उतरून जाणे शक्य नसेल तरी किमान दुरून गुरूशिखर दर्शन घेता येईल. पण जर खाली जाता आले तर अवश्य जावे. मनात जायचे आले तर लगेच निर्णय घेतला तर पुढील सर्व अडचणी आणि मार्ग 'ते' सुकर करतात हा अनुभूतीने आलेला विचार आहे.

शेवटी एकच सगतो. "जय गिरनारी,बाकी आपण काही नाही" 

"जय गिरनारी"

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०





वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले