Thursday, July 08, 2021

"एक दाबेली की किमत तुम क्या जानो......"

 "एक दाबेली की किमत तुम क्या जानो......"


     पुण्यातील माझे पहिल्या वर्षाचे कॉलेज सुरू झाले. हॉस्टेल मधील मित्रां सोबत सगळे दिवस मजेत सुरू झाले.  आमच्या कॉलेजच्या मागच्या बाजूला आमची मेस होती, म्हणजे हॉटेलच्या पहिल्या वर्षी तीच मेस लावणे बंधनकारक होते. हॉस्टेल मधील अनेक मित्र नॉनव्हेज खाणारे होते. त्या मित्रांची या मेस मुळे पंचाईत झाली कारण मेस फक्त शुद्ध शाकाहारी होती.

      माझ्या लहानपणी घरी पहिले वाढलेले अन्न संपवायचे हा नियम असल्यामुळे, जरी न आवडणारी भाजी किंवा कोणता न आवडणारा पदार्थ असेल तरी तो सगळ्यांना ताटात वाढला जात असे, मग काय? कधी त्याचा पहिला घास घे, तर कधी पाण्याच्या घोटा बरोबर खावून टाक, असे पर्याय वापरून पहिले वाढेलेले अन्न संपवायचे. मग नंतर पानात घेतले नाही तरी चालायचे. लहान पणापासून कधी हा आवडता, हा नावडता पदार्थ असे काही लाड आई बाबांनी केले नाहीत. सगळे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हाच संस्कार केला. त्यामुळे मेस मध्ये फक्त उदर भरणम् हाच विषय डोक्यात ठेऊन जेवायला जात येत होतो.

     माझ्या सुदैवाने संघ कामाची गोडी लहान वयातच लागल्यामुळे सर्व समाजात फिरणे होत आले आहे. अनेक वस्ती विभागातील घरात संपर्क आला होता. ज्यांना एका वेळेला जेवायला काय आणि कसे मिळते हे पाहिलेले होते. त्यामुळे आपल्याला आई बाबा यांच्या कृपेने किमान दोन वेळेला पोटभर अन्न मिळत आहे यायचं समाधान आणि तृप्ती मिळत होती. मेसचे जसे असेल तसे जेवण मी मोठ्या आनंदाने जेवत होतो. कधी कडक, वात्तड, चिवट पोळ्या, कच्चा राहिलेला भात, कमी शिजलेल्या भाज्या, तेलकट पुऱ्या असे असून या अन्नाला कधी नावे न ठेवता जेवत असे. बाकी मित्र कायम याबाबत तक्रारी करत असायचे. कदाचित या बाबत, साने गुरुजींच्या " श्यामची आई" या पुस्तकाचा माझ्यावर खूप परिणाम झाला असेल. त्यात एक प्रसंग आहे. श्यामचे वडील त्याच्या आईला (साने गुरुजींचे वडील त्यांच्या आईस) म्हणतात" तुम्ही दिवसभर चुलीतील धुरात राब राबून स्वयंपाक करायचा आणि आम्ही खाणाऱ्यांनी, या स्वयंपाकात हे कमी, हे जास्त आहे. असे म्हणून या जेवणावर एका क्षणात शेरा मारायचा, यात काय माणुसकी आहे?"

     आज इतकी वर्षे झाली. माझ्या कडून आपोआप हे पाळले गेलेले आहे. असो... तर मेस मधील जेवण कोणतीही नावे न ठेवता भरपेट सुरू होते. घर सोडून राहण्याचा पहिलाच प्रसंग होता. कमी अनुभव, कमी जाण असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचे अज्ञान होते. त्यामुळे कधी कधी त्याचे नुकसान पण व्हायचे. रविवारी रात्री मेस बंद हा विषय आधी माहीत नव्हता. पण पहिला आठवडा आला कीच हा  समजला...तरी मावशी तळेगावला होती म्हणून काही काही वेळा शनिवारी रात्री तिच्याचकडे जायचो. मागे या बाबत बोललो आहे" तळेगाव लोकल" यात.

    रविवारी मेस बंद असल्यावर सगळे मित्र आपल्याला हवे ते आणि जेथे पाहिजे तिथे पैसे खर्च करून जेवत होते. एक दोनदा त्यांच्या सोबत जेवायला गेलो. पण एकंदरीत जेवण, हॉटेल, खर्चिक कार्यक्रम, त्यांच्या इतर सवयी यांचा लवकरच कंटाळला आला. मग रविवारी रात्री काय? असा प्रश्न समोर आला...

   पूर्वी डेक्कन pmt बस स्टॉप जवळ म्हणजे नेमके सांगायचं झाले तर pmt बस, स्टँड मध्ये जेथून आत जाते त्या कोपऱ्यावर एक पानटपरी होती म्हणजे अजून पण आहे. त्याच्या बाजूला एक पोरगा हातगाडी घेऊन त्यावर मोठी जर्मनची परात ठेऊन उभा असलेला मी बरेचदा पाहिला होता. तो नेमका काय विकतो याचा पहिल्यांदा अंदाज आला नाही. पण एकदा शाखा झाल्यावर एका मित्रा सोबत तेथे आलो असता पहिल्यांदा त्या पदार्थाची चव पाहिली आणि याला ' दाबेली ' म्हणातात हे समजले.

    आमच्या गावी हा पदार्थ मी कधीच खालेल्ला नव्हता. त्यामुळे पहिल्याच चवीत त्याच्या प्रेमात पडलो. त्या पोराची दाबेली करण्याची पद्धत पण मला खूप आवडली, त्याने डाव्या हातात अर्धे पोट फाडलेला पाव घेतला, त्या पावला आतून लाल, हिरव्या चटण्या लावल्या, त्यात गरम गरम लाल, तांबुस बटाटा भाजी चमच्याने भरली, त्यावर काही लालचुटुक रसरशीत डाळिंब दाणे घातले, वरतून मसाला शेंगदाणे घातले, हे असे शेंगदाणे आमच्या शाळेेच्या बाहेर पण मिळायचे. एकदा त्या पावाचे पोट भरले की तो पोरगा एका विशिष्ट स्टाईलने तो पाव तव्यावर बटर ( म्हणजे असेल) टाकून  कडक भाजायचा...पाव भाजल्यावर त्या पावाचा काय सुवास सुटायचा!!! अजून मला तो चांगला लक्षात आहे. त्याने गरम गरम पाव बारीक शेवेत बुडवून प्लेट मध्ये देऊन त्यावर काही शेंगदाणे, कांदा, कोथिंबीर घालून आमच्या हातात दिली.

    ही दाबेली बनवण्याची पद्धत मला आपच तिच्याकडे आकर्षित करून गेली. कदाचित आज बऱ्याच जणांना वाटेल, त्यात इतके काय? पण एका नवीन गोष्टीची जाणं त्यावेळी मला झाली. त्या मुलाच्या बरोबर तिरकस कोपऱ्यात असेच एक दाबेली सेंटर आहे, अजून आहे. 'यशवंत दाबेली', हाँगकाँग लेन जवळ, त्याच्या कडे पण एकदा दाबेली खायचा योग आला. मालकाचा मुलगा की कोणी नातेवाईक असेल, तो शाळकरी मुलगा आमच्या शाखेत यायचा. त्यामुळे एकदा येथे पण दाबेली खाल्ली. 

   रविवारी रात्री मेस बंद असायची. बाकी पोरं आपल्या आपल्या परीने पैसे खर्च करून मज्जा करायचे. मी यात कधीही सामील झालो नाही. काटकसर म्हणा किंवा फक्त पोट भरले पाहिजे हा साधा हेतू म्हणा. जिभेचे चोचले कधी करायची वेळ आली नाही. एकतर हा दाबेली प्रकार आवडला होता आणि त्यात तो पोट भरणारा होता. त्यामुळे मी बरेच रविवार येथेच येई. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी हे बोलतोय त्याला आता जवळ जवळ २१वर्षे झाली आहेत. त्यावेळी या मुलाकडे दबेलीचा दर फक्त ₹३/- होता आणि त्याच्या समोरील यशवंत कडे ₹४/- दर होता. मी भरपेट दाबेली खावून रविवारच्या रात्रीची सोय करी. 

    आमचे एक सर नेहमी म्हणायचे" तुम्ही असे बना की दगडावर फेकले, तरी तुम्हाला उगवता आले पाहिजे" मला पुस्तक प्रदर्शनामुळे बरेच वेळा कोकणात, इंदोर येथे जावे लागत होते. तेव्हा या सरांच्या वाक्याचा आणि दाबेली पचवण्याचा अनुभव कामी आला. जे मिळेल ते, जसे मिळेल ते खावून आपले पोट भरता आले पाहिजे बस...कुठे अडचण झाली नाही.

    २००७ साली ओम शांती ओम नावाच्या सिनेमात एक डायलॉग होता" एक चुटकी सिन्दुर की किमत तुम क्या जानो..." तसेच म्हणावेसे वाटते " एक दाबेली की किमत तुम क्या जानो..." साधे साधे अनुभव, प्रसंग आपल्याला पुढील काळात खूप उपयोगी पडतात, हे तेव्हा जरी समजत नसले तरी ते पुढे नक्की कामी येतात.

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.
-------------------------------------------------------------------------------
English Translation

"What do you know the price of a dabeli ......"

I started my first year college in Pune. The whole day started with friends in the hostel. We had a mess at the back of our college, so it was mandatory to have the same mess in the first year of the hotel. Many of the friends in the hostel were nonveg eaters. The mess of those friends led to the panchayat because the mess was just pure vegetarianism.

 Since it was a rule to finish the first grown in my childhood home, no matter what vegetable or food I disliked, it was grown on everyone's plate, so I used to finish the first grown food using the option of whether to take its first grass or eat it with water. Then he would walk even if he didn't take the leaf. Some of the pampered parents have never done this favorite or disliked food since childhood. All food is complete Brahman. So in the mess, I was going to eat with only the topic of Udarambharan in my head.

 Luckily for me, the love of team work started at an early age and it has been circulating in the society. Homes in several residential areas were contacted. Who had seen what and how to get one meal at a time. So, thanks to the grace of mother and father, we were getting enough food at least twice a day. I was happily eating a meal like Mess. Sometimes it was hard, windy, stiff beehive, raw rice, undercooked vegetables, oily puris and this food was never eaten without a name. The rest of the friends were always complaining about it. Perhaps in this regard, Sane Guruji's book "Shyam's Mother" has had a great impact on me. There is an occasion in it. Shyam's father says to his mother (Sane Guruji's father is his mother) "You used to cook in the smoke in the stove all day and we eaters, this is less in this cooking, this is more.

It's been so many years today. This is automatically followed by me. Anyway ... so the meal in the mess starts without a name. It was the first time he had left home. Lack of experience, lack of awareness leads to ignorance of many things. So sometimes it hurts. The subject of closing the mess on Sunday night was not known before. But the first week came and I realized this ... However, my aunt was in Talegaon, so sometimes I would go to her on Saturday night. We have talked about this back in "Talegaon Local".

 When the mess was closed on Sunday, all the friends were eating whatever they wanted and wherever they wanted, spending money. One or two went to dine with them. But overall, meals, hotels, expensive events, their other habits soon got bored. So what about Sunday night? The question came up ...

 In the past, near the Deccan pmt bus stop, there was a pant pari at the corner from where the pmt bus enters the stand. I had often seen him standing next to a Porga handcart with a large German layer on it. It is unknown at this time what he will do after leaving the post. But once the branch was over, when I came there with a friend, I saw the taste of the food for the first time and understood that it is called 'Dabeli'.

I have never eaten this food in our village. So we fell in love with him at the first taste. But I liked the way he pressed the pora. He took a half-torn loaf of bread in his left hand. He put red and green chutneys on the inside of the step. These peanuts were also available outside our school. Once the stomach of the bread was full, the porga used to bake the bread on a tawa with butter (meaning it would be) in a certain style. I still remember it well. He dipped the hot bread in a fine paste and put it in a plate, put some peanuts, onion and cilantro on it and gave it to us.

This method of making dabeli attracted me to her. Probably a factor as to why they're doing so poorly. But then something new happened to me. There's a similarly pressed center in the oblique corner with that kid, still. 'Yashwant Dabeli', near Hong Kong Lane, had the opportunity to eat Dabeli once. Whether it was the owner's son or a relative, the schoolboy used to come to our branch. So once here but Dabeli ate.

 The mess used to be closed on Sunday nights. The rest of the boys used to have fun by spending money on their own. I never joined it. Say frugality or just say the simple intention is to fill the stomach. There was no time to bite the tongue. Either way he liked the pressed type and it was filling to the brim. So I came here a lot on Sundays. You may be surprised but I am saying this, it has been almost 21 years now. At that time, the rate of Dabeli was only ₹ 3 / - for this boy and the rate for Yashwant in front of him was ₹ 4 / -. I ate a lot of dabeli and made it to Sunday night.

 One of our sirs used to say, "You have to be able to grow even if you throw it on a rock." I had to go to Konkan, Indore many times because of the book exhibition. Then the experience of digesting the words of this saree and Dabeli came in handy. You just have to be more discriminating with the help you render toward other people.

One of our sirs used to say, "You have to be able to grow even if you throw it on a rock." I had to go to Konkan, Indore many times because of the book exhibition. Then the experience of digesting the words of this saree and Dabeli came in handy. You just have to be more discriminating with the help you render toward other people.

 In the movie Om Shanti Om in 2007, there was a dialogue, "What do you know about the price of a pinch of vermilion ..." Even if they don't understand it then, they will definitely come in handy later.

 © Nikhil Devidas Vaze
 9011096250

4 comments:

  1. Lai bhari👌...tumhich introduce Keli hoti Yashwant chi dabeli bhauji.. feeling Nostalgic

    ReplyDelete
  2. दाबेली लईच भारी!!

    ReplyDelete
  3. दाबेली खावी लागती आत्ता एकदा तरी

    ReplyDelete

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले