"अदलाबदल"
साधरण वस्तीतील एकाला एक लागून असलेली घरे, त्यातील काही पत्र्याची, काही कच्ची पक्की घरे, कुठे कुठे नुसत्या विटा चिखलात एकावर एक लावून भिंती उभ्या केलेल्या, काही काही ठिकाणी तर दोन घरांमधील भिंत सामाईक, घराच्या समोर खेळणारे लहानगे मुलं, कुठे कोणी म्हातारा खोकलत बिडी काडी ओडतोय. असे हे सगळ्यांचे निवास स्थान.
"सुरेखा ऐ सुरेखाsss कामावर जायचं नाय का आज? उठ लवकर!!!" बापा ने रागे रागे तिला झोपेतून उठवले.
अंगाला अळोखे पिळोखे देत सुरेखा जागी झाली. तिचे अंग जड पडले होते. झोपेतून उठवत नव्हते. एक तर रात्रभर झोप लागली नाही. संपूर्ण रात्र पाऊस सुरू होता त्यामुळे पत्रावरून काही नव्या जागांमधून पाऊसधारा घरात येत होत्या. मग काय? त्या धारांखाली कुठे पातेले, बकेट लाव. ते भरले की, पाणी बाहेर नेवून ओत अशीच सगळी रात्र गेली. कितीही झोपावे वाटले तरी सुरेखाला सकाळी ९ वाजता कामावर रुजू व्हावे लागत होते.
सुरेखा एका मोठ्या मॉल मध्ये सामान पॅकिंगच्या कामावर जात होती. तिच्या जन्मापासून आई आजारीच होती, आई बाबा एका कॉन्ट्रॅक्टर कडे वाळू, विटा उचलायला जात होते. बाप रात्री दारू पिऊन घरी येई, त्याही अवस्थेत लहान सुरेखाला कधी मारी, कधी बायकोला मारी आणि अशाच एका मारण्यात त्याची बायको मार लागून पडली. तिच्या कंबरेला जबर मार लागला. डॉक्टरांकडे नेणे शक्य झाले नाही आणि हेच निम्मित होऊन तिची आई वारली.
आपली बायको आपल्या मारण्यामुळे मेली, यामुळे तिच्या वडलांनी हाय खाल्ली, ते दिवसभर घरातच बसू लागले. आई गेली आणि बाप हा असा नैराश्याने घरी बसून राहायला लागला. तिला त्यामुळे लहान वयातच नोकरी करावी लागली. सुरेखाच्या मदतीला सेवाभावी संस्था आली आणि तिचे किमान १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले. त्याच संस्थे मार्फत तिला ही मॉल मधील कायमची नोकरी मिळाली. पगार जेमतेम, पण ओव्हर टाईम करून जास्तीचे काही पैसे मिळत. याच जास्तीच्या पैशातून तिने एक साधा मोबाईल विकीत घेतला.
सुरेखा कशी बशी जागेवरून उठली आणि लगेच आवरायला लागली. कामावर जायला अजून वेळ होता. पण घरातील सर्व आवरून, डब्बा, बापाचा स्वयंपाक करून निघायचे होते.
"सुरेsss,अगं सुरे"
"काय मावशी? अगं तू आज कामावरून येताना महादूच्या गोळ्या घेऊन येते का?" शेजारच्या मावशीने जुन्या गोळ्यांचे संपलेले पाकीट आणि एक शंभराची नोट तिच्या हातावर टिकवली.
"हो आणते की,महादू बरा आहे का? आणि त्याचा हात"
"हो बाई बरं आहे आता, त्याच्याच गोळ्या संपल्या पाय काल, रात्रीच येणार होते पण लय पाणी( पाऊस) होता रात्री"
" हो"
" आवर तू माझ्या मूळ तुला उशीर व्हायचा, डब्बा झाला का? का देऊ करून चपात्या?"
" नको मावशी करते"
मावशी गेली तशी सुलेखाने पण पटापट सगळे आवरले.
वडिलांचे जेवण झाकून ठेवले. आपले डब्बे भरले आणि पिशवीत भरून ड्रेस बदलून घरा बाहेर पडली.
सुरेखा दिसायला सावळी, अंगाने जरा कमी, उंची बेताची, सावळी असली तरी नाकी डोळी सरळ, एकदम सुरेख दिसायची. हुशार, चुणचुणीत, कर्तबगार म्हणून सगळ्या वस्तीत तिचा सगळ्यांना आधार वाटायचा. घरापासून मॉल जवळच होता. पण गाडी पेक्षा चालत जाण्याचे अंतर जास्त होते. वाहन नसल्यामुळे ती चालत कामावर निघाली आणि ऐन मॉलच्या वळणावर एक दुचाकीवाला उभा होता...त्याने गाडीच्या आरशातून तिला येताना पाहिले होते. आपली ओढणी सावरत आणि मागे पुढे पाहत ती पटापटा चालत येत असलेली त्याला दिसली. तिच्या सोबत कोणी नव्हते. तिच्या तोंडावर स्कार्फ बांधलेला होता तरी ती सुरेखा आहे हे त्याच्या लक्षात आले.
तो ही गाडीवर स्टँड न लावता, दोन्ही पाय खाली सोडून सीट वर बसला होता. गाडीच्या हॅण्डलला डाव्या हाताला डब्ब्याची पिशवी होती, उजवा हात त्याने गाडीवर ठेवला होता. सुरेखा आणि त्याच्यातील अंतर आता हळू हळू कमी होत आले... तसे त्याच्या हृदयातील धडधड वाढली... त्याने मनात निश्चय केला... परत एकदा आरशात अंतर कमी झालेले दिसले. सुरेखा आता त्याच्या अगदी एक - दोन हात जवळ आली...त्याने पटकन तिचा डावा हात आपल्या उजव्या हाताने धरला आणि तिला चालताना थांबवले. ती पण अचानक झालेल्या या गोष्टीमुळे दचकली आणि जरा लाजली, पटकन तिने डाव्या हाताकडे पाहिले रस्तावर कोणी नव्हते तो निर्मनुष्य होता.
"हात सोड"
"सोडतो !!! तुझा फोन कुठे आहे?"
"बापाने काढून घेतला" ती रागाने म्हणाली.
"का?"
"माहीत नाही"
"थांब, मॉल जवळ आला आहे. आपल्याला कोणी पाहिलं, तुझे भरलेले डब्बे दे इकडे आणि माझे हे डब्बे तुला घे" असे म्हणत सुरेखाने तिचे डब्बे पिशवीतून बाहेर काढले.
दोघांनी एकमेकांचे डब्बे अदलाबदल केले आणि लगेच सुरेखा मॉलकडे निघाली.
"उशीर झाला तर हाफ डे लागतो त्यामुळे थांबायला वेळ नाही"असे म्हणत ती निघाली. मागे वळून न पाहताच पुढे चालू लागली... त्याने अधाशासारखे दिलेले डब्बे उघडले, डब्बे रिकामेच होते. वैद्याच्या पुडी सारखी एक पुडी त्यात होती. आधी त्याने एका डब्ब्यातून एक पुडी काढली, मग दुसरी, मग तिसरी आणि शेवटी अजून एक चौथी पुडी काढली.
त्याला धीर धरत नव्हता, पटापटा त्याने सगळ्या पुड्या उघडुन पाहिल्या
१) आपले भेटणे कठीण झाले आहे,
२) घरी, वस्तीत सगळीकडे बोंबाबोंब सुरू झाली,
३) काय करावे सुचत नाहीये,
४) बापाला सोडता येत नाहीये,
वरील मजकूर चिठ्ठीत होता. कुठे पण कोणाचे नाव नव्हते. चुकून चिठ्ठी गहाळ झाली तरी, कोणाला काही समजले नसते.
सुरेखा कॉलेजला असताना, तेव्हाची परिस्थिती खूप वाईट होती, आई नाही, बाप असून नसल्या सारखा. मग वस्तीतील वाईट मुलांची वाईट नजर तिच्यावर कायम डोळे ठेऊन असायची. त्यातच ती कॉलेजला जाताना एकटी, शांतपणे जात येत असे. आपल्यावर माया करायला कोणी नाही. ना आई, ना बाबा आणि अशातच तिची आनंदशी ओळख आणि मग मैत्री झाली.
अचानक आनंदशी आलेला संपर्क, त्याचे प्रेम, तिची काळजी घेणे, माया, यामुळे ती आपसूक त्याच्या कडे आकर्षित झाली. मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले ते त्या दोघांना पण समजले नाही. एकमेकांना पाहीले की हळूच हृदयातील धडधड सुरू झाली. दोघांना पण एक दिवसाचा विरह सहन होईनासा झाला. त्यांनी कॉलेजच्या इतर ग्रुप मधील मित्र मैत्रिणींना देखील आपल्या दोघांचे प्रेम आहे. हे पहिले काही महिने समजू दिले नव्हते. न जाणो त्यांच्या कडून कुठे पसरले असते तर!!!
आनंद(नंद्या) तसा चांगला मुलगा होता. निर्व्यसनी तर होताच पण तिचा आदर देखील ठेवत होता. तो ही कमी वयातच शिक्षण आणि काम करू लागला. त्यामुळे दोघांच्यात लवकर जवळीक निर्माण झाली. काम करुन शिक्षण घेणे कठीण असते हे दोघांना पण माहीत होते. कॉलेजच्या निम्मित रोज भेट होत असे. ते संपले आणि भेट कमी होऊ लागली. म्हणूनच तिने किमान फोन वर बोलता येईल या हेतूने मोबाईल घेतला होता. पण बापाला संशय आला आणि त्याने तो काढून घेतला.
आनंद आणि सुरेखा दोघे पण एकाच समाजाचे होते, दोघे पण कमवते होते, सद्गुणी होते, तरी तिच्या बापाला तिने असे प्रेम विवाह करणे पसंत नव्हते. तिचे लग्न झाले तर माझे पुढे काय आणि कसे होणार असेच त्याला वाटे. जातीतील काही लोकांची स्थळे पण त्याने याच कारणासाठी नाकारली होती. बाप खूप स्वार्थी विचार करत होता पण आपल्या मुलीच्या मनातील भावना, अपेक्षा त्याला समजत नव्हत्या.
आज मिळालेल्या चिठ्ठ्या शर्टच्या खिशात ठेऊन तो पण कामाला निघाला. आनंद एका बिल्डिंग मध्ये रंग काम करत होता. डोक्यातील विचारातच त्याने गाडीला किक मारली आणि तो कामावर निघाला.
दोघे पण दोन वेगळ्या वाटेला निघाले. दोघांच्या मनात आपले पुढे काय? हाच प्रश्न होता.
"आनंद आज उशीर झाला? काय झाले?" कमावरच्या मित्राने विचारले.
"आज डब्बा तयार झाला नाही, शेवटी रिकामाच घेऊन आलो, दुपारी आणतो त्यात काही तरी" त्याने वेळ मारून नेली.
"सुरेखा आज थोडक्यात वाचलीस बघ. अजून पाच मिनट उशीर झाला असता तर..."
"हो न!!!"
दिवसभरात डोक्यात नाना विचार करतच दोघांनी कामे केली, काही चुकली, काही परत केली, मनाची अवस्था कोणाला सांगता येईना. त्याचे उत्तर सापडेना अशीच झाली. डोक्यात असंख्य विचार सुरू होते.
"बाबा माझा फोन द्या" संध्याकाळी कामावरुन आल्यावर सुरेखाने चढ्या आवाजात विचारले.
"देत नाही, विकला मी" दारूच्या नशेतच तो बोलला.
"नाही, मला माहित आहे तो इथेच आहे" ती शोधा शोध करू लागली .
"कहाला,पाहिजे? सुरेsss, मला चांगल माहीत आहे तू पोरांना फिरवायला लागली आहेस.." दारूच्या नशेत तो वाट्टेल ते बडबडत होता.
"बाबाssss" तिला खूप राग आला होता पण पुढे स्वतःला आवरून ती गप्प बसली.
"द्या फोन माझा, संस्थेच्या बाईंना फोन करायचा आहे."
"तेच फोन करायचा आणि मला परत द्याचा"
"हो"
त्यानं तिला फोन दिला. बाईंना कधी भेटू इतकेच विचारले आणि परत फोन बापाला देऊन टाकला.
सकाळी परत असेच रिकामे डब्बे, चिठ्ठी, आनंदची ओझरती भेट फक्त एका वेगळ्या चिठ्ठीत मजकूर होता
"आज पाच वाजता बाईंना भेट"
दोघे पण कामावरून लवकर निघाले. बाईंची भेट घेतली. त्यांची सगळी अडचण सांगितली, त्याचे काय उत्तर काढावे या बाबत चर्चा केली.
"हे पहा, सुरेखा मी तुझ्या घरी येते. तुझ्या वडिलांना समजवते किंवा काही दिवस तुम्ही दोघे शांत रहा. यातून काही मार्ग निघेल."
बाईंचा विचार दोघांनी पण मान्य केला, म्हणजे त्या दोघांकडे तो मान्य करण्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता.. बाई काही घरी येईनात...बापाला सोडून सुरेखला जाता येईना...आनंदला भेटता येईना...या सगळ्या निराशेत एकच अशेची गोष्ट होती, ती म्हणजे रिकामा डब्बा...त्यातील किमान चार ओळींची चिठ्ठी. या डब्बे अदलाबदल करण्यासाठी ओझरता का होईना किमान आनंद सुरेखा यांची भेट ...बाकी जैसे थे..
©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.
-------------------------------------------------------------------------------
English Translation
"Swap"
Houses adjacent to one of the ordinary settlements, some of which are made of sheets, some of which are mud-brick houses, where the walls are erected one on top of the other in mud bricks, in some places the walls are shared between the two houses, small children playing in front of the house. Odtoy. This is everyone's place of residence.
"Surekha, why do you want to go to work today? Get up early !!!" Dad woke her up in a rage.
Surekha woke up, giving her body a warm kiss. Her limbs were heavy. Was not waking up. One did not sleep through the night. It had been raining all night so the rain was coming into the house from some new places from the letter. So what Put the bucket under the stream. When it was full, the water went out and poured out all night. No matter how much he wanted to sleep, Surekha had to start work at 9 in the morning.
Surekha was going to work packing in a big mall. Her mother had been ill since she was born, and her father was going to a contractor to pick up sand and bricks. The father came home drunk at night, at the same time he sometimes killed the little Surekha, sometimes he killed his wife and in one such case his wife was beaten. Her waist was severely bruised. She could not be taken to the doctor and her mother died
His wife died because of his beating, so her father ate hi, they stayed at home all day. The mother was gone and the father was sitting at home in such despair. She had to get a job at such a young age. A service-oriented organization came to Surekha's aid and she completed her education by at least 12th standard. She got a permanent job in this mall through the same organization. Same as salary, but getting some extra money by working overtime. With this extra money, she bought a simple mobile phone.
Surekha got up from her seat and immediately started covering herself. There was still time to go to work. But I wanted to leave the house with all my belongings, the box, my father's cooking.
"Suress, oh sure"
"What aunty? Oh, do you come home from work today with Mahadu's pills?" The neighbour's aunt held a finished wallet of old pills and a hundred note in her hand.
"Yes, does Mahadu recover? And his hand."
"Yes lady is fine now, his pills ran out yesterday, the night was coming but the rhythm was water (rain) night"
"Yes"
"Our you originally wanted to be late, did you get a box? Why offer chapatis?"
"No aunt does"
As my aunt went, Sulekha covered everything quickly.
Dad's meal covered. Filled her cans and filled the bag, changed dresses and headed out of the house.
The shadow looked beautiful, the limbs were a little short, the height was beta, although the shadow was straight, the nose was straight, it looked very beautiful. As a smart, smart, dutiful person, she was supported by everyone in the neighborhood. The mall was close to home. But the walking distance was longer than the car. Since there was no vehicle, she walked to work and a two-wheeler was standing at the turn of Ain Mall ... He saw her coming through the car mirror. He saw her coming and going. There was no one with her. Although he had a scarf tied around his face, he noticed that she was beautiful.
He was sitting on the seat with both legs down, without putting a stand on the car. The handle of the car had a compartment bag in his left hand, the right hand he had placed on the car. The distance between Surekha and him was slowly decreasing now ... As his heartbeat increased ... He decided in his mind ... Once again the distance in the mirror was reduced. Surekha now came very close to his one or two hands ... He quickly grabbed her left hand with his right hand and stopped her walking. She was shocked and embarrassed by what had happened. She quickly looked to her left hand. There was no one on the road.
Let go
"Leave !!! Where's your phone?"
"Daddy took it away," she said angrily.
"Why?"
"Don't know"
"Wait, the mall is approaching. Someone saw you, give me your full cans here and take these cans of mine," said Surekha, pulling her cans out of the bag.
The two exchanged boxes and immediately headed for Surekha Mall.
"It's half a day if it's late, so there's no time to wait," she said. Without looking back, she started moving forward ... He opened the boxes given to him like greed, the boxes were empty. There was a pudi in it like a doctor's pudi. First he took one pudi out of a box, then another, then a third, and finally another fourth pudi.
He could not bear it, he quickly opened all the pudas
1) It is difficult to meet you,
2) Bombings started at home, everywhere in the neighborhood,
3) I don't know what to do,
4) The father cannot be released,
The text above was in the letter. Where but no one's name. Even if the note was missing by mistake, no one would have understood.
When Surekha was in college, the situation was very bad, not having a mother, not having a father. Then the evil eye of the bad boys in the neighborhood kept staring at her. In addition, she used to go to college alone, quietly. There is no one to love you. No mom, no dad and that's how she got to know Anand and then became friends.
The sudden contact with Anand, his love, her caring, Maya, attracted her to him. The two did not understand when the friendship turned into love. Seeing each other, the heart started beating. The two of them could not bear a day's separation. He also loves his friends from other groups in college. This was not understood for the first few months. I don't know where it would have spread from them !!!
Anand (Nandya) was such a good boy. He was not only addicted but also respected her. He started teaching and working at an early age. This created an early bond between the two. They both knew that working hard was the key to success. I used to visit every day for college. It ended and the visit began to wane. That's why she had taken the mobile with the intention of at least talking on the phone. But the father became suspicious and took it away.
Anand and Surekha both belonged to the same community, both were earning, were virtuous, but her father did not like her to have such a love marriage. He wondered what would happen to me if she got married. The places of some people of the caste but he had rejected for the same reason. The father was thinking very selfishly but he did not understand the feelings and expectations of his daughter.
He also went to work with the lottery ticket he received today in his shirt pocket. Anand was working paint in a building. With a thought in his head, he kicked the car and went to work.
But the two went their separate ways. What's next for both of you? That was the question.
"Happiness is late today? What happened?" Asked Kamawar's friend.
"The box is not ready today, we finally brought it empty, we will bring something in the afternoon" he wasted no time.
"Surekha, read it briefly today. If it was five minutes late ..."
"Oh no !!!"
Throughout the day, while thinking various thoughts in their heads, they both did things, made some mistakes, made some mistakes, no one can tell the state of mind. This is how the answer was not found. Numerous thoughts start in the head.
Baba, give me the phone.
"No, I sold it," he said intoxicated.
"No, I know he's here," she began to search.
"Where, you want to? Sure, I know you're going to turn the kids around ..." he muttered as he got drunk.
"Baba ssss" She was very angry but later she covered herself and remained silent.
"Give me the phone, I want to call the left of the organization."
"Call me and give me back."
"Yes"
He gave her the phone. He asked Baini when he would meet her and returned the phone to her father.
The same empty box back in the morning, the letter, a glimpse of happiness was just the text in a separate letter
"Meet the left today at five o'clock"
Both of them left early. Left met. He explained all their problems and discussed what to do about it."Look, Surekha, I'm coming to your house. I'll explain to your father, or you'll both be quiet for a few days. There's a way out of this."
Both of them agreed to the idea of the left, so they both had no choice but to accept it .. The woman could not come home ... She could not leave her father and go to safety ... She could not meet Anand ... There was only one thing in all these disappointments, that is Empty box ... a note of at least four lines in it. At least Anand Surekha's gift for exchanging these boxes ...
© Nikhil Devidas Vaze
9011096250
खुप छान
ReplyDelete