Tuesday, June 29, 2021

"शंकर/Shankar"


   "शंकर"


   कृष्णाची मुंज झाली होती आता तो जरा मोठा पण झाला होता. शाळेत शिक्षक, मित्र यांचा लाडका तर होताच पण काही बारीक सारीक खोड्या पण सुरू झाल्या होत्या...

  जसे की वर्गात बाकावर माती टाकून ठेवणे, मैदानात खेळताना मुद्दाम कोणाला तरी धक्का मारणे, असे अनेक उद्योग सुरू झाले. शाळेतून रोज दुपारी एक वाजता परत आला की आजी सोबत जेवण, मग झोप, संध्याकाळी मनसोक्त मित्रांसोबत खेळणे, अभ्यास....असा रोजचा दिनक्रम ठरलेला होता.

   त्या दिवशी सोमवार होता.. रविवारची शाळेला सुट्टी झाली आणि नव्या दमात सोमवारी शाळेत जाऊन दुपारी नेहमीच्या वेळी कृष्णा घरी परत आला. आई काही कामासाठी बाहेर गेली होती. आजी आणि कृष्णा जेवायला बसणार इतक्यात...घराच्या गेट जवळ कोणी तरी मोठ्या आवाजात शंख वाजवला. तो एकदम दचकलाच पण त्याला त्या आवाजाची उत्सुकता पण वाटत होती. तो लगेच घरा बाहेर आला...आणि....आणि...लगेच पटकन घरात परत आला. 

"काय रे राजू काय झाले? का आलास परत घरात? बाहेर कोण आहे?"
"माहीत नाही, पण खूप भीतीदायक आहे तो"
" कोण? चल पाहू आपण" आजी आणि कृष्णा बाहेर आले.

    कृष्णाने या व्यक्तीला पहिल्यांदाच पाहिले असल्यामुळे तो जरा घाबरून गेला. म्हणजे कोणी पण त्याला घाबरेल असेच त्याचे ते रूप होते.

     चांगला ६ फूट उंच, रंगाने तांबुस काळा, अंगाने हेss असाss बलदंड, अनवाणी पाय शेतात, मातीत काम केल्या प्रमाणे एकदम टणक, कडक आणि पायाला भेगा पण दिसत होत्या, दोन्ही पायात काळे धागे बांधलेले, खरंतर मूळच्या काळ्या सावळ्या रंगात सुध्दा ते काळे धागे ओळखून येत होते. कंबरे खाली कधी काळी लाल रंग असेल,  पण आता विटकरी दिसणारे धोतर होते, वरचे शरीर फक्त भस्म लावलेले, गळ्यात अनेक प्रकारच्या माळा उदा. रुद्राक्ष, काळे, लाल, हिरवे मणी असलेल्या माळा, मोठी घंटा (DDLJ सारखी), तसेच दोरीत बांधलेली एक कवटी, भक्कम चेहरा पण तो ही भस्म लावलेले, जाडजूड मिश्या, मोठ्या मोठ्या डोळ्या भवती पांढरा काळा रंग वापरून वर्तुळे काढलेली, कपाळावर भले मोठ्ठे त्रिशूळ रंगवलेले, डोक्यावर मुंडास आणि त्यात मोरपिसांचा भारा लावलेला. डाव्या हातात भिक्षा पात्र, उजव्या हातात लोखंडी त्रिशूळ आणि दोरीला बांधलेला पांढरा शुभ्र मोठा शंख तो त्याने हातात लटकवलेला होता. तो गेट जवळ आला तेव्हा त्याने हाच शंख जोरात वाजवला होता.

                                                

"राजू... ऐ राजू....चल त्याला अन्न देऊ....घाबरु नकोस.."

    आजीचा आधार घेत घेत तो आणि ती गेट जवळ आले. आजीने त्याच्या भिक्षा पात्रात पोळी भाजी वाढली आणि त्याने परत शंख वाजवला.

" आजी कोण होता ग तो? कसला भीतीदायक होता!!"
"अरे त्याला मसणजोगी म्हणतात, म्हणजे स्मशानात राहणारे जोगी"
"स्मशान म्हणजे काय?"
"अरे जेव्हा माणसं देवाघरी जातात तेव्हा त्यांना, जेथे जाळले जाते अशी जागा... पुरे आता...जेवायला बस"
"पण आजी माणसांना जाळतात का?"
"पुरे आताss...मी तुला सांगितले तरी तुला ते समजणार नाही आणि त्यामुळे मला अजून प्रश्न विचारशील, चल जेवायला बस"
"हो, पण तू त्याला आपल्या आधी जेवायला का दिले"
"अरे असे म्हणतात, दुपारच्या जेवणाच्या वेळी जर कोणी याचक (भिकारी, मागणी करणारा ) आला तर तो कदाचित देवच रूप बदलून आपली परीक्षा पाहायला आलेला असतो. आपण त्याला आपले पोट भरायच्या आत जेवायला देतो का? तेच तो पाहतो."
"पण, तो बोलत का नव्हता?"
"भिक्षा मिळाली तरच तो बोलतो आणि नाही मिळाली तर घंटा वाजवून निघून जातो."
"मग तो कुठे जातो?"
"अरे अशी काही घरी भिक्षा मागून झाली. की तो त्याच्या घरी जातो"
"त्याचे घर कुठे आहे?"

    आजीच्या उत्तरातून कृष्णाला अजून प्रश्न पडत होते. त्याचे आजी निरसन करत होती.

"अरे त्याचे घर दूर स्मशानभूमी जवळ असते."
"हो का?"जेवत जेवत कृष्णा प्रश्न विचारातच होता.

     संध्याकाळी मित्रांसोबत खेळताना त्यांना मी आज कोणाला पाहिले, ते त्याने सगळ्या मित्रांना सांगितले. त्याचे नीट वर्णन केले. सगळ्यांचं मित्रांना आता हा कोण माणूस आहे हे पाहण्याची उत्सुकता लागली.

"कृष्णा तो परत आला की मला कळव" पिंट्या म्हणाला
"मला पण ...मला पण" सगळे मित्र म्हणाले.
"हो हो सांगतो, पण जरा जपून, तो खूप रागीट आणि भीतीदायक दिसतो"
"असू दे रे... भूत नाही न!!!, मग काय भीती"

     मित्रांना कृष्णाने त्याचे वर्णन तर केले होते आणि स्वतःच्या मनाच्या जास्तीच्या चार गोष्टी पण सांगितल्या होत्या. पण आता मित्र जर त्याला भेटले, तर आपली काहीतरी पंचाईत होणार हे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने परत एकदा त्या मसणजोगीची भीती आपल्या मित्रांना दाखवली होती.

     अंधार पडला तसे सगळे सवंगडी एक एक घरी परतले. कृष्णा पण घरी आला. तरी दुपारचा तो मसणजोगी, त्याचा तो रंगवलेला चेहरा , त्याचे मोठे मोठे डोळे,  हे सगळे चित्र कृष्णाच्या डोक्यातून जात नव्हते. बाबा ऑफिस मधून घरी आल्यावर त्याने पाहिलेल्या मसणजोगी बद्दल काय काय पाहिले, आजीने त्याला कसे अन्न दिले हे सगळे सांगितले. 

"खरं तर मी त्याला आधी घाबरलो होतो..पण मग नाही... आजी सोबत गेलो त्याच्या समोर..." कृष्णा बढाया मारत सांगत होता.

    मध्ये अनेक दिवस गेले आणि अशाच एका सोमवारी परत तो मसणजोगी घरी आला. तशीच डाव्या हाताने गळ्यातील घंटा वाजवली आणि शंख पण वाजवला. आता मात्र कृष्णाची भीती चेपली होती. तो सरळ आजी कडून पोळी भाजी घेऊन त्याच्या समोर उभा राहिला.

    कृष्णा अगदी लहान ८-९ वर्षाचा, उंचीने लहान, दिसायला लोभस, गोंडस असल्यामुळे त्या मसणजोग्याची आपोआप नजर त्याच्यावर एकवटली, त्याच्या त्या कठोर चेहऱ्यावर बारीकसे हास्य आले, त्याने खाली वाकून आपले भिक्षा पात्र पुढे केले. उजव्या हातातील त्रिशूळा सकट कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवला...

" हर हर महादेव.... बम् बम् भोले...." असे म्हणत आशिर्वाद दिला आणि मोठ्याने शंख वाजवला.

कृष्णाची नजर त्याच्या गळ्यातील घंटेवर गेली.

"वाजवता का ही घंटा?" कृष्णाने विचारले.

    आपल्या गळ्यातील लटकवलेली घंटा त्याने काढून "वाजवा" असे म्हणून कृष्णाच्या हाती दिली. त्याने पण अगदी आनंदाने ती मोठी घंटा वाजवली. त्या आवाजाने आजी पण गेट जवळ आलीच.

"तुमचे नाव काय हाय?" तो मसणजोगी बोलला.
"कृष्णा दामोदर जोशी" त्याने आपले पूर्ण नाव सांगितले आणि "तुमचे नाव काय?" एकास एक प्रश्न कृष्णाने केला.
तो क्षणभर गडबडला..."काय काय ? मवं नाव? कहाला पुसता मला? आम्हाला नाव नसतं जी" 
"असं कसं? तुम्ही तर माझ्या पेक्षा किती किती मोठे आहात. मग तुम्हाला नाव नक्की असेल, सांगा की तुमचे नाव" त्याच्या त्या निरागस बोलण्याने त्याच्यातील माया स्पष्ट दिसत होती. 
"अरे सांग की तुझे नाव" आजी पण मोठ्या वयाने त्याला विचारत होती.

    दोघांचे पण मन मोडणे त्याला जमेना 

" सांगतो 'शंकर' , आजी आज पहिल्यांदा कोणी तरी मला मव नाव इचारले आहे, माझं पोरगा असल असत, ते या कृष्णा वनीच असला असतं पहा.."

तो त्याच्या मनातील बोलत होता. आजीला समजत होत कृष्णाला काही समजले, काही त्याच्या डोक्यावरून गेले.

"तुम्ही मला हा शंख वाजवायला शिकवता का?"
"हो, शिकवू की, पर आता नको, निघाल पाहिजे मला...पुढल्या वेळी शिकवतो "
"चालेल..."

   गेट जवळून कृष्णा आणि आजी पाठमोऱ्या मसणजोगीकडे पाहत होते. फरक इतकाच होता, आता तो शंकर होता. त्यातील बाप, माणूस, भक्त स्पष्ट दिसत होता...

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation

"Shankar"

    Krishna was confused, but now he was a little older.  At school, teachers and friends were pampered, but some subtle pranks were also started

   Many industries started, such as throwing dirt on the bench in the classroom, deliberately hitting someone while playing on the field.  When I came back from school at one o'clock every afternoon, my daily routine was to have lunch with my grandmother, then sleep, play with my best friends in the evening, study ..

    That day was Monday .. Sunday was a school holiday and Krishna returned to his home in the afternoon as usual.  Mom had gone out for some work.  Just as Grandma and Krishna were about to sit down to eat ... Someone near the gate of the house sounded the conch in a loud voice.  He was stunned but he was curious about the sound.  He came out of the house immediately ... and .... and ... immediately returned ho

 "What happened Ray Raju? Why are you back home? Who's out

 "I don't know, but it's too scary.

 "Who? Let's see you" Grandma and Krishna came out

     He was a little frightened when he saw this person for the first time.  I mean, it was like someone would scare him.."?"me.. ...

A good 6 feet tall, reddish in color, strong in body, bare feet, in the field, hard as in the soil, stiff and split feet, black threads tied at the feet, in fact even in the original black shadow color, the black threads were recognizable. There used to be a red color below the waist, but now there is a dhoti that looks ugly, the upper body is just burnt, there are many types of garlands around the neck like rudraksha, black, red, green beads, big bell (like DDLJ), strong face but it is burnt He has a thick mustache, a circle around his big eyes with white and black color, he has a big trident on his forehead, he has a beard on his head and a load of peacock feathers. In his left hand he held a begging bowl, in his right hand an iron trident and a large white conch tied with a rope.

 As he approached the gate, he sounded the same conch shell.

 "Raju ... Hey Raju ... let's give him food ... don't be afraid ..."

 He and his grandmother approached the gate. Grandma put poli, vegetables in his begging bowl and he played the conch again.

 "Who was Grandma? Who was scary !!"

 "Oh, he is called Masanjogi, meaning the one who lives in the cemetery."

 "What is a crematorium?"

 "Oh, when people go to the house of God, the place where they are burned ... enough now ... just sit down to eat."

 "But does Grandma burn?"

 "Enough now ... even if I told you, you wouldn't understand it and so you would ask more questions, let's just eat."

 "Yes, but why did you let him eat before you?"

 "Oh, it is said that if a beggar (beggar, beggar) comes at lunch, it is probably God who has changed his form."

 "Why wasn't he talking?"

 "If he gets a beggar, he speaks and if he doesn't get it, he rings the bell and leaves."

 "Then where does he go?"

 "Oh, he begs at home so he goes to his house."

 "Where is his house?"

Krishna was still questioning his grandmother's answer. His grandmother was resolving.

 "Oh, his house is far away near the cemetery."

 "Yes, why?" Krishna was thinking while eating.

 He told all his friends who I saw today while playing with friends in the evening. Well described. Everyone's friends were curious to see who this guy was now.

 "Krishna let me know if he comes back" Pintya said

 "Me too ... me too" said all the friends.

 "Yes, he says yes, but with a little care, he looks very angry and scary."

 "Let it be ... no ghost !!!, then what fear"

 Krishna had described it to his friends and also told four more things of his own mind. But now he had realized that if his friend met him, something would happen to him. So he once again showed his fear to his friends.

 As darkness fell, all the companions returned home one by one. But Krishna came home. However, the mason jogi of the afternoon, his painted face, his big eyes, all these pictures did not pass through Krishna's head. When Baba came home from the office, he saw what Masanjogi had seen, how his grandmother had given him food.

 "Actually, I was scared of him before..but not then ... I went with my grandmother in front of him ..."

 Krishna was boasting.

Several days passed in and one such Monday he came back to Masanjogi home. The left hand also rang the bell and the conch. Now Krishna's fear was crushed. He took a bunch of vegetables straight from his grandmother and stood in front of her.

 Krishna was very young, 8-9 years old, short in stature, greedy to look at, cute. He placed his hand on Krishna's head with the trident in his right hand ...

 Saying "Har Har Mahadev .... Bamb Bambhole ...." he blessed and sounded the conch loudly.

 Krishna's gaze went to the bell around his neck.

 "What time is it?" Krishna asked.

 He removed the bell hanging from his neck

 He handed it to Krishna as "Vajva".

 He also rang the big bell with great joy. With that voice, my grandmother came near the gate.

 "Hi what's your name?"

 "Krishna Damodar Joshi" He said his full name and what is your name? "

 He was confused for a moment ... "What? My name? Where can I clean it? We don't have a name."

 "How so? You are so much older than me. Then you must have a name, tell me your name."

 "Oh, tell me your name," Grandma was asking him at an older age.

He could not bear to see them both

 "I say, 'Shankar', grandmother, for the first time today, someone has called me Maw, if it was my Porga, it would be Krishna Vani."

 He was speaking his mind. Krishna understood something while understanding Aji, some went through his head.

 "Are you teaching me to play this conch?"

 "Yeah, let's teach, but not now, I have to go ... I'll teach next time"

 "Okay ..."

 Krishna and Aji were looking at Masanjogi from behind the gate. The only difference was, now it was Shankar. The father, the man, the devotee were clearly visible.

©Nikhil Devidas Vaze
9011096250




 






3 comments:

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले