"ओळख"
ओळख हा शब्द वाचला, ऐकला, बोलला, किंवा साधा स्मरला तरी आपल्या डोळ्यासमोर अनेक चांगल्या वाईट गोष्टी, घटना लगेच पुढ्यात येतात.
आपला जन्म झाला की आपली सगळ्यात पहिल्यांदा कशाची ओळख होत असे तुम्हाला वाटते...बरेच जण म्हणतील की पहिली ओळख होते ती आपल्या आईची, होय ते तर आहेच. पण मला असे वाटते की आपला जन्म झाल्यावर आपल्याला पहिली ओळख होते ती श्र्वासाची. बरोबर न!! श्वासच आपल्याला पहिल्यांदा याची जाणीव करून देतो की, आता तुझी पुढील ओळख माझ्यामुळेच निर्माण होणार आहे.
तहाने असताना आई, बाबा, आजी, आजोबा, भाऊ, बहिण तर आपल्याला नंतर ओळखायला येतात. आई ही चेहऱ्याने ओलखण्याआधी आपल्याला तिच्या स्पर्शातून तिची ओळख करून देते . जी आपल्याला मरणापर्यंत टिकून राहते.
ओळख जशी नात्यात आहे तशी अजून एक महत्वाची ओळख आपल्याला अगदी लहान वयात मिळते. ती म्हणजे आपल्या मातीशी. आपली जन्मदाती आई तर आहेच पण या धरणीमातेची ओळख आपल्याला लहान असतानाच यायला लागते हे कसे? मुलं रांगायला लागले की त्याच्या हाता पायाला माती लागतेच, पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते माती चाटू लागते. विज्ञान याची कशी आणि काय उकल करते ते मला माहित नाही. पण या माती चाटण्याने आपल्या मातृभूमीची ओळख होते हे नक्की.
शिवाजी महाराज जेव्हा बाल्यकाळात होते. ते पण असेच रांगुन आपले कपडे, अंग मातीने भरवून घेत असतील. पुढे याच मातीच्या ओळखीने त्यांना आपल्या अंगा खांद्यावर घेतलें. लहान पणातील चिखलात खेळून आनंद तर घेतलाच पण या भूमीचा कण आणि कण आपलासा केला.
असे म्हणतात लहान पणाची ओळख आपण कधी विसरत नाही...म्हणजे याचा नेमका काय अर्थ असेल? अशा नेमक्या कोणत्या ओळखी आहेत ज्या आपण जन्मभर लक्षात ठेवतो. मला एक पटकन आठवते ती म्हणजे गरम तवा पाहून आईने सांगितले होते "हाsss आहेsss, भाजेल" गरम तव्यावर हात लावून खरंच हात भाजतो का? हे ही आपण पाहतोच. मग हे कायम लक्षात राहते की गरम तवा खरंच आपल्याला चटका देतो. ही लहान पणाची ओळख आपल्याला पुढे अनेक प्रसंगांतून वाचवते. जिथे धोका आहे किंवा काही संकट असेल तिथे आपल्याला हा चटका नक्की आठवतो. तसेच सकाळी सकाळी, अंघोळ झाली की देवाची प्रार्थना किंवा भक्ती, नमस्कार ही ओळख आपल्याला पूर्ण वेळ सोबत करते. अशी अनेक उदाहरणं देणे शक्य आहेत.
लहान असताना अशीच पहिली ओळख होते ती आपल्या शाळेची, वर्गाची, प्राथमिक शिक्षक किंवा बालवाडीतील बाईंशी, हे सगळ्यांना नक्की पटेल, आपण जरी खूप मोठे झालो, अगदी पुढील जीवनात आपली स्वतःची ओळख निर्माण करू शकलो. तरी त्या बालवाडी मधील आपल्या बाई/ ताई आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांचे लाड, पाठीत मारलेले धपाटे, मायेने जवळ घेऊन मांडीवर बसवणे, डब्बा जर खात नसू तर मायेने तो त्या आपल्या हाताने भरवत. दुसऱ्यांच्या मुलांवर माया कशी आणि का करावी याचीच बाई आपल्याला ओळख करून देत होत्या असे वाटते .
आपल्याला आठवत असेल, फार पूर्वी ' गोट्या' नावाचे एक मराठी उत्तम धाराविक लागे (https://youtu.be/1eBp8qE7Kmg) त्यात गोट्याला माई आपल्या मुला प्रमाणे सांभाळतात. आपले मूल असताना दुसऱ्याची आई ती कशी होते. याचीच माई ओळख करून देते. तशाच या बालवाडीतील बाई पण. मला अजून माझ्या बाईंचा चेहरा त्यांची बोलण्याची पद्धत अगदी स्पष्ट आठवते.

शाळेत मित्र, मैत्रिणी, वर्गशिक्षक, नियम, सूचना, अभ्यास याची ओळख होतेच, पण महत्वाचे म्हणजे कसे वागू नये याची महत्वाची ओळख आपल्याला शाळेतून मिळते. मी गेली अनेक वर्षे पुस्तकांच्या व्यवसायात आहे. आमचे एक ज्येष्ठ जाणकार वाचक नेहमी म्हणतात, रामायण कसे वागायचे याची ओळख करून देते, तर कसे वागू नये याची महाभारत ओळख करून देते. तसेच म्हणावेसे वाटते की, शाळेतील काही उडाणटप्पू मित्र कसे वागू नये याची ओळख करून देतात, तर शाळा आपण कसे वागावे याची ओळख करून देते. आपल्यात बंधूभाव, राष्ट्रभक्ती याची ओळख शाळेतील राष्ट्रगीत, प्रार्थना या गोष्टी करून देतात.
या ओळखीवर किती आणि काय लिहू तितके कमीच आहे. बाल्य वय संपले की तरुणपणी कॉलेज मधील नवीन मित्रांची ओळख. दुसऱ्या कोण्या मित्राला बोलण्याआधी वर्गातील मुलीशी आपली झालेली पहिली ओळख...ती भावना...अठवती आहे का? पहिल्या पावसातील मातीचा सुवास सांगणे कठीण. तसेच आपल्या वर्गातील मुलीची झालेली पहिली ओळख हे ही सांगणे कठीण. आजपण आपले डोळे मिटा, लगेच आपला पहिला मित्र-मैत्रीण, यांची झालेली पहिली ओळख नक्कीच सगळ्यांना दिसेल. कदाचित तो मित्र, ती मैत्रीण आज काही कारणामुळे आपल्या सोबत नसतील तरी देखील आपल्याला ती ओळख कधीच मिटणार नाही.
आपल्या रोजच्या दिनक्रमात अनोळखी लोकांची कुठे पण आपली ओळख होत असते. विशेष म्हणजे प्रवासात तर हमखास ओळखी होतात. आपण त्या आवर्जून करतोच. प्रवसात वेळ जातो आणि गप्पा होतात. 'ओळख असलेली कधी पण बरी', असेच आपण म्हणतो. पु.ल. आठवले का... "पेस्तन काका" किंवा व. पु. काळे यांचा "पंत वैद्य" हे दोन्ही प्रवसातील ओळखी झालेलेच व्यक्ती चरित्र आहेत.
ओळख असणे, ती काढणे कधी कधी फायद्याचे ठरते तर कधी कधी नुकसानीचे पण ठरते.
याच ओळखी विषयी आपल्या मराठी, हिंदी चित्रपटात अनेक प्रसंग आहेत. आनंद पिक्चर मधील " अरेsss मुरारीलालाsss," राजेश खन्ना अशीच यानिमित्त अनेकांची ओळख करून घेतो. हा एक विनोदी, पण अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे न? आपल्याला जगायला अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल असे लागते पण अजून एक महत्वाची गोष्ट आहे. जी आपण बरेजदा विसरतो, ती म्हणजे समाज, तो असेल तर आपली ओळख आहे..मित्रमंडळी, नातेवाईक हे सोबत असावे तरच आपले जगणे सोपे होते.
असेच एक उदाहरण म्हणजे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकात आहे . त्यात नथुराम गोडसे म्हणतात " नाना, आता ओळख न दाखवणे, किंवा अनोळखी असणेच योग्य आहे. माझ्या ओळखीमुळे कदाचित तू पण अडचणीत येशील" आठवले का? आपल्याला पण असे अनेक प्रसंगी वाटले असेल की "अरे याची माझी ओळख आहे हे समजले तर...." या ओळखीचे असेच एक नुकसान
" श्रेयसsss" श्रेयस तळवळकरला चुकून बसलेला मार...आठवला ( दुनियादारी).
आपली इतरांशी ओळख असणे आणि आपली ओळख निर्माण करणे हे फार महत्त्वाचे कार्य आहे. संघाचे दुसरे सर संघचालक प. पू. श्री गोळवलकर गुरुजी यांची एक खासियत मुद्दाम सांगतो. प.पू. गुरुजी कधीच ओळखी विसरत नव्हते अगदी अनेक वर्षांनी पाहिले तरी...
म्हणून म्हणतो, आपण कोण आहोत? का आहोत? आपले ध्येय काय? याची ओळख जर आपण विसरलो तर आपली ओळख निर्माण करणे शक्य होत नाही. आपली ओळख हीच की, आपण माणूस आहोत. आपल्याला मन, बुध्दी, वाणी आहे त्याचा सदुपयोग करून आपण नक्कीच आपली ओळख निर्माण करू शकतो.
©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Identity"
Even if the word identity is read, heard, spoken, or simply remembered, many good and bad things come before our eyes, events come to the fore immediately.
When you are born, what do you think is the first thing you know ... Many people will say that the first thing you know is your mother, yes it is. But I think the first thing you know when you're born is breathing. Not right !! The breath makes you realize for the first time that now your next identity is going to be created by me.
When you are thirsty, mother, father, grandmother, grandfather, brother, sister come to know you later. The mother introduces us through her touch before we recognize her by her face. Which lasts us until we die.
Just as identity is in a relationship, another important identity we get at a very young age. That is with our soil. You are the birth mother, but how did you get to know this earth mother when you were young? When the children start crawling, his hands and feet get wet, but most importantly, he starts licking the dirt. I don't know how and what science solves. But licking this soil is definitely the identity of our motherland.
When Shivaji Maharaj was in his childhood. They will also fill their clothes and limbs with dirt. Later, recognizing this soil, he carried them on his shoulders. I enjoyed playing in the mud in the small water, but the particles and particles of this land made you happy.
It is said that we never forget the identity of small water ... so what exactly does it mean? What exactly are the identities we remember throughout our lives? I remember one time when she saw a hot frying pan, her mother had said, "This is haass." This is what we see. Then it is always remembered that the hot griddle really gives you a click. This small water identity saves us from many situations ahead. Where there is danger or some crisis, we remember this click. Also in the morning, after bathing, whether it is prayer or devotion to God, Namaskar introduces us to you full time. It is possible to give many such examples.
The first such acquaintance as a child was with your school, class, elementary teacher or kindergarten lady. However, you will never forget your wife in that kindergarten. His pampering, slaps on the back, Maya holding him close and sitting on his lap, if I don't eat the box, Maya would fill it with her hands. I think the woman was introducing us to how and why to love other people's children.
As you may remember, a long time ago there was a great Marathi serial called 'Gotya' (https://youtu.be/1eBp8qE7Kmg) in which Gotya is taken care of by Mai like her son. How she was the mother of another when she was a child. This is what Mai introduces. So is the woman in this kindergarten. I still vividly remember my left face and the way they spoke.
In school, friends, girlfriends, class teachers, rules, instructions, studies are known, but more importantly, we get important information from the school on how not to behave. I have been in the book business for the last several years. One of our senior knowledgeable readers always says, Ramayana introduces how to behave, while Mahabharata introduces how not to behave. It also seems that some of the flying friends at school teach us how not to behave, while the school introduces us how to behave. Brotherhood and patriotism are introduced in us by the national anthem and prayers at school.
There is so little to write about this identity. Introducing new friends in youth college as childhood ends. Do you remember your first acquaintance with the girl in the class before talking to another friend? It is difficult to tell the smell of the soil from the first rain. Also, it is difficult to say that this is the first acquaintance of a girl in our class. Even today, if you wipe your eyes, your first friend's identity will be visible to everyone. Maybe that friend, even if that friend is not with you today for some reason, you will never lose that identity.
In our daily routine, we get to know strangers everywhere. What is special is that we get to know each other while traveling. We are doing that. Time travels and chats take place. That's the decent thing to do, and it should end there. P.L. Do you remember ... "Peston Uncle" or so. P. Kale's "Pant Vaidya" is a well-known character in both the journeys.
Having an identity, removing it is sometimes beneficial and sometimes harmful.
There are many instances in our Marathi and Hindi films about this identity. In the Anand picture, "Aress Murarilalassss," Rajesh Khanna introduces many on the same occasion. Isn't this a humorous, but very important occasion? We need food, clothing, shelter, mobile to survive but there is another important thing. What we often forget is the society, if it is, then it is our identity. Our life becomes easier only if we have friends and relatives with us.
One such example is in the play 'I am speaking Nathuram Godse'. In it, Nathuram Godse says, "Nana, it is better not to show your identity now, or to be a stranger. You may get in trouble because of my acquaintance." You may have thought on many occasions that "Oh, if you understand that I know this ...." Such a loss of identity.
"Shreyasssss" Shreyas Talwalkar was mistakenly beaten ... Athavala (worldliness).
Getting to know others and building your identity is a very important task. The second head of the team, Sanghchalak P. E. Mr. Golwalkar deliberately mentions one of Guruji's specialties. P.P. Guruji never forgot his identity, even after many years ...
So who are we? Why are we What is your goal It is not possible to create our identity if we forget its identity. Our identity is that we are human. We can certainly create our identity by making good use of the mind, intellect and voice we have.
© Nikhil Devidas Vaze
9011096250
Mastch ..
ReplyDeleteNice
ReplyDelete👌
ReplyDeleteMast 👍🏻
ReplyDelete