Sunday, June 13, 2021

"सायकल! छे, हा तर Harculas चा घोडा"

 "सायकल! छे, हा तर Harculas चा घोडा"



   पुण्यात शिकायला आलो आणि काकांचे घर ते कॉलेज असा प्रवास सुरू झाला (वारजे माळवाडी ते डेक्कन) पण रोजचे बस मधील अनुभव (फक्कड पुणेरी अनुभव मला प्रवासातच मिळाले) त्यापेक्षा, लागणारा वेळ आणि पैशामुळे, आपली सायकल बरी असे वाटत होते. कॉलेजला यायला - जायला तसेच इतर काही कामासाठी तिचा उपयोग होणार होता.

    पु.ल.म्हणतात ना तसे 'पुण्यात सायकल चालवणे म्हणजे हत्यार चालवण्यासारखे आहे'.  

मला ११ वीला असताना बाबांनी "Herculas शक्ती" ही सायकल घेऊन दिली होती, ती बाबांनी ट्रॅव्हल्सनी पुण्याला पाठवली.

    मी ती मनपा येथे सकाळी घ्यायला गेलो.(तेव्हा बाहेरून येणाऱ्या बऱ्याच ट्रॅव्हल्स मनपा येथे थांबत) मस्त पैकी सायकल  मनपा ते  वारजे माळवाडी चालवत घेऊन गेलो, हा पुण्यातला पहिला सायकल प्रवास केला. मी कुठे तरी वाचले होते कि पुणे हे सायकलींचे शहर होते वगैरे. त्या दिवशी मला पण खूप  भारी वाटत होते की, आपण पुण्यात सायकल चालवत आहोत......आणि तो पण 'आपल्या नेहमीच्या घोड्यावर.

    पावसाळा सुरू झालेला होताच. माळवाडी ते डेक्कन असे रोज पावसात सायकलवर  येणे -जाणे सुरू होते, ते पण एका हातात छत्री आणि दुसरा हात सायकलच्या ब्रेकवर, (खास परभणी स्टाईल). कदाचित पुण्यात अशी सायकल मी एकटाच चालवत असेल. 

    या सायकलवर पुण्यात खूप प्रवास केला. कॉलेज, क्लास, सिंहगड, खडकवासला अश्या अनेक ठिकाणी मी सायकलवर फिरायचो. एवढेच काय शाखेच्या कामासाठी तर एका वेळी दोन बाल आणि दोन शिशु स्वयंसेवकांना घेऊन शाखेत जात होतो.

    मला एक प्रसंग आठवतोय.......तेव्हा माझ्या एकट्याकडेच सायकल होती. या सायकल वर दोन मित्रांना घेऊन ( एक मागे कॅरिअरवर आणि एक समोर दांडीवर ) बसून डेक्कन ते शनिवारपेठ असा प्रवास अनेक दिवस करत होतो.  कदाचित हाच सायकल चालवण्याचा अनुभव मला आयुष्यात खूप काही शिकवून गेला. दुसऱ्याचे ओझे आपले मानून  काम करणे हा संस्कार माझ्यात विकसित झाला.

    मी जवळ जवळ ८ वर्षे पुण्यात सायकल चालवली आहे आणि माझ्या Harculas च्या घोड्यानी पण मला खूप साथ दिली.

    एकदा असाच कॉलेजला  जात होतो. कॉलेज आता जवळ आलेले होते. मी सायकल चावताना माझ्याच तंद्रीत होतो. डाव्या हाताला एक झक्कास पांढरी चारचाकी लागलेली पाहिली....आणि...आणि...तितक्यात त्याचे मागचे दार उघडले गेले. माझे लक्ष त्या दाराकडे गेले पण ब्रेक मारायला उशीर झाला होता...खरंतर गाडीमधील व्यक्तीने दार उघडताना मागे पाहून मग दार उघडायला हवे होते. पण त्यांनी ती चूक केली न बघता सरळ दार उघडले. मी सरळ त्या उघड्या दारावर जाऊन आदळलो. माझ्या सायकलचे समोरील चाक वाकडे झाले. पडल्यामुळे जरा पायाला लागले. 

                            

"अहो, अहो, असे कसे दार उघडलेत!!...मला काय माहित तुम्ही दार उघडणार ते" मी पडलेली सायकल उचलत उतरणाऱ्या बाईला विचारले.
"सॉरी, सॉरी...माझ्या लक्षात आले नाही" आपली चूक लक्षात येऊन त्या बाई म्हणाल्या.

    मी सायकल उचलली आणि पाहिले तर काय? गाडीत आमच्याच वर्गात असणारी एक पोरगी समोरील सीटवर बसलेली. मी काही न बोलता सायकल नीट केली आणि कॉलेजकडे निघालो. त्या पोरीन पाहिले असेल नसेल देव जाणे? मला उगाच लाज वाटली. मी आपला सायकलवर कॉलेजला येतो ...तेही पुण्यात...माझ्या मनात काही तरी वेगळेच विचार आले. स्वतःची लाज वाटली. कमकुवत बुद्धीचा विचार मनाला स्पर्श करून गेला. पण त्याच दिवशी संघाच्या जेष्ठ प्रचारकांना हा माझ्या मनातील कोता विचार बोलून दाखवला.

    त्यावर ते इतकेच म्हणाले "तुझ्याकडे तर सायकल आहे, जो तुझा लाडका घोडा आहे, पण बाकी तर बरेच विद्यार्थी चालत येतात कि!!! मग कोण जास्त श्रीमंत आहे? तुला तर आनंद झाला पाहिजे. तुझ्या घरच्यांनी तुला सायकल घेऊन दिली."

   "अरे हो कि माझ्याकडे तर माझा घोडा आहे...आणि बाकी...." हा विचार मला  मनापासून पटला.  

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation

                                            "Bicycle! Yes, this is Harculas's horse."

    I came to Pune to study and started my journey from my uncle's house to college (Warje Malwadi to Deccan) but my bicycle felt better because of the time and money it took than the daily bus experience (I got the Pune experience from traveling). It was to be used for commuting to and from college as well as some other work.

    As P.L. says, 'Cycling in Pune is like riding a weapon'.

When I was 11 years old, Baba gave me a bicycle called "Herculas Shakti", which Baba sent to Pune by Travels.

    I went to take it to the Municipal Corporation in the morning. (Many of the travels coming from outside stopped at the Municipal Corporation). I had read somewhere that Pune was a city of bicycles and so on. On that day, I felt very heavy that we were cycling in Pune ...... and he was also riding his usual horse.

    As soon as the rains started. From Malwadi to Deccan, people start cycling in the rain every day, but with an umbrella in one hand and a bicycle brake in the other (special Parbhani style). Maybe I am the only one riding such a bicycle in Pune.

    I traveled a lot in Pune on this bicycle. I used to cycle to many places like college, class, Sinhagad, Khadakwasla. What's more, for the branch work, I was going to the branch with two children and two infant volunteers at the same time.

    I remember an incident ....... I had a bicycle alone then. I was traveling from Deccan to Shaniwarpeth for several days on this bicycle with two friends (one on the back carrier and one on the front pole). Maybe this experience of cycling taught me a lot in life. The culture of working as one's own burden developed in me.

    I have been cycling in Pune for almost 8 years and my Harculas horse has been very supportive.

    I was going to college like this once. The college was now approaching. I was in a trance when I cycled. On his left hand he saw a zakkas white four-wheeler .... and ... and ... at that moment his back door was opened. My attention went to that door but it was too late to hit the brakes ... In fact, the person in the car had to look back when opening the door and then open the door. But they opened the door straight away without seeing the mistake. I went straight to that open door and crashed. The front wheel of my bicycle turned. Falling caused a bit of a foot injury.

"Hey, hey, how did you open the door like that !! ... I don't know if you will open the door" I asked the woman who was picking up the fallen bicycle.
"Sorry, sorry ... I didn't notice" the lady said realizing her mistake.

    What if I picked up the bike and looked? Sitting in the front seat of a car in our classroom. Without saying a word, I cycled straight to college. Have you seen that Porin go to God? I was ashamed. I come to college on my bicycle ... also in Pune ... something different came to my mind. Felt ashamed of himself. The thought of a weak intellect touched the mind. But on the same day, I shared my thoughts with the senior preachers of the Sangh.

    He said, "You have a bicycle, which is your darling horse, but the rest of the students are walking !!! So who is richer? You should be happy. Your family gave you a bicycle."

   "Oh yes, I have my horse ... and the rest ..." I thought to myself.

© Nikhil Devidas Vaze
9011096250

No comments:

Post a Comment

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले