"जय गुरु बोल बच्चन"
"हो ये ये " ..PMT चे चालक काका डावा हात दाखवत म्हणाले
मी बस मधे शिरलो आणि पाहतो तर काय? सिटी बस मधे ३ ते ४ तिकीट तपासणी अधिकारी. एकतर बसमध्ये समोरच्या दारातून चढल्यामुळे तिकीट काढायला मागे कंडक्टर पर्यंत जावे लागणार होते.
मी काकाने लिहून दिलेला पत्ता पाहिला, त्यानुसार सुर्यनगर (माळवाडी) चे तिकीट काढणे अशी सूचना होती. मला पुण्यात येऊन जेमतेम ८ दिवस झालेले होते. अजून बस स्टॉप, PMT चे नंबर,काही लक्षात येत नव्हते.
असाच बसमधील गर्दीमधून कसा बसा बसच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या कंडक्टर पर्यंत आलो, पण तितक्यात, तिकीट तपासणी अधिकाऱ्याने मला "तिकीट कुठे आहे याची विचारणा केली?'
मला पटकन काही सुचेना?????
आणि त्या अधिकाऱ्याचा चेहऱ्यावरील भाव ' आज कसा बकरा सापडला ' असाच दिसत होता.
"हे काय!! तिकीट काढतोय." मी पटकन उत्तर दिले
"बस मध्ये कुठे बसला? "
त्याने परत विचारले
" हे काय आताच" मी म्हणालो
"पण आता तर आम्ही पण तपासणीसाठी बस मध्ये आलो तू काही मला दिसला नाही चढताना. त्यांनी शंकेने माझ्याकडे पहात विचारले.
"काका मी समोरून बस मध्ये आलो" मी अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले.
"अरे पण आता बस स्टॉप वरून समोरून कोणीच चढले नाही आणि तू म्हणतोय समोरून चढला?" तो अधिकारी काही केल्या माझी पाठ सोडत नव्हता. आता बोलबच्चन द्यावेच लागणार होते.
"अहो मी आता बस जिथे थांबली होती, त्या सिग्नलला चढलो आणि ते पण ड्रायव्हर काकांना विचारून आत आलो,विचारा पाहिजे तर त्यांना.' मी शांतपणे पुढचे उत्तर दिले.
" हे पहा, मी गावावरून नुकताच पुण्यात आलो आहे, ही पद्धत आहे का तुमची नवीन विद्यार्थ्यांना स्वागत करण्याची........." (मी धीर सोडला नाही. कारण मी सत्य बोलत होतो) माझी ही बोलबच्चन गिरी चालू असताना
शेवटी एक तपासणी अधिकारी म्हणाला की ,"मी पाहिला त्याला बस मध्ये येताना."
"हुश्श .....बसss. सुटलोsssबाबा " असे म्हणून मी रीतसर तिकीट घेतले आणि घरी आलो.
काकाला संपूर्ण किस्सा सांगितला, त्याने पाठ थोपटली आणि बाबांना कळवले "निखिल रुळला बरं का पुण्यात आणि विशेष म्हणजे पुण्याने त्याला सामावून घेतले"
असे अनेक कठीण प्रसंगातून याच बोलबच्चनमुळे सुटलो आहे. कधी ट्राफिक पोलीस, कधी उडाण टप्पू पोरं असे अनेक वेळा आपली सोडवणूक केली आहे. एकदा तर चक्क रेल्वे रूळ ओलांडताना स्टेशन वरील अधिकाऱ्याने पकडलं पण फक्त "जय गुरु बोलबच्चन" बसsss. बाकी काही नाही.
९०११०९६२५०
English Translation
"Jai Guru Bol Bachchan"
"Should the driver's uncle get in front of the bus?" ... I asked nervously.
"Yeah yeh yeh" ..PMT driver Kaka said showing his left hand
What if I get on the bus and see? 3 to 4 ticket inspection officers in city buses. Either way, the bus had to go through the front door and go back to the conductor to get the ticket.
I saw the address written by my uncle, according to which there was an instruction to get a ticket for Suryanagar (Malwadi). It had been almost 8 days since I came to Pune. Yet the bus stop, the PMT number, was not noticed.
How did I get out of the crowd and reach the conductor standing at the back of the bus, but in the meantime, the ticket inspector asked me, "Where is the ticket?"
Any suggestions to me quickly ?????
And the expression on the officer's face was like, 'How did you find the goat today?'
"What the heck !! Getting a ticket." I answered quickly
"Where did you sit in the bus?"
He asked back
"What's this now?" I said
"But now we got on the bus to check. I didn't see you getting on. They looked at me suspiciously and asked."
"Uncle I got in the bus in front" I replied quite honestly.
"Oh but now no one got in front from the bus stop and you say got in front?" He did not leave me alone. Now Bolbachan had to give.
"Hey, I got to the signal where the bus stopped now, and he came in asking the driver's uncle, if you want to ask him." I quietly answered further.
"Look, I have just come to Pune from the village, is this the way to welcome your new students ........." (I did not give up. Because I was telling the truth)
Finally, an investigating officer said, "I saw him getting on the bus."
"Hushh ..... bus sss. Sutlo sss baba" so I took the ticket and came home.
He told the whole story to his uncle, patted his back and told Baba, "Why Nikhil Rula is better in Pune and especially Pune has accommodated him."
Bolbachan has escaped from many such difficult situations. Sometimes the traffic police, sometimes the flight attendants have solved our problem many times. Once, while crossing the railway line, he was caught by the officer at the station, but only "Jai Guru Bolbachan" bus sss. Nothing left.
9011096250



बोल बच्चन वरून मला एक आठवला, मी पुण्यात असताना अलका टॉकीज जवळ चे सिग्नल माझ्याकडून नकळत ब्रेक केला. सिग्नल ब्रेक केल्या नंतर साहजिक आहे फाइन तर लागणारच जेव्हा माझा driving licence चेक केला तेव्हा योगा योगाने त्याच नाव पण आणि माझं नाव सारखच होत ते म्हणाला अरे वा मी म्हणलं काय झाला माझा name plate read करा. केला तर same मग सुरू बोलबच्चन😂😂
ReplyDeleteधन्यवाद,
ReplyDeleteमाझ्या सुदैवाने अजून एकदा पण कोणत्याच ट्राफिक पोलिसाला पैसे द्यावे लागले नाहीयेत. फक्त जय गुरु बोल बच्चन