"बदल- उत्तरार्ध"
"अरे झोपू दे..एकतर रात्री लवकर झोप लागली नाही आणि तू सकाळी सकाळी उठवलं." अनिकेत झोपेतेच बडबडत होता.
"अन्या झोपायला आला का इथ, चल बाहेर मस्त एक चक्कर मारून येऊ. झोपतर नेहमीची आहे."
ना इलाजस्तव अनिकेत डोळे चोळत उठला, पाण्याने चुळ भरून प्रभूच्या मागे निघाला.
"बघ बघ जरा..गावाकडे.."उत्साहात प्रभू म्हणत होता.
मागे लिहल्या प्रमाणे देवीचे मंदिर लोक वस्तीपासून जरा अलिप्त होते त्यामुळे अनिकेत आणि प्रभू दुरून गावातील सकाळच्या हालचाली पाहत होते.
कोणी फक्त कंबरेला कर्दोटा बांधलेले पोरं आईला पळवत होते, कुठे चुलीवर गरम पाणी ठेवले होते, कोणी मस्त तंबाखूची मिष्री दातावर लावत होते.
"अरे चहा म्हणजे त्या कालच्या हॉटेल मध्ये जावे लागेल"
"चल की मग जाऊ"
दोघे खोलीत आले,पाण्याच्या बाटलीने दात घासून बाहेर पडले.
"काय रे पोरांनो कुठं निघाले?"
" काही नाही मामा चाललो असेच"
"या असे या" म्हणून एक मध्यम वयाच्या मामांनी घराच्या जवळ बोलावलं.
" काल तुम्हासनी पाहितलं मी इस्टँडवर, कुठून आले म्हणायचे?" मामांनी विचारले.
"आम्ही जिल्हातून आलो आहोत."
"वाईच छा घेता का?"
"नको हो, तुम्हाला त्रास" प्रभू म्हणाला
"तरास कसला...तुम्ही गावचे पावन...घ्या वाईज छा. भामाss हो भामा...लेक माझी....छा टाक बरं...."
मामा आत्मीयतेने सगळी चौकशी करत होते...तितक्यात कान नसलेल्या कपात चहा आला.
"अहो असे का म्हणता, मामा?"
चहात दूध नव्हते हे पाहून अनिकेत हळूच म्हणाला " प्रभू हा असा चहा कधी पीला नाही रे."
" आमचा गरिबाचा छा आहे बाबांनो. प्या प्या. आवडलं तुम्हाला..."
खरचं मामांचे प्रेमच त्या चहात होत, बाकी फक्त गरम गुळाचे पाणी...तो प्रेमाचा चहा दोघांनी पिला.
"या असे परत...." मामांनी प्रेमाने दोघांना निरोप दिला.
सकाळचे आठ वाजायला आले होते. दोघे पण खोलीत जात असताना पुजारी काका कुंडाजवळ दिसले. बहुदा पूजेसाठी कुंडात डुबकी मारून पाणी घ्यायला आले असतील असा अंदाज अनिकेतन काढला
"काय पोरांनो झोप लागली का?"
"हो हो लागली नं"
"काका आम्हाला पण अंघोळ करायची आहे हो! त्याची सोय कुठे आहे?"
"खोल्यांच्या मागे एक संडास आहे आणि त्याच्या बाजूला अंघोळीचा एक मोठा दगड आहे. तिथं घ्या उरकून, जवळच एक हापसा आहे, हवं तर घरून एक बकिट, मग्गा देतो"
"बर बर, पण या कुंडात स्नान केले तर? प्रभू ने विचारलं"
"सकाळी सात नंतर कुंडात स्नान करायचे दोन रुपये पडतील.असा नियम आहे देवस्थानचा."
पुजारी काका कुंडात उतरायला सुरुवात करत म्हणाले.
"चला अनिकेतराव हापसा पाहून येऊ, म्हणजे अंघोळ करायची, का आज गोळीच घ्यायची हे ठरवता येईल."
आपण कुठे अवरावे या विचारात दोघे हपसा पाहायला गेले तर....
"सारेss(सारिका) आपल्या कडले दिसंनात हे पोरं"
"होय मायss, आपल्याकडे कहाला आले असत्याल."
हापसा सार्वजनिक होता, सकाळी सकाळी काही बायका भांडी घासायला, पाणी भरून न्यायला आल्या होत्या, त्यांच्या कामात उगाच अडथळा निर्माण करण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून अनिकेत, प्रभू दुरूनच सगळ्या जागेची पाहणी करत होते. एकतर पाच सहा बायका, मुली आणि उघड्यावर आंघोळीची जागा, त्यामुळे दोघे पण संकोचले.
"चला प्रभू आज गोळीच घेऊ.....उद्या पाहू..."
सगळी मुलं सकाळी मैदान स्वच्छ करायचे म्हणून खोलीत आलेच.
"हो हो चला. आले का सगळे....."
"येत्याल मागून.. अपोन जाऊ पुढं...." पिंट्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.
मैदान स्वच्छता मोहीम सुरू झाली. सगळी वानरसेना पटापटा काचा, काटे, मोठे दगड एका बाजूला गोळा करायला लागले. कुठं जमीन सारखी करायला लागले. दुपारपर्यंत बरेच म्हणजे किमान खेळता येईल इतके मैदान स्वच्छ करून झाले...आणि नेमका एक मोठा दगड काही केल्या जागचा हलेना.
"जा...आण पटकन, पण तू एकटा अणू शकशिल का?"
"आता आलोच...रघु घराकडे पळतच निघाला...."
"सब्बल येईपर्यंत आपण उरलेले काम करू. पहा बर, सगळे काटे निघाले का... काही राहिले तर आपल्याला संध्याकाळी दिसणार नाहीत."
"हो हो दादा.."
सगळी पोरं शोधाशोध करायला लागली.
"अरे हो हो....किती दम लागला तुला. बस बस जरा"
"हळू रे अनिकेत..."
"हो हो..." अनिकेतने आत हात घातला आणि दगड उचलणार तितक्यात प्रभूची सब्बलवरील पकड सुटली आणि....आणि..... अनिकेतचा एक हात त्या दगडाखाली सापडला....
मग पटापटा जोर लावून आणि परत सब्बल वापरून त्याचा हात बाहेर काढला. नशीब हाताची फक्त दोनच बोटं दगडात अडकली...सगळ्यांना वाटले पूर्ण हातचं दगडाखाली अडकला.
"प्रभू थोडक्यात निभावलं..फक्त दोन बोटांना जखम झाली आहे..पण आता काही होणार नाही...मी त्याची जखम बांधली आहे आणि गोळ्या दिल्या आहेत..आणि जरा जपून करा काम"
छोटी मुलं हे सगळे आपल्या चिमुकल्या डोळयांनी पाहत होती...हे दोन दादा कशी एकमेकांची काळजी घेत आहेत...
"अनिकेत तुला दोन दिवस जेवताना भारविन मी...."
असे वाक्य मुलांच्या कानात घुमत होते...कशी जिवाभावाची मैत्री आहे या दोन दादांची हेच ते पाहत होते.
"चला रे मुलांनो, आता त्यांना आराम करू द्या...या तुम्ही संध्याकाळी.. अनिकेत आणि प्रभू, तुम्ही आता इथेच थांबा, आपण एकत्रित जेऊ..मग तू गोळ्या घेऊन आराम कर" डॉक्टर काकांनी अधिकार वाणीन दोघांना सांगून टाकले.
संध्याकाळ झाली तशी पोरं डॉक्टर साहेबांच्या घरापाशी घुटमळत होती.
"अरे येत्याल की आता."
"अन्या एss अन्या...." पक्याने जोरात आवाज दिला.
"काय रे!!! आलो आलो...".अनिने आतूनच आवाज दिला.
"अरे दादा कुठे आहेत?"
"आले का मुलांनो !!!..चला जाऊयात न खेळायला.....
अनिकेत आणि प्रभू प्रसन्न चेहऱ्याने घराबाहेर पडले....दुपारी अनिकेत दादाला लागले तरी तो प्रसन्न आणि किती उत्साही वाटतोय हे सगळ्या मुलांच्या लक्षात आले.( गावाकडील मुल परिस्तिथीमुळे फार लवकर समजूतदार होतात हे नक्की )
सगळे मेहनतीने स्वच्छ केलेल्या मैदानात आले.... अनिकेतने शाखा लावली....पोरांचे मनोसक्त खेळ घेतले,पहिल्याच दिवशी कोणी गुडघे फोडून घेतले तर कोणाचे कोपरे...तरी पोरं मुक्त मनाने खेळले..खेळ झाले मग सगळे जण गोलात बसले.
"नाही अजून घ्या की खेळ...लय वेगळे खेळ आहेत हो हे.... आम्हासनी यातला एक बी खेळ माहीत नव्हता."
"आवडले न..पण आता पुरे....आता उद्या वेगळे खेळ खेळू आपण..."
"मग आता हो का करायचं असं बसून?"उतावळ्या पिंट्याने प्रश्न केलाच.
"अरे आता सगळ्यांनी आपले पूर्ण नाव, कोणत्या वर्गात आहोत....शाळेचं नाव काय....हे सगळे सांगा. तुमचे सगळ्यांचे सांगून झाले की आम्ही आमची नावं सांगू....."
काही जणांना अनिकेत आणि प्रभू चे नाव लक्षात होते.. ते लगेच म्हणाले " दादा मी...मी....सांगू तुमचे नाव....."
"हो ते बी बराबर आहे...."
सगळ्यांनी आपली आपली नावं नीट सांगतील आणि सवयी प्रमाणे काहींनी आपली पोट जात पण सांगितली. अनिकेत आणि प्रभू साठी हे खूपच वेगळे होते. त्यांना हा अनुभव नव्हता.
"अरे आपली फक्त नावं सांगा, कोणीही जात सांगायची नाही." प्रभूने आवाज चढवून सांगितले.
सगळ्यांनी नावं सांगितली,"चला आता आपण रोज याच वेळी येथ एकत्र भेटणार आणि असेच खेळणार...याल न उद्या पण...."
सगळी वानरसेना लगेच बसल्या जागी ओरडली...."होsss....." त्या मोकळ्या मैदानात आवाज सगळीकडे पसरला..
"आता प्रभू दादा आपल्याला झकास गोष्ट सांगणार आहे, ती सगळ्यांनी नीट ऐका...."
" असे होते आपले बाल शिवाजी....त्यांनी सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली......बोला शिवाजी महाराज की जयsss"....सगळी पोरं मन लावून गोष्ट ऐकत होते, प्रभूने घोषणा दिली आणि त्यांच्यात रोमांच उभे राहून सगळी पोर आसमान दणाणून सोडत शिवाजी महाराज कीssss जयsss ओरडले.
शेतावरून जनावर परत घेऊन येणारे लोक, डोक्यावर पाट्या घेऊन येणाऱ्या बायका, उगाच उनाडक्या करत फिरणारे तरुण पोर या जयघोषामुळे एकदम मैदानाकडे आकर्षित झाले. आता मैदानात दोन दादा, दहा वीस पोरं आणि मैदानाच्या बाहेर बघे...अश्यात प्रार्थना झाली...प्रभूने उत्तम आणि खड्या आवाजात ती सांगितली...( नम्र विनंती कृपया खालील प्रार्थना ऐकताना आपण जागेवर उभे राहावे.)
बघे हे सगळे पाहत होते....
"कोण हायती ही पोरं?"
"आपल्या कडले समदी पोरं पहा कशे दिस्त्यात." असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.......
गावात आता अनिकेत आणि प्रभूला येऊन दोन तीन दिवस झालेले होते, त्यांची पोरांशी मैत्रीही झाली होती, राहायची सोय झाली होती. पण अजून आपण सकाळी आवरायचं कुठे? हे गणित काही केल्या सुटत नव्हत. एक दिवस तर आंघोळीची गोळी घेतली पण अंघोळ केल्याशिवाय कसे राहायचे हा प्रश्न होताच? उघड्यावर, बायका, मुली असताना अंघोळ करणे लाजिरवाणे वाटत होते, रोज सकाळी याच कामासाठी कोणाच्या घरी कसे जावे? हा ही संकोच दोघांच्या मनात होताच.
"हो रे पण कुठं?"
"कुंडात करायची का..? एक बुडी मारून येऊ लगेच बाहेर..."
"अरे पण रोज दोन रुपये लागतील त्याला....आठवतंय न?"
गावाला येताना दोघांनी प्रवास खर्च म्हणून प्रत्येकी जेमतेम शंभर रुपये आणलेले होते आणि त्याचा हिशोब पण ठेवा, अशी सूचना दोघांना मिळालेली होती. परत घरी जाताना एसटी भाडे, कधी काही खायला लागले तर पैसे हवे होतेच.....आणि फक्त अंघोळीसाठी रोज दोन रुपये खर्च करणे योग्य आहे का? हा ही विचार त्यांच्या मनाला शिवत होता.
"प्रभू, कदाचित त्याआधी नसतील लागत..."
"ठरलं, मग सकाळी लवकर उठू...आणि पटकन अंघोळ करून येऊ, हवं तर परत झोपू....."
"अन्या....परत झोपू!!!"
"मग काय तर...."
ही सकाळची योजना नक्की करून दोघे अडवे पडले. अनिकेतचा हात जरा ठणकत होताच...पण गोळ्यांमुळे त्याला झोप लागली....
पहाटेच दोघांना जाग आली, नुकतंच तांबड फुटायला सुरुवात होत होती...दोघे उठले पटकन हापसावर जाऊन दात घासले आणि कुंडा जवळ आले. कुंडात अजून अंधार होताच...पण कोणी बायका.(लाज वाटत होती )..यायच्या आधी खाली जाऊन एक डुबकी मारावी म्हणून खाली उतरले....त्या सकाळच्या गारव्यात आणि गार पाण्यात पटकन एक डुबकी मारली....
"चल पटकन वर..... खोलीत जाऊ....."दोघे पळतच खोलीत आले.....
"चहा पाहिजे राव आता पटकन....."
"चल स्टँड कडे जाऊ...."
पटापट कपडे आवरून दोघे निघाले...
" आपल्याला आज गावातील काही लोकांची भेट घ्यावी लागेल. आपले तीन दिवस झाले की" प्रभू म्हणाला...
दुपार पर्यंत दोघे गावातील एकमेव वकील, शाळेतील मुख्याध्यापक, शाळा, पाटील, ग्रामसेवक, व्यापारी....यांच्या भेटी घेत गावात फिरत होते...माहिती घेणे...लोकांना बोलणे....संघ काय आहे?...आम्ही मैदानात काय सुरू केलं?... अशी सगळी माहिती देणे सुरू होते. फिरत फिरत दोघे डॉक्टर कुलकर्णी यांच्या घरी आले.
"मग दप्तर नव्हते?"
"होते, पण कमी असायचे.."
"तुला उचलते का हे...?"अनिकेत दादाने विचारले.
"हो, पण मला उचलावेच लागत नाही."
तितक्यात किसना आलाच....
"अन्या, चल जायाच न शाळेत?"
"काय किसना, कसा आहेस...संध्याकाळी येणार न सगळे?" प्रभूने पाठीवर थाप देत विचारले.
"हो समदे येणार दादा.... "असे म्हणत त्याने अनिकेतचे दप्तर नेहमी प्रमाणे उचललं आणि दोघे शाळेत निघाले.
छोटा अनिकेत निवांत रिकाम्या हाताने आणि पाठीवर कोणतेच ओझे न घेता शाळेत दाखल झाला.
अनिकेत आणि प्रभाकर हे पाहतच राहिले.
"हो रे काही तरी वेगळे आहे हे..."
दोघांच्या मनाला, ही गोष्ट खटकली होती.. दुपारी डॉक्टरांकडे जेवून दोघे खोलीवर परतले. आराम झाला, तसे काही वाचत बसले. सोबत येताना काही पुस्तकं आणलेली होतीच.
"बर सांगतो...."
संध्याकाळी काय काय खेळ घ्यायचे....काय गोष्ट सांगता येईल याचे नियोजन पूर्ण झाले....
पोरं शाळा झाली की लगेच देवळाच्या बाजूला असलेल्या अनिकेत आणि प्रभाकर दादांच्या खोलीवर आलेच. पोरांना काही चैन पडेना...हे दादा खोलीत काय करतात...कसे राहतात....काय सामान आहे त्यांच्याकडे...याचे कुतूहल सगळ्या मुलांना होते.
"अरे हे आपल्या देशासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले त्यांचं पुस्तक आहे..."
"दादा, तुम्हांसनी खूप अभ्यास अन् लय वाचावं लागत का हो? पिंट्याने विचारले
"अरे हो, त्यामुळेच तर माहिती मिळते....."
"अरे त्याला डायरी म्हणतात...."
"म्हणजी काय असतं ओ?" किसनाने निरागसपणे विचारले.
"अरे डायरी म्हणजे नोंदवही....आम्ही दिवसभर सगळ्या गावात फिरतो...मग भेटलेले लोक, त्यांचे नाव, पत्ता लिहून घेतो....आमचा रोजचा हिशोब लिहतो "अनिकेत ने माहिती दिली.
"हिशेब, म्हणजे आमचा महादू वाणी दुकान बंद करताना असाच काही तरी लिहत असतो त्याच्या कडच्या लाल वहीत"छोटा अनिकेत म्हणाला....
"बरोबर...त्याने आपले गणित तर पक्के होतेच...पण या हिशोब लीहल्यामुळे वायफळ खर्च कमी होतो"...प्रभू समजावून सांगत म्हणाला. "चला जाऊया मैदानात."
सगळे मैदानात आले तर त्यांच्या आधीच एक उंच, शरीराने पैलवान,रंगाने काळा, बहारदार मिशा, हातात जाड तांब्याच कडे, पायात जाड चांबड्याच्या चप्पल आणि अंगात पांढरा लेंगा आणि सदरा घातलेला माणूस उभा होता.
"तुम्हीच आले का जिल्हातून?" जड आणि भारदस्त आवाजात त्यांनी अनिकेत आणि प्रभाकरला विचारले.
त्या देहाला पाहून दोघे पण जरा घाबरले....पण....
"हो काका...." प्रभू पुढे येऊन म्हणाला....
"रामरामss माझं नाव निवृत्ती सखाराम सावरगावकर पाटील.." मी बी संघ कार्यकर्ता आहे बर का...गावात काय बी अडचण म्हणजी कोणी बी तरास दिला तर नुस्त मव नाव सांगा...बाकी बसsssss"
गावातील पोरं पाटील काकांना ओळखत होतेच...त्यामुळे दोघांची भीती चेपली....
मनसोक्त खेळ झाले आणि पोरं गोलात बसले....
"आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे....ती म्हणजे साने गुरूजी यांची..."
अनिकेतने साने गुरुजींची एकदम झकास आणि रंगवून गोष्ट सांगितली.....
"तर मुलांनो स्वावलंबन म्हणजे आपली स्वतःची कामे स्वतःच करणे, याला खूप महत्व आहे....आम्ही पण येथे आलो..कोणाकडे जेवलो तर आपले ताड वाट आम्ही उचलून घासून ठेवतो....आपलं सामान आपण उचलतो....आपल्या अंथरूण पांघरूण याची नीट घडी घालतो..आज तुम्ही खोलीत पाहिलं न?"
ही गोष्ट सांगताना अनिकेत दादाने मुद्दाम छोट्या अनिकेतला आपल्या जवळ बसवलं होते.....
"हो की नाही रे अनिकेत? आम्ही वागतो न असं, पाळतो न स्वावलंबन? ( असं म्हणून त्याच्या मांडीला दादाने हात लावला ) तो पाहतो आम्हाला त्यांच्याकडे जेवायला आलो की..."
अनिकेतच्या कोवळ्या मनावर नकळत हा संस्कार होत होता...पण त्याने कधी त्याकडे लक्ष दिले नव्हते...पण आज अनिकेत दादाच्या गोष्टीमुळे तो नीट विचार करू लागला....
गोष्ट संपली....शाखा सुटली.....
"हो का नाही!!!...आईला विचारून ये कधी येऊ म्हणून आणि तुझे बाबा कधी येतात शेतावरून?"
"दादा, मला बा नाही....देवा घरी गेले ते.....किसनाच्या डोळ्यात पटकन पाणी आले.
" अनिकेत दादा पटकन गुडघ्यात बसला, त्याने किसनाला मायेने मिठी मारली....उगी उगी....मला माहित नव्हतं....जाऊ आपण जेवायला....तू विचार आईला....."
छोटा अनिकेत हे सगळे पाहत होता. आपला जिवाभावाचा मित्र किसन दुःखी आहे आणि.. आपण...हेच प्रभू दादा, जेव्हा अनिकेत दादाला लागले तेव्हा त्याची किती सेवा करत होते..मायेने जपत होते अनिकेत दादाला.. त्याला हे विचार असह्य झाले...आणि....त्याला पण एकदम रडू फुटले....
"मग, किसन रडताना मला नाही का रडू येणार" तो माझे रोज किती काम करतो...आणि....मी.....त्याला...काहीच...मदत... रडणाऱ्या अनिकेतला पुढे काहीच बोलता येईना.
दोघांच्या रडण्याचा झटका ओसरला. तसे सगळेच किसनकडे गेले. ओळख झाली....गप्पा झाल्या....जेवण झाले....
" अरेss अरss राहूद्यात...तुम्ही कशाला या गरीबाच्या पाया पडता."
"असे कसं काकू...तुम्ही आई प्रमाणे आहात....."
दोघे गप्पा मारत मारत खोलीवर आले...
"हो रे अन्या, तुझ्या आज शेवटच्या गोळ्या घ्यायच्या असतील न त्या घे आणि झोप लवकर....सकाळी बोलू..."
अनिकेतने गोळ्या घेतल्या, पण त्याच्या मनात खूप घालमेल होत होती...रडणारा किसन.... त्याचं एका खोलीचे घर.....आई....विचार करून करून तो अस्वस्थ झाला. त्याला काही केल्या झोप येईना....खोलीचे दार उघडुन बाहेर पडला......थंड वारा सुटला होता... कुठं तरी दूर कुत्रे, आपल्या भाकरी देणाऱ्या मालकाचे रक्षण करण्यासाठी भुंकत होते....तो असाच काही वेळ चालत देवळात जाऊन परत आला.....मन शांत होत नव्हते...पण आता झोपणे आवश्यक होते....डोळे मिटले आणि विचारातच केव्हा तरी त्याला झोप लागली.
नेहमी प्रमाणे सकाळी कुंडात डुबकी मारून दिवस सुरू झाला. आता या दोघांचे सर्व वेळापत्रक लागले होते...शाखा पण छान सुरू होती...पोरं आनंदात होती....आणि एक दिवस सकाळी पुजारी काका घाई घाईने त्यांच्या खोलीत येताना त्यांनी पाहिले..
"अन्या, ऐ अन्या... पुजारी काका गडबडीत आपल्याकडे येताना दिसतायत रे.....त्यांना कळलं तर नाही न....आपण...सकाळी सकाळी कुंडात स्नान करतोय ते..".
"अरे कशाला घाबरतोस !! आपण त्यांच्या नियमात राहूनच तर डुबकी मारतोय...पाहू काही म्हणले तर.."अन्याने आत्मविश्वासपूर्वक सांगितले.
" काय पोरांनो, झाले का आवरून, आज दुपारी या आमच्याकडे जेवायला....पुरणाचा नैवेद्य आहे आज देवीला. म्हणल तुम्हाला पण सांगावे...या मग बरोबर एक वाजता...आणि दोन दिवसांनी बळीचा कार्यक्रम पाहायला पण या, तुम्ही असाल तेव्हा इथचं, हाच निरोप द्यायला आलो सकाळी सकाळी"
"हो हो येतो न"
दुपार झाली...दोघांच्या पोटात कावळे ओरडत होतेच......आणि त्यात पुरणपोळी म्हणजे अजूनंच भूक लागली होती...घर सोडून आता बरेच दिवस झाले होते आणि घरी जायला अजून बरेच दिवस बाकी होते.
वेळेत दोघे पुजारी काकांकडे आले..
"अले का...या या,आलोच ह.." असं म्हणून काका आत गेले. बहुदा आम्ही आलो याची वर्दी घरात देण्यासाठी आत गेले असावेत.
मग एक साधरण वयाच्या नऊवारी साडी नेसलेल्या बाई बाहेर आल्या....त्यांनी लाकडी कपाटाच्या बाजूने, एकदम खानदानी जुने लाकडी मोठे सहा पाट मांडले. त्या पाटावर मस्त पितळी नक्षी काम केलेले होते. पाट मांडून झाले...तितक्यात पुजारी काका सोवळे नेसून बाहेर आले..
"बसा बसा पोरांनो...."
दोघे हे सगळे पाहत होते. एका समोर एक ठेवलेल्या पाटावर कसे बसावे तेच त्यांना समजत नव्हते.
"बर बर...बसतो..." मागच्या पाटावर काका बसले आणि समोरच पाट मोकळा सोडला.
मग अनिकेत आणि प्रभू पण तसेच बसले. त्यांचे हे अज्ञान हुशारीने दोघांनी सोडवले...
मग मोठे आणि जाड ताट, वाटी, एक लोटी, फुलपात्र समोरच्या पाटावर आले...
"हे आमचे कुटुंब बर का..." पुजारी काकांनी आपल्या पत्नीची ओळख करून दिली...पण त्या काहीच न बोलता आत निघून गेल्या..बहुदा पुजारी काकांना आवडत नसेल किंवा त्यांची भीती असेल....
एक एक पदार्थ ताट व्यापात होता. काकांनी आत आवाज दिला..." झाले का सगळे....?? करायची का आम्ही सुरुवात....."
आतून दोन मिनट काहीच उत्तर आले नाही.....काकांनी काय अर्थ काढायचा तो काढला आणि भोजन मंत्र सुरू केला...." वदनी कवल घेताss....." काकांनी चीत्रावती घातल्या आणि "करा मुलांनो सुरू आता. मी जेवताना बोलत नाही बर...तुम्ही निवांत जेवा...काय पाहिजे ते मागून घ्या....." असे शेवटचे वाक्य बोलले आणि कटाच्या आमटीचा झक्कास भुरकाsss मारला.
अनिकेत आणि प्रभू एकमेकांकडे पाहतच राहिले. ज्यांनी आपल्याला जेवायला बोलावले तेच जर बोलत नसतील तर आपण तरी काय बोलायचे आणि कसे मागून जेवायचे?
कसे बसे, गप्पगुमान दोघे जेवले...काकू अधून मधून बाहेर येऊन वाढत होत्या...पण दोघे संकोचतच जेवत होते. कोणीच काहीच बोलत नव्हते....ती शांतता आता अनिकेतला सहन होत नव्हती...ते पटापटा जेवले....हात धुवून परत वर आले....तेव्हा पुजारी काका निवांत पान चघळत होते...तोंडातील पानामुळे तोंड अगदी लालेलाल झालेले होते...आणि त्यांना बोलणे देखील शक्य होत नव्हते....पानाचा तोबरा आणि जमा केलेली लाळ यामुळे त्यांचे शब्द नीट फुटत नव्हते....
ओठावर दोन बोटं अंतर ठेऊन त्यांनी खिडकी जवळून खाली मोकळ्या जागेत पिंक टाकली....तेव्हा त्यांचे शब्द दोघांना समजले." काय रे जेवले न नीट?"
"हो हो काका"
खोलीत परत आले तसे, अन्या प्रभूला म्हणाला..."यायला काका भारीच होते....जेवताना गप्प, कसे जेवायचे असे?.....आणि नंतर पण पानामुळे गप्प......किती विरुद्ध गाव आहे एकतर सधन...नाही तर एकदम गरीब...."
"हो रे"
नेहमी प्रमाणे आज संध्याकाळी काय काय करायचे याचे नियोजन केले आणि दोघे आराम करायला पडले...
आता दोघांना पण घरी परतायचे वेध लागेल होते..लहान वयातच असे अडचणीत राहणे आणि नवनवीन अनुभव घेत जगणे त्यांच्या साठी खूप काही देणारे ठरत होते...
शेवटचा एक दिवस आणि एक रात्रच राहिली होती...ते विस्तारक म्हणून आले होते...अनोळखी गाव....अनोळखी माणसं....कसे काम करता येईल....आपल्याला पाठवले तर आपल्या हातून नीट काम होईल याच काळजीत या गावात आले..पण गावकऱ्यांनी साथ दिलीच आणि सगळ्या मुलांना शाखा पण आवडली....आता ती फक्त नित्य चालू राहावी हाच प्रयत्न करायचा होता....
"अरे पक्या तसे नाही पण आता आम्हाला जावे लागेल... तुम्ही सगळे रोज असेच एकत्र खेळा आणि शाखा पण लावा..प्रभू दादा कुठं दिसतोय का रे.?"
"ते तिकड एका म्हाताऱ्याला बोलत्यात...."
"एक काम कर, सगळ्यांना बोलावून आण आणि दादाला पण ये म्हणा...आज आपल्याला एक काम करायचे आहे..."
"कनच काम दादा?"
"सांगतो, जा पटकन आण बोलावून..."
काही वेळात सगळे लहान पोरं, त्यांच्या सोबत काही तरुण, मोठी माणसं पण आली...
"दादा म्हणजे?"
"प्रभू पुढचा विषय तू सांग ..."
"आज आपल्याला आपल्या गावाची सेवा करायची म्हणजे आपण जिथे राहतो, ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो...म्हणून आपण आज गावातील सर्व सार्वजनिक जागांची साफ सफाई करूयात का? का अजून काही नवीन नवीन कल्पना सुचती आहे सगळ्यांना?" काही तरुण मुलांना हा वेडेपणा वाटला.."आम्हाला नको हे करा तुम्हीच" म्हणत ते निघून गेले..
उरलेल्या सगळ्यांनी प्रभू दादा म्हणतो तसेच करू असे ठरवून होकार भरला. मग दिवसभर सगळ्यांनी गावातील देवळे, शाळा, पार आणि इतर सार्वजनिक जागांची स्वच्छता केली. गावातील मोठ्या लोकांनी सगळ्यांचे तोंडभरून कौतुक केले, त्यांची दृष्ट पण काढली....
अचानक जोरात बँड वाजण्याचा आवाज यायला लागला. सगळी पोरं त्याच्या दिशेला धावली. हा काय प्रकार आहे म्हणून अनिकेत आणि प्रभाकर पण त्या वरातीकडे गेले. बऱ्याच माणसांचा घोळका होता. काही लहान मूल, काही विवध रंगाचे फेटे बांधलेले, धोतर नेसलेले म्हातारे. असे सगळे देवीच्या देवळाकडे निघाले होते.
समोरच्या बाजूला एक लहान काळे शेळीचे कोकरू होते. त्याच्या गळ्यात फुलांची माळ घातलेली होती...ते बिचारे जिवाच्या आकांताने ओरडत होतं....
"अहो दादा, आज बळी हाय बळी...."
"मग आता..."
"आता काही नाही....याचा.....( त्याने हाताने खुणवलं )
"याचा जीव घेतील....."
"हो हो...आणि देवीला....त्याचे रक्त...."
सकाळ झाली...
आज दोघेपण आपल्या घरी जाण्यासाठी देवळात देवीला बाहेरूनच नमस्कार करून डॉक्टर काकांकडे आले, त्यांच्याशी गप्पा मारून जेवण करून दुपारच्या बसने घरी जाणार होते. देवळापासून डॉक्टर साहेबांच्या घरी जाताना सगळे लोक त्यांना "परत या" असे आमंत्रण देत होते... पण काही केल्या कालचा प्रसंग त्यांच्या डोक्यातून जात नव्हता..
"नाही तर काय? मला रात्री झोपच आली नाही रे...सारखे बिचारे ते कोकरूच दिसत होते...."
"काय करणार नेहमी दुबळ्याचाच बळी जातो हे प्रत्यक्षात पाहायला मिळाले."
दुपारी सगळे एकत्र जेवले.... अनिकेत आणि प्रभाकर सगळ्यांना नमस्कार करून लिंबाच्या झाडाखालील स्टँड कडे निघाले. तितक्यात शाळेत जाण्यासाठी किसन अनिकेतकडे आला..
"किसन आणि अनिकेत निघाला का शाळेत?" आपण भेटू परत आता, तुम्ही खूप मोठे व्हा...." दोघांनी पण दुरूच हात उंचावून टाटा केला...
छोट्या अनिकेतने आपले दप्तर उचलले, आपले ओझे आपल्या पाठीवर घेतले आणि मागे वळून दादांना हात दाखवला...
बस मध्ये बसून अनिकेत आणि प्रभाकर एकमेकांकडे पाहत फक्त एकच वाक्य म्हणाले..." बदल झाला..."
(समाप्त)
९०११०९६२५०
English Translation
"Change- second half"
It was early in the morning in the village rather than in the city ... Somewhere the rooster was crowing, somewhere in the distance the bull's neck was ringing, somewhere in the middle the dogs were barking ....
"Come on, look, it's morning ..." Prabhu was looking out of the window and waking up Aniket. "Oh, get up quickly and see how nice red is outside, the sun has also risen. Let's go outside and see."
"Oh, let me sleep. Either I didn't fall asleep early last night and you woke up early in the morning." Aniket was babbling in her sleep.
"Did anyone else come to sleep here? Let's go for a walk outside. Sleep is normal."
For the sake of cure, Aniket got up rubbing his eyes, filled his mouth with water and followed the Lord.
"Look, look ... to the village ..." the Lord was saying excitedly
As written earlier, the temple of the Goddess was a bit detached from the people, so Aniket and Prabhu were watching the morning movements in the village from a distance.
Someone was just running away from the mother with a cord tied around her waist, where hot water was put on the stove, someone was putting a lot of tobacco on her teeth.
"Let's get ready. Let's see if we can get some tea nearby."
"Oh tea means I have to go to that hotel yesterday"
"Let's go then"
The two came into the room, gritted their teeth with a bottle of water and walked out.
"It's too heavy to walk in the morning, Ray."
"Where did the boys go?"
"Nothing, Mama."
"Come on," a middle-aged uncle called near the house.
"You saw me on the stand yesterday, where did you come from?" Asked the uncle.
"We're from the district."
"Would you like that?"
"No, don't bother," said the Lord
"What's the matter ... You are the village's holy ... Take it wise. Bhamass ho bhama ... Lake my .... Take it well ...."
Mama was intimately inquiring about everything ... At that moment, there was a cut of tea without ears.
"What about our poor ..."
"Hey why do you say that, Mama?"
Seeing that there was no milk in the tea, Aniket said softly, "Lord, I have never drunk such tea."
"P silently" the Lord widened his eyes and marked Aniket.
"We have a poor father. Drink. Drink. You like it ..."
In fact, only uncle's love was in that tea, all that was left was hot jaggery water ... they both drank that love tea.
"Come back like this ..." Uncle said goodbye to both of them with love.
It was eight o'clock in the morning. While the two were going into the room, the priest was seen near Kaka Kunda. Aniketan guessed that they might have come to fetch water by dipping in the pool for worship
"Uncle hello," they both said, joining hands.
"Did the boys fall asleep?"
"Ho ho lagali no"
"Uncle, we also want to take a bath! Where is his facility?"
"Behind the rooms is a latrine, and beside it is a large bath-stone.
"Well, well, but what if you take a bath in this pool?" The Lord asked.
"It will cost two rupees to bathe in the pool after seven in the morning. This is the rule of the temple."
The priest said as Kaka began to descend into the pool.
"Let's see Aniketrao Hapsa, so we can decide whether to take a bath or not."
If you both go to see Hapsa wondering where to go ....
"Who is Bai?"
"Saare ss (sarika) aapna kadle disannat he poran"
"Yes, my dear, you must have come."
Hapsa was public, in the morning some women had come to wash the dishes, fetch water, there was no point in obstructing their work, so Aniket, Prabhu was inspecting the whole place from a distance. Either five or six wives, girls and an open bath, so the two hesitated.
"Prabhu, let's take a pill today ..... let's see tomorrow ..."
All the children came to the room in the morning to clean the ground.
"Let's go, Grandpa, don't you want to work?"
"Yes, yes, let's go. Why did everyone come ....."
"After coming .. let's go ahead ..." Pinta's enthusiasm was overflowing.
Ground cleaning campaign started. All the monkeys started collecting glass, thorns and big stones on one side. Somewhere like the ground began to do. By noon, most of the grounds had been cleared so that at least one could play ... and a large boulder did not move.
"Dada is our bass kad sabbal (pahar). Anu ka me? ... he has moved dagud" ...
"Go ... and quickly, but can you make an atom alone?"
"Now come on ... Raghu ran towards the house ...."
"We'll do the rest of the work until Sabbal arrives. Look, all the thorns are gone ... if anything is left, you won't see it in the evening."
"Yes yes grandpa .."
All the boys started searching.
"Grandpa, take this ..."
"Oh yes yes .... how breathless you are. Just wait."
Aniketan took the sabbal in his hand and struck the root of the stone ... he sat down with the first wound. Everyone shouted at Sabal and picked up the stone. Some children removed the soil from the dried bowls of coconut, ...
"Lord, you hold the sable, I lift the stone under my hand."
"Slow Ray Aniket ..."
"Yes yes ..." Aniket put his hand inside and as he was about to pick up the stone, Prabhu's grip on the sabbatical was released and .... and ..... Aniket's hand was found under the stone ....
Then he pushed hard and pulled his hand out using the back sabbatical. Luckily, only two fingers of the hand got stuck in the stone ... Everyone thought the whole hand got stuck under the stone.
"Doctor Kaka didn't feel much, Aniket, I made a mistake, I got hold of Sabbal ..." Prabhu was talking to Doctor Saheb out of Aniket's concern.
"Lord, I survived briefly..only two fingers are injured..but nothing will happen now..I have bandaged his wounds and given him pills..and work carefully"
The little ones were watching with their twinkling eyes ... how these two grandfathers are taking care of each other ...
"Aniket, I will burden you while eating for two days ..."
Such sentences were ringing in the ears of the children ... He was looking at the friendship of these two grandfathers.
"Come on children, let them rest now ... this evening you .. Aniket and Lord, you stay here now, we will eat together..then you take pills and relax" Doctor Kaka told both of them with authority.
As the evening wore on, the boys were crouching near the doctor's house.
"Where did grandpa go?"
"Oh come on now."
"Anya aas anya ...." Pakya shouted.
"What the heck !!! Come on ..." Anin called from inside.
"Hey, where's Grandpa?"
"Come on guys !!! .. let's not go play .....
Aniket and Prabhu fell out of the house with a happy face .... In the afternoon, even though Aniket started looking at Dada, all the children noticed that he was happy and very enthusiastic.
Everyone came to the field which was cleaned by hard work .... Aniket planted a branch .... Kids played with passion, on the first day someone broke their knees and someone's corners ... However, the boys played with a free mind .. After the game, everyone sat in a circle.
"Sit down .... why are you tired?" The Lord asked ...
"No more games ... rhythms are different games ... we didn't know a B game."
"I don't like it..but now enough .... let's play a different game tomorrow ..."
"Then why do you want to do it now?" He asked hurriedly.
"Hey now everyone tell us your full name, what class we are in .... what is the name of the school .... tell it all. After all you have said, we will tell you our name ....."
Some people remember the names of Aniket and Prabhu .. They immediately said "Dada me ... me .... tell me your name ....."
"Oh yes you know ... but the rest of the friends are new where they know our names ...."
"Yeah that's equal to B ...."
Everyone will say their names correctly, and as usual, some will say their names. It was very different for Aniket and Prabhu. They did not have this experience.
"Hey just say your name, no one wants to go." The Lord raised his voice.
Everyone said names, "Let's meet here at the same time every day and play like this ... not tomorrow but ...."
All the monkeys immediately shouted at the place where they were sitting .... "Hosss ....." The sound spread everywhere in that open field ..
"Now Lord Dada is going to tell you a wonderful story, everyone listen to it ...."
"Such was our child Shivaji .... He took the oath of Swarajya at the age of sixteen ...... Speak Shivaji Maharaj ki jass" .... Leaving the sky, Shivaji Maharaj shouted.
The people who were bringing the animals back from the fields, the women who were carrying the boards on their heads, the youngsters who were walking around in a daze, were suddenly attracted to the field. Now look at the two grandfathers in the field, ten or twenty boys and outside the field ... there was a prayer ... the Lord said it in a good and stony voice ...
Look, everyone was watching ....
"What's going on in the village?"
"Who is Haiti?"
"Look at the Samadi boys around you." Many such questions were present .......
It had been two or three days since Aniket and Prabhu came to the village, they had befriended the boys, they had been accommodated. But where do we still cover in the morning? This math was not going away. One day I took a bath pill but the question was how to live without taking a bath? In the open, it was embarrassing to take a bath when there were wives and daughters, how could I go to someone's house every morning for the same work? This hesitation is in the minds of both of them.
"I have to take a bath tomorrow morning."
"Yes, but where?"
"Do you want to do it in the pool ..? Let's take a dip and get out immediately ..."
"Oh, but it will cost him two rupees a day ... don't you remember?"
On their way to the village, the two had brought a hundred rupees each as travel expenses and had been instructed to keep an account of it. On the way back home, ST fare, if you ever start eating, you need money ..... and is it worth spending two rupees a day just for bathing? This thought was running through his mind.
"Anya, that priest had said that it would cost money after seven in the morning ... so what before that?"
"Lord, maybe not before ..."
"Okay, then get up early in the morning ... and take a quick shower, or go back to sleep ..."
"Anya .... let's go back to sleep !!!"
"So what ...."
This morning, they both deal with their confidence as they choose to embark on their play activities. Aniket's hand was shaking a little ... but he fell asleep due to the pills ....
They both woke up early in the morning, they were just starting to burst red ... They both got up quickly, went to Hapsa, brushed their teeth and came closer to Kunda. As soon as it was still dark in the pool ... but some women.
"Let's go today .... take a bath .... and my hand didn't get wet" Both of them were feeling cold ...
"Let's go upstairs quickly ..... let's go to the room ....." They both came running into the room .....
"I want tea, Rao, now quickly ..."
"Let's go to the stand ...."
They both got dressed and left ...
"We have to meet some people in the village today. It's been three days," the Lord said ...
Till noon, the two were walking around the village visiting the only lawyer in the village, the headmaster of the school, the school, the patil, the gram sevak, the trader ... to get information ... to talk to the people ... what is the team? What started? ... All such information begins to be given. Walking around, the two came to Dr. Kulkarni's house.
"What happened to Aniket, why are you getting ready to go to school, father, what a big backpack you have !!! We didn't have so many backpacks, Baba"
"Then there was no backpack?"
"Yes, but less so."
"Does it pick you up ...?" Aniket Dada asked.
"Yeah, but I don't have to."
Just then Kisna came ....
"Anyway, let's not go to school?"
"Kisna, how are you ... not everyone will come in the evening?" The Lord asked, patting him on the back.
Saying "Yes, I will come, grandfather ..." he picked up Aniket's backpack as usual and the two went to school.
Little Aniket entered the school empty-handed and without any burden on her back.
Aniket and Prabhakar kept watching.
"Have you seen others?"
"Yeah, there's something different ..."
This thing had bothered both of them .. After eating at the doctor in the afternoon, they returned to the room. Relaxed, just sat reading something. Some books were brought along.
"Tell me another story today"
"I'll tell you ..."
The planning of what to play in the evening .... what to tell the story is complete ....
As soon as the boys finished school, Aniket and Prabhakar came to Dada's room next to the temple. The kids don't have any peace ... What do these grandfathers do in the room ... How do they live .... What belongings do they have ... All the children are curious about this.
"What book is Dada Dada?"
"Oh, this is the book of the revolutionaries who sacrificed their lives for our country ..."
"Grandpa, why do you have to study so much? Pintya asked
"Oh yes, that's why we get information ..."
"What is this little book, Andada?" That poor thing didn't even know the word diary ...
"Hey it's called a diary ...."
"So what is it?" Kisna asked innocently.
"Hey diary is a record book .... we go around the village all day ... then write down the people we meet, their names, addresses .... write down our daily accounts" Aniket informed.
"Hisheb, I mean, when Mahadu Vani closes the shop, he writes something like this in the red book on his side," said little Aniket ....
"That's right ... he did his maths well ... but writing these calculations reduces the cost of waffles" ... the Lord explained. "Let's go to the field."
When everyone came on the field, there was already a tall, strong-bodied man, black in color, with a mustache, with thick copper in his hands, thick leather slippers on his feet, and a man in a white lenga and shirt.
"Did you come from the district?" He asked Aniket and Prabhakar in a heavy and heavy voice.
Seeing that body, both of them were a little scared .... but ....
"Yes uncle ...." Lord came forward and said ....
"Ram Ramss, my name is Nivruti Sakharam Savargaonkar Patil .." I am a B Sangh worker. What is the problem in the village? If someone bothers me, just tell me the name.
Poran Patil from the village was getting to know his uncle ... so both of them got scared ....
Favorite game was played and the boys sat in a circle ....
"Today I am going to tell you one thing .... that is Sane Guruji's ..."
Aniket told the story of Sane Guruji in a very beautiful and colorful way .....
"So, children, self-reliance is to do your own work, it is very important .... we also came here..if we eat at someone's place, we pick up our palms and rub them .... we pick up our luggage .... we cover our bed. It's time to move on. Haven't you seen it in the room today? "
While telling this story, Aniket Dada had deliberately placed little Aniket near him .....
"Yes or no Ray Aniket? We don't behave like that, we don't follow or self-reliance?" (So Dada touched his thigh) He sees that we have come to eat with him ... "
This rite was happening unknowingly on Aniket's cowardly mind ... but he never paid attention to it ... but today he started thinking carefully because of Aniket Dada's story ....
The story is over .... the branch is gone .....
"Grandpa, do you come to us for dinner today? I ask my mother in advance ... Kisan said
"Yes, why not !!! ... Ask your mother when she will come and when will your father come from the field?"
"Grandpa, I don't know ... God went home ... Tears came to Kisna's eyes quickly.
"Aniket Dada quickly got down on his knees, he hugged Kisna with love .... Ugi Ugi .... I didn't know .... let's go for dinner .... you thought mother ....."
Little Aniket was watching all this. Your dear friend Kisan is sad and .. you ... this is Prabhu Dada, how much you were serving Aniket Dada when he was touched .. Aniket was caring for Dada with love .. he had this unbearable thought ... and .... he But suddenly burst into tears ....
"Hey, why are you crying now?" The Lord approached Aniket and asked.
"Then, why can't I cry when Kisan cries" How much work he does for me every day ... and .... I ..... him ... nothing ... help ... crying Aniket couldn't say anything further.
The shock of both of them subsided. That's how everyone went to Kisan. Introduced .... chatted .... had a meal ....
"Let's go aunty" They both bowed and greeted him ...
"Oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh, oh ...
"How aunty like that ... you are like a mother ....."
The two came into the room chatting ...
"Lord, what are the people's sorrows and financial difficulties ... how happy we are in the city !!!"
"Yeah Anya, you don't want to take your last pills today, take them and go to bed early .... let's talk in the morning ..."
Aniket took the pills, but his mind was getting very confused ... crying Kisan .... his one room house ..... mother .... he became restless thinking. He couldn't sleep after doing something .... He opened the door of the room and came out ...... The cold wind had blown away ... Somewhere far away the dogs were barking to protect their bread-giving owner .... He walked like this for some time in the temple He came back ..... his mind was not calming down ... but now he needed to sleep ....
The day started with a dip in the pool as usual in the morning. Now all the schedules of these two had started ... the branch was also starting well ... the boys were happy .... and one morning they saw the priest uncle hurrying to his room ..
"Anya, aya anya ... you see the priest uncle coming towards you in a hurry ..... if he doesn't know .... you ... are bathing in the pool in the morning ..".
"Oh, why are you scared !! You are just taking a dip while following their rules ... let's see if they say anything ..." Anya said confidently.
"What's up guys, why are you covering up, come to us this afternoon to have dinner .... Purana is offered to the Goddess today. I want to tell you too ... Come back at one o'clock ... and come to see the victim's program in two days, but when you are Here's to saying goodbye this morning. "
"Yes, yes."
It was noon ... the crows were screaming in their stomachs ...... and Puranpoli was still hungry in it ... it was many days since they left home and there were many more days left to go home.
In time, the two priests came to the uncle.
"Ale ka ... ya ya, aloch ha .." so uncle went inside Probably went inside to give us the uniform we came for.
Then a woman in a sari, who was about nine years old, came out. There was a lot of brass work on that plate. After the flood was over ... the priest came out carrying his uncle Sovale ..
"Basa basa poranno ...."
The two were watching it all. They did not know how to sit on a bench in front of them.
"Uncle, first you sit down ... then we sit down ..." Prabhu said cleverly.
"Bar bar ... sit ..." Uncle sat on the back bench and left the bench open in front.
Then Aniket and Prabhu also sat down. Both of them cleverly solved their ignorance ...
Then a big and thick dish, a bowl, a pot, a flowerpot came on the front plate ...
"Why is this our family ..." Uncle Pujari introduced his wife ... but she went inside without saying anything..maybe Pujari Uncle may not like or be afraid ....
One by one the dish was covered. Uncle called inside ... "Why did everything happen .... ?? Why should we start ....."
There was no answer for two minutes ..... Uncle took out what he meant and started the food mantra ..... "Vadani kaval gheta ss ....." No, well ... you have a good night's sleep ... ask for what you want ..... "
Aniket and Prabhu kept looking at each other. If those who invited you to dinner are not talking, then what are you talking about and how to ask for food?
How are you, gossiping, they both ate ... Aunty was coming out from time to time ... but both of them were eating hesitantly No one was saying anything .... Aniket could not bear that silence anymore ... He ate fast .... He came back after washing his hands .... Then the priest uncle was chewing the sleeping leaf ... There were ... and they couldn't even speak .... their words weren't bursting at the seams and the accumulated saliva ....
With two fingers on his lips, he put pink in the open space near the window .... Then both of them understood his words. "Why didn't you eat properly?"
"Ho ho kaka"
As he came back to the room, Anya said to Prabhu ... "Uncle was too heavy to come .... Silent while eating, how to eat? ..Not if very poor .... "
"Ho re"
As usual, we planned what to do this evening and we both had to relax ...
Now both of them had to wait to return home..Living in such a difficult situation at a young age and living with new experiences was proving to be very rewarding for them ...
There was only one last day and one night left ... He had come as an expander ... Stranger village .... Stranger man .... How can you work .... If you are sent, you will work properly. She came to the village..but the villagers supported her and all the children also liked the branch .... now she just wanted to keep it going ....
"Dada Dada, will you go tomorrow? Do you like Rao or something else, don't you like our village?"
"Oh, it's not like that, but now we have to go ... You all play together like this every day and plant branches too ... Where do you see Lord Dada?"
"He was talking to an old man ..."
"Do something, call everyone and tell grandpa to come ... today we want to do something ..."
"Kanch kaam dada?"
"Tell me, go quickly and call ..."
In a short time, all the little boys, some young, big men came with them ...
"Come on, today we want to serve our village ..."
"What is grandpa?"
"Lord, tell me the next subject ..."
"Today, to serve our village, we have to give something to the community where we live, to the community in which we live ... So should we clean all the public spaces in the village today? Why are there any new ideas for everyone?" Some youngsters felt this madness .. "We don't want you to do this" and they left.
Everyone else agreed to do as Lord Dada says. Then all day long everyone cleaned the temples, schools, parks and other public places in the village. The big people of the village complimented everyone with their mouths, but also took their eyes off ....
Suddenly there was a loud band playing. All the boys ran towards him. Aniket and Prabhakar went to the show because of what type it is. There was a crowd of many people. Some small children, some old men wearing different colored headdresses. All of them had gone to the temple of the Goddess.
On the front was a small black goat lamb. He had a garland of flowers around his neck ... he was screaming with a sigh of relief ....
"What is Raghu Ray?"
"Hey grandpa, victim today hi victim ...."
"Then now ..."
"Nothing now .... of this ..... (he pointed)
"It will kill ....."
"Yes yes ... and to the goddess .... his blood ...."
It's morning ...
Today, the two of them greeted the Goddess from outside the temple and went to the doctor's uncle to go to their house. On the way from the temple to the doctor's house, everyone was inviting him to "come back" ... but the incident of yesterday after doing something was not going through his head ..
"The Lord saw the victim's case on the last day ..."
"No, what? I couldn't sleep at night ... I looked like a poor lamb ...."
"It simply came to our notice then.
In the afternoon everyone ate together .... Aniket and Prabhakar greeted everyone and went to the stand under the lemon tree. Just then Kisan came to Aniket to go to school.
"Why did Kisan and Aniket go to school?" See you back now, you grow up .... "But both of them raised their hands and shook hands ...
Little Aniket picked up his backpack, carried his burden on his back and turned around and showed his hand to Dada ...
Sitting in the bus, Aniket and Prabhakar looked at each other and said only one sentence ... "Change has taken place ..."
(Finished)
© Nikhil Devidas Vaze
9011096250
खुप छान.
ReplyDelete