"बदल- पूर्वार्ध"
"हो हो चल जाऊ अपुन.."
अनिकेत (अन्या) आणि किसना ( किसन) जवळच असलेल्या शाळेत आले...दोघांनी वर्गात दप्तर ठेवले आणि मित्रांची वाट पाहत पायऱ्यांवर बसले...प्रार्थनेला अजुन बराच वेळ होता. घर आणि शाळा म्हणजे फक्त एका भिंतेचे अंतर. हे दोघे असेच रोज शाळेत लवकरच येऊन बसायचे.
"अरे अन्या येत्यात आता, आपण लवकरच येतो रोज"
" हो रे, येतील" अन्या शाळेच्या वाटेकडे मित्रांची वाट पहात बसला.
अनिकेत हा गावातील एकमेव डॉक्टर कुलकर्णी साहेब यांचा पोरगा .या कुलकर्णी डॉक्टरचे आजोबा पहिल्यांदा या गावातील लोकांची सेवा करता येईल यासाठी त्यांनी हे गाव निवडले. त्यावेळी गाव अगदीच लहान होते. जेमतेम शे - दोनशे वस्तीचे, वीज नाही, शाळा नाही, मग कुलकर्णी डॉक्टरच गावात रुग्ण पाहायचे आणि लहानग्या पोरांना शाळा पण शिकवायचे. डॉक्टर मनापासून गावाची सेवा करायचे म्हणून गावाने पण त्यांना आपल्या गावकित सामावून घेतले.
तेव्हा पासून डॉक्टर म्हणले की फक्त कुलकर्णी हेच समीकरण गावकऱ्यांच्या डोक्यात पक्क बसले आहे. डॉक्टरांची आता तिसरी पिढी गावात सेवा करत आहे. डॉक्टर सदाशिव कुलकर्णी हे देखील गावात मिळून मिसळून गावकऱ्यांची मनोभावे सेवा करतात.
आता गाव बदलले रस्ते, वीज, पाणी, जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय आले, मोबाईल फोन आले, आणि बरेच काही नव्याने गावात बदल झाले.
" काय सांग की,अन्या ?"
"अरे,चूप चूप ( अनिकेतने तोंडावर बोट ठेऊन पिंट्याला खुणवल )"
"अरे अन्या, ऐ अन्या.." पिंट्याने दोन तीन वेळा आवाज दिला पण अनिकेतने त्याच्याकडे लक्षच दिले नाही.
शेवटी चिडून पिंट्या जवळजवळ "अन्याssss" असे जोरात ओरडलाच.
"कोण आहे रे तिकडे, कोण आवाज करतोय? कोण तू तूच न...कोण? ये बाहेर ये, रांगेतून...." हेडमास्तर गुरुजी ओरडत होते.
पिंट्या गपगुमान रांगेतून बाहेर पडला.
"नाही गुरुजी...."
"नाही?"
"म्हणजे नाही, गुरुजी तसं नाही, मी काही बोलत नव्हतो."
"मग काय.. काय करत होतास?" गुरुजी रागात त्याला विचारत होते.
"माझ्या दोस्ताला अन्याला बोलवत होतो."
"अन्या?"
"अनिकेत कुलकर्णी."
"त्याला कशाला बोलवत होतास?"
"मी त्याला विचारू लागलो होतो...की आज..."( अडखळत ) भीतीने प्रकाश काहीच बोलू शकत नव्हता.
"बोल की...काय विचारत होतास?"
"की, की, आज....आज...शाळा सुटल्यावर काय?"
पिंट्याचे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच हेडमास्तर गुरुजींनी त्याचा कान धरला...
" अरे शुंभा अजून शाळा भरली नाही आणि तुला शाळा सुटल्याचे वेध लागले, अं, चल रांगेत जा."....
प्रार्थना झाली....सगळी पोरं आपापल्या वर्गात गेली..
अनिकेत, पिंट्या, किसना, राघ्या, पक्या ही सगळी दोस्त मंडळी एकाच वर्गात म्हणजे ६ वी फ तुकडीतील जिवाभावाची मित्र मंडळी होती.
वर्गात बसायला लांब लाकडी बाक, त्यावर बसून वही मात्र मांडीवर ठेऊन म्हणजे वाकूनच लिहावे लागे. वर्गात मोठा काळा फळा. त्याच्या उजव्या कोपऱ्यात वर्गातील आजची उपस्थिती, अनुपस्थिती, एकूण. असा वर्गातील पोरांचा वृत्तांत लिहला गेला. मग फळ्याच्या मध्यभागी झकास सुविचार, हा लिहला की पोरांनी पटापटा आपल्या आपल्या वहीत तो टिपला. वर्गात विविध मान्यवर शिक्षणमहर्षी, संत, राष्ट्रीय नायक, वैज्ञानिक यांचे फोटो प्रत्येक भिंतीवर लावलेले, वर्ग सजावटीत तयार केलेले भिंतीपत्रक, कागदी रंगीत पताका, आणि लाकडी दाराच्या कोपऱ्यात कधी काळी फडा म्हणता येईल असा वर्ग झाडायचा फडा ( झाडू ) देखील होता.
अशा वर्गात सर्वांची शाळा सुरू झाली. तासा मागून तास पडत होते..(म्हणजे टोले पडत होते ) पण पिंट्याला काही केल्या स्वस्त बसवत नव्हते..
"पिंट्या, तुला काय घाई लागली रे...काल सांगितले न..." अनिकेत वैतागून म्हणाला.
"तरी सांग बे..."
"आज संध्याकाळी शाळा झाली की आपल्याला, आपल्या गाव देवीच्या देवळात एकत्रित भेटायचे आहे. नवीन दीपमाळे जवळ."
" अरे, ते मला पण नीट माहीत नाहीये. बाबांनी मला तसं सांगितले, तुझ्या सगळ्या मित्रांना घेऊन ये म्हणून"
"आता झालं का!!! डॉक्टर साहेबांना कोण विचारणार?"पक्या पटकन बोलून गेला.
गावात लहान मोठे सगळेच जण डॉक्टरांना, डॉक्टर साहेबच म्हणत. म्हणजे त्यांच्या बद्दल सगळ्यांनाच आदर होता.
पोरं कसे बसे शाळा संपेपर्यंत शाळेत बसले. साडे पाच वाजता शाळा सुटली...किसनान नेहमी प्रमाणे अनिकेतच दप्तर उचलल. तो नेहमीच त्याच्या सेवेत असे आणि अनिकेत पण बालबुध्दी प्रमाणे दप्तर त्याच्याकडून उचलून घेत असे. गावात जसे डॉ. साहेब आदराचे स्थान होते तसेच अनिकेत हे लाडाचे लेकरू होते.
अनिकेत होता ही गोंडस बाळ, गोरा रंग, दोन्ही गालावर खळी, उंची बेताची, तो रस्त्यातून जाताना कोणी म्हातारी आज्जी त्याला मुद्दाम आवाज देई,
"अरे अन्या...इकडsss ये बाबा....." दोन्ही हाताने आज्जी मायेने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्याचा पापा घेई. म्हातारी अशा तर चावडीवरचे म्हातारे त्याला आपल्या मांडीवर बसवत पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणत...
" डॉक्टर साहेबांचं पोरं...लयच लागवीsss....हुशार हाय..बापावनी.... बापावनी हे बे डॉक्टर होतंय..आणि आपल्याकडे येतेय सुई टोचायला..."
शाळा झाली..., सगळ्या मित्रांनी पटापटा दप्तर घराकडे नेऊन टाकले, आपला शाळेचा पांढरा शर्ट बदलला आणि लगेच अनिकेतकडे आले.
"आई, तो पिंट्या आला का गं?"
" हो रे तोच, काय घाई असते याला"
"अगंss,आज शाळेत पण मी याच्यामुळे शिव्या खाणार होतो...पण थोडक्यात वाचलो..."
दूध पितपीत अनिकेतन शाळेतील किस्सा आईला सांगितला.
"अगं नाही आई, काहीsss होत नाही."
"अन्या, अन्या अरे चल की लवकर.."
"हो हो येतोय अनी, दूध पितो आहे. तुम्हीपण या सगळे ओसरीवर बसा, तुम्हाला पण दूध देते "
डॉक्टर साहेबांची बायको पण खूप मायाळू होत्या. त्या नेहमी या मुलांना काही तरी खाऊ पिऊ घालायच्या,
"काकू तुम्ही किती चागल्या हायत हो, आम्हाला बी दूध दिलं."
"अरे वेड्या, त्यात काय ,माझ्या अनीचे मित्र म्हणजे माझे पण पोरचं की. चला पुसा तोंड आणि पळा खेळायला."
अन्या, पिंट्या, किसन, पक्या सगळे एकत्र आले. ठरल्या प्रमाणे एकमेकांच्या गळ्यात हात टाकले आणि गाव देवीच्या देवळाकडे निघाले....
तसं हे गाव देवीच मंदिर गावाच्या लोक वस्ती पासून जरा अलिप्त होते. देऊळ पूर्वीपासून गावाच्या एका बाजूलाच. नंतर गाव जरी वाढले, तरी पण देऊळच्या अजूबाजूला लोक वस्तीला आले नाहीत. देऊळ साधारण सोळाव्या शतकातील, दगडी बांधकाम, लाकडी माळवद, उंच कळस, त्यावर एक भोंगा, कधी काळी भगवा असेल पण आता पांढरा पडलेला ध्वज, हा भोंगापण अजबच होता, रोज संध्याकाळी आरतीच्या आधी त्याला खालून उंच गुढीच्या बांबूने हलवायला लागे, तरच त्यातून आवाज येई.
देवळाच्या आवारात सुंदर चाफा होता, जसा शिव मंदिरात असतो अगदी तसा.. कमी पाने आणि अगदी शेंड्याला पांढरी फुलं. तांबडी कण्हेर, जास्वंद, लाल गुलाब, अशी विविध फुलं झाड होती. दगडी मोठा सभामंडप होता. आत गाभाऱ्यात शेंदूर लावलेली, माहुरचे ठाणे ( प्रती रूप )असलेली देवी विराजमान होती.
देऊळ तसे नेहमी शांत असे, फक्त सकाळी काही गावकरी नित्य दर्शनासाठी येत आणि संध्याकाळी काही आरतीसाठी..बाकी इतर वेळी देवळात फक्त देवीचे वंश परंपरागत पुजारी राहत असतं. हे पुजारी काका पण देवळात राहायचे, त्यांच्याच घरातील जुन्या लोकांनी हे देऊळ बांधले म्हणे. देवळाला लागून एक रिकामे मैदान होत आणि त्याच्या पलीकडे एक देवी कुंड.
देवीच्या उत्सवात लोक येथे पैसे देऊन अंघोळ करत. इतर वेळी त्या कुंडात फक्त पुजारी अंघोळ करत आणि घागर भरून देवीवर अभिषेक करे. मात्र कोणी भाविक अंघोळ करू इच्छित असेल तर मात्र त्यांच्याकडून दोन रुपये घेण्याचा निर्णय झालेला होता..
हे कुंड होते मोठे सुंदर किमान तीस फूट लांब आणि वीस फूट रुंद, कुंडात उतरायला दोन्ही बाजूने पंधरा वीस दगडी पायऱ्या, पायऱ्या उतरून खाली गेले की एका खोबणीत शेंदूर लावलेला गणपती होता, गावात अशी मान्यता होती की वळवाचा पाऊस झाला तर त्या पावसाने कुंडात जर पाणी वाढले आणि ते गणपतीच्या उजव्या पायापर्यंत आले तर त्या वर्षी पाऊस चांगला होईल, नाही तर कमी होईल, तसे गाव कायम कोरडवाहू पट्यातील पण देवीचीच कृपा, या कुंडात मात्र कायम पाणी असे. अगदी एन उन्हाळ्यात पण....
पोरं देवळात देवीचे दर्शन घेऊन आली आणि मोठ्यांची नजर चुकवून हळूच कुंडाकडे गेली.
"अरे नको पिंट्या...मला अजून भीती वाटते"
" आय चाss अन्या..वर्गात मास्तरांना त्रास देताना भीती नाही वाटत आणि इथं काय भायलास?"..पक्या म्हणाला....
"अरे नको पक्या, पायऱ्या खूप खोल आहेत रे..."
"अन्या, उतरतोस का आता!! का नेवू तुला वडत?" पिंट्याने अनिकेतचा हात धरला. तो काही केल्या ऐकेना.
शेवटी अनिकेतने हिम्मत दाखवत पायरीवर पाय ठेवला..
कुंडात उतरायला साधारण वीस एक दगडी पायऱ्या असतील.पायरी तशी खोल म्हणजे साधारण पोरांनाच्या उंचीच्या मानाने उडी मारूनच उतरायला लागत होती. मोठी माणसं पण एकावेळी एकच पायरी उतरू किंवा चढू शकायचे.
"अन्या ये लवकर लवकर, कोणी मोठ माणूस अर्डायच्या आत पाय टाकू पाण्यात" मागे वळून बघत पक्या म्हणाला...
" हो हो आलोच" सावकाश पायऱ्या उतरत अनिकेत म्हणाला "पिंट्या जरा जपून रे" असे म्हणेपर्यंत....
पिंट्या उड्या मारत खाली उतरत असताना त्याच्या कंबरेचा कर्दोटा ( लाल रंगाचा धागा ) तुडला आणि त्याला अडकवलेली चड्डी खाली आली.
सगळे मित्र पिंट्याला हसले आणि हसल्यामुळे त्या खोल कुंडात आवाज घुमला...सगळे मित्र पटापटा पायऱ्या उतरून खाली आले, पाण्यात पाय बुडवून वर पाहायला लागले तर अंधार भरायला लागला होता...आणि....त्या खोल कुंडात तो अजूनच जाणवू लागला. आता मात्र सगळेच टरकले होते.
आता सगळेच पटापटा बाहेर पडायला लागले, सगळ्यात शेवटी पिंट्या आपली चड्डी सांभाळत बाहेर आला.
" पक्या ते हाराचा दोरा दे रे" जुन्या हारापासून एक दोरा, पण जरासा जाडसर पिंट्याला दिसला. तो त्याने तात्पुरता कंबरेला बांधला.
" पिंट्या, अरे राहील का तो दोरा?"
" हो रे अन्या तुडल, पण जितका वेळ राहील तितक्या वेळ राहील"
इकडं देवळात डॉक्टर साहेब आलेले होते, त्यांनी पोरांना बोलावलं होत. पण पोरं आपल्याच उद्योगात होते. पोरांची शोधाशोध सुरू होती आणि इतक्यात पोरं देवळाच्या आवारात आलेच.
"बाबा... अ....ते...आम्ही....ते..आपले"(जरा गडबडून अनिकेत काही बोलणार तितक्यात )
"काही नाही डॉकटर साहेब बाहेरच होतो. पण देवळाच्या मागच्या पटांगणात होतो. किसन म्हणाला.
"असे होय, या लवकर बाकीचे सगळे मित्र आले का? कोणी राहील असेल तर त्यांना अणा बोलवून"
काही वेळात सर्व मित्र मंडळी देवळाच्या अंगणात जमा झाले.
"डॉक्टर साहेब ते दादा कुठून आणि कामुन येणार आपल्या गावात.?" पक्याने विचारले.
"डॉक्टर काका, डॉकटर काका, त्यांना आपल्या गावात काय काम?" छोट्या मधुने नाक पुसत पुसत विचारले.
पोरांच्या मनात असे अनेक प्रश्न सुरू झाले, सगळ्यांनी एकदम प्रश्नांची सरबत्ती सुरू केली..
"हो हो...ssss" सगळ्यांनी एकच गलका केला.
"चला मग आता पळा घरी...."
पोरच ती...जाताना पण गळ्यात हात टाकून आपल्या घराच्या वाटेला निघाले. जाताना पिंट्याची मात्र गमंत उडाली, एक हात चड्डी सांभाळत आणि एक हात पक्याच्या गळ्यात टाकून सगळे जण घराकडे पोहचले.
दुपारची दोनची एसटी धूळ उडवत लिंबा खालच्या स्टँड वर आली.
"आज्या, तुला रे काय चिंता? एसटी कवा का येईना."
"अरे तस नव्हं बाबा, काल डॉक्टर साहेबानी मला गोळ्या दिल्या , अन् म्हणले दुपारची एसटीचा टाईम झाला, की ही पिवळी आणि लाल गोळी घ्या, म्हणून म्हणल."
"अरे आज्या मग डॉक्टर साहेबांना येळ ईचारायची नाहीस का?"
"अर बाबाsss, मी हा असा अडाणी मानुस, मला कुठ येतंय येळ बिळ पाहायला."
"ते बी खरच की."
एसटी लिंबाच्या खालच्या स्टँड वर उभी राहिली, आतील प्रवासी खाली उतरले...
"मला पण, चल समोरच्या हॉटेलवर एक चहा पिऊ मग जाऊ"
असे म्हणून पहिल्यांदाच गावात आलेले ते दोन तरुण मित्र हॉटेलकडे निघाले.
"हे हॉटेल एकदम जुन्या मराठी चित्रपटात दाखवतात तसेच आहे रे"
"हो रे, ते पहा जर्मन प्लेट मध्ये कसा चिवडा, लाडू, शेव, वडे,भजी, जिलेबी,बालुशाही, ठेवले आहेत."
हॉटेल म्हणजे एका ओसरीवर तयार केलेली जागा. मागे मालकाचे घर, समोर पत्रे मारून पुढे ओढलेले हॉटेल, चार लाकडी बाक ( त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेले, म्हणजे अजून एक लाकूड काथ्याने गच्च बांधलेले )दोघांनी भूक मारायला काचेच्या कपबशीत आलेला चहा पीला आणि बाहेर पडले.
"पोरांनो, डॉक्टर साहेबांकडे आले का पावन?"
"हो"
"असं करा, हे असे इकुन सरळ... जा, मग खाल्ल्या ( डाव्या हाताला) अंगाला गेले का!!! एक शाळा दिसलं...त्या शाळेची भिंत आहे न, त्याला लागूनच आहे डॉक्टर साहेबांच घर. अन् नाही भेटल तर कोणाला बी विचारा दावत्यात तुम्हाला."
दोघे मित्र गावाचे अवलोकन करत करत चालत डॉक्टर कुलकर्णी यांच्या घरी आले.
"मी अनिकेत नारायण आगाशे" आणि "मी प्रभाकर किशोर मुळे" दोघांनी आपापले नावं सांगितले.
" आरे वा, आमच्या ही मुलाचे नाव अनिकेतच आहे. शाळेत गेला आहे. येईल संध्याकाळी आणि हे पण आज तालुक्यात गेले आहेत. तुम्ही या आणि फ्रेश व्हा. सखू यांचे सामान मागच्या खोलीत ठेवायला सांग आणि हात पाय धुवायला जागा दाखव......तो पर्यंत मी यांच्या जेवणच बघते." काकू मायेने त्यांना सांगत होत्या.
दोघे मित्र सकाळपासून दोन एसटी बदलून गावात आले होते, दमले होते आणि भूक पण लागली होती. दोघं पण ११ वी मध्ये शिकत होते. वय असेल साधारण सोळा सतरा वर्ष. तसे वयाने लहानच पण कोणता तरी मोठा उद्देश घेऊन या गावात आले होते.
दोघांना पण भूक लागली होतीच त्यामुळे अगदी पटापटा जेवले आणि काकूंनी सांगितल्याप्रमाणे जरा खोलीत विश्रांतीसाठी गेले. दमलेले होतेच... पोटात अन्न गेले आणि लगेच झोप पण लागली.
पाच वाजता एकदम दचकून जाग आली.
"हो रे खूप वेळ झोपलो आपण प्रभू"
दोघे उठून खोलीच्या बाहेर आले, काकूंनी गरम गरम चहा त्यांच्या समोर ठेवला.
"अरे काही होत नाही, दमला होतात तुम्ही. घ्या चहा घ्या , आता काही वेळात पोरं शाळेतून येतील, तुम्ही चहा घ्या आणि एक फेरफटका मारून या हवं तर" काकूंनी चहाचे कप हातात देत सांगितले.
चहा घेऊन दोघे घरा बाहेर पडले, गावाकडे कोणी अनोळखी आले की सगळे लोक आत्मीयतेने आपली चौकशी करतात,
"प्रभू गावात लोक चांगले आहेत वाटत"
"हो असतील की!"
दोघे मित्र जवळपासचे अंतर भटकून बरोबर सहा वाजता परत डॉ कुलकर्णी यांच्या घरी आले.
डॉक्टर साहेब तोपर्यंत आलेच होते.
"अजून पूर्ण पाहून झाले नाही काका"प्रभू म्हणाला
"होईल होईल, आजच आलात..मला एका कामासाठी तालुक्याला जावं लागलं म्हणून, नाहीतर आपण एकत्रच गावात गेलो असतो. पण उद्या सकाळी जाऊ."
गप्पा सुरू होत्याच तितक्यात टेबलावर चहाचे कप आले. आपल्याकडे हे कोण दादा आले आहेत? हे छोटा अनिकेत पडद्या अडून पाहत होता. ते आपल्या बाबांशी काही गप्पा गोष्टी करतायत हे तो नीट पाहत होता.
"काय बाबा?"
"अरे बाहेर ये. हे पाहिले का कोण दादा आलेत ते!!"
अनिकेत हळूच बाहेरच्या खोलीत आला आणि जरा लाजत बाबांच्या जवळ जाऊन उभा राहिला.
"हो, बाबा"
"काय नाव तुझे, पण पूर्ण नाव सांगायचं हं आणि कोणत्या वर्गात आहेस हे पण सांग" दादानी विचारले
(भीत आणि लाजत) "अनिकेत सदाशिव कुलकर्णी. मी सहावी फ मध्ये आहे."
"अरे वा...दे डाळी...." ( असं म्हणून अनिकेत दादाने हात पुढे केला)
"का?"
"अरे माझे पण नाव अनिकेत आहे. पण मी ११ वी मध्ये आहे( सगळे हसले ) तू आणि मी दोस्त. एक छोटा अनिकेत आणि एक मोठा अनिकेत दादा हो की नाही."
गप्पा झाल्या, मैत्री झाली आणि सगळे अनिचे मित्र, डॉक्टर साहेब, अनिकेत दादा आणि प्रभू दादा सगळे देवीच्या देवळात जमा झाले.
देवीच दर्शन घेतले. देवीला नारळ वाढवला आणि सगळे पोरं दगडी सभामंडपात बसले.
"बरं का पोरांनो, मी काल म्हणालो होतो न!!! ते हे दोन दादा आज आपल्याकडे आले आहेत".
डॉक्टर साहेब समोरून बोलत होते पण मुलांना काही समोर कोणीच दादा दिसत नव्हते. दिसणार कसे, ते दोघे पण मुलांच्या एकदम मागच्या बाजूला बसलेले होते.
अनिकेत आणि प्रभू एकदम शेवटी बसून डॉकटर साहेब काय बोलतात हे ऐकत होते. आम्ही दोघे कोणी वेगळे नाही, तर याच मुलां मधील आहोत हेच ते भासवत होते.
"हो हो आलो.."
दोघे पण आपल्या जागेवरून उठले आणि समोर आले.
अंगात साधारण रंगाचा शर्ट, पँट, केसाचा नीट भांग पाडलेला, नुकतेच मिशा फुटलेले, शरीराने मध्यम, कपाळाला गंध, वरच्या खिशात एक छोटी डायरी आणि एक पेन. असे ते मुलांच्या समोर उभे राहिले.
"मी अनिकेत नारायण आगाशे दादा आणि "मी प्रभाकर किशोर मुळे दादा"
"मुलांनो, तुम्हाला खेळायला आवडते का?" प्रभूने सगळ्यांना प्रश्न केला
" हो हो दादा खूप आवडते" सगळ्यांनी एकत्रित उत्तर दिले.
"वा वा छान, मग काय काय खेळता?"
"तसे आम्ही जास्त क्रिकेट, गोट्या,पतंग,....."
असे अनेक जणांनी उत्तरे दिले..
"हो,पर तिथं लय कचरा आहे, काचा, बाभळीचे लय काटे असतेत, म्हनून आम्ही कोणी बी खेळत नाही तिथे." पिंट्या म्हणाला.
"हो का? मग आपण करू की ते बाजूला. उद्या सकाळी आपण ते मैदान स्वच्छ करू आणि खेळता येतंय का ते पाहू. उद्या रविवार आहे. तुम्हाला शाळेला सुट्टी पण आहे न!!!....चालेल?
सगळी पोरं लगेच हो म्हणाली....डॉक्टर साहेब हे सगळ बसून पाहत होतेच. कोण कुठले जिल्हातून आलेले ही दोन पोरं आणि आपल्याकडचे सगळी लहान पोरं त्यांचं लगेच ऐकायला लागली. काय जादू आहे या दोन मुलांत? याचा ते विचार करत होते. तितक्यात..
"हो मी आहे की , अजून कोणाला सोबत घेता येते का!!! तेही पाहतो."
सगळ्यांना बोलून झाले. सकाळी मैदान स्वच्छ करायचे वानर सेनेने ठरवलं आणि भेट संपली.
"हो चला डॉक्टर काका"
देवीचे पुजारी हे पण देवळातच राहायचे. त्यांच्याच पूर्वजांनी हे देवीचे मंदिर बांधले होते. त्यांना देवीच्या पूजेचा मान होता, तसेच गावातील जुने घराणे होते.पुजारी काका वाड्यातील वरच्या मजल्यावर राहत होते. शहाबादी फरशीवर निवांत उघडे बंब, एकावर एक मांडी घालून बसलेले होते, त्यांच्या शेजारी विड्याचा पानाचा पितळी डबा होता. त्यातून काही सुट्टी पाने बाहेर डोकावत होती. पुजारी काकांचे पाने खावून तोंड लालेलाल झालेले होते. बाजूलाच एका पितळी तबकात काही विडे तयार करून ठेवलेले होते.
"या या डॉक्टर साहेब" विडा लावत लावत पुजारी काका बोलले.
"कसं काय येणे केलं..आज..? बऱ्याच टाईमाने भेटले..."विड्यात लवंग घुसवत पुजारी काका.. हसत हसत म्हणाले.
"यांची ओळख करून द्यायला आलो."
"हा अनिकेत आणि हा प्रभाकर, जिल्हातून आले आहेत"
"कशाला?...काय गाव बघायला का?"
"नाही हो. हे संघाचं काम करायला आले आहेत"
"संघ...? कोणता संघ, कब्बडी का खो-खो संघ?" दोघांच्या वयाकडे पाहून ते कोणत्या तरी खेळाच्या संघातील असतील असे पुजारी काकांनी अंदाज बांधला.
"नाही नाही..अनिकेत तूच सांग त्यांना"
" पुजारी काका, आता आम्ही पुढील आठ ते दहा दिवस गावात राहून मुलांची शाखा लावणार आहोत. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विस्तराक म्हणून काम करण्यासाठी गावात आलो आहोत."
"डॉक्टर काका आणि पुजारी काका आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित, जाणकार लोकांच्या भेटी पण घेणार आहोत" प्रभू म्हणाला.
"त्यांना भेटून संघ काय आहे, शाखा म्हणजे काय हे सगळे सांगणार...बसss."
"असं होय...मग हे राहणार कुठे हो? डॉकटर साहेब तुमच्याकड का ? नाहीतर असं करा आपल्या देवळाच्या दोन खोल्या आहेत न कुंडांच्या बाजूला तिथे राहूद्यात."
"हो चालेल काका...आम्ही नाहीतरी सगळे साहित्य आणलेले आहेच."
"अनिकेत आणि प्रभाकर तुम्ही रहा त्या खोलीत पण रोज जेवायला मात्र आमच्याकडेच या."
"तसे नको, जेवणाची रोज वेगवेगळ्या घरी सोय झाली, तर त्या निम्मित, त्या घरात परिचय होईल आणि ते घर जोडले जाईल काका...मग ते कोणाचं पण असो". प्रभू म्हणाला
पुजारी काकांची ओळख झालीच होती, स्वतंत्रपणे राहायला खोली मिळाली...उद्या सकाळी मैदान स्वच्छ करायचे असे नियोजन बद्ध काम झाले होते.रात्री जेवायला अनिकेत आणि प्रभू डॉक्टर कुलकर्णी यांच्या घरीच गेले आणि रात्री जेवण, गप्पा करून उशिरा त्यांच्या खोलीत आपले सर्व साहित्य घेऊन आले. प्रवासाचा शीण होताच खोलीत बिछाना टाकला आणि लगेच आडवे झाले....
"अबे, न जमायला काय झाले. करू आपण संघ काम."
"अरे पण आपण सकाळी आवरायचं कुठं ? ते तर कोणालाच विचारलं नाही की. संडास...बाथरूम कुठं आहे.?"
"अरे अन्या झोप आता, सकाळी पाहू काय ते."
"प्रभू बाहेर कसले आवाज येतायत का रे तुला? खोलीच्या बाहेर बघ..नजर जाईल तिथपर्यंत अंधार आहे रे."
"अरे काही आवाज येत नाहीये...झोप....तुला न!! जागा बदल झाली की असे होतेच...माहिती आहे मला....झोप...आणि मला पण झोपू दे....."
मनाचा निग्रह करून अनिकेत झोपायचा प्रयत्न करत पडून राहिला...अशीच केव्हा तरी त्याला झोप लागली....
(क्रमशः)
९०११०९६२५०
English Translation
Similarly, this village is a temple of the Goddess. The temple is already on one side of the village. Later the village grew, but people did not come to settle around the temple. The temple dates back to the 16th century, with its stone construction, wooden platform, high pinnacle, a buzzer on it, once a saffron flag but now a white flag.
There was a beautiful chafa in the temple premises, just like in Shiva temple .. few leaves and even white flowers on the top. There were various flowering trees like red kanher, jaswant, red rose. The stone was a large hall. Inside, inside the temple, there was a goddess with a vertebrae, a beehive.
The temple was always quiet like this, only some villagers used to come in the morning for regular darshan and some in the evening for some aarti. The rest of the time only the traditional priests of the goddess lived in the temple. The priest's uncle also lived in the temple, saying that the temple was built by the old people of his house. Adjacent to the temple was an empty field and beyond it was a Devi Kund.
People used to take bath here for the festival of Goddess. At other times, only the priest should bathe in the pool and anoint the goddess with a jug. However, if a devotee wants to take a bath, it was decided to take two rupees from him.
The tank was large, beautiful, at least thirty feet long and twenty feet wide, with fifteen or twenty stone steps on either side to descend into the tank. And if it comes to the right foot of Ganapati, the rain will be good that year, otherwise it will be less, just like the village is always in a dry belt but by the grace of Goddess, there was always water in this pond. Even in N summer ....
The boy came to the temple with the darshan of the Goddess and went to the Kunda side by side without looking at the elders.
"Oh no Pinta ... I'm still scared"
"I don't feel any fear while harassing the masters in the class and what are you doing here?" .. Pakya said ....
"Oh no, the steps are too deep ..."
"Anya, why are you coming down now !! Why should I take you?" Pinta grabbed Aniket's hand. He didn't listen to anything.
Finally, Aniket showed courage and set foot on the steps.
There will be about twenty one stone steps to descend into the pool. The steps are so deep that you have to jump down to the height of an ordinary kid. Big men could go up or down one step at a time.
Aniket shouted from "Pakya, wait for me", Pakya jumped up and down three or four steps but continued ....
"Come soon, Anya, let's put our feet in the water inside a big man," said Pakya, looking back.
"Yes, yes, come on" Aniket said slowly descending the stairs until he said "Pintya zara japun re" ....
As Pinta was jumping down, the cord of his waist (red thread) was broken and his tights got stuck.
All the friends smiled at Pinta and as they laughed, the sound reverberated in the deep pool ... All the friends came down the stairs, dipped their feet in the water and started looking up, but it was getting dark ... and ... he was still feeling in that deep pool. But now it was all over.
"Come on, let's go quickly, the sun is going down. Let's go up before it gets dark."
Now everyone started coming out in a hurry, at last Pinta came out holding her shorts.
"Pakya te haracha dora de re" A rope from the old necklace, but a slightly thicker pinta appeared. He tied it to a temporary waistband.
"Pintya, will that rope stay?"
"Yeah Al that sounds pretty crap to me, Looks like BT aint for me either.
Doctor Saheb had come to the temple, he had called the kids. But the boys were in our own business. The search for the boys was on and soon the boys came to the temple premises.
"What happens to Aniket?" Doctor Baba asked Aniket with a smirk.
"Baba ... a ... that ... we ... that ... ours" (as soon as Aniket said something confused)
"Nothing. Dr. Saheb is outside. But in the backyard of the temple," Kisan said.
"Yeah Al that sounds pretty crap to me, Looks like BT aint for me either."
In time, all the friends gathered in the courtyard of the temple.
"Tomorrow two grandfathers will come to our village. They will come to our house in the afternoon, so you can all be at school today so we can call you together."
"Doctor Saheb, where will Dada and Kamun come to your village?" Pakya asked.
"Doctor Uncle, Doctor Uncle, what do they do in your village?" Asked the little honey wiping his nose.
Many such questions started in the minds of the kids, all of a sudden they started asking questions.
"Hey..hey ... yes ... yes ... keep quiet, everyone .... tell me ... tell me, everyone will know why those two grandfathers will come tomorrow at seven o'clock in the evening but everyone should come .. Hmm ... not everyone will come? ""
"Yeah yeah ... ssss."
"Let's run home now ...."
As soon as she left, she put her hand on her neck and left for home. On the way, however, Pinta's fun was blown away, one hand was holding the shorts and one hand was thrown around Pakka's neck and everyone reached home.
At two o'clock in the afternoon, Limba came to the lower stand, blowing dust.
"It's not too late to come to ST today ..." said the toothless grandfather
"Grandma, what are you worried about? Why don't you come to ST?"
"Oh no, Dad, yesterday Dr. Sahebani gave me the pills, Ann said it's time for ST in the afternoon, take this yellow and red pill, so he said."
"Oh Grandma, don't you want to call the doctor?"
"Er Babass, I am such an ignorant man, I am coming to see where the bill is."
"It's really that."
ST stood on the lower stand of the lemon, the passenger inside got down ...
"I'm very hungry, Ray."
"Me too, let's have some tea at the hotel in front then go"
So the two young friends, who had come to the village for the first time, went to the hotel.
"This hotel is shown in a very old Marathi movie.
"Yeah Ray, look at how the Chivda, Laddu, Shev, Vade, Bhaji, Jilebi, Balushahi, are put in the German plate."
A hotel is a place built on an aisle. The owner's house in the back, the hotel in front with the letters in front, four wooden benches (their legs are fractured, that is, another wooden fence)
The two drank tea in a glass cup to quench their hunger and went out.
"Mama, where is Dr. Kulkarni's house?"
"Poranno, did you come to Dr. Saheb?"
"Yes"
"Do it, it's like this, Ikun straight ... go, then did you eat (left hand) and go to Anga !!! I saw a school ... there is no wall of that school, there is a doctor's house next to it. Ask you at the feast. "
The two friends came to Dr. Kulkarni's house while observing the village.
"Hello,
"I am Aniket Narayan Agashe" and "I am Prabhakar Kishor Mule" both said their names.
"Hey, our boy's name is Aniket. He has gone to school. He will come in the evening and he has also gone to the taluka today. Come and be fresh. Ask Sakhu to keep his belongings in the back room and show him a place to wash his hands and feet." Until then, I'll just watch his meal. " Aunt Maya was telling them.
The two friends had come to the village after changing two STs since morning, exhausted and even hungry. Both of them were studying in 11th standard. The age will be approximately sixteen to seventeen years. He had come to this village at a young age but with a big purpose.
Both of them were hungry so they ate very fast and went to rest in the room as told by their aunt. I was exhausted ... I lost food in my stomach and immediately fell asleep.
I woke up at five o'clock.
"Anya, it's too late for you. Get up quickly. What will people say?"
"Yes, you slept a long time, Lord."
The two got up and came out of the room, the aunt put hot tea in front of them.
"I'm sorry, we slept a little too much."
"Oh, nothing is happening, you are exhausted. Have some tea. The boys will come back from school in a while. You can have some tea and take a walk."
The two went out of the house with tea, a stranger came to the village and all the people inquired about him intimately,
"What's new?" Which side did you come from? Why Dr. Saheb? ”People were talking to him from a distance.
"Lord think people in the village are better"
"Yes, there will be!"
The two friends wandered a short distance and returned to Dr. Kulkarni's house at exactly six o'clock.
Doctor Saheb had come by then.
"Come on, boys, how did our village feel?"
"It's not over yet, uncle," said the Lord
"Yes, yes, you came today..I had to go to the taluka for a job, otherwise we would have gone to the village together. But we will go tomorrow morning."
As soon as the chat started, a cup of tea came on the table. Who are these grandfathers you have? This little Aniket was watching from behind the curtain. He could see that they were chatting with his father.
"Anya ye anya ..."
"What, Dad?"
"Hey come out. Did you see who Grandpa came from !!"
Aniket came to the outside room and stood beside Baba a little embarrassed.
"Well done, this is our Aniket. Why are all his friends coming today? Yes or no."
"Yes, Baba"
"What's your name, but tell me your full name and what class you're in," Dadani asked
(Fear and embarrassment) "Aniket Sadashiv Kulkarni. I am in 6th F."
"Oh wow ... give it to me ..." (so Aniket Dada extended his hand)
"Why?"
"Oh, my name is Aniket. But I am in 11th grade (everyone laughs) You and I are friends. A little Aniket and a big Aniket grandfather or not."
Chats took place, friendships were formed and all Ani's friends, Doctor Saheb, Aniket Dada and Prabhu Dada all gathered at the temple of the Goddess.
The goddess herself took darshan. The goddess raised coconuts and all the boys sat in the stone hall.
"Okay guys, I said no yesterday !!! These two grandfathers have come to you today".
The doctor was talking in front but the children did not see any grandfather in front of them. As it turned out, they were both sitting at the very back of the children.
Aniket and Prabhu were sitting at the very end listening to what Dr. Saheb was saying. He pretended that we were not different, that we were children.
"Oh Aniket, what is the Lord doing back then? Come forward like this."
"Ho ho alo .."
Both of them got up from their seats and came forward.
He was wearing a plain colored shirt, pants, a well-groomed hair, a recently shaved mustache, a medium body, a forehead odor, a small diary in his upper pocket and a pen. So they stood in front of the children.
"So, children, these two grandfathers have come to you. Now they will talk to you and introduce you.
"I am Aniket Narayan Agashe Dada and" I am Dada due to Prabhakar Kishor "
"Kids, do you like to play?" The Lord questioned everyone
"Yes, I like Grandpa very much," they all replied together.
"Wow nice, so what do you play?"
"By the way we have more cricket, goths, kites, ....."
So many people answered ..
"Well ... then do you want to meet to play in the field next to the temple from tomorrow evening?" Aniket Dada asked.
"Yeah, but there's rhythm rubbish, raw, acacia rhythms are thorny, so we don't play any seeds there." Said Pintya.
"Yes, why? Then we will do it aside. Tomorrow morning we will clean the ground and see if it is possible to play. Tomorrow is Sunday. You don't even have a school holiday !!! .... OK?
All the boys immediately said yes .... Doctor Saheb was sitting and watching all this. These two boys who came from which district and all our little boys started listening to them immediately. What is the magic in these two children? That's what he was thinking. At the same time,
"Doctor uncle can you come tomorrow morning"
"Yeah that's me, can anyone else take it along !!! See that too."
Everyone was talking. In the morning, Vanar Sena decided to clean the ground and the meeting ended.
"Let's meet Aniket and Lord, the priest uncle of the temple."
"Ho chala doctor kaka"
The priests of the goddess also used to stay in the temple. The temple of this goddess was built by her ancestors. They respected the worship of the goddess, as well as the old families of the village. The priest uncle lived on the upper floor of the castle. Shahabadi was sleeping on the floor with an open bomb, one sitting on his lap, next to him was a brass box of Vidya leaves. Some holiday leaves were peeking out of it. The priest ate his uncle's leaves and his face turned red. Next to it, in a brass plate, were made some vidas.
"Yeu ka kaka"
"Come on, Doctor," said the priest's uncle, waving goodbye.
"How did you come..today ..? I met you for a long time ..." said the priest uncle inserting cloves in Vidya .. smiling
"We came to introduce him."
"Who are these boys?"
"This Aniket and this Prabhakar are from the district"
"Why? ... What village to visit?"
"No. Yes, they have come to work for the team."
"Sangh ...? Which Sangh, Kabaddi or Kho-Kho Sangh?" Looking at the age of the two, the priest's uncle guessed that they would be in some sports team.
"No, no, Aniket, you tell them."
"Uncle Pujari, now we are going to stay in the village for the next eight to ten days and plant a children's branch. We have come to the village to work as an expander for the Rashtriya Swayamsevak Sangh."
"Doctor Kaka and Pujari Kaka will also visit all the distinguished, knowledgeable people in our village," Prabhu said.
"Meet them and tell them what a team is, what a branch is ... just sss."
"Yes, yes ... then where will it stay? Doctor, why do you have it? Otherwise, do it. There are two rooms in your temple, not on the side of the pool."
"Yes, it will work, uncle ... we have brought all the materials anyway."
"Aniket and Prabhakar stay in that room but come to us for dinner every day."
"No, if the meal is arranged in a different house every day, then for that occasion, the house will be introduced and that house will be connected, uncle ... then whoever it is". Said the Prabhu
The priest's uncle had already been identified, he got a room to live independently ... A plan was made to clean the ground tomorrow morning. As soon as the journey was over, I put the bed in the room and immediately lay down ....
"Prabhu, you don't stay for eight or ten days, so you don't have enough?"
"Abe, what happened to Namay. Let's do team work."
"Oh, but where do you want to cover in the morning? I didn't ask anyone. Where is the toilet ... the bathroom?"
"Hey Anya sleep now, let's see what happens in the morning."
"Lord, what kind of noise is coming from outside, Ray? Look outside the room..it is dark as far as you can see."
"Oh, there is no sound ... sleep .... you don't !! It happens when the place changes ... I know .... sleep ... and let me sleep too ....."
Aniket kept trying to sleep by restraining his mind ... Sometime like that he fell asleep ....
(Respectively)
© Nikhil Devidas Vaze
9011096250








खुप सुंदर मांडणी केली आहे. उत्सुकता वाढली आहे पुढील भाग वाचण्यासाठी.
ReplyDeleteछान ! उत्तम लिखाण..
ReplyDelete