Saturday, May 08, 2021

"भिंत"/"Wall"

    

 "भिंत"


    जचा विषय वाचून एकदम आश्चर्य वाटलं असेल नं? पण आज या भिंतीवर लिहावे असे वाटले, आपल्या रोजच्या जीवनात आपण या भिंतींकडे नीट पाहत नाहीच हो!!! आपल्यापैकी अनेक जणांनी हे वाचले किंवा चित्रपटात पाहिले असेल श्री संत ज्ञानेश्वर यांनी चांगदेव महाराज यांना सामोरे जाताना भिंत चालवली, हे त्यांना का शक्य झाले असेल? सर्वाठाई एकच ब्रम्ह आहे, रेडा ( सजीव) काय? आणि भिंत ( निर्जीव) काय? दोन्हीत संत ज्ञानेश्वर यांनी तेच हे एक तत्व पाहिले, संत ज्ञानेश्वरांची उंची, त्यांचे अधिकार सगळ्याकडे नाहीत.  मी याचे काय योग्य विवेचन करणार, पण माझ्यासाठी हि घटना महत्वाची  आहे.


      आज पण आपण पाथरी ( जिल्हा परभणी ) मध्ये गेलो तर श्री  साई बाबा, ज्या जागी पहिल्यांदा राहिले तेथे जी वास्तू आहे. त्या वास्तूची भिंत टिकून ठेवलेली आहे.

    एकदा पिंपरी ( पुणे ) रेल्वस्थानकाला प्लॅटफॉर्म नंतर एक संरक्षण भिंत बांधण्यात येत होती. स्टेशन पलीकडे एकदम दाट झोपडपट्टी होती , जेव्हा हे संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू होते तेव्हा  माझ्या कानावर काही लोकांचे वाक्य बोलणे पडले. 

" मुझे यह जगह चाहिए!!!"
" मी तर या बाजूला राहील!!!"
"तुम्ही इथं, तर मगं म्या इथं!!!"

    हा नेमका काय प्रकार आहे हे समजण्यासाठी मी त्या सगळ्यांचे निरीक्षण केले तेव्हा कळले कि हि सगळी मंडळी त्या भिंतीचा फायदा कसा घेता येईल याची चर्चा करत होते.  आपल्या आपल्या राहण्यासाठी जागा नक्की करत होते. खरंतर या भिंतीमुळे रेल्वे स्टेशनवर झोपडपट्टीतील मुलं, माणसं येऊ नये याचंसाठी संरक्षण म्हणून हे बांधकाम सुरू होते.

   पण उलट आपल्या घरासाठी मागची ( फुटकं ) एक भिंत बांधण्यात येत आहे, आता फक्त तीन भिंती, मग त्या विटांच्या असो किंवा पत्र्याच्या असो त्या उभ्या केल्या की आपले घर तयार!!! त्यासाठी त्या जागा वाटून घेणे सुरू होते.

    एका घरासाठी भिंत का आवश्यक आहे हे मला त्यादिवशी नक्की समजले. तसे मला शाळेत असतानाच या भिंतीचे काय महत्व आहे हे पण लक्षात आले होतेच.

   दहावीची परीक्षेचा पाहिला पेपर होता. परीक्षा सेंटर तसे घरा जवळच्या एका शाळेत होते, आम्ही सगळे मित्र एकत्रच परीक्षा केंद्राच्या शाळेत गेलो, प्रत्येकाने आपापल्या वर्गात प्रवेश केला. घंटा नाद झाला, प्रचंड दडणाखाली परीक्षा सुरू झाली, काही वेळाने उत्तर सुचेना म्हणून परीक्षा खोलीत जरा इकडे तिकडे पाहत होतो, खोली तशी लहानच होती, जेमतेम सगळ्या शाळांचे मिळून तीस पत्तीस मुलं मुली या वर्गात परीक्षा देत होते. त्यात काही अती हुशार, काही हुशार, मध्यम, आणि एकदम ढ असे विद्यार्थी होते. वर्गाची खोली जेमतेम बांधकाम अर्धवट सोडून वापरात आणलेली होती. भिंती उभ्या करून त्यावर छत म्हणून फक्त पत्रे होते. त्या छताला वीज जोडणी न केलेला पंखा लटकवला होता. उन्हाळ्यातील परीक्षा त्यामुळे जास्तच घाम येत होता. भिंतीना प्लास्टर केलेलं नव्हते त्यामुळे त्या भिंतीची एकना एक वीट दिसतं होती.. या असल्या वातावरणात तीन तास बसून पेपर संपवून  घरी आलो.    


    दुसऱ्या दिवशी केंद्रावरील  वर्गात लवकरच दाखल झालो. माझ्या दोन बेंच मागील एका अती उत्साही आणि अती ढ मुलाने आपला आजचा पेपर नीट जावा यासाठी शक्कल लढवून भिंतीत करामती सुरू केल्या होत्या. पेपर मध्ये पास होण्यासाठी आता बाहेरून सपोर्ट मिळायला हवा म्हणून या गड्याने थेट त्या प्लास्टर नसलेल्या भिंतीत चक्क एका विटेची खिडकी तयार केली. म्हणजे आता कोणी पण खोलीच्या बाहेरून थेट त्याच्या बेंचवर हात ठेऊन उत्तरे पाठवू शकले असते तर नवल नव्हते. पुढे अनेक स्वयंपाकघर आणि हॉलला जोडणी करणारी तसेच  दवाखान्यात डॉक्टर आणि कंपाऊंडर यांना जोडणारी भिंतीमधील खिडकी पहिली कि मला ती परीक्षा खोलीतील एका विटेची खिडकी आठवते.

    त्या वयात हे असले उद्योग पाहिले आणि भिंतीचा फायदा कोण आणि कसा घेईल काही सांगता येत नाही हे समजले.

   पुढे पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना  असाच एक अनुभव आला. परीक्षा देताना सहसा आपला रोज एकच बेंच असतो, एकच वर्ग.  मग त्यावेळी पण भिंत काय करू शकते हे इतरांकडून समजले. काही विद्यार्थी, विद्यार्थीनी चक्क भिंतीवर डायरेक्ट लिहून ठेवायचे, आता याला कॉपी म्हणावे का काय? हे असले उद्योग पाहून त्यांची चीड यायची आणि दया पण यायची.  मनात वाटायचे, ज्या सावरकरांनी आपले साहित्य अंदमानच्या खोलीतील भिंतीवर लिहून देशातील तरुणांना प्रेरणा, देशभक्ती गीतं आणि महाकाव्य दिले. एका लहानशा खिळ्याने कितीतरी तास उभे राहून त्यांनी ते काव्य भिंतीवर कोरले होते. सावरकरांच्या स्पर्शाने कदाचित ती त्या सेल्युलर जेल मधील भिंतच पावन झाली असेल. 

   जी निर्जीव भिंत संत ज्ञानेश्वर यांनी चालवली, ज्या भिंतीवर सावरकर यांनी काव्य निर्मिती केली. त्या भिंतींचे  भाग्य थोर की यांच्यामुळे त्या निर्जीव भिंतीला पण इतकं महत्व प्राप्त झाले. जेव्हा जेव्हा संत ज्ञानेश्वर , सावरकर यांच्या चरित्राचा उल्लेख येतो, त्यावेळी त्या भिंतीची पण आठवण होतेच.

    असेच भिंतीचे एक अजून सामर्थ्य काय हे पण सांगतो. 

    शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात वास्तव्य करत होता. लालमहाल म्हणजे ज्या वाड्यात शिवाजी महाराजांचे बालपण गेले ती जागा. शिवाजी महाराजांना या वाड्यातील सर्व जागा नीट माहित होत्या. जेव्हा प्रत्यक्ष शाहिस्तेखानावर छापा टाकला जाणार होता. त्यावेळी लाल महालात कुठून प्रवेश करायचा याची योजना नक्की केलेली होती. लाल महालाच्या मागच्या बाजूस एक स्वयंपाक खोलीला खिडकी होती, पण शाहिस्तेखानाने या वाड्यात काही बदल केलेले होते . त्यातच ही खिडकी देखील तात्पुरती दगड माती लावून (लिंपून) बंद केलेली होती. याच भिंतीला इतिहासात फार महत्व आहे. त्या तात्पुरत्या भिंतीला देशपांडे बंधू ( बाबाजी आणि चिमणाजी) यांनी खणून भगदाड पाडले आणि शिवाजी महाराज लाल महालाच्या परिसरात प्रवेश करते झाले... पुढील सर्व छापा कसा पार पडला ते पुन्हा कधी तरी नक्की सांगेन. सांगायचा मुद्दा हाच की त्या भिंतीची आठवण झाल्या खेरीज शाहिस्तेखान वरील छापा पूर्ण होत नाही.

 अशा या सर्व घटना भिंतींमुळे पूर्ण झाल्या आहेत. आपल्या मराठी मध्ये, ' आपल्यात भिंत उभी राहिली',  'मतभेदाच्या भिंती ', ' भिंतीला कान असतात ', ' भिंतीला कान लाव' असे वाक्यप्रचार, म्हणी आपण नेहमी वापरतो. म्हणून मला असे वाटते की आपण जेव्हा या भिंतीवर बोलत असतो, तेव्हा तिला काय वाटतं असेल? आपल्या बद्दल जे बोलले जाते ते योग्य की अयोग्य असा प्रश्न तिला पडत असेल का? निर्जीव भिंतीला त्यावेळी सजीव पण प्राप्त झालं तर...आपल्याला तिच्या पायाखाली दाबत ती आपल्याला म्हणेल  " तुम्ही माणसंच वाईट वागून एकमेकांत वितुष्ट निर्माण करतात आणि बदनामी माझी होते. आम्ही तर चौघी ( चार भिंती ) बहिणी एकत्र येऊन छप्पराला आधार देतो, तुम्हाला थंडी, वारा, पाऊस यापासून वाचवतो. तुम्ही मात्र गैरसमज करता आणि बदनाम आम्हाला करता!!! आज आम्ही आपली जागा सोडली तर!!! तुमचे अस्तित्व ते काय उरेल...?"

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या (comment) प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या, सोबत आपले नावंं लिहावेे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation

"Wall"

    Wouldn't you be surprised to read today's topic? But today I felt like writing on this wall, in our daily life we ​​don't look at these walls properly !!! Many of us may have read this or seen it in a movie. There is only one Brahma everywhere, what is Reda (living)? And what about the wall (inanimate)? In both, Saint Dnyaneshwar saw the same principle, the height of Saint Dnyaneshwar, his rights are not with everyone. I will discuss this properly, but this incident is important for me.

    Today, if we go to Pathri (District Parbhani), there is a Vastu where Shri Sai Baba first stayed. The wall of that object is preserved.

    A protection wall was being constructed behind the platform at Pimpri (Pune) railway station. There was a dense slum beyond the station, when the construction of this protective wall began. Some of my people’s sentences fell on deaf ears.

"I want this place !!!"
"I'll stay on this side !!!"
"You're here, so I'm here !!!"

    When I observed them all to understand exactly what type it was, I realized that the whole church was discussing how to take advantage of the wall. Yours was exactly the place to stay. In fact, this wall is used to protect the children and people from the slums at the railway station.

   But on the contrary, a back wall is being built for your house, now only three walls, whether it is made of bricks or letters. That's where the space begins to unravel.

    Just as I understood that day why a wall is necessary for a house, I realized the importance of this wall when I was in school.

   It was the first paper of the matriculation examination. The examination center was in a school near the house, we all went to the school of the examination center together, each entered his own class. The bell rang, the exam started under heavy pressure. After some time, I was looking around the examination room as if it was the answer. The room was so small that thirty five boys and girls from all the schools were taking the exam in this class. The students were moderate, and very strong. The classroom was abandoned as soon as the construction was completed. The walls were erected and there were only sheets on it as a roof. The ceiling had a fan without electricity connection. The summer exams were so sweaty. The wall was not plastered, so one brick of the wall was visible. In this environment, we sat for three hours and came home with paper.

The next day I entered the room at the center early, one of my two benches was very enthusiastic and very stubborn boy had started fighting against the wall to get his paper right today. To get through the paper, you now need to get support from outside, so the wall made a brick window directly into that non-plaster wall. I mean, no wonder someone could send answers directly from outside the room with their hands on his bench. Next I saw a window in the wall that connects several kitchens and halls, as well as the doctor and Compounder in the hospital, and I remember a brick window in that examination room.

    I saw industries like that at that age and it is not possible to say who will take advantage of the wall and how. Got it

   Later education starts in Pune, when we start college education we have only one bench every day in exams, one room, then at that time we understood from others what a wall can do, some kids used to write directly on the wall, now why call it a copy? They used to get annoyed when they saw such industries and they used to come.

    I used to think that Savarkar, who wrote his literature on the wall of the room in the Andamans and gave inspiration, patriotic songs, poems to the youth of the country, stood on a small nail and carved that poem on the wall. Savarkar's touch may have sanctified the wall of that cellular jail.

   The inanimate wall was run by Sant Dnyaneshwar, on which Savarkar composed poetry. Due to the great fortune of that wall, that inanimate wall also gained so much importance. Whenever the character of Saint Dnyaneshwar, Savarkar is mentioned. I still remember that wall.

    It also tells you what another strength of the wall is.

    Shahistekhan was living in Lal Mahal in Pune, Lal Mahal is the place where Shivaji Maharaj spent his childhood. Shivaji Maharaj knew all the places in the palace, the rooms, the doors, so when the actual Shahistekhan was to be raided, where to enter the Red Palace. This was exactly what was planned. There was a kitchen window at the back of the red palace, but the Shahistekhan had made some changes to the castle. The window was also temporarily closed with lime. This wall is very important in history. That temporary wall was dug by Deshpande brothers (Babaji and Chimanaji) and Shivaji Maharaj enters the premises of Lal Mahal ... I will tell you exactly how all the next raids were carried out. The point to make is that the raid on Shahistekhan is not complete unless the wall is remembered.

    All these incidents have been completed due to the walls. In our Marathi, we always use phrases like 'we have a wall', 'walls of differences', 'walls have ears', 'ears to the wall', so I think when we are talking on this wall.

    So what does she think? Does she wonder if what is being said about her is right or wrong? If the inanimate wall gets alive but at that time ... she will press you under her feet and she will say to you "You people are disgusted with each other and the disgrace is mine, we four sisters (four walls) come together and support the roof, you cold, wind Rain saves us from this. But you misunderstand and slander us !!! If we leave our place today !!! (Like Sant Dnyaneshwar) What is your existence ...? "

© Nikhil Devidas Vaze
9011096250


 

3 comments:

  1. भिंत.
    एक अद्भुत गोष्ट आहे.
    भिंत आधार देते तद्वतच दुरावा सुद्धा निर्माण करते.......

    ReplyDelete

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले