"रूम वरचे पाहुणे"
"अरे नाही! आम्ही नारायण पेठ मध्ये राहतो. पण डेक्कन पासून जवळच आहे".
"मग मी तुमच्याकडेच येतो, चार दिवस! माझे काम झाले की निघेन".
" हो,हो! ये ना, आम्ही आहोतच".
असे बोलून एक ना अनेक मित्र आमच्या कडे यायचे, आपली रूम म्हणून काही दिवस रहायचे. त्यांचे काम झाले की परत गावी, वा सोय झाली तर दुसरीकडे, सोय झाली तर त्यांच्या कॉलेजच्या जवळ, किंवा कामाच्या ठिकाणाजवळ निघून जायचे. एकतर आमची रूम डेक्कन बसस्टॉप पासून अगदी जवळ होती (जिथून पुण्यात कुठंही जायला यायला PMT मिळायची.)आणि दुसरे म्हणजे आमचा सगळ्यांचा खूप दिवसांनी सहवास मिळायचा. यामुळे आमची मैत्री आणि रूम या दोन्हीवर सगळ्यांचा जीव होता.
आमच्या या रूम मधील वातावरण,हे एखाद्या चुंबाका प्रमाणे होते.पाहुणे मित्र आपोआप खेचले जायचेच. रूम मधील सगळ्या मित्रांचा स्वतःचा असा माणसांचा गोतावळा होताच. सिनियर मित्र शिक्षण पूर्ण होऊन परत गावी गेले.मी मात्र शिक्षण संपवून अजून तिथेच राहत होतो.
अनेक नवीन जुने मित्र येत जात होते. अमक्याचा मित्र,तमक्याचा मित्र ,मित्राचा मित्र, असे दोन दिवस रहायला यायचाच.आम्ही आपले त्यांना आमच्यात सामाऊन घ्यायचो.
मित्र यायचे तेव्हा काही वाटतं नव्हते, पण कोणाच्या घरची वडील मंडळी येणार असले की, रूमची कमीत कमी दोन दिवस आधी साफ सफाई करायला सुरुवात होत असे. तसे आम्ही रोजच फरशी झाडत होतोच.पण इतर अनेक गोष्टीची साफ सफाई काही रोज करत नव्हतो.म्हणजे तितका वेळ देणे शक्यच नव्हते.
असाच एकदा एक सावत्र मित्र, काय? कळले नाही का? 'सख्खा मित्र' म्हणजे आपला मित्र,आणि 'सावत्र मित्र' म्हणजे आपल्या मित्राचा मित्र. तो नेहमी प्रमाणे चार दिवसांसाठी आमच्या रूम वर त्याची काही सोय होई पर्यंत आला होता.
आम्ही दोघं संध्याकाळी असेच फिरत फिरत डेक्कन ला आलो,तिथे पूर्वी बोगद्यातील (बोलीभाषेतील) एक नाश्ता केंद्र (अपना घर) होत. अजून पण ते सुरू आहे फक्त आता त्याचे रूप पालटलं, तशी आमच्या दोघांना पण भूक लागली होती,हे अपना घर डेक्कन भागात खूप प्रसिद्ध आहे.पूर्वी तिथे जायला एक अंधारी बारीक बोळ होती,जेम तेम एक माणूस जाईल इतकी जागा...बोळ पार केली, की एक खोली...बसायला दगडी कट्टे/ ओटा. ती खोली म्हणजे संपूर्ण इमारतीचा भार आपल्या डोक्यावर घेऊन बसलेली अशीच होती.आता या जागेत बरेच चांगले बदल झाले आहेत.
आत गेलो आणि खायला पोहे मागवले. त्या उपहार गृहा मध्ये स्टीलच्या प्लेट मधे पोहे आले. प्लेट गरम लागू नये म्हणून हातात एक प्लेट खाली रुमाल पण देत असतं.आम्ही तो घेतला...आणि पोह्यात एकही शेंगदाणा न दिसल्यामुळे....तो मित्र डायरेक्ट म्हणाला.... "अबे! हे कसले पोहे?.....एक पण शेंगदाणा नाही, राव!!!"
त्याला हे माहीत नव्हते की हे बटाटा पोहे आहेत....पूर्ण मराठवाड्यात शेंगदाणे न घालता कुठेच पोहे मिळत नाहीत....
तो कसा बसा खायला तयार झाला...पण त्याची बडबड सुरूच होती...तितक्यात मला म्हणाला...."जाऊ देत,शेंगदाणे नाही तर नाही, पण पोहे गरम आहेत की काय? हातात रुमाल पण दिलाय"
"अबे, नाही, त्यांनी आपल्याला प्लेट गरम करून दिल्यात, म्हणून हातात रुमल देतायत"🤪😄.
माझे हे वाक्य माझ्या तोंडून इतके सहज निघून गेले की ते काऊंटर वर पैसे घेणारे काका देखील हसले.😃शेंगदाणे नाहीत म्हणून चिडलेला मित्र पण हसला आणि त्याचा राग निवळला.😃
असे पाहुणे मित्र यायचे....रहायचे..ती रुम,त्यातील सगळे मित्र,यामुळे पाहुणे जायलाच तयार होत नसत.एक मित्र तर मुंबईवरून फक्त शनिवार रविवार आमच्या कडे राहून स्वतःमधील कंटाळा,धकवा घालवून, स्वतः मध्ये सकारात्मकता, पुढील आठवड्या साठीची ऊर्जा घेऊन आमच्या कडे येऊन जात असे.तसे आमच्या मैत्रीचे गारुडच होते.की हा आपला,हा परका असे कोणाचं बाबत,कोणीच करत नसे.
त्यामुळे त्या रूमवर जितके वर्ष राहीलो,तितके वर्ष पाहुणे येत गेले.काहीं ना आम्ही सुधारले,काहींना आम्ही सोबत केली,काहींना जमेल तितकी मदत केली, काही चार दिवस राहून त्यांच्या त्यांच्या रस्त्याला लागले.हीच गोष्ट आम्ही रूम सोडली तरी पुढील मित्रांनी पण केली.
रूम मधील मुलं बदलली.... पण पाहुणे नाही.....ते पण तसेच येत जात राहिले आणि रूम मात्र त्यांचे नेहमी प्रमाणे स्वागत करत राहिली.
©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
English Translation
"Guest at Our Rooms"
"Hey, Nikhya, your room is in the Deccan, isn't it?"
"Oh no! We live in Narayan Peth. But it is close to Deccan."
"Then I'll come to you, four days! I'll leave when I'm done."
"Yeah, yeah! Come on, we're here."
After saying this, one or more friends would come to us and stay for a few days as our room. When their work was done, they would go back to the village, or if it was convenient, on the other hand, if it was convenient, they would go near their college, or near their place of work. Either our room was very close to the Deccan bus stop (from where we could get PMT to get anywhere in Pune) and the other was that we all got together after many days. It was the lifeblood of both our friendship and the room.
The atmosphere in our room was like a magnet. As soon as all the friends in the room had their own crowd of men. Senior friend returned to the village after completing his education. However, after finishing his education, he was still living there.
Many new old friends were coming. Amakya's friend, Tamakya's friend, Mitra's friend, used to stay for two days. We used to accommodate them in us.
It was not uncommon for friends to arrive, but if the elders of someone's home were to come, the room would be cleaned at least two days in advance. We were sweeping the floor every day. But we were not cleaning many other things every day. So it was not possible to give that much time.
Once upon a time, a step-friend, what? Don't understand? 'Sakha Mitra' means your friend, and 'Sawatra Mitra' means your friend's friend. He came to our room for four days as usual until he had some comfort.
The two of us walked around the Deccan in the evening, where there used to be a breakfast center (our home) in the tunnel. It is still going on, only now it has changed its form, both of us were hungry, this house is very famous in the Deccan area. , That one room ... a stone block / ota to sit on. That room was like carrying the weight of the whole building on your head. Now a lot of good changes have taken place in this space.
Went inside and ordered Pohe to eat. They came swimming in a steel plate in the gift house. We used to give him a handkerchief under a plate so that the plate would not get hot. Not a single peanut, Rao !!! "
He didn't know that these potatoes are pohe .... you can't find pohe anywhere in Marathwada without adding peanuts ....
How did he get ready to sit down and eat ... but he kept on blabbering on ... he just said to me ....
"Abe, no, they heated the plate for you, so they give you a handkerchief".
This sentence of mine went out of my mouth so easily that even the uncle who took money at the counter laughed.
Such a guest friend used to come .... stay..that room, all the friends in it, because of this the guests were not ready to go. A friend from Mumbai only stayed with us on Saturdays and Sundays, getting rid of boredom, pushing, positivity in himself, taking energy for next week He used to come and go to us. He was the guardian of our friendship.
So the more years we stayed in that room, the more visitors came. Some we improved, some we helped, some we helped as much as we could, some stayed for four days and went on their way.
The children in the room changed .... but not the guests ..... they kept coming and going and the room kept welcoming them as usual.
9011096250

माणसांचा गुण जागेला लागतोच.
ReplyDeleteखूप छान लिहिता!सौ माधुरी केदारे
ReplyDeleteKhup Chan .mazi mumbai che friends aathavalya
ReplyDeleteथॅन्क्स
DeleteChhan
ReplyDeleteखूप छान निखिल... जुन्या आठवणी जाग्या झाल्या... 🤪
ReplyDelete