"विनायक दामोदर सावरकर"
दोन मजली कौलारू वाडा, शेणाने सारवलेले समोरील आणि मागील प्रशस्त अंगण, वाड्यात खाली आणि पहिल्या मजल्यावर खोल्या , वाड्याच्या मध्यात चौक, स्वतंत्र देवघर, मोठे स्वयंपाकघर, मोठी चूल. अशा सधन, सुखी आणि संपन्न वाड्यात, एक पती ( अण्णा) पत्नी( राधाबाई ) आणि त्यांची चार मुले राहत होते. त्यात तीन मुलं आणि एक मुलगी आणि त्या मुलांचे ज्येष्ठ काका ( बापू) असे समाधानाने राहत होते.
"नको नको जी, आम्ही इथचं थांबतो जीss" जरा दबूनच ते म्हणाले.
"अहो, बाहेर खूप उन्ह आहे!!! आणि तुम्ही दमलेले पण दिसता. वर बैठकीत बसा, मी पाणी देतो" आदराने तो मुलगा बोलला.
"नाई बाsss, तुम्ही कशाला त्रास घेता जी, आम्ही इथचं बरे हवं जीss" जास्तच खजील होत त्यातील एक जण म्हणाला
"अहो असे नका करू!!! या तुम्हीss बसाss, तुम्हाला अगदी संकोच वाटत असेल, तर बैठकित न बसता तिथे खाली बसा" ( बैठक वर दगडी ओट्यावर होती.)
ती आलेली लोकं बैठकी जवळ खाली जमिनीवर बसली. तितक्यात... बापू काका घरात आले. त्यांना येताना पाहूनच ही मंडळी आदराने जागेवरून उठून उभी राहत म्हणाली...
" राम राम बापू काकाsss" आपण या जागेवर बसलो या भीतीने सगळे कसेबसे घाबरत उभे राहिले होते.
बापू काका म्हणजे बलदंड शरीर, उंचपुरे, रंगाने गोरे, डोळे जरा घारे असे भारदस्त व्यक्तीमत्व होते. ते घरात येतायेता त्या उभ्या लोकांना पाहत होते. त्यांना ते लोक बैठकी जवळ बसलेले पाहून जरा आश्चर्य वाटले होते. बापू काका त्या लोकांना काही बोलणार तितक्यात...
"कोण? कोणी केला आग्रह?" बापू काकांनी जरा रागानेच विचारेल.
" छोट्या विनायकराव, तात्यांनी केला बाss"
"कोणी तात्यानी!!! मग मी आता काय बोलणार?? बसा बसा बाबा" बापू काका निरुत्तर झाले.
बापू काका हे विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे काका. अण्णा म्हणजे दामोदर सावरकर यांचे जेष्ठ बंधू पण तरी त्या दोन भावंडांचे जास्त पडत नसे. एकतर त्या दोघात वयाचे अंतर देखील जास्त होते. पण बापू काकांची दामोदर ( अण्णा ) यांच्या सर्व मुलांवर खूप माया होती, सगळ्यात जास्त प्रेम विनायक ( तात्या ) यांच्या वर होते.
सावरकर कुटुंब तसे मूळचे कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील सावरवाडी येथील होते. पण त्यांचे पूर्वज कधी तरी, कोणी तरी देशावर म्हणजे, कोकण सोडून वरील भागात राहायला आले. असेच दामोदर सावरकर आणि त्यांच्या पत्नी सौ राधाबाई हे देखील नाशिक मधील भगूर या गावी राहत होते. संसार अगदी सुखाचा, समाधानाचा, आर्थिक स्थिरतेचा सुरू होता. मुलं उत्तम गुण संपन्न, शिक्षणात प्रगती करणारी होती.
ज्येष्ठ पुत्र गणेश( बाबाराव), विनायक ( तात्या), मग एक मुलगी आणि शेवटी नारायण ( बाळ) असे चार गुणवान मुलं त्यांचा संसार फुलवत होती.
दिनांक २८ मे १८८३ रोजी विनायक याचा जन्म झाला. उत्तम कुंडली योग होता. असे म्हणतात की एखादा सत्पुरुष व्यक्ती जेव्हा जन्माला येतो, त्याच्या जन्मा आधी त्या घराण्याची अनेक वर्षांची देवावर श्रद्धा असते. त्यांच्या अनेक पिढ्या या परोपकार, समाजसेवा, ईश्वरसेवा करत आलेल्या असतात. तेव्हा त्यांच्या घराण्यात असे नररत्न जन्माला येतात.
सावरकर घराणं देखील असेच होते, घरात राष्ट्रभक्ती, स्वराज्य याची काळजी घेतली जात होती. ईश्वरसेवा, समाजसेवा केली जात असे. अनेक संस्कृत, मराठी ग्रंथांचे वाचन, चिंतन, मनन घरात होत असे.
विनायकाचा जन्म झाला, तसे आपल्या घरातील हे संस्कार आपल्या आण्णा, आई, ज्येष्ठ बंधू यांच्या आचरणातून त्यांना दिसत होते आणि ते त्याप्रमाणे आत्मसात करून वागत देखील होते. लहान असताना मित्र देखील मिळाले. सर्व समाजातील मित्रांसोबत नदीत तासनतास पोहावे, तालमीत जावून शरीर बलदंड करावे, शाळेत अभ्यास करावा, वृत्तपत्र वाचन, धार्मिक ग्रंथ वाचन असे सगळे सुरू होते. लहान पणापासून हिंदू धर्मावर अढळ श्रद्धा, पण जातीपाती मध्ये अडकलेला हिंदू समाज त्यांना मान्य नव्हता. हे वरील प्रसंगात समजते. आपण सर्व हिंदू एक आहोत हे बीज लहान असतानाच त्यांच्या मनात पेरले गेले असावे.
आपल्या वयाच्या अकराव्या ( इ.स.१८९४) वर्षी श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या जीवनावर फटका या बाल प्रतिभा असलेल्या मुलाने भगूर येथे लिहला.
भगूर मधील मित्रांसोबत प्रार्थमिक शिक्षण पूर्ण करून. आता ते पुढील शिक्षणासाठी नाशिक येथे आले. तिथे तर समविचारी अनेक मित्र भेटले.लहान वयातील विनायकात अनेक गुण होते,त्यातील काव्य रचना तर होताच पण नाशिक मध्ये आल्यावर अजूनही अनेक गुण दिसायला लागले. एकदा नाशिक मध्ये वक्तृत्व स्पर्धा भरली होती, यात छोट्या विनायकाने असे काही भाषण केले की सर्व सभा मंत्रमुग्ध होऊन गेली. भाषणाची सगळ्यात शेवटी संधी मिळून त्यांचा पहिला नंबर आला.
"नाही, मी विनायक दामोदर सावरकर, हे भाषण मी स्वतः तयार केलेले आहे." त्यांनी ठणकावून उत्तर दिले.
या बोलण्यावर त्या आयोजकांचा विश्वास बसला नाही. त्यांना असे वाटले की या मुलाचे हे भाषण दुसऱ्या कोणी लिहून दिले आहे. तेव्हा छोटा विनायक म्हणाला.
" उत्तम वाचन, चिंतन यावर मी भाषण तयार केले. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण भाषण उत्तम करणार या आत्मविश्वासानेच मी सभेतील भाषण केले". असा आत्मविश्वास लहानपणा पासून त्यांच्या अंगी होता..
छोट्या विनायकाने आता नाशिक मधील काही लोकांच्या मनावर आपल्या संस्कारातून, भाषणातून, नेतृत्व गुणामुळे भुरळ पाडली होती.
" अरे, तुझे नाव ' सावरकर ' म्हणजे, ज्याचे 'कर' राष्ट्राला सावरतात तो सावरकर" नाशिक मधील एक लोकमान्यांचे कट्टर समर्थक होते. ते नेहमी छोट्या विनायकाला असे म्हणतं. कदाचित लहान विनायकाला त्यांनी ओळखले असावे. नाशिक मधील शिक्षण, मित्रांसोबत मित्रमेळे, वाचन असे सगळे सुरू होते.. आणि काही महिन्यातच प्लेग या महामारीने आधी पुण्यात, मग मुंबई आणि मग नाशिक... असा प्रवास करत, हा महाभयंकर संसर्ग रोग नाशिक मध्ये आला. त्यामुळे विनायकाला परत आपल्या घरी भगूर येथे जावे लागले.
घरी गेले तरी त्यांचे वडील श्री दामोदर सावरकर आणि मोठे भाऊ बाबाराव हे गावातील काही जणांची सेवा करत असलेले त्यांनी पहिले. त्यांच्याच एका मित्राच्या वडिलांची सेवा अण्णा करत होते. पुण्यातील संसर्ग कमी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक विशेष अधिकारी नेमला. त्याचे नाव डब्ल्यू. सी. रँड. हा रँड लोकांची, स्त्रियांची, घरांची अमानुषपणे झाडाझडती घेवू लागला. घरातील देवालय, सामान, सगळे उध्वस्त करू लागला. या महामारीत अनेक लोकांचे प्राण देखिल गेले तरी त्याचे अत्याचार असेच सुरू होते.
दिनांक २२ जून १८९७ रोजी श्री दामोदर चापेकर त्यांचे श्री बाळकृष्ण चापेकर आणि श्री महादेव रानडे यांनी अमानुष रँड आणि ब्रिटिश सरकारच्या त्रासला कंटाळून त्याला कडक शासन व्हावे यासाठी त्याचा वध केला."गोंद्या आला रेss..."
पुण्यात ही घटना घडली पण त्याचे पडसाद सर्व दूर पसरले. छोटा विनायक लहान पणापासून आपल्या घरात नियमित वृत्तपत्र वाचन करत होताच. त्याला मी बातमी समजली. काही महिन्यातच चापेकर बंधू यांना अटक झाली ( द्रविड बंधू फितूर झाले).चापेकर बंधू यांना ब्रिटिश सरकारने सन १८९८ आणि १८९९ मध्ये फाशी दिली.
या फाशीची बातमी वाचून विनायक अत्यंत अस्वस्थ झाला. संध्याकाळ झाली...तो घरात चलबिचल करत फिरत होता... मनाची प्रचंड घालमेल सुरू होती.. तो संपूर्ण वाड्यात फेऱ्या मारत होता..त्याचे हे असे वागणे अण्णांनी पाहिले. आपला मुलगा प्रचंड अस्वस्थ आहे. त्यांना हे लक्षात आले की या विनायकाच्या मनात काही तरी घालमेल सुरू आहे. वडिलांनी आपल्या मुलाचे मन ओळखले.
" तात्या...अरे तात्या... नकोsss नको त्या वाटेने जाणे. ती वाट म्हणजे....नको रे नको" अण्णांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. विनायक काही बोलला नाही. तो सरळ आपल्या देवघरात गेला. त्याच्या पंजोबांनी ( आजीचे वडील) यांनी पराक्रम करून मिळवलेल्या देवीच्या मूर्तीच्या पायांना हात लावला आणि प्रतिज्ञा घेतली.
" हे मातृभूमि, तुझे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारेन, त्यासाठी या जुलमी ब्रिटिश सरकारशी मारीता मारीता मरेतो झुंजेन..आई तुला स्वतंत्र नक्की करेन" वयाच्या अवघ्या चौदा- पंधरा वर्षांचा विनायकाने जन्मभराची देशसेवेची प्रतिज्ञा घेतली.
पुढील शिक्षण नाशिक... मग पुण्यात शिक्षण... मग लंडन मधील शिक्षण. हे सगळे सुरू असताना कधीही आपल्या ध्येयापासून त्यांचे लक्ष विचलित झाले नाही. सशस्त्र क्रांती करत राहिले. मागे या विषयी बोललो आहेच. ( https://muktalikhan2021.blogspot.com/2021/05/100-years-of-freedom.html) असे हे श्री विनायक दामोदर सावरकर यांचे बालपण होते.
आज क्रांतिवीर श्री विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निम्मित त्यांना विनम्र अभिवादन.
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Vinayak Damodar Savarkar"
Two storey Kaularu castle, spacious front and rear courtyard covered with dung, rooms downstairs and on the first floor of the castle, square in the middle of the castle, separate temple, large kitchen, large chool. In such a rich, happy and prosperous castle, lived a husband (Anna), wife (Radhabai) and their four children. There were three sons and a daughter and the eldest uncle (Bapu) of those children was living happily.
"No, no, we'll stop here," he said with a sigh.
"Hey, it's too hot outside !!! And you look tired. Sit up in the living room, I'll give you water" said the boy respectfully.
"Nai bass, why are you bothering us, we want to get better here"
People from some of the lower castes who were stuck in the caste system of that time had come to meet the owners (Damodarrao). But traditionally or hesitantly, they stood in the sun in the courtyard, not even sitting on the plain ground.
"Hey, don't do that !!! You sit here, if you feel hesitant, sit down without sitting" (There was a stone oatmeal on the seat.)
She sat down on the ground near the meeting place. Just then ... Bapu Kaka came home. Seeing them coming, the congregation stood up respectfully and said ...
"Ram Ram Bapu kakass" Everyone was standing in awe of the fear that we were sitting on this place.
Bapu Kaka was a strong personality with a strong body, tall, fair complexion and dark eyes. He was looking at the people standing in the house. He was surprised to see them sitting near the meeting. As soon as Bapu Kaka will say something to those people ...
"Uncle Bapu, we didn't sit down. The small owners pushed hard," said the owner, clasping his hands.
"Who? Who insisted?" Uncle Bapu will ask angrily.
"Little Vinayakrao, Tatya did it"
"Someone Tatyani !!! So what am I going to say now ?? Sit down Baba" Bapu uncle became speechless.
Bapu Kaka is the great uncle of Vinayak Damodar Savarkar. Anna is Damodar Savarkar's elder brother but he did not care much for those two siblings. Either way the age gap between the two was even greater. But Bapu's uncle had a lot of love for all the children of Damodar (Anna), most of all for Vinayak (Tatya).
The Savarkar family was originally from Savarwadi in Guhagar taluka of Ratnagiri district in Konkan. But sometime, their ancestors left the Konkan and settled in the upper part of the country. Similarly, Damodar Savarkar and his wife Mrs. Radhabai were also living in Bhagur village in Nashik. The world was just beginning with happiness, contentment, financial stability. The children had excellent marks and progress in education.
His eldest son Ganesh (Babarao), Vinayak (Tatya), then a daughter and finally Narayan (baby) were the four virtuous children who were making their world flourish.
On 22nd June 1897, Shri Damodar Chapekar, his Shri Balkrishna Chapekar and Shri Mahadev Ranade, tired of the inhuman rand and the harassment of the British government, killed him so that he could be severely punished.
The incident took place in Pune but its repercussions spread far and wide. Chhota Vinayak has been reading a regular newspaper in his house since childhood. I understood the news to him. Within a few months, the Chapekar brothers were arrested (Dravid brothers became insane). The Chapekar brothers were hanged by the British government in 1898 and 1899.
Vinayak became very upset after reading the news of this execution. It was evening ... he was wandering around the house ... his mind was getting very busy .. he was going round the whole castle .. Anna saw him behaving like this. Your son is hugely upset. He realized that something was wrong with Vinayaka's mind. The father recognized his son's mind.
"Tatya ... Oh Tatya ... I don't want to go that way. That way is ... I don't want to go" Anna tried to explain to him. Vinayak did not say anything. He went straight to his temple. His Panjoba (grandmother's father) touched the feet of the idol of the goddess, which he had obtained by might, and took a vow
"Motherland, I will raise the bar of armed revolution to get your freedom, for which I will fight with this tyrannical British government..I will definitely make you independent" Vinayaka, who is only fourteen or fifteen years old, took a vow of lifelong service to the country.
Further education in Nashik ... then education in Pune ... then education in London. While all this was going on, their attention was never distracted from their goal. The armed revolution continued. We have already talked about this. https://muktalikhan2021.blogspot.com/2021/05/100-years-of-freedom.html This is Vinayak Damodar Savarkar.
Today, on the occasion of the birth anniversary of Krantiveer Shri Vinayak Damodar Savarkar, polite greetings to him.
9011096250




वि.दा.सावरकर यांना विनम्र अभिवादन. आपली लेखन शैली ओघवती..आवडली.
ReplyDeleteजयोस्तुते .....
ReplyDeletesundar nehami pramane
ReplyDelete,👌👌👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteस्वार्थासाठी नव्हे तर हिंदराष्ट्रासाठी जीवाची बाजी लाऊन प्राणाच्या समिधा वाहणा-या स्वातंत्र्य वीर सावरकरांचा देशाभिमान आजही देशभुमीसाठी निष्ठावंत असण्याची जाणीव करून देतो.
ReplyDeleteभारत भूमीतील प्रत्येक नागरिकांच्या नसानसात वीर सावरकरांचे जाज्वल्य विचार भिनले पाहिजे.
पुर्वापार चालत आलेल्या भावी पिढीचे प्रेरणास्थान
स्वातंत्र्य वीर सावरकरांना विनम्र अभिवादन.
खुप छान लेख
नलिनी अष्टेकर
🙏🏻धन्यवाद
Deleteखूप छान लेख.
ReplyDeleteउत्तम लिखाण��
ReplyDeleteस्वातंत्र्यवीर सावरकर सर्वांच्या मनात पोहचण्यास अगदी सोप्या भाषेत तुम्ही मांडले आहे.
Nice
ReplyDelete