" सेवा परमो धर्मा: "....आणि मी
" काय रे काय झाले? एकदम कुठे पळतोय."मी एका पळणाऱ्या मित्राला विचारले.
"टीव्ही बघायला....."तो घाई घाईतच उत्तरला.
"अरे निख्या, टीव्ही वर बातमी आली आहे की, गुजरात मधे खूप मोठ्ठा भूकंप झाला, आमच्या लातूर सारखा."
"अरे बापरे, हो का? चल मी येतो सोबत" ही बातमी ऐकून मी पण चकित झालो होतो.
त्या दिवशीची बातमी बघितली आणि एकदम धस्स झालं. ती तारीख होती दिनांक २६ जानेवारी २००१. भूकंप झाला आणि लगेच तिथे मदत कार्याला सुरूवात देखील झाली.
संध्याकाळी नेहमी प्रमाणे शाखेत गेलो, तिथे पण याबाबत माहिती समजली. या घटनेनंतर एक दोन दिवसातच शाखेत निरोप आला की आपल्या पुण्यातून मदतकार्य करण्यासाठी जायचे आहे. जे जाऊ शकतात अश्यांनी आपले नाव कळवावे. मी त्या दिवशी खूप विचार केला, आपण जावे का? घरी कसे कळवावे? वगैरे वगैरे.
आमची पहिली टीम जायची नक्की झाली त्यात मला जाता आले नाही. आपल्या संस्कारात सेवा भाव आहेच पण आज प्रत्यक्ष कृती करण्याची संधी मिळणार होती. ती हुकली असे वाटत असतानाच दुसऱ्या टीम मध्ये माझी पण वर्णी लागली.
पण एक मोठी अडचण होती ती म्हणजे आमच्या पहिल्या वर्षाच्या तोंडी परीक्षा सुरू झाला होत्या आणि माझे अडनाव इंग्रजी अक्षरा प्रमाणे सगळ्यात उशिरा येणार होते. मग काय करावे काही कळत नव्हते, पण नेहमीचे शस्त्र वापरले " जय गुरु बोल बच्चन"! इंग्रजीच्या मॅडमना ही अडचण पटवली आणि माझी दुसऱ्याच दिवशी तोंडी परीक्षा झाली. ती पण फक्त संघ, त्याचे सेवा कार्य या विषयी आणि ती पण मराठीतच.

परीक्षा पार पडली, घरून गुजरातला जाण्याची परवानगी मिळाली आणि आमची टीम गुजरातला आली. निसर्गाने दिलेला तडाखा पाहून हतबद्ध झालो होतो. काम प्रचंड होते, त्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्ही कामाला सुरुवात केली. तेथील अनुभव, लोक, त्यांच्या समस्या, जवळून पाहिल्या !!! काही दूर करता आल्या, काही नाही.
तेथील कार्यात खारीचा वाटा उचलताना खूप जणांशी संवाद होत होता. प्रत्येकाची कहाणी ऐकून मन हेलावून जात होते.
एक मुलगा होता...सुरेश तो नि त्याचा मित्र शाळेतून परत येत होते....तेव्हा त्याच्या मित्रावर पूर्ण भिंत पडली आणि तो मित्र जागीच गेला. सुरेश वाचला तर खरा, पण तो पूर्ण अनाथ झाला होता. कारण त्याच सकाळी त्याच्या आई वडील, तसेच आई कडील आणि वडिलां कडील सर्व जण त्या भूकंपाने हिरावून घेतले होते.
दुसरे एक जण होते, त्यांचे ३ मजली घर जमीनदोस्त झाले होते. ते मला म्हणत " निखिल भैया, आपके पुना मै एैसा कोई हॉटेल हैं क्या? जिसका एक दिनका किराया, एक लाख रुपये लगता हैं." चार लाख खर्च करून बांधलेले आपले घर वास्तूशांती नंतर चौथ्या दिवशीच पडले होते.. त्या घराचा तिसरा मजला जमिनीला टेकला होता. बाकीचे दोन मजले पूर्ण जमिनीने गिळून टाकले होते.

अशा अनेक घटना आम्हाला अस्वस्थ करत होत्या. आम्ही त्याभागात बरेच काम करू शकलो. मुख्य काम म्हणजे लोकांची भीती कमी करणे! नुसता जोरात सामानाचा ट्रक गेला तरी लोक, लहान मुलं भीतीने टेंट मधून बाहेर येत होते.
मी आणि माझा मित्र , आम्हा दोघांवर ३०० मुलांची शाखा घेण्याची जबाबदारी होती. आमचा बोलून, ओरडून शेवटच्या दिवशी आवाज देखील फुटत नव्हता. तरीही काम केल्याचे समाधान सर्वात जास्त होते.
सेवा कार्याचे आठ दिवस कसे आणि कधी संपले काहीच कळले नाही, तिथून निघायचे मन होईना. इतकं प्रेम,आपुलकी जिव्हाळा मिळाला, जाताना त्या लोकांचे आणि आमचे डोळे भरून आले. त्याही अवस्थेत त्या लोकांनी आम्हाला प्रेमाने ताक भरून बाटल्या,विविध खाद्य पदार्थ प्रवासासाठी सोबत शिदोरी दिले. स्वतः घर गमवले,माणसं गमवली तरी देखील प्रवसात आम्हाला काही खाण्याची आबाळ होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली. त्यांच्यात ही मानसिक ताकद आली कुठून हा प्रश्न माझ्या मनात आला. म्हणतात न "देणाऱ्याने देत जावे...देता देता एक दिवस....." हे प्रत्यक्ष त्यावेळी अनुभवातून शिकता आले. किती ही दानत! आपली अवस्था बिकट आहे, तरी देखील आपला हात सढळ असावा!किती मोठी गोष्ट आहे ही!
हे सेवा कार्य आयुष्यात पहिल्यांदाच झाले,पण खूप संस्कार करून गेले. माझा सेवा व्रताचा पाया भक्कम झाला.आज पर्यंत सुरु आहे.मागच्या लॉकडाऊन च्या काळात असेच प्रत्यक्ष काम करता आले.ते याही वेळी करता येत आहे.
"दादा, तुम्ही एक मदत करू शकता का? माझे पती आणि सासूबाई हॉस्पिटल मध्ये आहेत आणि...." त्या ताई रडतच माझ्याशी बोलत होत्या. " माझा चार वर्षाचा मुलगा पण मी शेजारच्या घरात ठेवला आहे आणि मी पण गृहविलगीकरणात आहे हो..." जरा रडू सावरत त्या बोलत होत्या. रात्री जवळ जवळ बारा वाजता त्यांचा मला फोन आला.
"हो का? काय मदत हवी आहे,ताई?" खरंतर मी पण अगदी नुकताच या महामारीतून बाहेर पडलो होतो. पण कदाचित संस्कार परत सोबत आले.'मैं नही हम' मी त्यांना विचारले.
"प्लाझ्मा हवा आहे, काही मदत होईल का दादा?"
"हो, सकाळी कळवतो,चालेल?"
"हो दादा, सकाळी नक्की कळवा" त्या कळकळीने बोलल्या.
त्यारात्री मला काही झोप आली नाही. डोळे मिटले कि त्यांचा तो रडका आवाज...मदतीची हाक. मला काही केल्या चैन पडेना.याच विचारात कधी तरी झोप लागली पण सकाळी बरोबर सात वाजता त्यांचा परत फोन आला. "दादा काही सोय झाली?"
संघ या सेवाकार्यात मागील वर्षा पासून अनेक कामे करत आहे. त्यातच प्लाझ्मादान प्रबोधन, संकलन, मानसिक आधार, विलगीकरण केंद्र, लसीचे प्रबोधन असे अनेक. त्या ताईसाठी काही फोनाफोनी केली. पण संध्याकाळी त्यांना दुसऱ्या कोणाच्या तरी ओळखीने प्लाझा मिळाला.
मधे असेच एक दोन दिवस गेले. परत त्या ताईचा फोन आला.
"दादा हॉस्पिटल मध्ये भरती असलेल्या आमच्या ह्यांना चार दिवस इंजेक्शन नेऊन देऊ शकता का" आर्जवी स्वरात त्या बोलल्या.
"हो देतो कि" मी कोणताच विचार न करता त्यांना कळवले.
चार दिवस त्यांच्या नवऱ्याला जवळच्या हॉस्पिटल मध्ये महत्वाचे इंजेक्शन नेऊन देता आले.
"Thanks" हा शब्द कानावर पडला...
खरं तर या आभाराची काही एक गरज नव्हती. ज्या समाजातून आपण येतो त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो बसsss. आपण निस्वार्थपणे सेवा केली आणि समोरची व्यक्ती त्या संकटातून बाहेर आली हीच खूप आनंद देणारी बाबा असते. मागच्या वर्षीपासून असे अनेक अनुभव खूप समाधान आणि प्रेरणा देऊन जात आहेत. असेच काम करण्याची प्रेरणा अखंड मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अनेकजण अनेक सेवा कार्य करत आहेत. मी देखील फक्त हे लिखाण करून फक्त हेच सांगू इच्छित आहे कि "सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले, ध्येय महासागर में सरितरुप हम मिले..."
©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Seva Paramo Dharma: .... and I"
"What happened? Where are you running to?" I asked a guardian friend.
"To watch TV ....." he replied hurriedly.
"Oh Nikhya, there is news on TV that there was a big earthquake in Gujarat, like our Latur."
I was shocked to hear the news, "Oh my God, why? Come with me."
The exam was passed, permission was given to go to Gujarat from home and our team came to Gujarat. I was shocked to see the blow given by nature. The work was huge, so we started work from day one. Look closely at the experiences, the people, their problems !!! Some were removed, some not.
There was a lot of interaction with Khari while taking part in the work. Everyone's story was moving.
There was a boy ... Suresh, he and his friend were coming back from school .... Then the whole wall fell on his friend and he went to the place. True if Suresh survived, but he was a complete orphan. Because that morning his mother and father, as well as his mother and father, were all taken away by the earthquake.
There was another man, whose 3-storey house had been demolished. Te Mala used to say, "Nikhil Bhaiya, is there any such hotel in your Pune? The one day rent is one lakh rupees." Our house, built at a cost of Rs 4 lakh, had collapsed on the fourth day after Vastu Shanti. The third floor of the house was on the ground. The remaining two floors were completely swallowed up by the ground.
Many such incidents were making us uneasy. We were able to do a lot of work in that area. The main task is to reduce people's fears! People, children were coming out of the tent in fear even though the luggage truck went by loudly.
My friend and I both had the responsibility of taking care of 300 children. On the last day of our talking and shouting, there was no sound. Yet the satisfaction of working was the highest.
I don't know how and when the eight days of service ended, I didn't want to leave. We got so much love and affection, our eyes filled with tears as we left. At the same time, they lovingly gave us bottles of buttermilk and various food items for our journey. He took care that we would not be bothered to eat anything during the journey even if we lost our house and people. Where did this mental strength come from? This question came to my mind. It is said that one should not give, one day one should give ... What a gift! Even though your condition is critical, your hand should be strong! What a great thing!
This service work was done for the first time in my life, but went through a lot of rites. The foundation of my service vrata has been strengthened. It has continued till today. I was able to do the same thing during the previous lockdown.
"Dada, can you help me? My husband and mother-in-law are in the hospital and ..." She was crying and talking to me. "My four year old son but I have kept him in the house next door and I am also in house separation yes ..." she was saying with a little tears. I got a call from them at about twelve o'clock at night.
"Yeah why? What help do you need, Tai?" In fact, I had just recovered from the epidemic. But maybe the rites came back together. 'Main nahi hum' I asked them.
"Plasma is needed, will it help, Dada?"
"Yeah, let me know in the morning, okay?"
"Yes Dada, let me know in the morning," she said earnestly.
I didn't get any sleep that night. His eyes met the sound of crying ... a call for help. I didn't feel comfortable doing anything. I fell asleep at the same thought but at 7 o'clock in the morning he got a call back. "Did grandpa make any arrangements?"
The team has been doing a lot of work in this service since last year. Among them are Plasma Donation Awareness, Collection, Mental Support, Isolation Center, Vaccine Awareness. Made some phone calls for that Tai. But in the evening they found the plaza with someone else's acquaintance.
A couple of days passed like this. Tai's phone rang again.
"Can you give us four days of injections for Dada Hospital," she said in a pleading tone.
"Yes, I do," I told them without thinking.
For four days her husband was able to take her to a nearby hospital for a critical injection.
The word "Thanks" is heard ...
In fact, there was no need for this gratitude. We have to give something to the society from which we come. It is a very happy father that you served selflessly and the person in front came out of that crisis. Many such experiences over the past year have been very satisfying and inspiring. Pray at the feet of God to get the motivation to do the same.
Many are working multiple services. I also just want to say this by writing that "Seva hai yagnakund samidha sam hum jale, dhyay mahasagar mein saritarup hum mile ..."
© Nikhil Devidas Vaze
9011096250
Great content.. 💯🙌
ReplyDeleteसुंदर अनुभव कथन...
ReplyDeleteछान अनुभव आहे.
ReplyDelete