Thursday, May 06, 2021

"इनामदार वाडा"/"Inamdar Wada"


     "इनामदार वाडा"

    काल रात्री पासूनची सुरू झालेली वाड्यातील गडबड आज सकाळपर्यंत सुरूच होती. पूर्ण रात्र गेली तरी वाडा काही शांत नव्हता...सर्वांची चलबिचल सुरु होती, काळजीचे वातावरण होते.


       गावातील सगळ्यात मानाचा, आधाराचा, अधिकाराचा वाडा म्हणजे गावचा ' इनामदार वाडा' !! अहो, वाडा कसला!!! गढीच ती!!! ह्या अशाss .....चांगल्या गुडघाभर उंचीच्या दगडी दहा पंधरा पायऱ्या चढून वर गेल्यावर शेणानं सरावलेले अंगण, झक्कास रेखाटलेली शुभचिन्ह आणि रांगोळी, लाकडी भक्कम मुख्य दरवाजा,लाकडी खांब व उंबरा ओलांडून आत गेलो की, भला मोठा चौक, त्यात मधोमध कारंज्यासाठी बांधलेला दगडी हौद, डाव्या हाताला पाच सहा आणि उजव्या हाताला पाच सहा मोठ्या खोल्या. मुख्य दरवाजा ओलांडून आत येताना उजव्या हाताला बैठक, तिथे एकदम खानदानी आसन व्यवस्था (गादया, लोड, इ.)  तिथल्या भिंतीवर इनामदार साहेबांच्या कुलदेवीचा व गावातील शिवमंदिरचा फोटो होता; त्याचसोबत पूर्वजांचेही फोटो लावलेले होते.


    या वाड्याचे सध्याचे मालक म्हणजे 'इनामदार नाना'!..... हो....! यांची गावात अशीच ओळख.  आपल्या नावापेक्षा 'इनामदार' या पदवी लाच  महत्व जास्त होते. नाना हे असे उंच उभेsss आडवेsss, गावच्याच तालमीत कमवलेले बलदंड शरीर, वय आता साठीकडे झुकलेलं, पण अजूनही लाल मातीच्या आखाड्यात पाच दहा मल्लांना आरामात चितपट करतील असं शरीर ते हातचं राखून होते.

    अंगात पांढरा सदरा, पांढरा पायजमा, हातात भारदस्त एकदम जाडजूड सोन्याचं कडं, एकदम तूप लावून पिळ दिलेल्या मिश्या, त्यातील काही केस वयाप्रमाणे रंग बदलायला लागलेले, म्हणजे जरी शरीर अजून मजबूत असलं तरी केसांचा रंग आता काळ्याकडून पांढरा दिसायला लागला होता.... अन् डोक्यावरच्या केसांची पण तीच गत व्हायला लागली होती.

    काल संध्याकाळ पासून इनामदार नाना वाड्याच्या चौकातून.... ओसरी वरून ते देवघरा पर्यंत नुसत्या एकसारख्या येरझाऱ्या घालत होते. दुपारी चार नंतर गावातील काही मंडळी ओसरीवर आले होते, त्यांच्या सोबत  बैठकीत बसले तरी पण मनाला काही केल्या चैन पडत नव्हते. गावकरी आगामी महाशिवरात्रीच्या उत्सवाची बोलणी करत होते, पण इनामदार साहेब फक्त शरीराने त्या गावकऱ्यांना सोबत करत होते. त्यांचं मन काही जागेवर नव्हतं ...ते सारखा विचार करून  आणि काळजीने काळवंडले होते.

                    

    बैठक संपली तसे ते बैठकीतून उठले आणि सरळ वाड्याच्या मधोमध असलेल्या चौकात आले, गावकऱ्यांना  रामराम केला आणि परत येरझाऱ्या सुरू केल्या...
"मालकsss मालकss..." दबक्या आवाजात रघु आवाज देत होता.
"मालकsss", त्याच्या बोलवण्याकडे त्यांचे लक्षच नव्हते...."मालकsss"
"काय रे रघ्याss?" रागातच त्यांनी डोळे मोठे करून रघु कडे पाहिले.
"घरात बोलवत्यात? म्हण जीsss!!!" घाबररेल्या रघुचा आवाज फुटेना.... "अरे बोल कीss, आता!!!, का दातखिळी बसली?"
एक जोरात आवंढा गिळून एका दमात त्याने सांगितले
"मालक, बाई आत जेवायला बोलवत्यात जी" रघु हात जोडून आर्जवी सुरात सांगत  होता.
"हं.....आलो म्हणून सांग..."

    नानांची विचाराची तंद्री मध्येच मोडल्यामुळे ते जरा चिडूनचं आवरायला गेले. मागच्या आडातील पाणी शेंदून हात पाय धुतले, देवघरच्या खोलीत जाऊन देवाला, दिव्याला नमस्कार केला, तेथील रक्षा लावली आणि जेवायला पाटावर बसले खरे पण त्यांचे मन कसल्यातरी चिंतेत होते.  ती चिंता, काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कसे बसे जेवले, शेवटचा ताक भात खाल्ला आणि आचमन घेऊन पानावरून उठले.

करss करss, करss करsss, खटss करss, असा आवाज करणाऱ्या बंगईत बसून एका हातात अडकित्ता, दुसऱ्या हातात सुपारीचे खांडे घेऊन ते कातरत बसले. मध्येच लहान नात येऊन त्यांच्या खाली लटकणाऱ्या पायांशी खेळून गेली, घरातील मांजर त्याच पायांवरून जात येत होते, पण रोज त्या दोघांशी खेळणारे ते आज शांत होते, त्यांचं कशातच लक्ष लागत नव्हतं. आपल्याला हे नेमकं काय होत आहे? हेच त्यांच्या समजण्याच्या पलीकडे होते. पोरीचे लग्न झाले, मुलाचे लग्न झाले.... नातू, नाती असे सगळे आहेत. आयुष्यात आधीही काही पेचाचे प्रसंग आले होते....पण तेव्हा अशी काळजी नव्हती मग आताच हे असे काय झाले? या विचाराने ते अस्वस्थ होत होते.

" रघु ....ए रघु"
"आलो जी"
"माझी काठी आणि बॅटरी घे बरं आणि शाल पण आण रे"
"होय जी, आणतू." रघुने आतून आवाज दिला
माजघरातून काळजीचा आवाज आला "आता कुठे?... जरा जपून "
" जरा बाहेर फिरून येतो",
"रघुला सोबत नेता का?"
"नको, जाऊन येतो मी एकटाच, जरा वेळाने येईन. तुम्ही निजानीज करा हवं तर. रघु......आण लवकर, मला यायला उशीर झालाच तर दरवाजा लावून घे आणि ओसरीत झोप म्हणजे मी परत आलो की तुला दरवाजा उघडता येईल."

    रघु ने सर्व सामान मालकांना दिले, नाना पायऱ्या उतरून खाली जाताना  त्याने पाहिले आणि तो परत वाड्यात शिरला. नाना एका हातात पितळी पत्रा असलेली मुठीची काठी रस्तावर टेकवत टेकवत पुढे निघाले. खरं तर त्यांना काठीचा आधार कधीच लागला नाही पण एक जरब, शान म्हणून ते नेहमी तिचा वापर करत असत. घराघरातील लाईटचा प्रकाश येत होता, रस्त्यावरील लाईट पण सोबतीला होते.  विचाराच्या नादातच शिवमंदिरा जवळ आले, बाहेरून त्यांनी नमस्कार केला. गावात या वेळी जो कोणी माणूस घरा बाहेर होता, त्याचा रामराम स्वीकारत पुढे पुढे जायला लागले. आपण बाहेर तर पडलो पण कुठे जावे? असा विचार करत, त्यांनी सरळ  मळ्याचीच वाट धरली.

    अंधाऱ्या रात्री आपल्या मळ्याच्या दिशेने पायी निघाले, वाड्यापासून तसे अंतर बरेच होते, चालत जायला बराच वेळ लागला.

    मळ्यात गडी, राखणदार, वस्तीला होतेच.

" अरे, पांडू, ये पांड्या"
"काय ? काय रं, किसन?"
"अरे कोण तरी येताना दिसतंय का रे, त्योक लाईट दिसतयं का?"
"हो रे,पण आता कोण?"
"काठी घे हातात, माहीत नाही कोण असलं ते, अपून बाबा तयार राहू."
"होय होय" 

    असं म्हणून पांडू आणि किसन अंधाऱ्या रस्त्यातून येणाऱ्या त्या बॅटरीच्या लाईटकडे पाहायला लागले...

"मालकsss, तुम्ही? या वक्ताला? अन् कसं काय येणे केलं? काही कसूर झाला का जीss आमच्या हातनं?"
"अरे नाही, मीच पाय मोकळे करायला मळ्यात आलो. ही पीकं, ही जनावरं पाहिली की बरं वाटतं".
"हो, पर मग दिवसा आलं पाहिजे होतं जी"
"खाट आण बरं बाहेर.... दमलो, बसतो जरा."
पांड्याने खाट तर खोलीतून बाहेर आणली, सोबत लोटी भर पाणी पण आणले.

    नाना खरंच चालून दमले होते. त्या गारव्यात देखील चालून त्यांना घाम आला होता. गड्यानी लोटी समोर केली की लगेच तिला तोंड लावून पूर्ण लोटी पाणी पिऊन  रिकामी केली.

"किसन आणि पांडू, असेल तर एक उशी नाहीतर डोक्याखाली घेता येईल असे काही आहे का? मी आज झोपतो इथेच!!!"
"मालक असं उघड्यात, सकाळी सकाळी लय थंड लागतयं मालक! त्रास होईल जी." पांडू ने काळजी करत सांगितले.
"राहू देत, काही होत नाही...जा मी पडतो, तुम्ही पण झोपाss"

    तितक्यात किसनने एक जेमतेम उशी आणून दाखवली, 

" मालक ही चालल का? पहाss"
"हो दे"

    नानांना उशी देऊन दोघे गडी झोपायला गेले. 

    

        नाना मुक्त आकाशाखाली, चांदण्या पाहत, खाटेवर आडवे झाले. काळ्याभोर आकाशात चंद्र शीतल प्रकाश देत होता, ध्रुवतारा, सप्तऋषी , अनेक तारा मंडल आकाशात स्वच्छ दिसतं होते...शीतल वारा वाहत होता, मधेच एखादे वटवाघूळ उडताना दिसत होते, अंधारात काही पिकं अस्पष्ट दिसतं होती. जनावरं गोठ्यात निजली होती, त्यातील कोणी आपली मान हलवली तर त्यांच्या गळ्यातील मोठे पितळी घुंगरू वाजत होते, या सगळ्या वातावरणात नाना जरा वेळ डोळे उघडे ठेऊन आकाशाकडे पाहत पडले, आता त्यांच्या मनाला आणि शरीराला शांतता मिळायला लागली होती. तसेच काही वेळ सताड डोळे उघडे ठेऊन ते पडून राहिले, काही वेळानं आपोआप त्यांचे डोळे लागले. आपला मालक झोपला आहे म्हणून राखणीला असलेले मोत्या, टीप्या आणि राणी हे कुत्रे देखील आवाज करत नव्हते .

" रघु.... ए रघु"
"हा बाई"
"अरे ....हा बाई काय? किती वाजले पाहिलेस का? हे अजून कसे नाही आले? यांना जाऊन किती वेळ झाला आहे." 
रघु नुकताच घरातील बाकी कामं उरकून आडवा पडला होता.
"हो जी, लय टाईम झाला की" 
"कुठे गेले असतील हे? पहा बरं" बाईंनी वाड्यातील सगळ्यांना कामाला लावले. कोणी म्हटलं महादेव मंदिरात असतील, नाही कदम अण्णाच्याकडे असतील.....!
"अरे या वेळी कसे जातील तिथे , आज त्यांचा बसायचा वार!! आज नाही जाणार नाना तिथं"
" रघु सायकल घे आणि खाली गावात पाहून ये बरं."
"हो , लागलीच जातो जी."

    रघु सायकलवर जाऊन पूर्ण गाव हिंडून आला, पण मालकांचा काही पत्ता नाही. गावात आता बऱ्यापैकी निजानीज झाली होती, त्यामुळे कोणाला विचारावे असा प्रश्न रघुला पडला? का कोणास ठाऊक पण एकदा मळ्याच्याकडं जाऊन पाहू म्हणून त्याने जोरात सायकल मळ्याच्या दिशेने हाणायला सुरुवात केली.

    मळ्यात मात्र नाना शांत झोपलेले होते, त्यांच्या हे लक्षात पण नव्हते की आपण घरी न सांगता आलो आहोत, आपली घरी कोणी काळजी करेल? हा विचार देखील त्याच्या मनाला शिवला नाही. ते निवांत घोरत झोपले होते.

 "मालक? आणि इथं झोपलेत? अन् आपुन सगळे बेजार..... झोपल्यात शांत जणू, उठवलं तर बडवत्याल मला, जाऊ आपून परत वाड्यावर अन् बाईसाहेबांना वर्दी देऊ." रघु स्वतःशी पुटपुटत परत निघाला.

     इकडं वाड्यात सगळे काळजीत होते, तितक्यात रघु ज्या वेगाने मळ्यात गेला होता त्याच वेगाने घरी परत आलां आणि मालक मळ्यात आहेत आणि त्यांना तिथेच झोप लागली हे सांगितले.

" मालक शांत झोपल्यात, दोन दिस झाले त्यांना काय तर झालं आहे, म्हणून मी बी त्यांना उठवलं नाही, जातो सकाळी लवकर परत "

    खरं तर रघु  नानांचा नोकर, घरगडी, हरकाम्या होता .....पण त्याचा नानांवर आणि नानांचा पण त्याच्यावर खूप जीव होता. कधी कधी ते त्याला रागवत, त्याच्यावर ओरडतं ,.....कधी कधी तर हात उगारत, पण तोच हात कधी कधी मायेने त्याच्या पाठीवरून पण फिरवत. रघु लहान असल्यापासून वाड्यातच राहत आला, त्याचे लग्न पण नानांनी लावून दिले. आई बाप नसलेल्या या पोराला नानांनी सांभाळून मोठे केले...म्हणून त्याची रघु ला कायम जाणं होती.

     वाड्यात अजून सगळे झोपलेले होते. 

"शांता दरवाजा लावून घे. मी जातो मळ्यात" तांबडं फुटायच्या आत रघु मळ्याकडे निघाला.

    मळ्यात नाना अजून झोपलेले होते. पांडू, किसन मात्र उठून खोली बाहेर आले, रात्रीच्या झोपेतून जनावरं पण एकदम ताजेतवाने होऊन रात्रीचा राहिलेला चारा खात उभे होते, त्यांच्या गळ्यातील घुंगर माळा आवाज करत होत्या. पाखरांचामुक्त विहार नुकताच सुरु झाला होता, कुठं कोंबडा दिस उगवला हे सगळ्यांना कळवत होता, हवेत सकाळचा गारवा होता आणि आता जरा जरा तांबडं फुटू लागल होतं. नाना शांतपणे डोळे उघडून खाटेवर बसले होते......  तितक्यात रघु पोहचलाच! 

"रघुss ए  रघु" नेहमीच्या सवयीनुसार नानांनी आवाज दिला, 

लगेच रघु समोर हजर झाला, 

"अरे तू कसा आला इथे?"

"मला माहित आहे मालक उठले की मलाच बोलवत्यात, म्हणून सकाळीच आलो मळ्यात. तसा काल रात्री आल्तो मी .....पण तुम्हाला लय शांत झोप लागली  व्हती..... म्हणून माघारी गेलो."

    धारोष्ण दूध पीत नाना भरलेल्या मळ्याकडे पाहत होते...... ज्वारी, मका, कपाशीच्या पिकामुळे  शेतामध्ये  काळा, हिरवा, पांढरा रंग सगळीकडे पसरला होता.  हे सगळे पाहून त्यांना आता खूप प्रसन्न वाटत होते. मनात एक उत्साह भरला होता, त्या सकाळच्या शुद्ध, प्रसन्न वातावरणामुळे ताजेपणा वाटत होता. दोन दिवसापासून पडलेली काळजी मिटल्या सारखे वाटत होते. 

    



    गाडीतून नाना आणि रघु प्रसन्न मनाने वाड्यात आले. 

" रघु, वकील साहेबांना घेऊन ये!!!" असे म्हणून नानांनी रघुला वकिलांकडे धाडले.
" मी गेली कित्येक दिवस वाड्यात आजारपणामुळे अडकून पडलो, घरातील माणसं मला काळजीने बाहेर जाऊ देत नव्हते. त्यामुळे मन बैचेन होत होते, जंगलातील वाघ पिंजऱ्यात कसा राहील, कायम समाजात वावणारा, आपल्या घामाने, मायेनं सांभाळ केलेला मळा कित्येत दिवस पाहता येत नव्हता. दोन दिवस कशातच मन रमेना, विचार करून दमलो आणि सरळ रात्रभर निसर्गाच्या सान्निध्यात शांत झोपलो, मन शांत झाले, मुक्त विहार, मुक्त आकाश आणि मी पण मुक्त, घराच्या चौकटीतून बाहेर पडून आलो. आता मन शांत झाले." नाना मनमोकळे पणे वकील साहेबांना बोलत होते.
".....तर वकीलसाहेब, तुम्हाला बोलावयाचे कारण म्हणजे आमचे मृत्यू पत्र करून टाका."
"का हो नाना साहेब?"
"माहीत नाही पुढे काय होईल ते?"
"बरं.....तुम्ही म्हणाल तसं", पेन घेऊन वकीलसाहेब  नाना सांगतील ते लिहत होते. नाना कोणाकोणाला काय द्यायचे ते सांगत होते.
"आमच्या रघुला मोठ्या विहरी कडच्या डाव्याबाजूला असलेले पाच एकर जमीन लिहून ठेवा."
"नाना........? रघु.........?"
"हो, त्याला पण द्यायचं आहे!!!"
"का? तो काही तुमचा खरा वारस नाही?"
"हो, पण काल परिक्षेत ते पोरं पास झालं." 
"कोणती परीक्षा?"
"आपला बाप रात्री गायब झाला हे कळताच........ मुलगा नाही तर रघु मला शोधत आला आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर तुम्ही मला आवाज द्याल म्हणून हजर झालो म्हणणाराही रघूच होता. आपल्या बापाची इतकी काळजी घेणारा हा माझा  मुलगाच की......!!!"

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- आपल्या (comment) प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या, सोबत आपले नावंं देखील लिहावेे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Inamdar Wada"

    The commotion in the castle that started last night continued till this morning. The whole night was gone but the castle was not quiet at all ... Everyone was moving, there was an atmosphere of worry.

        The most prestigious, supportive and authoritative mansion in the village is the 'rewarding mansion' of the village !! Hey, what a castle !!! It's a fortress !!! This is a good knee-high stone. After climbing ten or fifteen steps, the courtyard covered with dung, the auspicious sign lined with zakkas and rangoli, the wooden strong main door, the wooden pillars and the threshold, the big square, the stone built for the middle fountain. Houd, five or six large rooms on the left and five or six on the right. Entering through the main door, sitting on the right hand side, there was a very noble seating arrangement (mattress, load, etc.). On the wall there was a photo of Inamdar Saheb's family goddess and the Shiva temple in the village; There were also photos of ancestors.

    The current owner of this castle is 'Inamdar Nana'! ..... Yes ....! Such is his identity in the village. The title 'reward' is more important than your name. Nana is such a tall, horizontal body, strong body earned in the training of the village, age is leaning towards now, but still in the red clay arena, he was holding a body that would comfortably seat five to ten wrestlers.

    White shirt, white pajamas, thick gold bracelets in hand, mustache twisted with ghee, some of the hair began to change color with age, meaning that even though the body was still strong, the hair color was now starting from black to white .... The same thing was happening with her hair.

    From yesterday evening, from the square of Inamdar Nana Wada ... from Osari to Devghara, they were wearing the same Yerzhara. After four in the afternoon, some congregations from the village came to the aisle, sitting in a meeting with them, but they were not relieved. The villagers were talking about the upcoming Mahashivaratri celebrations, but Inamdar Saheb was only accompanying the villagers with his body. His mind was nowhere ... he was blackened by the same thoughts and worries.
As soon as the meeting was over, he got up from the meeting and came straight to the square in the middle of the castle, greeted the villagers and started Yerzhara again ...

"Owner, owner ..." Raghu was shouting in a hushed voice.
"Owner sss", they didn't pay attention to his call .... "owner sss"
"What the heck?" In anger, he widened his eyes and looked at Raghu.
"Calling home? Say gss !!!" The frightened Raghu's voice did not break .... "Oh, tell me, now !!!, why are you gnashing your teeth?"
He swallowed hard
Raghu was clapping his hands and saying in a pleading tone.
"Hmm ..... tell me as you come ..."
    
Nana's sleep was disturbed and he went to cover himself a little irritated. They washed their hands and feet with water from the backyard, went to the room of the temple, greeted God, the lamp, guarded it and sat down to eat, but their minds were worried. That worry, worry didn't let them sit still. How the buses ate, ate the last buttermilk rice and got up from the leaves with achaman.

He sat in a bungee that made a noise like a kar, a kar, a kar, a khat, a khat, a kar,  In between the little granddaughter came and played with the legs hanging under them, the cat in the house was walking on the same legs, but those who were playing with the two of them every day were quiet today, they were not paying attention to anything. What exactly is happening to you? This was beyond their comprehension. The girl got married, the boy got married .... grandchildren, grandchildren are all like that. There had been some troubles in my life before .... but I didn't care then, so what happened now? He was getting upset at the thought.

"Raghu .... A Raghu"
"Ha Bai"
"Hey .... what is this lady? What time did you see it? How come it hasn't come yet?
Raghu had just finished the rest of the housework.
"Ho ji, it's time for rhythm"
"Where did they go? Look," said Baini, putting everyone in the castle to work. Someone said Mahadev will be in the temple, no steps will be with Anna .....!
"Oh, how will they go there this time, today is the time for them to sit !! Nana will not go there today"
"Raghu, take a bicycle and come down to the village."
"Yeah, that's right."

    Raghu cycled around the village, but the owner had no address. The village was very sleepy now, so who should Raghu ask? For some reason, he started riding his bicycle towards the garden so that he could go and see it once.

    However, Nana was sleeping peacefully in the garden, but he did not realize that we had come home without telling him, who would take care of his house? This thought did not even cross his mind. He was fast asleep.
 "Owner? And you slept here? And you are all bored ..... As if you are calm in your sleep, if you wake up, you will wake me up. Raghu muttered to himself.

     Everyone in the castle was worried, so Raghu came back home at the same speed as he had gone to the garden and told the owners that they were in the garden and they slept there.

"The owner is sleeping soundly, the two have seen what happened to them, so I didn't wake them up, go back early in the morning."

    In fact, Raghu was Nana's servant, housekeeper, harakamya ..... but he had a lot of life on Nana and Nana's on him. Sometimes he would get angry with her, yell at her, ..... sometimes he would raise his hand, but sometimes the same hand would move on his back with love. Raghu has been living in the palace since he was young, but his marriage was arranged by Nana. Nana took care of this child without parents and raised him ... so he had to go to Raghu forever.

     Everyone was still asleep in the castle.

"Shut the door, Shanta. I'm going to the garden."

    Nana was still sleeping in the garden. Pandu, Kisan, however, got up and came out of the room. The animals from the night's sleep, but very fresh, were eating the leftover fodder of the night. The bird-free vihar had just started, he was telling everyone where the rooster had appeared, the morning mist was in the air and now it was starting to burst a little red. Nana was quietly sitting on the bed with her eyes open ...... just then Raghu arrived!

"Raghuss Raghu" Nana sang as usual,

Immediately Raghu appeared in front,

"Hey how did you get here?"

"I know the owner woke up and called me, so I came to the garden in the morning. I came last night ..... but you had a good night's sleep ..... so I went back."
    Nana was looking at the orchard full of hot milk ...... Due to sorghum, maize, cotton crop, black, green, white color was spread everywhere in the field. He was very happy to see all this. The mind was full of excitement, feeling refreshed by the pure, serene atmosphere of that morning. The worries I had felt for two days seemed to subside.
Nana and Raghu came to the palace with a happy mind.

"Raghu, bring the lawyer !!!" So Nana rushed Raghu to the lawyers.
"I have been stuck in the castle for the last few days due to illness. The people in the house were not letting me out. I was worried about how the tiger in the forest would stay in the cage. The mind rejoiced, exhausted by the thought, and slept peacefully in the midst of nature all night long, the mind became calm, the free vihar, the free sky, and I, too, came out of the frame of the free, home. Now the mind became calm. " Nana was talking openly to the lawyer.
"..... So, lawyer, the reason I want to call you is to make our death certificate."
"Why Nana Saheb?"
"Don't know what will happen next?"
"Well ..... as you say", Vakilsaheb Nana would write with a pen. Nana was telling someone what to give.
"Write down to our Raghu five acres of land to the left of the big well."
"Nana ........? Raghu .........?"
"Yeah, he wants to give too !!!"
"Why? He's not your true heir?"
"Yes, but he passed the exam yesterday."
"Which exam?"
"As soon as I found out that my father had disappeared at night ........ Raghu came looking for me, not my son. ... !!! "

© Nikhil Devidas Vaze
9011096250

4 comments:

  1. गावाचे वर्णन वाड्याचे वर्णन खूप छान केले आहे अगदी डोळ्यासमोर उभे राहिले सगळे चित्र, खुप छान.

    ReplyDelete

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले