"पांडोबा"
"भामा अगं ए भामा" पांडोबा घाई घाई ने आवाज देतच घराच्या दारापर्यंत आला. घर दिसायला जरी झोपडी सारखे असेल तरी त्या दोघांनी आपल्या हातांनी ते नेटाने उभं केलं होतं.

भामा आणि पांडोबा यांनी चार भांडी घेऊन आपला संसार सुरू केला आणि याच जागी दोघांनी आपला घाम गाळून हे घर उभं केले. पांडोबाने रानावनात हिंडून आपल्या डोक्यावरून वाळक्या कारवीच्या मोठंमोठाल्या मोळ्या बांधून आणल्या. एक एक कारवीची काठी उभं करत चार भिंती उभ्या केल्या... दोघांनी पण रात्रंदिवस मेहनत करून ते घर उभं केलं. हातावर दोरी वळून वळून त्या सगळ्या उभ्या काठ्या बांधल्या आणि त्यावर काळ्या मातीचा चिखल करून करून थापला. चार भिंती तर उभ्या राहिल्या पण छतासाठी परत रानावनात हिंडून गवत, सागाची वाळलेली पानं गोळा करून त्यापासून भामान छप्पर विणले.
"आता हे छप्परss टाकलं की आपलं घरं तयार होतंय!!!.."असे म्हणतं दोघांनी पण अजून मेहनत केली आणि त्याच जिझ झालं. त्यांच हक्काचं घर उभं राहिले.
तसा हा आता इतिहास झाला. बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी हे घर उभे केलेलं होतं. वारंवार त्याला वाऱ्या, पावसात नुकसान होत होतं आणि ते त्याला अशीच मेहनत करून परत उभं करत होते.
आज असाच तो घराच्या जवळ येतच भामाला हळी घालत होता.
"का ओss काम्हून बोलवता?" भामाने घरा बाहेर येत विचारले.
" अगं म्या इनामदारच्या वाड्यावर(https://muktalikhan2021.blogspot.com/2021/05/Inamdarwada.html) जाऊन येतो आणि वाईज पानी दे प्यायला"
" हा अंती" भामा घरातून मातीच्या मडक्यात पाणी घेऊन आली.
पांडोबा उघड्या अंगावरचा घाम पुशित बसला होता. कंबरेवर गुडघ्यापर्यंत येईल असा पंचा बांधला होता. खांद्यावर फक्त एक तसाच पंचा. बाकी वरच शरीर उघडं, रंगाने एकदम राकट तांबुस, उघड्यावर त्याचे पूर्ण शरीर तापून निघालेले दिसतं होते. भामाने पण आपल्या अंगावर दहा ठिकाणी ठिगळं असलेलं लुगडं नेसलेले होते. तिचे ते लुगडं पण फक्त जेमतेम तिच्या घुडघ्यापर्यंत येत होते. असा त्यांचा फाटका संसार सुरू होता. भामाने आणलेलं पाणी तो तोंड लावून गटागटा प्यायला आणि पाणी पिवून तो टाकोटाक वाड्याच्या दिशेला निघाला.

"रामss रामss मालक" वाड्याचा लाकडी उंबरठा ओलांडतच त्यानं साद घातला.
"अरे, आला का पांडोबा!!! ये बसं बस असा.." इनामदार नानांनी त्याला बसायला सांगितले.
पण आपण हरकाम्या, या भावनेने तो त्यांनी दिलेल्या जागेवर न बसता, आहे त्याच जागी गुडघ्यात वाकून ( शौचाला बसतो तसे ) बसला.
" मालक कहाला बोलविलत जीss?"
" अरे जरा आमच्या हिच्या सोबत जिल्ह्याला जातोस का उद्या सकाळी? मला जायला जमणार नाही, सोबत म्हणून जा आणि काय सामान असेल ते ओझ घेऊन ये, काही खरेदी करायचे आहे तीस" नाना सुपारी अडकित्त्यात फोडत पांडोबाला बोलत होते.
" जातो की, बाईंना सांगा मी हाय त्यांच्या संग. बरं अजून काय हुकुम"
"नाही, मग ये उद्या सकाळी"
"होय जी"
पांडोबा मेहनती, प्रामाणिक होताच आणि त्यावर विश्वास देखील ठेवण्यासारखा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी इनामदार बाई तयार झाल्या, त्याच आधी पांडोबा वाड्यावर दाखल झाला होता. बाईसाहेब दारा बाहेरच्या बैल गाडीत बसल्या, पांडोबाने त्या आधीच बैलगाडीत खाली गवताच्या गंजी,( बैलांना चारा आणि बसायला माऊ लागावे यासाठी ) त्यावर सतरंजी, मग त्यावर गादी घातली होती. त्यावर बाई साहेब बसल्या आणि गाडी निघाली.
गावापासून जिल्ह्याचे गाव साधारण असेल २५ ते ३० किलोमीटर , तसा प्रवास लहान पण रस्ता अगदीच खाचखळंग्याचा होता, त्यामुळे गाडी बेताबेतान पुढे जात होती. बाई बैलगाडीत बाजूच्या पट्ट्या धरून बसल्या होत्या. बैलाच्या गळ्यातील घुंगर माळा वाजत होत्या. पांडोबा बैलगाडीच्या सोबत चालत...मधेच बैलांच्या गतीन बरोबर पळत होता.
गाडी प्रवास करून जिल्ह्यातील बाजारपेठेत आली. तशा बाईंनी गाडी थांबवायला सांगितली. बाई टुणकन उडी मारत गाडी खाली उतरल्या.
" किसन, तू गाडी त्या तिथल्या लिंबाच्या सावलीत लाव, बैल सोड आणि थांब, मी पांडोबाला सोबत घेऊन पायीच जाते बाजारपेठेत. चल रे पांडोबा" बाईंनी दोघांना आज्ञा दिल्या आणि त्या बाजारात निघाल्या.
किसनने गाडी झाडाखाली नेली, बैलं मोकळे सोडले. गादी खालचे गवत वर केले त्यातील काही गवत बैलांना चारा म्हणून टाकले. बैलांच्या दोऱ्यांची टोकं जु ला बांधल्या आणि तो पण सावलीत निवांत बिडी ओढीत बसला. पांढरे शुभ्र बैलं देखील जरा आरामात गाडीपासून दूर जाऊन बसले. तरी किसान त्यांच्या कडे नजर ठेऊन होता.

बाई बाजारात काहीबाई सामान घेत घेत एका कापडं दुकानाच्या जवळ आल्या. त्यांना दुकानाच्या बाहेर पाहून आतून मालक पटकन बाहेर येत म्हणाला " या बाईसाहेब याss, नानासाहेब कसे आहेत?" दुकानदार आदराने त्यांना विचारत होता.
" ठीक आहेत, पांडोबा तू थांब इथं" बाईंनी त्याला पायरीवर बसायला सांगितले.
पांडोबा एखाद्या लहान मुलाप्रमाणे पायरीवर बसून त्या दुकानाकडे पाहत होता. दुकानात लाकडी कपाटात विविध रंगांच्या साड्या ठेवलेल्या होत्या, त्यात काही नऊवार लुगडे, काही पाचवार साड्या , खणं, माणसांच्या साठीचे काही कापड देखील दुसऱ्या लाकडी खणात दिसतं होते. कापडाचे लाकडी दांडीला गुंडाळून त्याचे खांब विवध रंगाप्रमाणे उभे करून ठेवलेले होते. त्याच्या वर पांढऱ्या शुभ्र धोतरांच्या एकावर एक अश्या अनेक खड्यांचा ठीग होता. त्यात काही जाड काठाचे, काही नक्षीचे असे धोतरं ठेवलेले होते.
दुकानात बसायला गादया त्यावर पांढऱ्या चादरी घातलेल्या होत्या. पांडोबा साठी हे सगळेच नवीन होते, त्याने याआधी हे कधीच पाहिले नव्हते. तो दुकानातील हे सगळे पाहून अत्यंत कष्टी होत स्वतःकडे पाहत होता. आपल्या कंबरेखाली जेमतेम मळकट मंचा, वरचे अंग उघडे, तीच गत आपल्या भामाची तिच्या अंगावर पण धड काही नाही जे आहे ते अनेक ठिगळ लावलेलं....त्याच्या मनात काहीशी खिन्नता आली होती.
" हे दया सगळं आणि हिशोब करा" बाईंनी दुकानदारांना सांगितले
"हो बाई साहेब, बसा काही वेळ"
दुकानदाराने सर्व हिशोब केला " अरे, जरा हा गठ्ठा बांधून दे रे याचा" असं म्हणून दुकानातील नोकराला त्याने आज्ञा केली. नोकराने सगळ्या सामानाचा एक भला मोठा गठ्ठा बांधून तयार केला.
"हे घ्या पैसे, नीट सगळे दर लावलेत नं? दया तो गठ्ठा बाहेरच्या आमच्या माणसाकडं, पांडोबाss" बाईंनी आवाज दिला.
तसा पांडोबा उठून उभा राहिला, दुकानातील नोकराने ओझे त्याच्या डोक्यावर दिले. बाईसाहेब आणि पांडोबा दोघे पण बैलगाडीच्या दिशेला निघाले. आता पांडोबाच्या डोक्यावर तो भला मोठा गठ्ठा, दोन्ही बगलेत पिशव्या असे घेऊन तो उन्हात, अनवाणी पायाने चालत होता. दोघंपण घाम पुसत पुसत बैलगाडीच्या दिशेला येताना किसनने पाहिले. त्याने लगेच गाडीला बैल जोडले आणि गाडी त्यांच्या दिशेला हाकली.

आता दुपार टळून गेली होती. सर्व आणलेले सामान वाड्यात नेवून ठेवेपर्यंत चार वाजले. तो पर्यंत पांडोबाच्या पोटात फक्त पाणीच होते, तेही चालून, पळून, ओझ उचलून शरीरातून उडून गेले होते. तो सर्व सामना वाड्यात ठेऊन माघारी निघणार इतक्यात...
"पांडोबा थांब जरा" आतून बाईंनी आवाज दिला. त्याला वाटले आता अजून काय काम काढलं असलं? जरा नाराजितच तो थांबला.
" हो बाई जी"
" हे घे" असं म्हणत बाईंनी त्याच्या हातावर काही भाकऱ्या, कांदा आणि भाजी दिली, " खा बाहेर बसून मग जा हवं तर घराकडे"
" नको जी घराकडं जातू, अजून काही काम असलं तर सांगा जी"
" नाही, अजून काही नाही, जा तू...आणि हो उद्या सकाळी ये, सोबत भामाला पण घेऊन ये."
" भामा हे घे, इनामदार बाईंनी दिल्या हायत भाकरी" तो दमून घरी पोंचला.
"खावा की मग!!! कवापासून तुम्ही उपाशी असत्याल" त्याच्या काळजीपोटी ती म्हणाली.
" पाणी दे फक्त पायला, आता दिस पार मावळतीला आला बघं. आता दिवे लागले की दोघं बी सोबतच खाऊ "
क्षितिजावर सूर्य मावळतिला आला, गाईगुरं परत घराकडं निघाले, पक्षी आपआपल्या घरट्यात निघाले, सांजप्रकाश आकाशात दिसू लागला, हळू हळू अंधार सगळीकडे आपले हात पाय पसरायला लागला. लवकरच काळोख झाला. तसे घरा घरातील दिवे पेटायला सुरुवात झाली. पांडोबा आणि भामा मात्र अजून अंधारातच घराबाहेर बसलेले होते. एकच पणती पेटेल इतकेच तेल घरात होते. त्यामुळे अगदी जेवताना लावावी आणि परत विझवावी याच हेतूने ते दोघेही अंधारात बसले होते.
" खायायचं का?" भामाने विचारले.
"हा,खाऊ "
दोघे पण हातावर भाकरी घेऊन जेवू लागले, जेवताना आपण दिवस भर काय काय पाहिले, कुठं कुठं गेलो हे सगळं त्याने भामाला सांगितले. ती बाजारपेठ...ती सगळी दुकानं...त्यातील सगळ्या वस्तू, तो अगदी भरभरून बोलत होता.
" बाईंनी उद्या सकाळी तुला बी वाड्यावर बोलावलं आहे"
"मला, अन ते कशा पाई?"
" मला काही म्हणल्या नाही बाsss, बघू उद्याच उद्या!!"
जेवणं झाली तशी भामा घरात झोपली आणि पांडोबा मुक्त आकाशाच्या खाली जमिनीवर आडवा पडला. दमलेलं शरीर आडव झालं. जरा जरा वारा सुटला होता. कुठं कुत्रे भुंकत होते, देवळात भजन सुरू होते, त्या सगळ्या आवाजात तो डोळे मिटून पडला. डोळे मिटले की त्याला आधी कापडं दुकान दिसले... त्यातील सुंदर सुंदर, रंगीबिरंगी कपडे...बाईंनी विकत घेतलेले कपडे...त्याचा मोठा गठ्ठा....तो उचलणे आपल्याला नको होत आहे... आपल्या आणि भामाच्या अंगावरील कपडे... याच विचारत त्याचा डोळा लागला. दमलेल्या शरीराला दमून झोप लागली.
" भामाss,ए भामा, हे बघं माझ्याकडं बघं, अगं ये कि लवकर बाहेर" तो आनंदनात तिला घराबाहेर बोलवत होता.
" अगं बाईss" भामा डोळे विस्फारून पांडोबाकडे पाहतच राहिली. त्याने पांढरे शुभ्र धोतर नेसलेले होते. तेही अगदी पायघोळ. अंगात निळ्या रंगाचा पूर्ण बाहीचा सदरा घातलेला. असा तो तिला दिसला. त्याच्या हातात कागदात गुंडाळलेले अजून काही तरी होते.
"हे काय हाय जी? सांगा की मला?"
" हे, हे तुला" पांडोबाने आपला हात पुढे करत आणि आनंदी होत तिच्या हातात ते दिलं.
" मला, काय हाय यात?"
" तूच पहाय"
" लुगडं, लुगडं, मला"ती खूप खुश होत म्हणाली.
"जा, पटकन ये नेसून"
दोघे पण नवीन कपड्यात एकमेकांनाकडे पाहत होते. तितक्यात...
" अहो, अहो उठा की, तांबडं फुटलं की, कोंबडं बी आरवल आणि तुम्ही अजून झोपले"
" आsss,सकाळ झाली...आणि माझ्या अंगावरली कापडं आणि तूझ्या अंगावरले लुगडं, कुठं गेलं?"
" काय याड बीडं लागल की काय? अहो कोणती कापडं? उठा चूळ भरून घ्या"
" सपान!!! छे, आपल्याला फकस्त सपान पडलं?"तो नाराजीन आपल्या अंगातील कपड्यांकडे बघत जागेवरून उठला.
" आले का तुम्ही दोघं, बसा बसा तिथं" बाईंनी पांडोबा आणि भामाला पाहत स्वागत केले
"राम,राम, हा आलो जी" पांडोबा नमस्कार करत म्हणाला
"या असे समोर या" नाना दोघांना समोर बोलवत म्हणाले
दोघं पण भितभित समोर सरकले. नाना चार पायऱ्या उतरून खाली अंगणात आले, पाठोपाठ बाईपण खाली आल्या.
"पांडोबा हात समोर कर" त्याला वाटले आपल्याला काय मारबिर बसतो कि काय? त्याने भितभित हात समोर केला.
" हे घे" असं म्हणतं त्याच्या हातावर नानांनी एक पांढरे शुभ्र धोतर आणि पिवळ्या रंगाच्या सदऱ्याचे कापड ठेवले.
तो हे पाहतच राहिला.
"भामा तू हे घे" असं म्हणून बाईंनी तिला पण एक लुगडं आणि काचेच्या हिरव्या बांगड्या असे तिच्या हातात दिले.
या घटनेतून दोघं पण एकदम चकित झाले. मालकांनी आपल्याला कापडं दिली? पण कसं काय बरं?
" अरे आज आमच्या संसाराला पंचवीस वर्षे पूर्ण झाली, त्यामुळे आम्ही असे ठरवले की सगळ्या गाड्यांना आणि कामगारांना कपडे द्यायचे. तेच काल तुम्ही जिल्ह्यात जाऊन घेऊन आलात" नाना सांगत होते.
पांडोबाच्या मनात विचार आला. काल आपल्याला जो मोठा गठ्ठा उचलायला लय जड वाटत होता. त्यात तर आपल्यासाठी पण हे कपडे होते कीss, आणि पहाट पडलेले आपले सपान बी खर झालं कीss...
"धन्यवाद मालक आणि बाईसाहेब" रडतच दोघांच्या तोंडून फक्त हेच शब्द बाहेर पडले...
©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या (comment) प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या, सोबत आपले नावंं लिहावेे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Pandoba"
"Bhama aang a bhama" Pandoba hurriedly came to the door of the house. Although the house looked like a hut, the two of them had erected it with their hands.
Bhama and Pandoba started their life with four pots and in this place they both built their house by sweating. Pandoba walked in the forest and brought huge bundles of sandalwood from his head. One by one, they erected a caravan stick and erected four walls ... but both of them worked hard day and night to erect the house. He twisted the rope around his hand and tied all the vertical sticks and hit them with black clay mud. The four walls remained standing, but we walked back to the forest for the roof, collected grass and dried saga leaves, and weaved the roof from them.
"Now that the roof has been removed, our houses are ready !!! .." They both worked harder and the same thing happened. The house of their right stood.
As such, it has now become history. He had built this house many years ago. He was repeatedly damaged by the wind and rain, and they worked hard to get him back up.
Today, as he was approaching the house, he was pushing Bhama.
"Why call Oss Kamhun?" Bhama asked coming out of the house.
"Oh my go to Inamdarwada's castle (https://muktalikhan2021.blogspot.com/2021/05/Inamdarwada.html) and give Wise water to drink"
"This is the end" Bhama brought water from the house in a clay pot.
Pandoba was sitting on his bare body sweating. A waist-length punch was tied at the waist. Only one such punch on the shoulder. On the left side, his body was exposed, the color was very rocky, and in the open, his whole body seemed to be warmed up. Bhama was also wearing patched clothes in ten places. It was her clothes but it was just coming up to her knees. This is how their torn world started. He drank the water brought by Bhama in his mouth and after drinking the water he went towards Takotak castle.
"Rams Rams owner" he shouted as he crossed the wooden threshold of the castle.
"Hey, why did you come, Pandoba !!! Let's just sit down .."
But we, Harkamya, did not sit in the place given to him by this feeling, but sat in the same place, kneeling (as if sitting on the toilet).
"Owner called Bolvilat GSS?"
"Are you going to the district with us tomorrow morning? I can't go, go with me and bring some luggage, I want to buy something. Thirty" Nana was talking to Pandoba.
"Go on, tell the left I'm hi with them. What more can I say?"
"No, then come tomorrow morning."
"Yes sir"
Pandoba was hardworking, honest and trustworthy. The next morning the rewarding lady was ready, just before Pandoba had arrived at the castle. Baisaheb Dara sat in the bullock cart outside, Pandoba had already put the haystack under the bullock cart (satranji on it (to feed the bullocks and mau), then put a mattress on it. Bai Saheb sat on it and the car started.
The distance from the village to the village of the district would be about 25 to 30 kilometers. The journey was short but the road was very bumpy, so the train was moving aimlessly. The woman was sitting in the bullock cart holding the side straps. The bull's neck was ringing. Pandoba was walking with the bullock cart ... Madhech was running with the speed of the bullocks.
The train traveled to the district market. The woman told him to stop. Bai Tunkan jumped out of the car.
"Kisan, you drive in the shade of that lemon, let go of the ox and wait. I will walk with Pandoba to the market. Let's go, Pandoba."
Kisan drove under the tree, releasing the oxen. Some of the grass under the mattress was used as fodder for the oxen. Xu tied the ends of the oxen's ropes and he also sat in the shade pulling a sleeping bidi. Even the white bulls moved away from the car and sat comfortably. But the farmer was watching them.
The woman came to a cloth shop in the market carrying some goods. Seeing them outside the shop, the owner quickly came out from inside and said, "How are you, Nanasaheb?" The shopkeeper was respectfully asking them.
"Okay, Pandoba, you stop here," the woman told him to sit on the steps.
Pandoba was sitting on the steps like a child looking at the shop. In the wooden cupboards of the shop, sari of different colors were kept, in which some nine-piece clothes, some five-piece sari, miners, some clothes for men were also seen in another wooden mine. The wooden poles were wrapped in cloth and its pillars were erected in different colors. On top of it was a pile of white stones, one on top of the other. It had some thick-edged, some patterned dhoti.
There were white sheets on the mattress to sit in the shop. It was all new to Pandoba, he had never seen it before. He was looking at himself with great difficulty seeing all this in the shop. Just like the floor under her waist, the upper limbs are open, the same thing happened to her brother-in-law on her body, but the torso is nothing, it is many patches .... There was something sad in his mind.
"All this kindness and calculation," Baini told the shopkeepers
"Yes lady sir, sit down for a while"
The shopkeeper calculated everything and said, "Hey, let's tie this bundle." The servant made a big bundle of all the things.
"Take this money, haven't you fixed all the rates? Please take that bundle to our man outside, Pandobas" the left voice shouted.
As Pandoba stood up, the shopkeeper put the burden on his head. Both Baisaheb and Pandoba went towards the bullock cart. Now Pandoba was walking barefoot in the sun with a big bundle on his head, bags in both arms. Kisan saw the two of them coming towards the bullock cart, sweating profusely. He immediately attached the oxen to the cart and drove the cart towards them.
It was past noon. It was four o'clock when all the luggage was taken to the castle. Until then, there was only water in Pandoba's stomach, which had also flown away from his body by walking, running, carrying weights. He will leave after leaving all the matches in the castle ...
"Pandoba, wait a minute," the left voice called from inside. He wondered what else he had done. He stopped a little annoyed.
"Ho bai ji"
"Take this," said the lady, handing him some bread, onions and vegetables.
"I don't want to go home, if there is any other work, please tell me."
"No, nothing else, you go ... and yes, come tomorrow morning, bring Bhama with you."
"Take this Bhama, Hayat bread given by Inamdar Baini" He reached home in a daze.
"Eat it then !!! You will be hungry from Kawa" she said worriedly.
"Give water only to the feet, now let's see if it comes down. Now that the lights are on, let's eat together."
The sun went down on the horizon, the cows returned to their homes, the birds went to their nests, the evening light appeared in the sky, and slowly the darkness spread its arms and legs everywhere. It soon became dark. That's how the lights in the house started to turn on. Pandoba and Bhama, however, were still sitting outside in the dark. There was only one oil in the house. So they were both sitting in the dark with the intention of putting it on while eating and turning it back on.
"Want to eat?" Bhama asked.
"Yes, let's eat."
The two of them started eating with bread in their hands. He told Bhama everything he had seen during the day and where he had gone. That market ... all those shops ... all the things in it, he was talking at length.
"The lady has called you to the castle tomorrow morning."
"Me, Ann, how did you get it?"
"I didn't say anything, bass, let's see tomorrow !!"
As the meal was over, Bhama slept in the house and Pandoba lay down on the ground under the open sky. The exhausted body became paralyzed. The wind was blowing a little. Where dogs were barking, hymns were being sung in the temple, he wiped his eyes at all those noises. When he rolled his eyes, he saw a cloth shop first ... the beautiful, colorful clothes in it ... the clothes bought by the left ... his big bundle .... you don't want to pick it up ... the clothes on you and your nephew .. His eyes widened as he asked. Exhausted body fell asleep.
"Bhamass, a bhama, look at me, come out soon" he was happily calling her out of the house.
"Oh my God" Bhama kept looking at Pandoba with wide eyes. He was wearing a white dhoti. Pretty even pants. Wearing a full blue sleeveless shirt. That's how she looked. He had something else wrapped in paper in his hand.
"Hi what's this? Tell me?"
"Hey, this is you" Pandoba extended his hand and happily handed it to her.
"Me, what's in it?"
"You see"
"Clothes, clothes, me," she said happily.
"Go, come quickly."
The two of them started eating with bread in their hands. He told Bhama everything he had seen during the day and where he had gone. That market ... all those shops ... all the things in it, he was talking at length.
"The lady has called you to the castle tomorrow morning."
"Me, Ann, how did you get it?"
"I didn't say anything, bass, let's see tomorrow !!"
As the meal was over, Bhama slept in the house and Pandoba lay down on the ground under the open sky. The exhausted body became paralyzed. The wind was blowing a little. Where dogs were barking, hymns were being sung in the temple, he wiped his eyes at all those noises. When he rolled his eyes, he saw a cloth shop first ... the beautiful, colorful clothes in it ... the clothes bought by the left ... his big bundle .... you don't want to pick it up ... the clothes on you and your nephew .. His eyes widened as he asked. Exhausted body fell asleep.
"Bhamass, a bhama, look at me, come out soon" he was happily calling her out of the house.
"Oh my God" Bhama kept looking at Pandoba with wide eyes. He was wearing a white dhoti. Pretty even pants. Wearing a full blue sleeveless shirt. That's how she looked. He had something else wrapped in paper in his hand.
"Hi what's this? Tell me?"
"Hey, this is you" Pandoba extended his hand and happily handed it to her.
"Me, what's in it?"
"You see"
"Clothes, clothes, me," she said happily.
"Go, come quickly."
The two were looking at each other in new clothes. Just ...
"Hey, hey, get up, the red burst, the rooster crows and you're still asleep."
"Assss, it's morning ... and the clothes on me and the clothes on you, where did you go?"
"What kind of clothes do you have?" "What kind of clothes? Get up and fill the stove."
"Spaan !!! Hey, did you just fall asleep?" He got up from his seat looking at his clothes.
"Come on, you two, sit down, sit down," the lady greeted Pandoba and Bhama
"Ram, Ram, ha alo ji" Pandoba said saluting
"Come forward like this" Nana said calling both of them in front
Both of them moved towards the wall. Nana came down the four steps to the courtyard, followed by the women.
"Put Pandoba's hand in front of you." He put his hand in front of the wall.
"Take this," says Nana, placing a white dhoti and a yellow shirt on his hand.
He kept watching.
"Bhama, take this," she said, handing him a cloth and a green glass bracelet.
The two were shocked by this incident. Did the owner give you clothes? But how?
"Oh, today is the 25th anniversary of our world, so we decided to give clothes to all the cars and workers. That's what you brought to the district yesterday," Nana was saying.
The thought came to Pandoba's mind. The rhythm seemed heavy to pick up the big bundle you had yesterday. In it, it was for you, but it was clothes, ss, and your spawn that fell in the morning came true, ss ...
The only words that came out of both their mouths while crying "Thank you Malik and Baisaheb" ...
© Nikhil Devidas Vaze
9011096250