Thursday, September 09, 2021

"आपल्या बापाचा गड...आणि...शेवंता"/"Your father's fort ... and ... Shevanta"

 "आपल्या बापाचा गड...आणि...शेवंता"

               सगळ्या वातावरणात, हवेत गणपती बाप्पा पसरलेला होता, म्हणजे दुकानादुकानात रंगीबेरंगी माळा लटकत होत्या, लहान मोठ्या सगळ्या गल्लीतील दुकांनात सजावटीचे सामान दिसायला लागलेले होते. लहान मुलं आपआपल्या आई वडिलांचे बोटं धरून खरेदी करत होते. सगळे कसे मस्त आणि अगदी भरल्या भरल्या सारखे दिसत होते.                                

        गणपती येणार म्हंटले की सगळीकडे असे आनंदी,प्रसन्न, अगदी सांगायचे झाले तर एकदम मंगलमय वातावरण झालेले होते. याचीच प्रत्यक्ष प्रचिती येत होती. दरवर्षी प्रमाणे मी पण माझ्या काकांकडे गणपतीसाठी जाणार होतोच. गणपती...नातेवाईक, मित्र मंडळी, मनाजोगते डेकोरेशन हे अतिशय अवडीचे समीकरण झालेले आहे.

"निखिल या वेळी तुम्ही काही तरी वेगळे करा" काका म्हणाला.
"काका, मी आणि अथू या वेळी शिव राज्याभिषेक हा देखावा करतो." 
"कल्पना चांगली आहे, दोन दिवसात सगळे लागणारे सामान आणून घेतो, मग सुरू करा काम"

    काकांच्या बोलण्याने एकदम अंगात उत्साह संचारला. तसे आम्ही घरातील सगळेच या कामाला लागलो. काम मोठे होते. जवळ जवळ १५ ते २० चित्र ( cut out) करायचे होते. त्यात शिवाजी महाराज यांचे मोठे चित्र म्हणजे अगदी चित्रकलेचा पूर्ण कागद ( drawing paper) लागणार होता. रोज थोडी थोडी तयारी करून पण जवळ जवळ सगळे चित्र, त्याचे स्टँड तयार करण्यात दहा बारा दिवस कुठे गेले काही कळाले नाही. रात्री झोपताना, झोपल्यावर स्वप्नात फक्त आम्ही करत असलेले कामच डोळ्यासमोर यायचे. ते काम हातून कोणती शक्ती करून घेत होती हे देवच जाणो. कधी कधी आपल्या हातून अनावधानाने असे काही विशेष काम होते जे आपल्याला आत्यंतिक समाधान आणि ऊर्जा देऊन जाते.

            

        

    गणपती बसायच्या आदल्या दिवशी, आमची संपूर्ण तयारी पूर्ण झाली. आमची सर्व मांडणी पूर्ण झाली. यासगळ्या आकृती उभ्या करण्यासाठी खास महात्मा फुले मंडई मागील बुरुडांकडून वेताच्या कामठ्या आणल्या होत्या.त्याचा आधार घेऊन ये जवळ जवळ दहा फुट डेकोरेशन  तयार केले होते. आपल्या मनाजोक्ती आरास पूर्ण करून आम्ही आरामात झोपी गेलो.

"दादा कंटाळा आला..मागच्या काही दिवसात आपले खूप काम झाले न!!!  चल जाऊ कुठे तरी आपण मला शाळेला सुट्टी आहे" लहान भाऊ म्हणाला.
"राजगडला जाऊयात!!! मी यापूर्वी जाऊन आलो आहे. नेतो तुला, जाऊ आपण"

    दोघांनी पण घरी परवानगी घेतली आणि ऐन गणपतीच्या तिसऱ्या दिवशी आम्ही राजगडला निघलो. गौरी येणार होत्या त्याचदिवशी. तसा राजगड मला आता बऱ्यापैकी माहीत झाला होताच. चढणीचा रस्ता नीट लक्षात होताच. त्यामुळे शाळकरी लहान भावाला घेऊन जाताना मनात कोणतेच दडपण नव्हते. अगदी आत्मविश्वासाने निघालो होतो. स्वारगेट मधून मुक्कामी जाणारी ST पकडली.

    गडाचा पायथा आला तसा..तसा आम्ही ST मधून उतरायची तयारी सुरू केली. मुक्कामाच्या ST ने आल्यामुळे उतरण्याची तशी काही घाई नव्हती. पण मनात उत्सुकता इतकी होती की, पटकन खाली उतरावे आणि अंधारात,चंद्राच्या प्रकाशात, लूक लूकणाऱ्या चांदण्यात गडाची अंधारी किनार पाहण्याची मज्जा काही औरच असते. झाडाखालील ST स्टँड वर आम्ही उतरलो. जवळच असलेल्या म्हसोबाच्या देवळात रात्रीचा मुक्काम करून पहाटे लवकरात लवकर गड सर करायचा बेत आम्ही आखला होता.

    म्हसोबाचे मंदिर तसे मुक्काम करायला एकदम सोईचे होते. मंदिराच्या बाजूनेच एक मोठा ओढा वाहत होता. तसे पावसाळी दिवस होतेच. पण आम्ही ज्यावेळी आलो होतो त्यावेळी मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप झालेली होती. त्यामुळे ओढा कमी पाण्याने वाहत होता. तो अगदी सहज ओलांडून मंदिराकडे जाता आले. पण या ओढ्यातून कधी पावसाचे पाणी वाढेल याचा काही नेम नाही. आपण खालील भागात पाणी नाही म्हणून निवांत असतो, पण या ओढ्याच्या वरच्या बाजूस म्हणजेच डोंगराच्या बाजूला कधी पाऊस पडेल आणि पाणी वाढेल याचा काही नेम नाही. त्यामुळे आम्ही तो ओढा पटकन ओलांडला आणि मंदिरात पोंचलो. जेवण करून लवकरच झोपी गेलो.                        

    भावाला उठवायच्या आधी अगदी अंधारातच ओढ्याचा झक्कास फोटो काढून आलो आणि त्याला उठवले. "अथू चला आवरून निघू लवकर..."मी भावाला उठवले आणि आम्ही तयारीला लागलो. आम्ही काही वेळातच गडाकडे चालायला सुरुवात पण केली. एकतर राजगड चढणे, सुवेळा माची, नेढे,( वाघाचा डोळा) डुब्बा, बालेकिल्ला हे सगळे पाहायचे होतेच आणि लगेच खाली पण यायचे होते. कारण परतीची शेवटची बस पकडायची होती. त्यामुळे जरा अंधारातच चालायला सुरुवात केली.

"दादा काय भारी दिसतंय रे सकाळीकडे...ते पहा आकाशात..."

    तितक्यात आकाशात सुंदर रंगांच्या छटा उमटल्या होत्या, नुकतेच तांबड फुडत होते. त्यामुळे भगवा, लाल, मध्येच कुठे तरी निळा, जांभळा असे रंग दिसत होते. सकाळी सकाळी पक्षांचे काही थवे रात्रीच्या विश्रांती नंतर घरड्या बाहेर पडून आपल्या दाण्यापाण्याची सोय करण्यासाठी आकाशात झेपावत होते. डोंगर चढताना आता सगळी कडचे स्पष्ट दिसू लागले होते. खाली गावातील बैठी कौलारू घरं, कुठे त्यातून धूर बाहेर येत होता..कोणाच्या चुली पेटल्या होत्या, कोंबडेदादा मधेच सकाळ झाली म्हणून आपला आवाज साफ करून झक्कास बांग देत होते. भाताची अनेक हिरवीगार शेतं दिसत होती. हे पाहत, हिरवेगार डोंगर त्यावर दिसणारे बारीक पांढरे शुभ्र लहान मोठे धबधबे आपले अंग चोरुन वाहत होते. डोंगर माथ्यावर पडणाऱ्या कमी जास्त पावसामुळे त्यांचा प्रवाह कमी झाला होता.

"दादा किती आहे रे अजून दरवाजा?" लहान भावाने प्रश्न केला .
"का रे दमलास का?"
"नाही पण आता गडावर पोंचायची उत्सुकता लागली म्हणून विचारले "
"अच्छा...येईल आता काही वेळात " आम्ही दोघेच निसर्गाच्या विविध छटा पाहत चालत होतो. मध्येच अचानक ढगं खाली यायचे आणि गडाला आपल्या कवेत घेऊन टाकायचे. अशावेळी समोरच काही दिसत नव्हते.
"हे कोण आले रे?" मी भावाला विचारले.
"हो रे दादा आपल्या मागे मगाशी तर कोणी नव्हते, अचानक हा कुत्रा कोण आला? आणि कुठून आला?"
"अरे अथू ती कुत्री आहे वाटतं. पण ती कधी आली आपल्या मागे?"

    आम्ही पुढे चालतच होतो. मध्येच अचानक एक स्वच्छ पांढरी, मध्ये मध्ये राखाडी रंग असलेली एक कुत्री आमच्या मागे मागे कधी आणि कुठून यायला लागली ते समजलेच नाही...चढताना आम्ही मध्ये कुठे थांबलो, बसलो की ती पण आमच्या बाजूला बसायला लगली. ओळख नव्हती पण कदाचित आमच्या दोघांच्या नजरेत तिला काही जाणवले असेल का? माहीत नाही.

    "अथू, हा पहा पद्मावती माची वरचा पहिला चोर दरवाजा आला" मी खालून त्याला दरवाजा दाखवला.

    गडावरून पावसाचे पाणी वाहत होते. ते दरवाज्यातून खालील दगडात चर मारून तयार केलेल्या पायऱ्यांवरून खाली येत होते .

" चल माझ्या मागून ये.पण जरा जपून.दगड ओले आहेत "

    त्याला सावरत मी वर चढू लागलो. आम्ही दरवाजातून आता आलो तशी ती कुत्री पण लगोलग आमच्या मागे आली. इतकी सहज ती चढली की मला आश्चर्य वाटले.

"काय पटकन वर आली रे ही दादा?" 
"हो न!!!"

    आम्ही तिघे पद्मवती माचीवर पोंचलो, होय भाऊ, मी आणि ती कुत्री. गडावर कोणी नव्हते. सगळीकडे स्वच्छ सुंदर वातावरण,मध्येच धुक यायचे, मध्येच अगदी भुरभुर पाऊस येत होता. आम्ही पद्मावती तलावाजवळ खाली उतरलो, त्या एकदम गार गार पाण्यात हात बुडवून आलो 

 तरी ती आमची सोबतीण आमच्या सोबत तळ्याकाठी पण आली. आम्ही तिला आपल्या घरातील पाळीव प्राणी आहे असेच वागवत होतो. तिच्या सोबत बोलत होतो. आम्ही बसलो की ती पण बसे. आम्ही उभे राहून चालू लागलो की ती पण पटकन चालू लागे.

"चल गं जाऊ आपण" मी तिला आवाज दिला.

आणि ती पण एका हकेत आमच्या सोबत चालू लागली.

"दादा कोण असेल रे ही, काय नाव असेल तिचे" भाऊ तिच्याकडे पाहत म्हणाला
"माहीत नाही पण आपण तिला ' राणी ' म्हणू. सोपे नाव आहे"
"चल राणी" भावाला नाव आवडले होते. एकतर सोपे, लहान नाव होते. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला.

    संपूर्ण गडावर शांतता होती. पक्षांचे आवाज येत जात होते. सगळीकडे सुंदर हिरवे गालिचे दिसत होते. अनेक झुडप वाऱ्याच्या झोताने हलत होती.

"कोण रे" एका काकांनी आवाज दिला.
"आम्ही पुण्यातून आलो काका" मी उत्तर दिले.
"असं होय. या वहीत तुमचे नाव, गाव लिहा" त्यांनी एक मोठे रजिस्टर आमच्या समोर केले.
"हो लिहतो" मी त्यावर आमच्या दोघांची पूर्ण नावं लिहिली, वय, कुठून आलो ते लिहले.
"हे का?" मी लिहता लिहता प्रश्न केला.
"मी सरकारी कर्मचारी आहे, आता कोण वर आल तर त्याचे नाव लिहावं लागते, चुकून माकून काही वाईट वंगाळ झालं, माणूस हरपल तर गडावर कोण आलंत हे समजत."

मी वहीत पाहिले तर आजच्या तारखेत आमचीच नाव होती .

"कोणी नाही का आज गडावर?"
"नाही तुम्हीच आहेत, अनं जरा जपून हिंडा, गडावर तुम्ही दोघं आणि मी आपणच आहोत. मी पण खाली जाणार आहे आता. आज कोण येत नाहीत वाटतं. आज आठवड्याचा मधला वार, त्यात गणपती आहेत घरात. पहा निवांत. वाईट वाटून घेऊ नका पण 'आपल्याच बापाचा(आदराने) गड आहे असे समजा आणि पहा" 

    त्यांचे ते बोलणे आवडले. ज्या शिवाजी महाराज यांची ही पहिली राजधानी, तोच या मराठी स्वराज्याचा बाप,पालन करता, धर्मरक्षक. म्हणून ते आपले बापच, या अर्थी त्या सरकारी कर्मचारी यांनी हे वाक्य टाकले असावे.

    सुवेळामाची पाहून येऊन आम्ही लगेच बालेकिल्ला सर करायला सुरुवात केली. पावसाच्या पाण्यामुळे जरा निसरडे कातळ असून बालेकिल्ला चाढलोच. 

"दादा हे तळे किती सुंदर आहे रे" चंद्र तळ्याकडे पाहत भाऊ म्हणाला. 
"हो जणू काही अष्टमीच्या रात्री दिसणारा चंद्र दिसावा. तसाच या तळ्याचा आकार आहे. म्हणूनच याचे नाव चंद्र तळे आहे"

    गडावर कोणी कोणी नव्हते. संपूर्ण बालेकिल्ला जणू काही आपल्या मालकीचा आहे असेच वाटत होते. त्यादिवशी आम्ही जवळ जवळ दोन तासांच्या वर तिथे होतो. इतके सुख परत कधीच मिळाले नाही. नाईलाजाने बालेकिल्ला उतरलो. कारण आता घरी परतायला ST पकडायची होती. 

    बालेकिल्ला चढायला जितका अवघड तितकाच तो उतरायला पण अवघड. त्यामुळे उतरणीला पण बराच वेळ लागला.

"दादा अरे ते पहा खाली" अथू एकदम म्हणाला.
"काय रे?"
"अरे ती राणी बघ कशी आपल्याकडे डोळे लावून बसली आहे. आपल्याकडेच पाहती आहे"
"हो की रे!!! मला वाटले, की ती गेली असेल. कोणाची आहे कोणास ठाऊक?"

    राणी अगदी आमच्या वाटेवर डोळे लावून बसली होती. राणी उंचीने असेल साधारण माझ्या गुडघ्या पर्यंत. अगदी असल गावरान दिसत होती. रंग पांढरा आणि मध्येच कुठे कुठे राखाडी झाक, शेपूट पण अशी भारदस्त, डोळे करारी पण मलका प्रती आदर आणि समर्पण भाव स्पष्ट दिसणारे होते. 

    वास्तविक आम्ही दिला आमच्याकडे जे खाण्यासाठी आणले होते, ते आमच्यातील एक घास काढून दिले होते. पण तरी ती आमची सोबत करीत होती. अगदी आम्हाला आधार देत होती. एवढ्या प्रचंड मोठ्या गडावर त्या दिवशी फक्त आम्ही दोघेच होतो. म्हणून तर कदाचित ती आम्हाला सोबत करत नसेल? कधी कधी अशी प्रचिती येते पण ती पाहण्यासाठी  आपलीच नजर कमी पडते.

"चला आता उतरले पाहिजे. नाही तर बस चुकेल"
"हो, दादा चल निघू"
"चल राणी जाऊ गडाखाली" मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो.

    मजल दर मजल करत आम्ही गडाखाली उतरलो,वाटेत जे सकाळी पाहता आले नाही, ते पाहत खाली येत होतो. झाडं, फुलं, पक्षी, असे पाहत खाली यायला उशीर झाला. राणी आमच्या सोबत होतीच. इतकी सहज ती आमच्यात मिसळून गेली जणू काही तिचे आणि आमचे नाते खूप वर्षांपासूनचे आहे.

    गडाखालील गुंजवणे गावातील अनेक कुत्रे तिला धाक दाखवून तिच्या वर भुंकत होते. पण ती तिच्या मार्गाने त्यांना विरोध करत आम्हाला सोबत करत होती. आमच्या मागे मागे येतच होती. लिंबाच्या झाडाखाली बसची वाट पाहत बसलो. वेळ पाहिली तर बसच्या वेळे पेक्षा आम्ही बऱ्याच उशिरा तिथे आलो आहोत हे लक्षात आले. जवळच्याच एका गावातील काकांना विचारणा केली, तर असे समजले की आज बस येणार नाहीये. 

"मग आता काय?"
"बाहेरच्या फाट्या पर्यंत जावं लागलं आता"
"किती दूर आहे, काका"
"असल बघा ७-८ किलो मिटर"
"चला...." आम्ही दोघे पायी मार्गासनी फाट्या पर्यंत निघालो.

    रस्ता तसा छान होता. वाटेत हिरवीगार भातशेती दिसत होती. उन नव्हते त्यामुळे चालायला काही त्रास होत नव्हता. आम्ही चालत होतो आणि आमच्या सोबत राणी पण येत होती. तिला आमच्या बद्दल इतकं प्रेम वाटत होते हे एक कोडेच होते.

"ये शेवंता, कुठं निघाली?" एका वाटेतील गावातील मध्यम वयाच्या माणसानं आरोळी दिली.
आमच्याकडे पाहून दिलेल्या आवाजामुळे मी चमकलो. 
"काय हो काका?" 
"अरे ही कुठं गावली तुम्हाला"
"कोण ही कुत्री? राणी?"
"राणी नव्हं ही वरच्या गावातील शेवंता हाय!!"
"हो का , आम्ही राजगडला गेलो होतो, तेव्हा पासून आम्हाला सोबत करती आहे ही शेवंता"
"असं होय, असल असल, हिला नादच लागला आहे गडावर जायचा"

    आम्ही काकांशी बोलून फाट्यावर आलो. तरी ती वाटेतील सर्व हद्दी सांभाळणाऱ्या कुत्र्यांना भांडत, गुरगुरत आमच्या सोबतच फाट्यावर आलीच होती. बस आली तसे आम्ही गाडीत बसलो. लहान भावाला खिडकीत बसवून मी शेजारी बसलो होतो.खरंतर आम्ही बस मध्ये चढताना ती आमच्या मागे बस मध्ये पण येतच होती.

"दादा त्या शेवंताला घेऊ का सोबत"
"अरे नको, तिचा कोण मालक असेल? तो शोधेल तिला"
"तिचे डोळे पहा न दादा!!! कसे केविलवाणे झाले आहेत. आपण निघतोय हे समजले दिला"
"हो न रे" आम्ही दोघे पण जरा हळवे झाले होतो. काय नाते होते माहित नाही.पण काही तासांचे सोबती असे दूर जाताना मनात कासावीस होत होती हे नक्की.

    बस निघाली तसे ती काही अंतर बस सोबत पळाली पण... शेवटी तिचा वेग आणि बस यांची सांगड कशी होणार...भाऊ आणि मी खिडकीतून तिच्याकडे पाहत होतो आणि मनात म्हणत होतो.

"शेवंता परत भेटू" पण त्यादिवशी भेटलेली ती शेवंता परत कधीही भेटली नाही.

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Your father's fort ... and ... Shevanta"

    In all the atmosphere, Ganpati Bappa was spread in the air, that is, colorful garlands were hanging in the shops, decorative items were appearing in all the shops, big and small. The children were shopping with their parents' fingers. It all seemed so cool and so full.
Ganpati will come and say that there was such a happy, happy, very auspicious atmosphere everywhere. This was the real realization. Like every year, I was going to my uncle for Ganpati. Ganpati ... relatives, friends, manajogate decoration has become a very favorite equation.

"Nikhil, do something different this time," said Kaka.
"Uncle, me and Athu do the Shiva coronation scene this time."
"The idea is good, we get everything we need in a couple of days, then get to work."
    Uncle's words suddenly filled my body with excitement. That's how we all started this work in the house. The work was great. I wanted to cut out about 15 to 20 pictures. The big picture of Shivaji Maharaj in it would have been a complete drawing paper. With a little bit of preparation every day but almost all the pictures, I don't know where the ten or twelve days went in making his stand. When we slept at night, when we slept, the only thing we could see in our dreams was what we were doing. God only knows what power he was taking from that work. Sometimes we inadvertently do something special that gives us extreme satisfaction and energy.

    The day before Ganpati sat down, our entire preparation was completed. All our layouts are complete. After completing the manajokti decoration, we went to sleep comfortably.

"Grandpa got bored..you haven't done much in the last few days !!! Let's go somewhere. I have a school holiday" said the younger brother.
"Let's go to Rajgad !!! I've been here before. I'll take you, let's go"
Both of them took permission at home and on the third day of Ain Ganapati we left for Rajgad. Gauri was coming on the same day. As soon as I knew Rajgad. As soon as the climbing road is clearly noticed. So there was no pressure on the schoolgirl to take her younger brother. He had left with confidence. Caught ST passing through Swargate.

    As soon as the base of the fort came, we started preparing to descend from ST. There was no hurry to get down as the ST of the camp arrived. But the curiosity in the mind was so much that it was fun to go down quickly and see the dark edge of the fort in the dark, in the moonlight, in the lunar moonlight. We landed on the ST stand under the tree. We had planned to spend the night at the nearby Mhasoba temple and make the fort as early as possible in the morning.

    The temple of Mhasoba was very convenient to stay like that. A big stream was flowing near the temple. It was a rainy day. But by the time we arrived, it had been raining for the past few days. So the stream was flowing with less water. He could easily cross the temple. But there is no telling when the rainwater will rise from this stream. We are restless as there is no water in the lower part, but at the top of the stream, on the side of the mountain, there is no indication of when it will rain and the water will rise. So we quickly crossed the stream and reached the temple. After a meal I soon fell asleep.
Before waking up the brother, we took a zakkas photo of the stream in the dark and woke him up. "Athu, let's wrap up and leave soon ..." I woke up my brother and we started getting ready. We started walking towards the fort in no time. I wanted to climb Rajgad, Suvela Machi, Nedhe, (Tiger's Eye) Dubba, Balekilla and I wanted to come down immediately. Because the last bus to return was to catch. So I started walking in the dark.

"Grandpa, you look so heavy in the morning ... look at that in the sky ..."

    At that moment, the sky was full of beautiful colors, and red was blooming. So saffron, red, blue, purple were seen somewhere in the middle. In the early hours of the morning, a few flocks of birds would come out of the nests after a night's rest and soar into the sky to facilitate their nourishment. As we climbed the mountain, all sides were now clearly visible. Downstairs, there were noisy houses in the village, where smoke was coming out of it. There were many green paddy fields. Seeing this, the green mountains, the small white waterfalls that were visible on it, were stealing their limbs. Their flow was reduced due to less and more rain falling on the mountain tops.

"Grandpa, how much is the door?" The younger brother asked.
"Why Ray Damlas?"
"No, but now I am curious to reach the fort, so I asked."
"Well ... it will come soon" We were both walking looking at different shades of nature. Suddenly the clouds would come down and take over the fort. Nothing was visible in front of him at that time.
"Who came here?" I asked my brother.
"Yes, Grandpa, there was no one behind you. Suddenly, who is this dog? And where did it come from?"
"Oh, I think she's a dog. But when did she come after you?"
We kept walking. Suddenly a clean white, gray dog ​​in the middle did not understand when and from where it started coming behind us ... As we climbed, we stopped in the middle, sat down and she also started sitting next to us. There was no identity but maybe she felt something in the eyes of both of us? Don't know

    "Athu, look, the first thief came to the door above Padmavati Machi" I showed him the door below.

    Rain water was flowing from the fort. They were coming down the steps from the doorway.

"Come after me. But be careful. The stones are wet."

    I started to climb on top of him. The dog followed us as we came through the door. She climbed so easily that I was surprised.

"Did you come up quickly, Grandpa?"
"Oh no !!!"
    The three of us reached the Padmavati Machi, yes brother, me and that dog. There was no one on the fort. Clean and beautiful atmosphere everywhere, it was foggy in the middle, it was raining heavily in the middle. We descended near Padmavati Lake, dipping our hands in the very cold water

 However, she came with us to the lake. We were treating her like we had a pet in our house. Was talking to her. We sat down and she sat down too. We stood up and started walking but she started walking too fast.
"Let's go you" I called out to her.

And she started walking with us in one go.

"Who is Grandpa, what is her name," said the brother, looking at her
"I don't know but you call her 'Queen'. It's a simple name."
"Chal Rani" brother liked the name. Either was a simple, short name. He said, rolling his hands over her head.
    There was peace in the whole fort. The voices of the parties were coming. Beautiful green carpets were everywhere. Many bushes were moving in the wind.

"Who's there?" An uncle called.
"We came from Pune, uncle," I replied.
"Yes. Write your name and village in this book." He made a big register in front of us.
"Yes I write" I wrote the full names of both of us on it, age, where we came from.
"Why?" I asked as I wrote.
"I am a government employee. Now I have to write the name of whoever came up.
If I looked in the book, it was our name on today's date.

"Is there no one on the fort today?"
"No, it's you, take care, you two and I are on the fort. I am going down now. I don't think anyone is coming today. Today is the middle of the week, there is Ganpati in the house. Look at it. Imagine for a second you were transposed into the karmic driven world of Earl.
They liked to talk about it. This is the first capital of Shivaji Maharaj, the father of this Marathi Swarajya, Dharmarakshak. So he is your father, in the sense that the government employee must have dropped this sentence.

    Seeing Suvelamachi, we immediately started doing Balekilla Sir. Due to rain water, it is a bit slippery and Balekilla Chadhloch.

"Grandpa, how beautiful this lake is," said the brother, looking at the moon lake.
"Yes, it looks like the moon on the night of Ashtami. This is the shape of the lake. That is why it is called Chandra Lake."
    There was no one on the fort. The whole Balekilla seemed to belong to you. We were there for about two hours that day. I have never been so happy. Nilaja landed at Balekilla. Because now I wanted to catch ST to return home.

    The harder it is to climb the fort, the harder it is to descend. So the descent took a long time.

"Grandpa, look at that down," Athu said suddenly.
"What the heck?"
"Look at that queen who is staring at you. She's looking at you."
"Yeah that's it !!! I thought she was gone. Who knows whose it is?"
    The queen was just staring at our path. The height of the queen will be approximately up to my knees. It looked very real. The color was white and in the middle there was a gray cover, but the tail was so elevated, the eyes were sharp but the respect and devotion towards Malka was evident.

    In fact, what we gave to eat was given to one of us who had removed the grass. But she was still with us. Was even supporting us. There were only two of us that day on such a huge fort. So maybe she's not doing it with us? Sometimes such a realization occurs but our own eyes fail to see it.

"Let's get off now. Otherwise the bus will miss."
"Yes, grandpa let's go"
"Let's go under the fort, queen," I said, rolling my hands over her head.
Step by step we came down to the fort, on the way we were coming down to see what we could not see in the morning. Seeing the trees, the flowers, the birds, it was too late to come down. The queen was with us. She blended in with us as easily as if she and I had been in a relationship for many years.

    Many dogs from Gunjavane village under the fort were barking at her in fear. But she was accompanying us, resisting them in her way. She was coming after us. We waited for the bus under the lemon tree. Looking at the time, we noticed that we got there much later than the bus time. I asked my uncle from a nearby village and he understood that the bus would not come today.

"So what now?"
"Now we have to go to the outer fork."
"How far is it, uncle?"
"Look at the real 7-8 km"
"Come on ..." We both walked to the fork.
    The road was just as nice. Green paddy fields were seen on the way. There was no wool so it was not difficult to walk. We were walking and the queen was coming with us. It was a mystery that she loved us so much.

"Hey Shevanta, where did you go?" A middle-aged man from a village on the street shouted.
I was dazzled by the sound we saw.
"What's up uncle?"
"Hey, where did you go?"
"Who is this dog? Queen?"
"Hi, Shevanta from the upper village, not Rani !!"
"Yes, we have been to Rajgad. Shevanta has been with us ever since."
"Yes, that's right, he's just about to go to the fort."
    We talked to our uncle and came to the fork. However, she was fighting with the dogs that were guarding all the boundaries of the road, growling with us. As soon as the bus arrived, we got in the car. I was sitting next to my younger brother in the window. In fact, when we got on the bus, she was coming behind us in the bus.

"Grandpa, why don't you take that Shevanta with you?"
"Oh no, who owns her? He'll find her."
"Don't look at her eyes, Grandpa !!! How sorry she is. I understand you're leaving."
"Yeah Al that sounds pretty crap to me, Looks like BT aint for me either." I don't know what the relationship was like.
    As the bus left, she ran some distance with the bus but ... how will her speed and the bus be combined in the end ... my brother and I were looking at her through the window and saying in our minds.

"Let's meet Shevanta again" but she never met him again.

© Nikhil Devidas Vaze
9011096250

3 comments:

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले