Saturday, July 10, 2021

"हत्तीच्या पोटात, वाघाचा डोळा"/"In an elephant's belly, a tiger's eye"

 "हत्तीच्या पोटात, वाघाचा डोळा"

          श्रावण महिना सुरू झाला, साधरण १५ ऑगस्ट नंतर पावसाने एकदम टॉप गेअर टाकला आणि रोज धुव्वाधार पाऊस पडायला सुरुवात झाली. रस्ते, नद्या, डोंगर- दऱ्या यातून पाण्याचे लोंढे वाहू लागले. सर्वदूर पाऊस पडत होता. रणरण उन्हात बोडके झालेले सगळे डोंगर-टेकड्या यांवर गवतांच्या हिरव्या रंगी अनेक छटा दिसायला लागल्या होत्या. आपली नजर जाईल तिथं पर्यंत सगळे अगदी स्वच्छ धुतल्या सारखे दिसत होते.

                        

    लहान मुलांचे टक्कल केले आणि काही दिवसात त्यां डोक्यावर जसे बारीक बारीक केस येऊ लागतात आणि टक्कलाचा हिरवट रंग दिसायला लागतो. (आठवून पहा..) त्याच बोडक्या डोक्याला 'हिरवळ धरायला लागली' असा बरेचदा शब्द प्रयोग केला जातो. कदाचित डोंगरावर येणाऱ्या या हिरव्या गवतामुळेच हे वाक्य प्रचलित झाले असेल असे वाटते.

"चल रे!!!!...." मित्राने समोरून फोन केला आणि हॅलो हाय न म्हणता फक्त तो हेच बोलला.
"चल की!!!...कधी?" मी पण त्याला तसेच उत्तर दिले.
"शनिवारी जाऊ, ये माझ्या घरी आदल्यादिवशी, आज मंगळवार आहे." त्याने निरोप दिला ('निरोप' यावर आधी बोललो आहेच) तसाच हा पण एक निरोप.
"हो येतो, तू खाद्य सामान घेऊन ये. मागच्या वेळची मसाला शेव पण नक्की आण. मी येतो शुक्रवारी" मी पण उलट मागणी केली आणि फोन ठेवला.

    दोन समविचारी मित्र, समान सवयी असलेले मित्र यांच्यात फार कमी संवादात एकमेकांच्या मनात काय सुरु आहे हे चटकन समजते. खूप गोष्टी उचकटून सांगत बसावे लागत नाही. असेच आमच्या दोघांचे पण आहे. पाऊस पडतच होता. त्यामुळे वातावरण खूप सुंदर झालेले होते. मग अशा वातावरणात घरी कसे बसावे? मग काय आहेच की....

"मी चालवू का गाडी?" 
"नको, तुला माझ्या गाडीची सवय नाही ये ....आणि अजून बराच अंधार आहे" मी त्याला मागे बसवत गाडीला किक मारत म्हंटले.
"अजून बराच अंधार आहे रे, पण आपण जाई पर्यंत तांबडे फुटेल" माझ्या मागून मित्र आजूबाजूला पाहत म्हणाला.
"अरे आपण अडीचला निघालो आहोत...मग अंधार असणारच कि... पण लवकर निघालो म्हणजे अंधारात रस्ता लवकर कापल्या जातो" उत्तरादाखल मी वाक्य पुढे केले.

    मी गाडी साधरण ५०-६० च्या गतीने चालवत होतो. पाऊस पडतच होता. रस्त्यावर अंधार, काही पाण्याचे डबके, खड्डे, गाव जवळ आले की येणारे गतिरोधक या सगळ्यांमधून जपून अप्पर- डीप्पर लाईट मारत गाडी चालवत होतो. डोळ्यावर पाऊस लागतच होता तरी पावसात गाडी चालवण्याचा आनंद घेत होतो. अंगात रेनकोट घातल्यामुळे वारा डायरेक्ट छातीला लागत नव्हता. बाकी आम्ही आतून कधीच चिंब भिजलो होतो. रेनकोट असून पावसाचा जोर इतका होता की त्या रेनकोटचा पावसापासून बचाव हा हेतू कधीच पावसाने उधळून लावलेला होता. मजल दरमजल करत एकदाचे आम्ही मार्गासनी फाट्यावर आलो. 

    आता बऱ्यापैकी उजाडले होते. भाताची पीकं जमिनीतून आता किमान गुडघाभर वर आलेली दिसत होती.काही काही भाताची खळे पूर्ण पाण्याने व्यापलेले दिसत होती. लहान- मोठे पांढरे,लाल,मातकट रंगाचे पाणी असलेले धबधबे हिरव्यागार डोंगरदर्यात लगेच आपल्याकडे लक्ष वेधून घेत होते.

                                    

    

    गडाचा पायथा आला तेव्हा साडे सहा तरी वाजले असतील. पुण्यात कामासाठी फिरावे लागते. पण कामाच्या वेळी रिपरिप पावसात सिग्नलला थांबणे, रेनकोट घालून गाडी चालवणे, अर्धे भिज कपडे घेऊन कामे करणे हे अतिशय त्रासदायक असते. पण तरी कामे कराविच लागतात. मग आम्ही नेहमी फक्त पावसात मनसोक्त भिजायला कोणता तरी गड शोधतो. त्यात पहिली पसंती म्हणजे " राजगड". राजांचा गड आणि गडांचा राजा असा तो राजगड. 

    पायथ्याशी असलेल्या नवीन वाहन तळाच्या मैदानात गाडी लावली आणि सरळ आधी पुरोहित यांचे हॉटेल गाठले. असे म्हणतात की हे पुरोहित गागाभट्ट यांचे नातेवाईक आहेत. आम्ही तसे रात्रीच निघालो होतो, त्यात पाऊस, वारा यामुळे आता भूक लागली होती. गरम गरम वाफाळलेले पोहे खावून आणि चहा पिवून आम्ही लगेच गड चढायला सुरुवात केली. फक्त आता रेनकोट काढून बॅगेत टाकून दिले. कारण पावसात मनसोक्त भिजायचे होते.

    डोंगर दर्यांमधून, पायवाटेवरून पाणी वाहत होते. आम्ही चिखल आणि गवत पायाखाली तुडवत, झुडूपं बाजूला करत, पडणाऱ्या पावसात गड चढू लागलो...मध्येच एखादा खेकडा दिसे, ढगांची गर्दी अचानक वारा आला की बाजूला व्हायची. काही काही वेळा तर अचानक नळ बंद करावा तसा पाऊस थांबायचा. पण अगदी गाडीचा वरचा गेअर टाकताच गाडी जशी वाढीव गती घेते, अगदी तसाच परत जोरात पाऊस सुरू व्हायचा.

    आता गडाचा पद्मावती माचीचा चोर दरवाजा आला. तिथून दरीतील फार कमी दृश्य दिसत होते. पाऊस तर होताच त्यात ढग खाली आल्यामुळे धुक्या सारखेच सगळीकडे दुधकट दिसत होते. आम्ही नेहमी प्रमाणे डोकं टेकवून चोर दरवाज्याला नमस्कार केला.

"कसलं गार लागले रे!!!" मित्र म्हणाला
"हो रे दगड आणि पाणी एकदम गार झाले आहेत. त्यात आपण पण मस्त भिजलो आहोत." 
    
    दरवाज्यातून पाणी सतत वाहत खाली पडत होते. पडणाऱ्या पाण्याचे तुषार वाऱ्याने उडत होते. छान चमचमीत  मोत्यांच्या माळे प्रमाणे उडणारे पाण्याचे थेंब दिसत होती. 
"चल" जाऊ वर
"मला जाम भूक लागली आता" आम्ही पायऱ्या चढत बोलत गडावर आलो.

    पद्मावती तळे अगदी पाण्याने गच्च भरले होते. त्यातील पाणी वारा आला की जणू समुद्रातील लाटांप्रमाणे  दिसत होते. तळे अगदी काठोकाठ भरल्यामुळे त्यातील पाणी भिंतीवरून खाली सांडत होते. गडावर नेहमी नेहमी असे दृश्य पाहायला, अनुभवायला मिळत नाही. म्हणून मला नेहमी नेहमी गड आपल्याकडे आकर्षित करत असतो. प्रत्येक वेळी त्याचे वेगळेच दर्शन घडते.

    सोबत आणलेल्या खाद्य साहित्याचा उपयोग करून बारुद्खानाच्या आडोश्यात उभ्या उभ्या मसालाशेव, ब्रेड,सॉस वापरून त्याचे सँडविच करून खाल्ले.

"चल रे, आता डायरेक्ट संजीवनी माचीवर जाऊ" आम्ही खावून लगेच कूच करायला सुरुवात केली.

    ही सगळ्यात लांब असलेली माची आहे. बाकी गडावर आता फिरणे शक्य नव्हते. कारण दुपारी परत निघायचे होते. राजगड पाहायला गडावर किमान एक रात्र मुक्काम केला. तर आपल्याला उत्तमपणे संपूर्ण गड पाहता आणि अभ्यासता येतो.

    आम्ही संजीवनी माचीकडे निघालो. वाटेत काही ठिकाणी चिंचोळ्या पायवाटा, निर्सडे दगड, गवत, चिखल यातून मार्ग काढत संजीवनी माचीच्या पहिल्या दरवाज्याजवळ आलो. माचीचा दरवाजा ओलांडून पुढे निघालो. या राजगडावरील तिन्ही माची( पद्मावती,संजीवनी,सुवेळा माची) म्हणजे स्वत्रंत्र गडच आहेत. या प्रत्येक माची देखील शत्रूशी पूर्ण ताकदीने झुंज देऊ शकत होत्या. 

"आज पाऊस खूपच आहे रे" तो गप्पा मारत मारत पुढे चालत होता.
"हो रे .... वारं पण खूप सुटले आहे... तू येणार आहेस का? मी वर जाणार आहे"
"अरे तू जाऊ नकोस...आणि... मी पण वर येणार नाहीये"
"अरे कशाला घाबरतोय, पहिल्यांदा आलो का आपण. मस्त पाऊस पडतोय. चल!!! वरतून भारी दिसेल.." असे म्हणून मी कडा चढायला सुरुवात पण केली.
"अरे, मी काय करू?" मित्र घाबरत विचारत होता.
"तूss, मी कडा कसा चढून वर जातो आहे,  हे भिंतीचा आडोसा घेऊन पाहत रहा..." मी त्याला खिजवले आणि हसलो.

     खरंतर त्याला कडा चढून वर यायचे होते. पण त्याची हिम्मत होत नव्हती.एकतर सतत पडणारा पाऊस, सोसाट्याचा वारा आणि अवघड कडा त्यामुळे त्याची हिम्मत होत नव्हती.

"थांब रेss, मी पण येतोयsss" त्याने मला खालून आवाज दिला. पण त्याने आवाज देई पर्यंत मी चांगला सात आठ फूट कडा चढला होता .
"ये ये, पण जरा जपून...तू पडला तर मी खाली येणार नाहीये आणि तुला हात पण देणार नाहीये. स्वतः स्वतःच्या जीवावर ये वर" मी त्याची भीती काढायला हे वाक्य ऐकवले. मला वर जाताना पाहून त्याला पण प्रेरणा तर आलीच आणि माझ्या या वाक्याने स्वतःचा आत्मविश्वास वाढला.

     तो कडा सावकाश चढू लागला...मी वरतून त्याला पाहत होतो. त्याच्या आधीच मी वर पोंचलो, तेव्हा काय भारी वाटत होते. तो ही जवळ जवळ रांगतच माझ्या पर्यंत आला. वरतून आम्ही पद्मावती माची कडे पाहिले. तोंडावर वारा, पाऊस लागतच होता. इतके कष्ट घेऊन वर आल्याचे चिज झाले होते. साहस केलेच पाहिजे, पण ते अविवेकी नसावे. समर्थ सांगतात त्या प्रमाणे "अखंड सावधान असावे" 

      

         आम्ही आता वाघाच्या डोळ्यात बसलो होतो. हो, दगडात तयार केलेल्या डोळ्याच्या आकारात बसलो होतो. त्याला नेढं पण म्हणतात. सुईत दोरा ओवण्यासाठी जी जागा असते त्याला नेढं म्हणतात. जो त्या वाघाच्या डोळ्यात जातो, त्यालाच फक्त त्याचे सौंदर्य समजते. हा डोळा साधारणत: आडवा वीस-पंचवीस फुट आणि उभा  दहा-पंधरा फुट असेल. तिथे बराच वेळ बसून आम्ही सावधपणे खाली उतरून डाव्या हाताला निघलो, काही अंतर चालून गेल्यावर मागे वळून पाहिले...ज्या कातळात हा वाघाचा डोळा (नेढं) आहे तो कातळ समोरून पाहिला, तर अगदी हत्ती प्रमाणेच दिसत होता. 

        आपण जर हत्तीला समोरून पाहिले तर त्याचे डोके, कान, त्याच्या मागे दिसणारे त्याचे गलेलठ्ठ पोट याप्रमाणेच तो कातळ दिसतो. मी जेव्हा पहिल्यांदा हे नेढं आणि कातळ पाहिले होते, तेव्हा आणि आता यात खूप फरक पडलेला आहे. तेव्हा अगदी, जणू काही उभा हत्ती आपण समोरून पाहत आहोत, असेच भासायचे. म्हणून मी त्याला "हत्तीच्या पोटात, वाघाचा डोळा" असे म्हणतो. या हत्तीची अवस्था अजून खराब होण्याआधी संजीवनी माचीला नक्की भेट द्यावी, हेच या निम्मित आग्रहाचे सांगणे.

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation

"In an elephant's belly, a tiger's eye"

    The month of Shravan started, after about 15th August, the rains put on top gear and it started raining heavily every day. Roads, rivers, mountains and valleys began to flow. It was raining everywhere. Many shades of green grass began to appear on all the hills and hills that were bare in the scorching sun. Everything looked as if it had been washed clean.

    Young children get bald and in a few days they start having fine hair like on the head and the green color of baldness starts appearing. (Remember ..) The same bald head is often used for the word 'green'. Probably a factor as to why they're doing so poorly.

"Come on !!!! ...." My friend called from the front and just said hello, without saying hi.
"Come on !!! ... when?" I answered him as well.
"Let's go on Saturday, come to my house the day before, today is Tuesday." He said goodbye (we have already said 'goodbye') but this is also a goodbye.
"Yes, come, you bring your luggage, bring the last spice shave for sure, I will come on Friday" but I demanded the opposite and hung up the phone.

    It is easy to understand what is going on in the minds of two like-minded friends, in very few interactions between peers. You don't have to say too many things. So it is with both of us. It was raining. So the atmosphere was very beautiful. So how to sit at home in such an environment? So what's up ....

"Should I drive?"
"No, you are not used to my car ... and it is still very dark" I said kicking the car behind him.
"It's still dark, Ray, but you'll be red until you go," said my friend looking around.
"Oh, we have left at half past two..then it may not be dark. But if we leave early, it means that the road is cut off in the dark"

    I was driving at a speed of about 50-60. It was raining, dark on the road, some puddles of water, potholes, speed bumps approaching the village, all of them were driving with the upper-dipper light on. It was raining on my eyes, but I was enjoying driving in the rain. Wearing a raincoat didn't just blow the wind directly to the chest. The rest of us were soaking wet on the inside (even underwear). He had a raincoat and the rain was so heavy that his intention to protect himself from the rain was never thwarted by the rain. Once upon a time, there was a fork in the road.

    It was now quite deserted. The rice crop now seemed to be at least knee-high above the ground. The paddy fields were completely covered with water. Small and large white, red waterfalls in the green mountain-valley were immediately drawing your attention.

    When the base of the fort came, it must have been at half past six. You have to travel to Pune for work, but it is very annoying to stop the signal in the pouring rain at work, to drive with a raincoat, to work with half-wet clothes. But it still has to work. Then we always look for a fort to soak in the rain. The first choice is "Rajgad". Rajgad is the fort of kings and the king of forts.

    The new vehicle at the foot of the vehicle drove into the ground floor and reached Purohit's hotel straight ahead. It is said that these priests are relatives of Gagabhatta. We left at night, because of the rain and wind, we were hungry now. After eating hot steamed pooja and drinking tea, we immediately started climbing the fort. Just threw the raincoat in the bag now.

    Water flowed from mountain valleys, from footpaths. We were climbing the fort in the pouring rain, trampling the mud and grass underfoot, pushing the bushes aside. A crab was seen in the middle, a crowd of clouds would come to the side when the wind suddenly came, sometimes the rain would stop as if to turn off the tap. But as the speed of the car increased by changing one gear of the car and shifting to the next gear, it was starting to rain again.

    Now the thief's door of Padmavati Machi of the fort came. There was very little view of the valley from there. As soon as it rained, the clouds came down and it looked like fog everywhere. We bowed our heads as usual and greeted the burglar door.

"How cool !!!" Said the friend
"Yeah, the rocks and the water are so cold. We're soaking wet."

Water was constantly flowing through the door. The falling water was blown away by the wind. A string of pearls was seen flying in a nice encounter.

Let's go

"I'm hungry for jam now" we came up the stairs talking.

    Padmavati lake was full of water. The water in it looked like the waves of the sea when the wind came. As the pond filled to the brim, water was spilling down from the wall. It is not always possible to see or experience such a scene on the fort. So I am always attracted to the fort. Each time a different vision occurs.

    Using the food brought along, I ate the sandwiches by throwing them in the vertical masalashev bread under the guise of barudkhana.

"Come on, let's go to Direct Sanjeevani Machi" and immediately started marching.

    This is the longest Machi. It was no longer possible to walk around the rest of the fort. Because I wanted to go back in the afternoon. If you stay at least one night to see Rajgad, you can study the entire first capital.

    We went to Sanjeevani Machi. On the way, we came to the first door of Sanjeevani Machi, making our way through some slippery footpaths, loose stones, grass and mud. We proceeded through Machi's door. Machi on this fort is an independent fort. These too could fight the enemy with full force. We were walking chatting.

"It's raining a lot today," said the friend
"Yeah ... it's too late ... will you come? I'm going upstairs"
"Nikhya, oh don't go ... and ... I won't come up either"
"Oh, why are you scared, did you come for the first time. It is raining heavily and it will look heavy from above ..." So I started to climb the cliff.
"Nikhya, what shall I do?" The friend was terrified.
"You, look at how I'm climbing up the edge, leaning against the wall ..." I teased him and smiled.

In fact, he wanted to climb the cliff. But he did not dare.

"Wait, I'm coming too" he yelled at me. But by the time he made a sound, I had climbed a good seven to eight feet.
"Come on, but be careful ... If you fall, I won't come down and I won't even give you a hand. Come up on your own." I heard this sentence to allay his fears.

     He started climbing slowly ... I was watching him from above. Its already overwhelming when I reached up. He came to me almost crawling. From above we looked at Padmavati Machi. It was raining and windy. It was something that came up with so much effort. Courage should be done, but it should not be irrational. As Samarth says, "there should be continuous vigilance".

    We were now sitting in the tiger's eye. Yes it was sitting in the shape of an eye made of stone. He is also called Nedh. The place where the needle is tied is called Nedh. Only the one who goes into the eye of that tiger understands its beauty. This eye will be about twenty-five feet in height and ten to fifteen feet in height. After sitting there for a long time, we got down carefully. We got down and left. We walked some distance and looked back. Part of the rock, which looked like an elephant, had fallen off. When I first saw this Ned and Katal and now it is very different. It was as if we were standing in front of an elephant. Therefore, it is said that "the eye of the tiger in the belly of the elephant" is the reason for the request to visit the elephant before it worsens.

© Nikhil Devidas Vaze
9011096250

5 comments:

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले