"श्री बाबसाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"
मला साल नीट आठवत नाही!!! पण बहुदा १९९६-९७ असेल. आमच्या घरी संध्याकाळी एक वृत्तपत्र यायचे, महाराष्ट्र टाइम्स (मटा). हो माझ्या गावी त्यावेळी मटा हा पेपर मुंबई मधून यायचा. त्यामुळे सकाळी मुंबईहून निघणाऱ्या रेल्वेने हा पेपर आमच्याकडे संध्याकाळी यायचा.तसे पहिले तर आम्ही शिळ्या बातम्या वाचायचो.पण यातील इतर सदर बाबा आवडीने वाचायचे.
असाच एक दिवस पेपर घरी आला, बाबांनी हातात पेपर घेतला आणि त्यांचे वाचन सुरू झाले. आज त्यात एक सदर त्यांनी वाचले. साधरण आतमधील पानावर असेल.(आता पान नंबर नीटसे आठवतं नाही ) "शिवचरित्रमाला" सुरू झाली होती. क्रमशः रोज त्यात लिखाण येणार होते. साधरण वीतभर पानावर हे शिवचरित्र छापून आलेले होते.
"निखिल हे पहा काय आले आहे यात" बाबा म्हणाले.
"काय?"
"अरे आज पासून रोज शिवाजी महाराज यांचे चरित्र यात येणार आहे" असे म्हणत बाबांनी पेपर माझ्या हातात दिला.
मी ही उत्सुकतेने पेपर हातात घेतला आणि वाचायला सुरुवात केली. साधी-सोपी भाषा आणि साधे एखादे लाईन वर्क असलेले चित्र त्यात होते. वाचायला सुरुवात केली. तसतसा त्यात रस यायला लागला आणि रोज पेपर घरी येण्याची मी वाटच पाहू लागलो.
"काका आज उशीर झाला? द्या पटकन पेपर" असे म्हणतं बरेचदा पेपरवाले काका आले कि यांच्या कडून अधाशा प्रमाणे पेपर घेऊ लागलो..
खरंतर लहानपणी मी खूप काही वाचत नव्हतो, वाचले तर फक्त वृत्त पत्र बाकी पुस्तके अगदी क्वचितच. पण या लेखमाले मुळे हळू हळू वाचनाची आणि इतिहासाची आवड निर्माण होऊ लागली. आज पर्यंत ती तशीच टिकली आहे.या पेपर मधील आलेले सर्व लेख अजून पण माझ्याकडे जपून ठेवलेले आहेत.
पेपर मध्ये येणारी ही लेखमाला लिहणारी व्यक्ती म्हणजे बाबासाहेब पुरंदरे, मला त्यावेळी हे कोण आहेत? ते कसे दिसतात? हे काही काही माहीत नव्हते. फक्त त्यांचे शिवचरित्र लिखाण वाचत होतो आणि हळू हळू मनामध्ये शिवाजी महाराज आणि इतिहास यांची गोडी काय आहे हे चाखू लागलो.
काय त्यांची भाषा?केवळ अप्रतिम!!! वाचताना डोळ्यासमोर सगळे स्पष्ट उभे राहूत होते. हा वाचनामुळे बाबासाहेब यांच्या बद्दल विलक्षण उत्सुकता निर्माण व्हायला लागली.
पुढे जसा जसा मोठा होत गेलो आणि पुण्यात शिक्षणासाठी आलो तेव्हा मात्र पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे कोण आहेत हे पाहिले.
सन २००२ मध्ये त्यावेळी मी पुण्यातील कॉलेज मध्ये शिकत असताना एक दिवस बातमी समजली की दिनांक २२ ते २४ नोव्हेंबर रोजी शिवचरित्र व्याख्यानमाला होणार आहे आणि वक्ते "श्री बाबासाहेब पुरंदरे" असणार आहेत. गरवारे कॉलेजच्या मैदानात ही व्याख्यानमाला होणार होती. विशेष म्हणजे याला कोणतेच शुल्क आकारले जाणार नव्हते.
देवाच्या कृपेने आणि थोड्याफार पुण्याईने त्या व्याख्यानमाले साठी तिन्ही दिवस पूर्ण वेळ जाता आले. गर्दीत देखील बाबासाहेब पुरंदरे जे बोलले, ते जमेल तसे वहीत नोंदवून घेता आले.

मला अजून नीट आठवते, तो त्यांचा प्रखर आवाज, ती शब्द फेक, तो आवेश..त्या सगळ्या सन सनावळ्या, ते अगदी बारीक बारीक तपशील..जणू काही बाबासाहेब प्रत्यक्ष घटना, तो प्रसंग घडताना तिथेच उपस्थित होते असेच वाटत होते. त्यांच्या त्या व्याख्यानाने मी इतका भारावून गेलो की, त्या तीन दिवसात मला दुसरे काही काही सुचत नव्हते. डोळे बंद केले की त्यांची मूर्ती डोळ्यासमोर दिसायची. कानात, डोक्यात फक्त फक्त त्यांचा तो करारी,पोट तिडकिने इतिहास सांगणारा आवाज घुमत होता.
"महाराजांनी शाहिस्तेखानला... शास्त केली...आणि ते लाल महालातून बाहेर पडताना ओरडले!!! दगाss,दगाsss,गनीमsss,गनीमsss,...असे म्हणत, महाराजांनी लाल महाल सोडला आणि ते नदी ओलांडून आता असलेल्या पुणे मनपा येथील पूर्वीच्या पाटील वाड्यातून घोडे घेऊन निघाले....आताच्या बालगंधर्व चौक...जंगली महाराज रस्ता... नळ स्टॉप... कर्वे रोड... वारजे...सिंहगड...असे करत. खानाला शास्त करून पुण्यातून पसार झाले."
बाबासाहेब हा प्रसंग जेव्हा सांगत होते आणि आजच्या रस्त्यांची नावे घेत होते, त्यावेळी डोळ्यासमोर खरचं आपले शिवाजी महाराज असे घोड्यावर बसून जात आहेत हे चित्र दिसत होते.प्रसंग जिवंत कसा करावा हे त्यादिवशी मला समजले.याच गुणाचा कधी कधी अनुसरण करण्याचा प्रयत्न करत असतो.
कदाचित बाबासाहेब पुरंदरे यांची ही जाहीर झालेली शेवटची व्याख्यानमाला असेल. पुण्यातील वास्तव्यात या परिसाकडे आपोआप खेचला गेलो.पण कधी प्रत्यक्ष भेट झाली नाही. मी बरेचदा विचार केला, पण तो कृतीत येऊ शकला नाही. त्यांच्या बद्दल मनात आदर आणि भीती दोन्ही होते. म्हणून कधी हिम्मत झाली नाही म्हणा किंवा तशी भेट घ्यायची संधी आली नाही म्हणा. पण एकदा एका संस्थेत रक्तदान शिबिर होते. आम्ही काही मित्र तिथे रक्तदान करायला गेलो आणि संस्थेचा बोर्ड पाहिला. त्यात अध्यक्ष म्हणून बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव होते. पण नेमके आम्ही तिथे उशिरा पोंचलो आणि काही वेळा पूर्वीच बाबासाहेब तिथे येऊन भेट देऊन गेले असे समजले. त्याही दिवशी त्यांची भेट होता होता राहिले.
बाबासाहेब पुरंदरे हे व्यक्तिमत्व किती कर्मठ (इथे कामाबाबत), वेळ, शब्द पाळणारे, कामाबद्दल तळमळ असणारे, त्यांबद्दल समर्पण भाव, माणसं जोडण्याचे त्यांचे तंत्र या आणि अशा अनेक गुणांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे भाग्य पुढे मिळाले. आमच्या एका सरांच्या मदतीने विशाल मंदिराचा एक छोटा वाळूचा कण होण्याची संधी मला मिळाली. होय!!! त्याच सरांच्या आशिर्वादामुळे आणि बाबासाहेब पुरंदरे आणि सरांच्या घरोब्याच्या संबंधामुळे मला "जाणता राजा" या महानाट्यात काम करण्याची संधी मिळाली.

नाटक तसे पाचच दिवस होते. पण त्याची तयारी, प्रॅक्टिस, यासाठी बाबसाहेब यांचे किमान १०-१५ दिवस मार्गदर्शन , सहवास लाभला. त्यांची कामाची गती..ते असे पटपट चालायचे, त्यांची सगळीकडे करडी बारीक नजर असायची. त्यांचे अनेक रूपं मला या नाटका निम्मित पाहायला मिळाले.
"शेवटच्या प्रयोगानंतर आम्ही, तुम्हां सगळ्यांचे एक छोटेसे ' कौतुक ' करणार आहोत बरं का!!!" हा त्यांचा कौतुक शब्द, त्यांचा तो आशिर्वादासाठी वर केलेला उजवा हात, हे अजून माझ्या डोळ्यासमोर येत आहे. आपल्या आजीं-आजोबांनी प्रेमाने, मायेने आपल्या पाठीवरून हात फिरवावा तसेच त्यांचे 'कौतुक' हे शब्द मला वाटत होते.
याच नाटकाच्या वेळी एक दिवस मी पोशाख करून तयार बसलो होतो. प्रयोग सुरु व्हायचा होता. तेव्हा असे समजेल की बाबासाहेब बाजूच्याच खोलीत बसले आहेत. दारावरच्या त्यांच्या सेवेत असलेल्या एका मुलाला विचारले.
"पाच मिनटे भेटू का?" मी दारावरच्या मुलाला विचारले
"आत विचारून येतो" असे म्हणून तो आत गेला.
"हो, जाऊ शकता" त्याने रीतसर परवानगी दिली.
मी आणि एक मित्र खोलीत प्रवेश केला, आम्ही आत येताच बाबसाहेब यांनी प्रसन्न, हसऱ्या चेहऱ्याने आमचे स्वागत केले, आमचे नाव, मूळ गाव, काय करता अशी आत्मियतेने चौकशी केली. मी माझ्या सरांची ओळख सांगितली. त्यांच्या मुळेच या नाटकात भाग घेता आला असे सांगितले.
"बाबासाहेब आपला एक फोटो घेऊ का?" मी जमेल तितक्या आर्जवी स्वरात विचारले.
"हो का नाही!!!, घ्या की. पण आपण पण या असे जवळ" बाबासाहेब आपल्या पेक्षा वयाने लहान जरी असेल तरी त्यांना पण आदराने बोलतात,म्हणजे अरे तुरे करत नाहीत.
"नको, फक्त आपलाच फोटो घेतो. माझी योग्यता नाही आपल्या जवळ उभे राहून फोटो घेण्याची" मी असे सांगताच त्यांच्या चेहऱ्यावर बारीक हसू आले. त्यांनी मायेने मला परत एकदा सांगून पहिले, पण माझी काही इच्छा झाली नाही.
"नको,फक्त आपलाच फोटो घेतो" मी त्यांचा फोटो घेतला, निघताना त्यांना वाकून नमस्कार केला.
"औक्षवांत व्हा!!!" त्यांनी मायेने पाठीवरून हात फिरवत असा आशिर्वाद दिला त्या परिसाचा स्पर्श त्यादिवशी समजला, त्यातील प्रेम, काळजी, आपलेपणा, ओलावा अनुभवता आला.
आज श्री बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म दिवस, वयाच्या शंभरीत असून देखील तरुणांना लाजवेल अशी त्यांची चिकाटी, धडपड, अभ्यासू वृत्ती हे आणि असे अनेक गुण आपल्या अंगी येवो हीच त्यांच्या आणि ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या कडून असेच अखंड इतिहास अभ्यास करणे आणि त्याचे सादरीकरण करण्याची प्रेरणा मिळो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
महाराष्ट्र भूषण "श्री बाबसाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"
©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Happy Birthday to Mr. Babasaheb Purandare"
I don't remember the year well !!! But it will probably be 1996-97. A newspaper used to come to our house in the evening, Maharashtra Times (Mata). Yes, in my village at that time, Mata used to come from Mumbai. Therefore, this paper used to come to us in the evening by train departing from Mumbai in the morning. At first, we used to read stupid news. But other of these, Baba used to read with interest.
One day the paper came home, Baba took the paper in his hand and started reading it. He read a column in it today. Normally it will be on the inside page. (Now I can't remember the page number clearly) "Shivacharitramala" had started. Gradually, it would be written every day. This Shivcharitra was printed on a normal page.
"Look what Nikhil has come up with," said Baba.
"What?"
Baba handed over the paper to me saying, "Oh, the character of Shivaji Maharaj will come in it every day from today."
I eagerly picked up the paper and began to read. It had pictures with simple language and a simple line work. Began to read. Gradually I became interested in it and I started waiting for the paper to come home every day.
"Uncle, is it late today? Give me the paper quickly," he says.
In fact, as a kid, I used to read a lot. But this writing gradually led to a love of reading and history. It has remained the same till today. All the articles in this paper are still with me.
The person who wrote this article in the paper is Babasaheb Purandare, who are these people to me at that time? What do they look like? Some did not know this. I was just reading his Shivcharitra writing and slowly began to taste what is the sweetness of Shivaji Maharaj and history in my mind.
What is their language? Just awesome !!! Everyone was clearly standing in front of my eyes while reading. This reading aroused great curiosity about Babasaheb.
Later, as I grew up and came to Pune for education, I first saw who Babasaheb Purandare was.
In the year 2002, while I was studying in a college in Pune, one day I heard the news that a Shivcharitra lecture series would be held on 22nd to 24th November and the speaker would be "Shri Babasaheb Purandare". The lecture was to be held on the grounds of Garware College. What is special is that there was no charge for it.
By the grace of God and a little kindness, I was able to go full time for those three days. Even in the crowd, what Babasaheb Purandare said could be recorded in a book.
I still remember it very well, it was his loud voice, it was throwing words, it was passion .. all those sun festivals, those very fine details..as if some Babasaheb was present at the time of the incident. I was so overwhelmed by his lectures that I did not know anything else during those three days. Closing his eyes, his idol was visible to the naked eye. In his ears, in his head, there was only the sound of him telling history.
"Maharaj punished Shahistekhan ... and he shouted as he came out of the Lal Mahal !!! He took horses out of the castle .... now Balgandharv Chowk ... Jangli Maharaj Road ... Nal Stop ... Karve Road ... Warje ... Sinhagad ... doing so. After defeating Khan, he passed through Pune. "
When Babasaheb was narrating this incident and taking the names of today's roads, I could see the picture of Shivaji Maharaj sitting on a horse in front of my eyes. That day I understood how to make the event alive.
This may be Babasaheb Purandare's last published lecture series. In fact, I was drawn to this area in Pune. But I never met him. I thought about it a lot, but it didn't work out. There was both respect and fear in my mind about them. So say you never had the courage or say you never had a chance to meet. But once there was a blood donation camp in an organization. Some of us friends went there to donate blood and saw the board of the organization. Babasaheb Purandare was named as the chairman. But we arrived there late and it was understood that Babasaheb had visited there a few times earlier. That was the day they met.
Babasaheb Purandare is a person who is very hardworking (here about work), time, keeping words, passionate about work, dedication towards him, his technique of connecting people and many such qualities. With the help of one of our sarees, I got a chance to become a small sand particle of a huge temple. Yes !!! Thanks to the blessings of the same Saran and the family relationship of Babasaheb Purandare and Saran, I got the opportunity to work in the great play "Janata Raja".
The play lasted only five days. But for his preparation, practice, Babasaheb's guidance for at least 10-15 days, I got companionship. The speed of his work..he used to walk like this, he used to have a keen eye everywhere. I got to see many of them in this play.
"After the last experiment, we are going to give you all a little 'appreciation' !!!" This word of appreciation, his right hand raised for blessing, is still coming before my eyes. I wanted my grandparents to move their hands on my back with love and affection and their words of 'appreciation'.
One day during this play, I was dressed and ready. The experiment was about to begin. Then it will be understood that Babasaheb is sitting in the next room. Asked one of the boys in their service at the door.
"See you in five minutes?" I asked the boy at the door
"Come in," he said, and went inside.
"Yes, you can go," he agreed.
A friend and I entered the room. As soon as we entered, Babasaheb greeted us with a happy, smiling face. I introduced myself. He said that it was because of him that he was able to participate in this play.
"Babasaheb, can I take a photo of you?" I asked in a pleading tone.
"Yes, why not !!!, take that. But you are so close."
"No, I only take photos of you. I don't deserve to stand near you and take photos" I said and a small smile appeared on his face. He looked at me lovingly again, but I didn't want to.
"No, just take a photo of you" I took a photo of them, bowed to them as they left.
"Be axed !!!" He felt the touch of the area that Maya blessed him with his hand on his back, he could feel the love, care, closeness, moisture in it.
Today is the birth anniversary of Shri Babasaheb Purandare. It is their prayer that they will be inspired to study and present such an unbroken history.
Maharashtra Bhushan "Happy Birthday to Shri Babasaheb Purandare"
© Nikhil Devidas Vaze
9011096250
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि मानाचा मुजरा
ReplyDeleteति. बाबासाहेब पुरंदरे या महान आणि ऋषितुल्य महात्म्याला शतशः प्रणाम आणि अनंत शुभेच्छा
ReplyDeleteApratim anubhav👏 ..Happy birthday to babasaheb purandare🙏
ReplyDelete