"केळीची पानं
पावसाळा सुरू झाला की गप्पगार घरात बसून राहणारा आमचा कोणाचाच पिंड नाही, म्हणजे आमच्या मित्र परिवाराचा. अनेकांना असे वाटते की मस्त पाऊस पडतोय. तो आपण आपल्या घराच्या खिडकीत बसून पाहावा, सोबत एक गरम गरम वाफाळलेला चहाचा कप असावा, त्याच्या बाजूला कांदा किंवा बटाटा भजी प्लेट असावी आणि हे सगळे उपभोगतं "आज पाऊस खूप आहे " असे नेहमीचे वाक्य म्हणत घरातच बसणाऱ्यात आम्ही नाहीत.पाऊस सुरू झाला की आमची मनसोक्त भटकंती सुरू होते.पण आम्ही उगाच कोणत्यातरी धबधब्यात, तलावात, धरणात जाऊन डुंबत बसत नाहीत. आम्ही आपले पाऊस सुरू झाला की कोणत्यातरी गडावर मोहीम आखतो.निसर्ग मुक्त हातांनी जे देतो आहे ते पाहायला आणि ऐतिहासिक वास्तूचे जाऊन दर्शन घेण्यात जास्त आनंद मिळतो. मी हे जाणतो कि प्रत्येक जण आपापल्या प्रमाणे आनंद घेतो. पण आमचा पिंडच वेगळा आहे त्याला काय करावे?
"यावेळी पुरंदरला जाऊयात का?"
तसा पावसाचा जोर कमीच होता. नुकताच पावसाळा सुरू झालेला होता. जून महिन्यातील पहिल्या दुसऱ्या पावसानंतर जाणे सोपे असते. त्यात जर आपल्या सोबत काही नवखे, सावत्र मित्र (आपल्या मित्राचा मित्र) असतील तर याच वेळी जाणे योग्य आहे. ऐन पावसात नवखे पोरं गळतात. म्हणून सुरुवातीच्या पावसात जाणे आम्ही नक्की केले. फक्त यावेळी सर्व माहिती गोळा करण्याची जबाबदारी दुसऱ्या एका मित्राने घेतली.आम्ही बाकी सगळ्यांनी त्याला फक्त मम म्हंटले.
"पातेले, झारा, स्टोव्ह, काडेपेटी, शिधा (तांदूळ, डाळ, मसाले, तेल मोहरी, इतर पूरक भाज्या), जेवणाच्या प्लेट, काकडी, टोमॅटो आले का सगळे!!!" मी वही पाहत चेक करत होतो.
"अरे पण हा स्टोव्ह पेटवायचा कसा? यात रॉकेल लागेल न" एका मित्राने बरोबर प्रश्न उपस्थित केला.
आमच्या कोणाच्याच कामात रॉकेल आणायचे लक्षात राहिले नव्हते. मग काय पटकन एक मित्र रमेश डाईंग जवळ एक सायकलचे दुकान आहे. तो दुकान मालक चोरून रॉकेल विकायचा ही माहिती समजली होती. त्याच साठी मित्र तिकडे गेला देखील. तो मित्र रॉकेल बाटलीत घेऊन आल्या बरोबर आम्ही सगळे सामान घेऊन बस करिता स्वारगेटला पोंचलो.
पुण्यातून पुरंदरला जाण्यासाठी तसे दोन रस्ते आहेत. एक सासवड मार्गे आणि दुसरा सातार रोडवरून केतकावळे रस्ता. आम्ही सासवड मार्गे निघालो होतो. चर्चेत, योजनेत आणि प्रत्यक्ष प्रवासात पोरं गळत गळत आम्ही फक्त बोटांवर मोजता येतील इतकेच मित्र प्रत्यक्ष ट्रेक साठी शिल्लक राहिलो. खरंतर खूप जास्त जण असतील तर ट्रेक, ट्रीप याचा जरा खेळ खंडोबाच होतो. मर्यादित संख्या असल्यावर ट्रेकचा आनंद जास्त घेता येतो. नाहीतर फक्त संख्या जास्त असली की त्यांची काळजी,संरक्षण, जबाबदारी यातच वेळ जातो.
पुरंदर तसा चढायला सोपा, पण मुख्य दरवाज्यापासून बालेकिल्याचे अंतर खूप आहे. पहिला दरवाजा आला कि असे वाटते कि बसss पोंचलो आपण. पण बालेकिल्ला, पुरंदरेश्वर मंदिर यातील अंदर जास्त आहे. तसे पाहिले तर नुकताच पाऊस सूरु झाला होता, पण पुरंदर हा दुष्काळ भागातच मोडतो. अजून नीट पाऊस सुरु झाला नसल्यामुळे गड अजून संपूर्ण हिरवा झालेला नव्ह्ता. पोरं घाम गाळत आणि पुसत गड चढत होती. सोबत नेलेल्या पाण्याच्या बाटल्या संपायला आल्या होत्या.
आम्ही गडावर जाऊन मस्त पैकी राम खिचडी करणार होतो. म्हणजे तसेच नियोजन केलेले होते. त्यामुळे एकतर चढण, त्यात खिचडीसाठी लागणारे सामान, डोक्यावरचे उन यामुळे जास्तच त्रास होत होता. कसे बसे एकदाचे गडावर पोंचलो. आम्हा सगळ्यात आचारी म्हणून माझा एक मित्र आणि मी, हेच असल्यामुळे बाकी पोरं फक्त आरामात आडवे झाले. आम्ही काही वेळांनी पुरंदरेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शंभू महादेव हा शिवाजी महाराज यांचे दैवत, त्यामुळे या मंदिरात कधी तरी शिवाजी महाराज, महाराणी सईबाई साहेब पण आले असतील असे वाटत होते. त्याचे कारण म्हणजे संभाजी महाराज यांचा जन्म याच पुरांदारावर झाला आहे. त्यामुळे आई आणि तान्ह्या संभाजीने या पुरंदरेश्वर मंदिरात प्रवेश करून महादेवाचे दर्शन नक्की घेतले असेल.
मंदिराच्या मागील बाजूला पूर्ण दगडी अंगण होते. त्याच मागील बाजूला स्टोव्ह पेटवून खिचडी तयार कारणासाठी, वाऱ्याने स्टोव्ह विजू नये म्हणून दगडाची देवडी केली (आडोसा).आमच्यासाठी स्टोव्ह पेटवणे हा नवीन अनुभव (त्याबाबत नंतर कधी तरी आपल्याशी बोलेन) होता. एकदाचा तो स्टोव्ह पेटला. खिचडीची प्राथमिक तयारी बाकी मित्रांनी केलेलीच होती. आम्ही फक्त फोडणी करणे आणि खिचडी शिजे पर्यंत ती पाहणे हेच काम करणार होतो. त्याप्रमाणे खिचडी पातेल्यात फोडणीस घातली. सोबत नेलेल्या पाण्याच्या बाटल्या त्यात रित्या केल्या आणि खिचडी शिजायला ठेऊन गप्पा मारत बसलो.
काही वेळाने पातेल्यातील पाणी आळू लागले. त्याची वाफ हवेत उडून जायला लागली. बिरबलच्या खिचडी सारखी ती काही केल्या शिजेना. आम्ही पाणी टाकू लागताच पाण्याची वाफ व्हायला लागली. सोबतचे सगळे पाणी संपले. मग काय? मित्र एकाएकी चारी दिशांना पाण्यासाठी धावले. माझी आणि मित्राची हालत खूप वाईट झाली. एकतर सगळ्यांना भुका लागल्या होत्या, त्यात ही खिचडी काही केल्या शिजेना...त्यातील पाणी वाफच होऊ लागले...आम्ही दोघे पण अगदी गलितगात्र होऊन बसलो होतो.
"काका खिचडी करतोय" मित्र म्हणाला.
"अच्छा, मगss झाली काss?" आमच्या रडवेल्या चेहऱ्याकडे पहात ते म्हणाले.
"नाही हो शिजतच नाहीये" मी अगदी अगतिक होत म्हटलो.
"अरे कशी शिजेल?झाकण कुठे आहे यावर?"
"हो कि" आम्ही सगळे सामान आणले पण पातेले झाकायला त्यावर झाकणच आणायचे विसरलो होतो.
"मग आता काय करू काका?" तितक्यात मित्र पण जमेल तितके पाणी घेऊन आले.
"जा रे पोरांनोss, दरीतून 'केळीची पानं' आणून दया यांना. आता आले आहेत काही दिवसापूर्वी नुसते जळके केळीचे खांब होते. जाss आणा पटकन" काकांनी अगदी देवा प्रमाणे आम्हाला मार्गदर्शन केले. अशा अनेक प्रचीती येत असतात.
मित्र दरीतून केळीची पानं घेऊन आले. त्यातील मोठ मोठी पानं घेऊन खिचडीचे पातेले झाकले आणि वाफ कोंडल्यामुळे काही वेळातच खिचडी पाहिजे तशी शिजली. त्यादिवशी पासून आज पर्यंत केळीची पानं पाहिले कि, मला हा प्रसंग आठवतो. उरलेल्या केळीच्या पानांवर जेवून आम्ही केळीच्या पानांचे आभार मानले.
इतर अनेकांना केळीची पानं हि सत्यनारायण पूजा, जेवण, यासाठी नक्की लक्षात असतील, पण माझ्यासाठी तर हि पानं होती म्हणून त्यादिवशी जेवायला मिळाले आणि मागे सिंहगडाच्या प्रसंगी आपल्याशी बोललो आहेच,(https://muktalikhan2021.blogspot.com/2021/04/my-sinhagad-love-part-1.html) त्यादिवशी दरीत याच केळीच्या बुंध्यात पाय अडकून जीवन मिळाले होते. सह्याद्री मुक्त हातांनी देतो आहे, फक्त आपण ते नीट जपले पाहिजे.
९०११०९६२५०
We were going to go to the fort and make Ram Khichdi. I.e. well planned. So either climbing, the stuff needed for khichdi in it, the heat on the head was causing more trouble. How did we reach the fort once? One of my friends and I, as the chef, was the only one of us, so the rest of the kids just lay there comfortably. After some time we went to Purandareshwar temple and took darshan. Shambhu Mahadev is the deity of Shivaji Maharaj, so it seemed that Shivaji Maharaj and Maharani Saibai Saheb may have come to this temple sometime. The reason is that Sambhaji Maharaj was born on this Purandara. Therefore, mother and Tanhya Sambhaji must have entered this Purandareshwar temple and taken darshan of Mahadev.
At the back of the temple was a full stone courtyard. For the purpose of making khichdi by lighting the stove on the same rear side, a stone porch was made so that the wind would not blow the stove (adosa). Lighting the stove was a new experience for us (I will talk to you about that later). Once he lit the stove. The initial preparation of khichdi was done by the rest of the friends. All we had to do was blow it up and watch it until it was cooked. In the same way, Khichdi put it in a bowl. We filled the water bottles we had brought with us and sat chatting while cooking khichdi.
After some time, the water in the pot started dripping. Its vapor began to fly through the air. She didn't do anything like Birbal's khichdi. As soon as we started pouring water, the water started evaporating. All the accompanying water ran out. So what The friend suddenly ran in all four directions for water. My friend and I were in a very bad mood. Either everyone was hungry, the khichdi was not cooked in it ... the water in it started evaporating ... but we were both very upset.
"Uncle is messing around," said the friend.
"Okay, then why?" He said looking at our crying faces.
"No, it's not cooking," I said, feeling helpless.
"Hey how do you cook? Where's the lid?"
"Yeah Al that sounds pretty crap to me, Looks like BT aint for me either.
"So what do we do now, uncle?" At that time, friends brought as much water as they could.
"Ja re poranno ss, bring 'banana leaves' from the valley to Daya. Now they have come. A few days ago there were only burnt banana pillars. Bring jass quickly" Uncle guided us like a god.
Friends brought banana leaves from the valley. He took large leaves from it and covered the khichdi bowls and cooked the khichdi in a short time as it was steaming. I remember seeing banana leaves from that day till today. We ate the rest of the banana leaves and thanked the banana leaves.
For many others, banana leaves are Satyanarayana Pooja, meal. Definitely will remember for this, but for me it was a page so I got to eat that day and I have spoken to you on the occasion of Sinhagad back then (https://muktalikhan2021.blogspot.com/2021/04/my-sinhagad-love-part-1.html) On that day, he got his life stuck in the same banana tree in the valley. Sahyadri is giving with free hands, only we should take care of it.
9011096250










