"वासोटा"
"सर्रss सर्रsss सर...सररss... सरसर..." आवाज करत तोफेची बत्ती पेटत पेटत तोफेच्या नाळेपर्यंत आली (बत्ती लावायचे छिद्र ) आणि काही क्षणात तोफेतून धडाडss धमss धड असा आवाज झाला. आवाज करून तोफेतून गोळा सुटला खरा पण तो गडावर आपटलाच नाही. बुरुजाला काहीच इजा झाली नाही. परत तोफा समोर सरकवत असाच प्रयत्न सुरू झाला. सर्रss सर्रsss सररss सरसर आवाज... तोफगोळा उडाला...पण तोही गडाच्या तटा बुरुजाला कोणतीच इजा करू शकला नाही.
गडावरून पण गड राखण्यासाठी किल्लेदार शर्थीने प्रयत्न करत होता. गडावरून तोफा, बंदुका, हुक्के (छोटे हात गोळे) यांचा मारा सुरू होता. यामुळे विजापूरकर सैन्याचे नुकसान होत होते. त्यांना पुढे सरकणे अथवा तोफा समोर सरकवून मारा करणे अशक्य होत होते.
विजापूरकरांकून सिद्दी जौहर हा मात्तबर सरदार अनेक महिन्यांपासून पन्हाळा किल्ल्याला कडक वेढा देऊन बसला होता. किल्ल्याच्या चारी बाजूला त्याने आपले मोर्चे बांधले होते. पण किल्ला काही केल्या पडत नव्हता. आपल्या ताफ्यातील असलेल्या तोफेचा गोळा तटापर्यंत पोंहचू शकत नाहीये हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे आता यावर काय उपाय शोधला पाहिजे याचाच तो विचार करत होता. दूरवर मारा करणाऱ्या तोफा जर आपल्याला मिळाल्या तर आपण हा गड नक्की जिंकू याची खात्री त्याला होती. सिद्दी जौहर खूप मेहनती, प्रामाणिक आणि चिवट ( म्हणजे एका गोष्टीचा ध्यास घेतला तर ती गोष्ट पूर्ण करणारा) सरदार होता.
त्यावेळी अशा लांबवर मारा करू शकणाऱ्या तोफा या राजापूर ( जिल्हा रत्नागिरी ) मधील इंग्रजांकडे (ब्रिटिश) होत्या याची त्याला माहिती होती. कारण राजापूर तेव्हा विजापूरकरांकडे होते. सिद्दी जौहरने या राजापूर मधील इंग्रज वखारीचे ( म्हणजे गोडाऊन म्हणा) अधिकारी यांच्या सोबत काही पत्रव्यवहार केला. त्यानंतर आपले काही विश्वासू माणसं साधारण ४००-५०० पायदळ, काही घोडेस्वार, पाच पालख्या आपल्या माणसांसोबत राजापूरकडे रवाना केल्या. साधारण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस असेल. सिद्दी जौहरने पाठवलेल्या माणसांनी सर्व तोफगोळे व इतर सामान पारखून घेतले. पुढे ही असाच दारुगोळा विकावा याची त्यांनी मागणी पण केली.
त्यानंतर राजापूरच्या वखारातीतून एक लांबमारा करणारी तोफ, पन्नास तोफगोळे घेऊन इंग्रज अधिकारी हेंरी रेव्हिंग्टन, सिंघॅम/ मिंघॅम, गिफर्ड आणि वेलजी हेही पन्हाळ्याकडे निघाले. आपल्या पाहुण्यांचे आणि मदतनिसांचे कोल्हापुरात जोरदार स्वागत केले गेले. आता पन्हाळा काही अंतरावर होता.
कोल्हापुरात मुक्कामात असताना रेव्हिंग्टन दिनांक ५ एप्रिल १६६० रोजी लिहतो " पन्हाळा किल्ल्याला प्रचंड वेढा पडला आहे आणि त्यात राणी ( बडी बेगम ) हीचा शिवाजी हा महाशत्रू आपल्या जवळ जवळ पाच हजार लोकांसह किल्ल्यात अडकून पडलेला आहे. याच साठी आपले गोळे विकत घेऊन किल्ला जिंकता येईल असे राणीच्या सरसेनापती सलाबतखान याला वाटते. त्याचसाठी त्याने अधिक तोफगोळे विकत घेण्याचे वचन दिले आहे." हा रेव्हिंग्टन पक्का धूर्त व्यापारी तर होताच पण लोभीही होता. त्याचमुळे त्याने या संधीचा लाभ घ्यावा असा विचार केला होता.
दिनांक १० एप्रिल रोजी सगळे साहित्य आणि इंग्रज पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेे. सिद्दी जौहरने नेमून दिलेल्या जागी तोफांचे मोर्चे लागले. हे मोर्चे साधरण किल्ल्याच्या तीन दरवाजा या भागाच्या जवळ लागले.
सर्रssसर्रsss सर सररss सर सर आवाज करत तोफेची बत्ती पेटली आणि एक प्रचंड गोळा गडाच्या तटाला येऊन धडकला, पण गडाचे कोणतेच नुकसान झाले नाही. किल्ल्यातून किल्लेदार, महाराज सगळे बुरुजावर आले. " ये कैसे झाले?" असाच प्रश्न कदाचित सर्वांना पडला असेल.
किल्याच्या बुरुजावरून महाराजांनी पाहिले तर काय...?
धूर्त व्यापारी असलेले हे इंग्रज आपल्या विरुद्ध त्यांचे झेंडे तोफेवर लावून आपल्याच विरुद्ध तोफ डागत आहेत. खरंतर अफजलखान जेव्हा स्वराज्यावर चालून आला आणि त्याला त्याच्या मोहिमेत काही सामुग्री कमी पडू नये म्हणून अल्ली आदिलशाहने काही जास्तीची सामुग्री, दारूगोळा समुद्रात गलबतांनी (जहजांनी) पाठवले होते. पण ती सर्व गलबते मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतली. याच वेळी जंजिरेकर सिद्दी विरुद्ध दारूगोळा पुरवण्याचे गुप्त आश्वासन देऊन कैदेत पडलेल्या आपल्या इंग्रज माणसांची सुटका याच हेंरी रेव्हिंग्टनने केरुन घेतलेली होती. तसेच चाणाक्ष शिवाजी महाराजांनी दूर दृष्टीचा विचार करून अजून एक आश्वासन याच्याकडून घेतले होते. ते म्हणजे, " स्वराज्याच्या कोणत्याही शत्रूला दारूगोळा विकता येणार नाही."
आपले म्हणणे मोडून, तरी देखील आपले झेंडे लावून हा इंग्रज हेंरी रेव्हिंग्टन आपल्या विरुद्ध गोळे डागत आहे हे पाहून महाराज संतापले. याचा बंदोबस्त करावाच लागेल. हे शिवाजी महाराजांनी मनात नक्की केले असावे.
शिवाजी महाराज किल्ल्यात अडकून पडले होते वेढा सुरूच होता. पण तरी देखील स्वराज्य विस्तार सुरू होता. मोरे यांच्या जावळी मधील काही भाग अजून स्वराज्यात आलेला नव्हता. जावळीच्या जंगलात असलेला विजापूरकरांच्या ताब्यातील एक अती दुर्गम, निर्मनुष्य असा एक वनदुर्ग अजून स्वराज्यात यायचं बाकी होता. जेधे आणि बांदल यांच्या एका मोहिमेत याच कठीण वेळेत म्हणजे आपले राजे वेढ्यात असताना. मराठ्यांनी शके १५८२ च्या ज्येष्ठ शु. अष्टमीला म्हणजेच इंग्रजी दिनांक ६ जून १६६० रोजी विजापूरकरांकडून वासोटा किल्ला जिंकला. ( आजची तारीख) 
वासोटा किल्ला म्हणजे घनदाट जंगलात बसलेला वाघच होता. या वनदुर्गाचा सभोवतालचा सर्व परिसर पाहून शिवाजी महाराजांनी त्याचे नाव बदलून 'व्याघ्रगड' असे केले होते. असा हा दुर्गम गड स्वराज्यात पहिल्यांदा दाखल झाला. महाराज अजून वेढ्यातच होते पण त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि दिनांक १३ जुलै १६६० रोजी रात्री पन्हाळा किल्ला सोडून विशाळगडाच्या दिशेने निघाले. तो इतिहास आपल्याला आता सांगत नाही.
महाराज सुखरुप सर्व संकटांवर मात करून आता राजगडावर परत आले. तिकडे पुण्यात आधीच शाहिस्तेखान आला होता. त्याचा बीमोड कसा करावा? याचं विचारात असताना हेरांकडून आलेल्या बातमीमुळे नवीन मोहीम आखून उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केला. याविषयी आपल्याला या आधी बोललो आहेच. "निरोप- https://muktalikhan2021.blogspot.com/2021/05/blog-post_11.html"
कारतलबखानाचा पराभव करून महाराज सरळ तळकोकणात उतरले. तळकोकण अजून विजापूरकरांकडेच होते. आधी दाभोळ...चिपळूण...संगमेश्वर...देवरूख..आणि आता त्यांची नजर वळली ती राजापूरवर. महाराज ३००० पायदळ आणि १००० घोडेस्वार यांना घेऊन राजापूरच्या वेशीबाहेर धडकले. गावातील काही प्रमुख मंडळींकडून भेटीस बोलावून खंडणीची मागणी केली. खंडणी फक्त बड्या बड्या व्यापाऱ्यांकडून मागितली. गरीब लोकांना कोणताच त्रास दिला नाही. त्यातच महाराज आल्याचे समजताच येथील इंग्रज वखारीचा प्रमुख हेंरी रेव्हिंग्टन, रँडॉल्फ टेलर, रिचर्ड टेलर, फिलीफ गिफर्ड हे अगदी साळसूदपणे महाराजांना भेटायला आले.
त्यांना पाहताच महाराज संपातले, आपल्याशी केलेला दगा त्यांच्या चटकन डोळ्यासमोर आला. आपण वेढ्यात अडकलो हे पाहून या या हरामखोर इंग्रजांनी स्वराज्याविरुद्ध त्यांचे झेंडे लावून तोफा डागल्या.आपल्याशी केलेला करार मोडला. यांना शासन झालेच पाहिजे.
"पकडा यांना, यांची सगळी वखार जप्त करून टाका" रागातच महाराजांची आज्ञा केली.
महाराजांची ही आज्ञा मिळताच मराठ्यांनी त्यांना कैद केले आणि कुदळी, फावडे घेऊन संपूर्ण वखार खणून काढली. यात महाराजांना सुमारे २३ ते २४ हजार होनांची रक्कम मिळाली. तसेच बाकीचे गोरे, हेही मराठ्यांच्या हाती लागले. या सगळ्या कैद्यांना आधी सोनगडी आणि मग वासोटा येथे पाठवले. यातील एक दोन इंग्रज हे राजापूरच्या कैदेतच मरण पावले.
वासोटा हाच किल्ला या सगळ्या कैद्यांना ठेवण्यासाठी का वापरला असेल? तर माझ्या मते वासोटा हा त्यावेळचा अंदमान किंवा काळेपाणी याची शिक्षा असेल. अती घनदाट जंगल, त्यात हा एकटा किल्ला, हिंस्र प्राणी, वाघ, बिबटे, सिंह, साप यांचा एक नैसर्गिक आधार येथे होता. अशी मान्यता आहे की वसिष्ठ ऋषी येथे तपासाठी आले होते. त्याला म्हणून वसिष्ठा डोंगर हे नाव पडले. पण अपभ्रंश होत होत आता वासोटा असे झाले. पुढे मग शिलाहार वंशाच्या दुसऱ्या भोज राजाने येथे नीट गड बांधला असा उल्लेख सापडतो. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर याच गडावर स्वराज्याचे अधिकृत (ऑफिशल) तुरुंग होता. जसे इंग्रजांना या तुरुंगात ठेवले. तसेच समुद्री चाचे (दरोडेखोर) हे देखील याच गडातील तुरुंगात ठेवलेले होते.
वासोटा हा कायम अती दुर्गम आणि निर्मनुष्य असाच गड आहे. पुढे हा किल्ला औंधचे पंतप्रतिनिधी यांच्या एका उपस्त्रीने 'ताई तेलीण' यांनी घेतला. पण लगेच पुढच्या वर्षी पेशव्यांचे शूर सरदार बापू गोखले यांनी पंतप्रतिनिधी यांचा पराभव केला आणि किल्ला घेण्याचे अनेक प्रयत्न करून देखील, अगदी त्यांच्या नोंदी प्रमाणे सांगायचे झाले तर.
" डोंगर झाडी मनस्वी अडचण बहुत. किल्ला बहुत बाका, सात कोश आणि अडीच मास झाडी तोडली तेव्हा मार्ग झाला" याचा अर्थ जवळ जवळ ३ महिने हत्ती, घोडे यांची मदत घेऊन किल्ल्या जवळचे जंगल कापले तेव्हा कुठे किल्ला जिंकायचा मार्ग मोकळा झाला. तरी हा गड मिळवायला त्यांना सहा सात महिने लागले. ताई तेलीण हिने हा किल्ला धान्यकोठार आणि इतर ठिकाणांचे नुकसान झाल्यामुळे सोडला. तिच्या या पराक्रमाची साक्ष म्हणून एक काव्य लिहले गेले. याची इतिहासात नोंद आहे का हे माहित नाही? या काव्याचा वापर प्र.के. अत्रे यांच्या श्यामची आई (१९५३) मधील चित्रपटामध्ये केलेला आहे.
पुढे जेव्हा मराठे आणि इंग्रज यांचे शेवटचे युद्ध सुरू होते सन १८१८ च्या शेवटी. त्यावेळी किल्लेदार भास्कर पंत याने अनेक तास हा किल्ला लढवला. त्याही वेळी अनेक इंग्रज कैदी याच वासोट्यावर कैद होते. पण गड पडला आणि इंग्रज कैदी हे या वासोट्यावरून मुक्त झाले.
आज अनेक लोक, पर्यटक या गडावर जातात. पण या किल्ल्याचा खरा इतिहास, त्याचे महत्व काय? याचसाठी या गडाचा हा अल्प परिचय माझ्या बुध्दीप्रमाणे आपल्या समोर मांडला. आज याच गडाला स्वराज्यात येऊन ३६१ वर्षे पूर्ण झाली.
संदर्भ:- वा सी बेंद्रे, ब.म.पुरंदरे, विजय देशमुख.प्रो.विजयानंद गद्रे.
९०११०९६२५०
English Translation
"Vasota"
"Sarrssrrrrrrrrrrrrrrrrr ...The sound of the cannon came to the barrel of the cannon (the hole to light the lamp) and in a few moments there was a thud. It is true that the cannon escaped from the cannon but it did not hit the fort. The bastion was not harmed. A similar attempt was made by sliding the gun back in front.
Srr sr sr sr sr sr sr sr Sounds ... cannonballs fired ... but he could not do any damage to the fort's bastion.
From the fort but the fort keeper was trying his best to maintain the fort. From the fort, cannons, guns, hookahs (small hand balls) were being fired. This was causing loss to the Bijapurkar army. It was becoming impossible for them to move forward or to hit the gun.
Siddi Johar, a powerful chief from Bijapur, had laid siege to Panhala fort for many months. He had built his fort around the fort. But the fort did not fall into anything. He noticed that the cannonballs in his convoy could not reach the shore. So he was thinking of a solution. He was sure that if we got the long-range guns, we would win this fort. Siddi Jauhar was a very hardworking, honest and hardworking (that is, one thing that can be accomplished).
At that time, he knew that the British in Rajapur (Ratnagiri district) had guns that could hit at such a distance. Because Rajapur was then with Bijapurkar. Siddi Jauhar had some correspondence with the officials of the English warehouse in Rajapur. After that some of his loyal men sent about 400-500 infantry, some cavalry, five palanquins with their men to Rajapur. Normally it will be the beginning of the month of April. The men sent by Siddi Johar inspected all the artillery and other items. He also demanded to sell such ammunition later.
Henry Revington, Singham / Mingham, Gifford and Velji, the English officers, then marched from the Rajapur warehouse to the Panhala, carrying a long-range cannon, fifty artillery shells. His guests and helpers were warmly welcomed in Kolhapur. Now Panhala was some distance away.
While staying in Kolhapur, Revington writes on April 5, 1660, "Panhala fort is under siege and Shivaji, the enemy of Rani (Buddy Begum) is trapped in the fort with about five thousand people near him. General Salabat Khan thinks so. He has promised to buy more artillery for that. " Not only was Revington a cunning businessman but he was also greedy. That is why he wanted to take advantage of this opportunity.
On 10th April, all the literature and English reached the base of Panhala fort. Gun marches took place at the place designated by Siddi Johar. This procession is near the three gates of the fort.
Srr sr sr sr sr sr sr sr sr The sound of gunfire ignited and a huge ball hit the wall of the fort, but no damage was done to the fort. From the fort, the fort keeper, Maharaj all came to the bastion. "How did this happen?" The same question may have plagued everyone.
What if Maharaj saw from the bastion of the fort ...?
These cunning Englishmen are brandishing their flags against you and firing cannons at you. In fact, when Afzal Khan marched on the Swarajya and Alli Adilshah had sent some extra material, ammunition to the sea so that he would not run out of some material in his campaign. But all those ships were taken over by the Marathas. At the same time, it was Henry Revington who freed his English captives by secretly promising to supply ammunition against Janjirekar Siddi. Also, Chanaksha Shivaji Maharaj had taken another assurance from him by thinking far ahead. That is, "no enemy of the Swarajya can sell ammunition."
The Maharaja was infuriated to see that Henry Revington, an Englishman, was still waving his flags. This has to be taken care of. This must have been exactly what Shivaji Maharaj had in mind.
Shivaji Maharaj was trapped in the fort and the siege continued. But even then the expansion of self-government was also underway. Some parts of More's Jawali had not yet come under Swarajya. A very remote, desolate fort in the possession of Bijapurkar in the forest of Jawali was yet to come under Swarajya. In one of the expeditions of Jedhe and Bandal, this difficult time was when our kings were under siege. The Marathas defeated Shake 1582's senior Shu. On 6th June 1660, Vasota fort was conquered by the Bijapurkars. (Today's date)
Vasota fort was a tiger perched in a dense forest. Seeing all the surroundings of this fort, Shivaji Maharaj had changed its name to 'Vyaghragad'. This remote fort was first established in the Swarajya. Maharaj was still under siege but he took a bold decision and left Panhala fort on the night of 13th July 1660 and headed towards Vishalgad. That history no longer tells us.
Maharaj overcame all difficulties and returned to Rajgad. Shahistekhan had already come to Pune. How to bemode it? With this in mind, news from Heran led to a new campaign and defeated Kartalbakhan in Umbarkhindi. We've talked about this before. "Message- https://muktalikhan2021.blogspot.com/2021/05/blog-post_11.html"
After defeating Kartalbakhana, Maharaj went straight to Talakkonam. Talakkonam was still with Bijapurkar. First Dabhol ... Chiplun ... Sangameshwar ... Devrukh ... and now his eyes are on Rajapur. Maharaj with 3000 infantry and 1000 cavalry rushed outside the gates of Rajapur. He called for a visit from some prominent congregations in the village and demanded a ransom. The ransom was only demanded from the big merchants. No harm was done to the poor. Henry Revington, Randolph Taylor, Richard Taylor and Philip Gifford, the head of the English warehouse here, came to meet the Maharaja.
As soon as Maharaj saw them, his betrayal came to their notice. Seeing that we were under siege, these rogue British raised their flags against Swarajya and fired their guns. The agreement made with us was broken. They must be ruled.
"Catch him, confiscate all his warehouses," Maharaj ordered in anger.
Upon receiving this order from the Maharaja, the Marathas captured him and dug up the entire warehouse with spades and shovels. In this Maharaj got an amount of about 23 to 24 thousand hons. The rest of the whites also fell into the hands of the Marathas. All these prisoners were sent first to Songadi and then to Vasota. One or two of these Englishmen died in captivity at Rajapur.
Why did Vasota use the same fort to house all these prisoners? So in my opinion Vasota would be the punishment of the Andamans or black water of that time. A very dense forest, with a lone fort, a natural base for wild animals, tigers, leopards, lions and snakes. It is believed that Vasistha sage came here for investigation. He was named Vasistha Dongar. But it was not to be. Later it is mentioned that another Bhoj king of Shilahar dynasty built a fort here. In today's language, there was an official prison of Swarajya on this fort. Like putting the British in this prison. Also, pirates were kept in the same fort.
Vasota is a fort that is always very remote and uninhabited. Later, the fort was taken over by 'Tai Telin', one of the deputies of the Prime Minister of Aundh. But soon after, the next year, the brave Peshwa chief Bapu Gokhale defeated the Prime Minister, and after many attempts, even according to his records.
"The mountain bush is a big problem. The fort is very bad, seven coffins and two and a half masses of trees were cut down. The way was cleared." However, it took them six or seven months to reach the fort. Tai Telin left the fort due to damage to granaries and other places. A poem was written to testify to her prowess. Don't know if it is recorded in history? The use of this poem by P.K. Atre's Shyamchi Ai (1953).
Poetry: "Ajikya Vasota of Shrimant Pant Pratinidhi,
Tai Telin Mari Sota,
Take care of Bapu Gokhale Kasota "
This poem seems to have been somewhat ridiculed. But it is certain that Bapu Gokhale was a brave and intelligent Sardar.
Later, when the last war between the Marathas and the British started, at the end of 1818. At that time fort keeper Bhaskar Pant fought for this fort for many hours. At the same time, many English prisoners were imprisoned on this vassal. But the fort fell and the English prisoners were freed from this captivity.
Today many people, tourists visit this fort. But the true history of this fort, what is its significance? That is why this short introduction of this fort was presented to you as per my intellect. Today, 361 years have passed since this fort came under Swarajya.
References: - Wa C Bendre, B.M. Purandare, Vijay Deshmukh.
9011096250




छान माहिती आहे.
ReplyDeleteWow 😍😍
ReplyDeleteVery nice 👍👏
अप्रतिम लेखन
ReplyDelete