"गंध"
कृष्णा आता आठ वर्षाचा होत आला होता. पहिल्या सत्राची परीक्षा झाली, परीक्षेचा निकाल लागला. तो वर्गात तिसरा आला त्यामुळे घरचे खूप खुशीत होते. आजींने तर त्याच दिवशी राजूची ( राजू हे कृष्णाचे आजीने ठेवलेले टोपण नाव) संध्याकाळी दिवे लागल्यावर दृष्ट काढली,
"इडा पिडा टळो.....आणि माझ्या राजूलाsss" असे म्हणून वाकून जमिनीवर बोटं पण मोडली.

देवापाशी दिवा लावलेला होता मग आजी आणि लाडका नातू शुभंकरोती...रामरक्षा...भीमरूपी.... ई. स्तोत्रे म्हणतं देवा जवळ बसले. तितक्यात कृष्णाचे बाबा ऑफिसमधून घरी आले. आपला मुलगा वर्गात तिसरा आला ही बातमी आईने फोनवरून ऑफिस मध्ये कळवली होतीच, म्हणून येतानाच त्याच्यासाठी खाऊ घेऊन आले होते.
"अरे दामू, राजूची मुंज करावी आता" आजी आपल्या मुलाला ( दामोदर) म्हणाली.
"अगं आई मी आज ऑफिसमधून येतानाच गुरुजींकडे जाऊन आलो आहे. येत्या जानेवारी महिन्यात मुहूर्त चांगला आहे म्हणाले गुरुजी"
"हे एक बरं झाले बाई! काय मग राजू आता मुंज करायची ना?" आजीने जवळ घेत कृष्णाला विचारले.
"पण मग टक्कल करावे लागेल? " कृष्णाने प्रश्न विचारला.
"हो, पण एक वाटी इतके केस ठेवायचे असतात, शौर म्हणून....." बाबा म्हणाले.
"हो का, मग आलोच" असे म्हणत कृष्णा चटकन जागेवरून उठला आणि थेट स्वयंपाक घरात गेला.
काय झाले याला? स्वयंपाकघरात कशाला पळाला हा पोरगा असे आई विचारणार तितक्यात.......आतून भांड्यांचे आवाज यायला लागले.
"कृष्णाsss, काय पाडापाडी सुरू केली आहे रे स्वयंपाक घरात?" आईने दरडावून विचारले.
"काही नाहीsss, आलो आलो" आतून त्याने आवाज दिला.
आई, बाबा आणि आजी सगळेच विचारत पडले हा आत काय करतो आहे?
"बाबा हे घ्या!!!"
"हे काय रे? हे कशाला आणलेस?" त्याच्या हातातील वस्तू पाहून आईने विचारले.
"बाबा, या वाटी एवढे ठेऊ यात माझे केस... म्हणजे मला चालेल." त्याने हात पुढे करत बाबांना वाटी दाखवत मागणी केली.
" अरे राजू ही काही वाटी नव्हे!! अरे हा तर कुंडा आहे( बाऊल ) याचा आकार खूप मोठा होईल."
"हो ना!! काही करतो हा पोरगा...थांब" आई जागची उठली आणि आता ती स्वयंपाक घरात गेली.
आपल्या डोक्यावर खूप केस रहावे असेच कृष्णाला वाटत होते. आपल्याला शाळेत वा वर्गात कोणी चिडवेल याची त्याला भीती वाटत होती.
"हे बघ, डोक्यावर इतके केस ठेवायचे आसतात" आईने एक लहान वाटी त्याच्या पुढ्यात ठेवली.
"बसsss, इतकेच!!!!" कृष्णाने आश्चर्याने विचारले
"अरे राजू, सगळीच मुलं इतकेच केस ठेवतात, दामूने पण असेच केस ठेवले होते" आजी पाठीवर हात ठेवत म्हणली.
"बघू कुठे आहे फोटो?"
"अरे तेव्हा कुठे फोटो होते!!"
"आहेत की....आई बाबांच्या लग्नाचे फोटो..."
"कृष्णा, आमच्या लग्नाच्या वेळी होते. पण माझे मुंजीतील काही फोटो नाहीत." बाबा म्हणाले.
बराच वेळ या वादात आणि चर्चेत गेले. शेवटी होय-नाही करत मुंज नक्की करायला दामोदरराव " उद्या तारीख नक्की करतो" असे म्हणत त्या चर्चेतून उठले.
कृष्णा तसा हुशार, संस्कारी, अल्लड मुलगा होता. आता तो पुढच्या वर्षी पाचवी मध्ये जाणार होता. पाचवीत त्याला अनेक नवीन विषय शिकायला मिळणार होते. इंग्रजी, हिंदी याचा परिचय याच वर्गात होणार होता. चौथीच्या वर्गातील आता काहीच महिने शिल्लक होते. जानेवारीत मुंज नक्की झाली... आणि एप्रिल मध्ये परीक्षा होणार होती. चौथीतील अगदी २-३ महिनेच शिल्लक होते.
"कृष्णा ये कृष्णाsss" बाबांनी हाक मारली.
"आलोsss"
" बस येथेsss, आज रविवार; मला सुट्टी आहे. आज पासून तुला गणपती अथर्वशीर्ष शिकवतो. आता मुंज होणार. तो पर्यंत काही श्लोक शिकता येतील आणि मग मुंज झाली की तुला पूर्ण अथर्वशीर्ष नीट म्हणता येईल" दामोदरराव पूजा करतानाच त्याला सांगत होते.
" लगेच, जरा वेळाने नाही शिकता येणार का?"
" नाही, बस"
इच्छा नसताना बाबांनी आज्ञा केल्यामुळे कृष्णाचा नाईलाज झाला आणि तो त्यांच्या जवळ बसला.
हळू हळू शिकवणी सुरू झाली...शिकवलेले श्लोक, त्याची शाळेतून परत आल्यावर केलेली उजळणी,पाठांतर, आजी, बाबा, आई कडून मिळालेली शाब्बासकी यामुळे इच्छे विरुद्ध सुरू झालेली शिकवणी हळू हळू त्याला आवडायला लागली. त्याचा आपोआप उत्साह वाढला.
जानेवारी महिना आला...ठरवल्या प्रमाणे नातेवाईकांच्या उपस्थितीत मुंज सर्व धार्मिक विधीत पार पडली. मुंज झाली की हळू हळू कार्यासाठी आलेले नातेवाईक पण आपापल्या गावी परत गेले. कृष्णाच्या डोक्यावर बारीक बारीक केस पण यायला लागले. आता आपल्याला शाळेतील मुलं कमी चिडवतील याचे त्याला समाधान वाटत होते.
" आई, मी दोन दिवस जरा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी जाणार आहे" दामोदर रावांनी घरात निरोप दिला.
"हो या की तुम्ही जाऊन" कृष्णा म्हणाला.
"हो, पण आता तुला देवाची पूजा करावी लागेल हं!!"
"मी करेन रे पूजा दामू" आजी म्हणाली.
"नको, कृष्णा करेल, आता त्याची मुंज पण झाली आहे आणि तो आता छान अथर्वशीर्ष पण म्हणायला लागला आहे, काय रे करशील न पूजा?"
या प्रश्नाचे नेमके काय उत्तर द्यावे हे त्याला सुचेना. नाही म्हणावे तर बाबा रागवणार, हो म्हणावे तर पूजा कशी करायची हे ही अवघड!!.. तो काही वेळ तसाच गप्प उभा होता.
"करील रे दामू तो आणि नाही केली तर मी आहेच की, मी त्याला सांगेन"
" होss करतो, पण मी गंध उगळणार नाही बाबा!!" तो वैतागून म्हणाला.
"मी देईल तुला गंध उगाळून" लगेच आजी मदतीला धावली.
कृष्णाचे आजोबा, पणजोबा यांच्या पासून एक पिढीजात सहाण घरी होती, त्यावर चंदनाचे जाडजूड लाकूड घेऊन...त्यावर अष्टगंध व पाणी घालून ते गोल गोल फिरवून गंध तयार करायचे. मग त्या गंधाचा वापर देव पूजेसाठी करावा लागे.

कृष्णा तसा अजून लहानच होता, त्याला दोन्ही हातात ते चंदनाचे लाकूड काही नीट धरता येत नसे म्हणून "पूजा करेल पण गंध उगळणार नाही?" असे त्याने आधीच सांगून टाकले होते. पण मनातून तो जाणून होता की वंश परंपरागत पूजेच्या विधीसाठी हे कधी तरी आपल्याला करावे लागेल. सध्या तरी आजी या कामासाठी त्याला मदतनीस म्हणून मिळाली आणि त्याची सुटका झाली.
आजीने उगाळलेल्या गंधाचा वापर करून बाबांच्या सारखी पूजा कृष्णाने करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या पूजेचे उरलेले गंध आपल्या कपाळी लावले. कपाळाला लावलेल्या त्या अष्टगंधाचा वास त्याला कोणत्या तरी आभासी जगात घेऊन जात होता.

"आजी या गंधाचा वास किती छान येतो आहे गं!!"
"राजू, वास नाही रे बाळा, सुवास"
"सुवास, म्हणजे?"
" सुंदर वासाला सुवास म्हणतात. तुझे आजोबा तर रोज पुजा झाली की असेच अष्टगंध वापरून उगळलेले गंध कपाळी लावूनच ऑफिसला जायचे......म्हणून तुझे बाबा देखील तसेच गंध लावून जातात बरं का?"
"त्याने काय होते?"
"चंदन वापरल्यामुळे डोके शांत राहते. अष्टगंध सुवासिक असल्यामुळे मनाला आनंद मिळतो."
"अच्छा...पण मला हे गंध उगळता येत नाही......?"
"मोठा झाला की येईल, दामू लहान असताना मीच तुला जसे गंध उगाळून दिले तसेच त्याला पण देत असे."
नातवाचे प्रश्न आणि आजीचे उत्तर अनेक वेळ सुरू राहिले. पण याच आजी नातवाच्या संवादातून कृष्णाला त्याच्या घरातील परंपरा, पूजा आणि भक्तीचे अधिष्ठान या विषयी कळत होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कृष्णाने जमेल तसे गंध स्वतः उगाळून घेतले....!
घरातील संस्काराचा गंध पुढच्या हळूहळू पिढीला सुवासित करत होता.
"गंध सगळ्यात आहेच!! फक्त सुवास कशात आहे हे समजले पाहिजे"
©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या प्रतिक्रिया (Comment) अवश्य कळवाव्या, सोबत आपले नाव पण लिहावेे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Smell"
Krishna was now eight years old. The first session was examined, the result of the exam was announced. He came third in the class so the house was very happy. On the same day, Aji saw Raju (Raju's nickname given by Krishna's Aji) when the lights came on in the evening,
"Ida avoid pain ..... and my Raju sss" so he bent down and broke his fingers on the ground.
The lamp was lit near God, then grandmother and darling grandson Shubhankaroti ... Ramraksha ... Bhimrupi .... E. Psalms say sit near God. Just then Krishna's father came home from the office. The mother had informed the office over the phone that her son was third in the class, so she had brought food for him on arrival.
"Oh Damu, Raju should be hummed now" Grandma said to her son (Damodar).
"Oh mother, I have come to Guruji as soon as I come out of the office today. The time is coming in January, said Guruji."
"It's a good thing, lady! Do you want Raju to do it now?" Grandmother approached and asked Krishna.
"But then you have to go bald?" Krishna asked.
"Yes, but I want to keep so much hair in a bowl, as a bravery ....." Baba said.
Saying "Yes, then come", Krishna got up quickly and went straight to the kitchen.
What happened to him Just as my mother was asking why she ran away in the kitchen, the sound of pots started coming from inside.
"Krishnassss, what the heck has Ray started in the kitchen?" Asked the mother.
"Nothing sss, come on" he called from inside.
Mom, Dad and Grandma all kept asking what is he doing inside?
"Daddy take this !!!"
"What's this? Why did you bring this?" Seeing the object in his hand, the mother asked.
"Dad, put this bowl in my hair ... so I can go." He extended his hand and asked Baba to show him the bowl.
"Hey Raju, this is not a bowl !! Hey, this is a bowl.
"Oh no !! Porga does something ... wait" Mother woke up and now she went to the kitchen.
Krishna wanted to have a lot of hair on his head. He was afraid that someone would tease him at school or in class.
"Look, there are so many hairs on the head," said the mother, placing a small bowl in front of him.
"Just sss, that's it !!!!" Krishna asked in surprise
"Hey Raju, all the boys have the same amount of hair, Damu also had the same amount of hair" Grandma said putting her hand on her back.
"Let's see where the photo is."
"Hey where were the photos then !!"
"There are ... wedding photos of parents ..."
"Krishna, it was at our wedding. But I don't have any photos of Munji." Dad said.
A lot of time went into this debate and discussion. In the end, Damodarrao got up from the discussion saying, "I will definitely do it tomorrow."
Krishna was such a smart, cultured, alluded boy. Now he was going to be in fifth next year. In the fifth he was to learn many new subjects. English and Hindi were to be introduced in this class. There were only a few months left in the fourth grade now. Munj was exactly in January ... and the exam was to be held in April. There were only 2-3 months left in the fourth.
"Krishna ye krishna sss" Baba called.
"Alossss"
"Just here, sss, today is Sunday; I have a holiday. Ganpati will teach you Atharvashirsha from today. Now it will be Munj. You can learn some verses till then and then you will be able to say Atharvashirsha properly"
"Immediately, can't you learn in a little while?"
"No, just"
When Baba did not want to, Krishna was cured and he sat next to him.
Gradually the teaching started ... He gradually started liking the teaching that started against his will due to the verses he was taught, his revision after coming back from school, recitation, Shabbaski from his grandmother, father, mother. His spontaneous enthusiasm increased.
The month of January has come ... As planned, Munj was performed in the presence of relatives. The relatives who had come for work slowly returned to their respective villages. Krishna's hair started growing on his head. Now he was satisfied that we would be less annoyed by the school children.
"Mom, I'm going out to the village for two days for some office work," said Damodar Rao.
"Yes, you go," said Krishna.
"Yes, but now you have to worship God huh !!"
"I'll do it, Pooja Damu," Grandma said.
"No, Krishna will do it, now he has lost his temper and now he has started saying nice Atharvashirsha, what will you do without worship?"
Don't tell him exactly what to answer. If you say no, Baba will get angry, if you say yes, it is difficult to know how to do pooja !! .. He remained silent for some time.
"Karil Ray Damu, if he doesn't, I'll tell him."
"Yes, I do, but I won't smell it, Daddy !!" He said angrily.
"I'll give you the smell" Grandma immediately rushed to help.
From Krishna's grandfather, Panajoba, Sahan was at home for a generation. Then that smell had to be used for worshiping God.
Krishna was still so young, he could not hold the sandalwood in both hands, so he would "worship but not smell?" He had already said that. But in his heart he knew that we would have to do this someday for the traditional ritual worship. For now, however, his grandmother hired him as a helper for this work, and he was released.
Krishna tried to perform Baba-like pooja using the scent that Aji used and put the rest of the smell of the first pooja on his forehead. The scent of the octagon on his forehead was taking him to some virtual world.
"Grandma, how nice it smells!"
"Raju, no smell, baby, fragrance"
"Fragrance, I mean?"
"A beautiful smell is called fragrance. If your grandfather used to go to the office every day after worshiping, he would go to the office with the same smell ...
"What happened to him?"
"Using sandalwood keeps the head calm. Ashtagandha is fragrant, it makes the mind happy."
"Okay ... but I can't smell it ...?"
"It will come when he grows up. When Damu was young, I used to give him the same smell as you."
The granddaughter's question and the grandmother's answer continued for a long time. But it was through the conversation of this grandmother and grandson that Krishna came to know about the traditions, worship and devotion in his house. So the next day Krishna sniffed as much as he could ....!
The smell of home rites was slowly permeating the next generation.
"Smell is everything !! Just understand what fragrance is"
© Nikhil Devidas Vaze
9011096250
Bharich
ReplyDeleteखूप छान.
ReplyDelete