" फक्त माणुसकी बेटाss, फक्त माणुसकी "

नुकताच अश्विन संपून कार्तिक महिना सुरू झाला होता. हवेत जरा थंडी जाणवू लागलेली होती. पण काहीच दिवसात त्या थंडीचे प्रमाण वाढले.या अचानक वाढलेल्या थंडीमुळे गावात मात्र रात्री लवकरच निरव शांतता होत होती. आधीच थंडी, त्यात गावाकडचे मोकळे रानं, नदीला असलेले मुबलक पाणी यामुळे थंडी जास्तच वाजायची.
त्या दिवशीही पूर्ण गावात शांतता होती,सगळे आपापल्या घरात घोंगडी, गोधडं पांघरून गुडूप झाले होते, मुलं आपल्या आईला बिलगुन झोपलेले, आकाशातील चंद्र देखील आपले अंग चोरत होता, गोठ्यातील जनावरं पण अंग चोरून झोपले होते, थंडीमुळे कोणत्याच कुत्र्यांच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता, तेही मातीत खड्डे करून, नाहीतर आडोसा शोधून कुडकुडत झोपले होते. आपल्या घराच्या परसात कोणताच गडी माणूस खाट टाकून झोपू शकत नव्हता. रस्त्यावरचे मिणमिण दिवे सुरू होते. त्याचा नीट प्रकाश पण नव्हता, कदाचित कोणी झोपण्यापूर्वी केलेल्या शेकोटीचा धूर आणि धुके यामुळे दिव्यांचा प्रकाश कमी दिसत होता.
त्या भयाण रात्री , अचानक ही शांतता भंग करत तान्ह्या बाळाच्या रडण्याचा उंच किरकिरा आवाज सगळीकडे घूमला....ते बाळ टाहो फोडून रडत होतं....त्याचा तो चिरका आवाज परिसरातील शांतता भंग करत होता.
" अहो, अहो, उठा!!! अहो उठा पटकन"
"कोण आहे ? काय, झालं ?"
"मीच आहे, अहो बाळाच्या रडण्याचा आवाज येतो का तुम्हाला? का बाई मलाच भास होतायतss?"
घरातील दिवा लावून दोघांनी अंथरूण सोडले.
"हो गं, मला पण येतोय!!! पण कुठून येतो आहे हा आवाज? थांब, मी समोरची खिडकी उघडून पाहतो आणि तू मागची खिडकी उघडून पहा....आवाज आपल्याच घराजवळून येतो आहे हे नक्की.
दोघे पण आवाजाचा अंदाज घेण्यासाठी घरातून शोधाशोध करत होते.
"अगं समोरून आवाज येतो आहे...!!!"
"समोरून कसा येईल? समोरच्या घरात तर फक्त ती कदमांची म्हातारीच राहते आणि काल तिच्याकडे कोणी पाव्हुणी पण नाही आलीये, मग तिच्या घरातून कसा आवाज येईल"
"अगं, पण मी खिडकी उघडली तर मला आवाज स्पष्ट ऐकू आला"
ते बाळ अजून मोठ्याने रडत होते.
"बघ आला तुला?"
"हो आला न...?"
"उघडा बरं दरवाजा ... पण जरा जपून...हवं तर आधी दाराच्या फटीतून पहा...अंगणात कोणी दिसतंय का ते...सगळा गाव शांत आहे...काळजी वाटते...म्हणून..."
"हो हो पाहतो....."
हळूच दाराच्या फटीतून अंगणात डोकावले तर त्यांना बाहेरच्या मिणमिण प्रकाशात फक्त शेणाने सारवलेले अंगण दिसले. आजूबाजूला वाऱ्यात हलणारी रातराणी आणि इतर झाडं, अंगणाच्या मध्यात असलेले सुंदर सजवलेले तुळशीवृंदावन, त्यातील तुळस आणि वाऱ्याच्या झोताने हलणारा तुळशीवृंदावनाच्या खोबणीतील दिवा हेच दिसत होते. पण बाळाचा आवाज किंवा हा काय प्रकार आहे? हे काही केल्या समजत नव्हते? आता मात्र बाहेर जाऊन हा काय प्रकार आहे हे पाहण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
"अहो काहीच नीट दिवस नाहीये? मग जा बाहेर. पण आवाज तर येतो आहे"
"हो जावचं लागेल बाहेर"
लाकडी दाराचा अडसर दूर केला, साखळीची कडी बाजूला केली...किंचित दार उघडले तर त्यातून फक्त थंड वारा आत आला.
"अगं, माझी शाल घे बघू...बाहेर थंडी आहे...बॅटरी आणि काठी पण आण. काळोख आहे बाहेर तोवर मी दार लावतो"
"हे घ्या...."
लगेच शाल नीट अंगावर घेऊन ते बाहेर पडले...हळू हळू अंदाज घेत घेत समोर सरकले मनात भीती होतीच, म्हणून एका हातात काठी घेतली आणि दबक्या पावलांनी आवाजाच्या दिशेला निघाले.
"अहोss जरा जपूनss" आतून आवाज आला.
"होss होss"
जसं जसा आवाजाच्या जवळ जवळ जाऊ, तसं तसा तो बाळाचा आवाज अजूनच हृदयद्रावक भासत होता.
एक एक पाऊल पुढे टाकत तुळशीवृंदावनाच्या मागे डोकावून पहिले, तर......??
"अगं, अगं तू पण बाहेर ये लवकर......"
"थांबा, थांबा आले. तुम्ही थांबा हं तिथेच, हि आलेच..."
सकाळ झाली अजून नीट उजेडायचे होते. थंडीमुळे बाहेर सगळीकडे दाट धुक पसरलं होतं, आकाशातील सूर्य पण चंद्र प्रमाणे भासत होता. घरा समोरचे तुळशीवृंदावन पण नीट दिसत नव्हते.
 |
| हा सूर्यच आहे बरं!!! |
"अहो उठतायं नं..आवरायचं आहे नं? "
"सकाळ झाली??" असे म्हणत विठ्ठलपंत जागेवर उठून बसले...जमिनीला वंदन केले...आणि बसूनच नेहमीचा श्लोक "|| समुद्र वसने देवी..... क्षमस्व मे|| म्हणून जागेवरून उठले, कौलारू छतावरच्या कवडस्यातून कोवळे ऊन भिंतीवर येत होते.
"कालच्या रात्रीच्या प्रसंगामुळे झोप नाही गं, सकाळी सकाळी जरा कुठे डोळा लागला"
"होय न हो!!! जा परसात आता, तोवर मी चहा ठेवते"
"होss"
चहा घेऊन झाला तसे त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारले
"अगं ती उठली का?"
"नाही, ती अजून झोपली आहे. मगा मी तिच्या अंगावर अजून एक गोधडी घातली, थंडी वाचत असेल बिचारीला"
"हो नss झोपू देत!!! जेव्हा उठेल तेव्हा बोलू, तोवर मी माझे बाकीचे आन्हिक उरकून घेतो, फुलं आणली तोडून...?"
"हो तुमची पुजेची सगळी तयारी झाली आहे, या तुम्ही आवरून"
देवाची यथोचित पूजा झाली. देवघर अतिशय सुंदर महिरपी सिसवी लाकडात केलेले, स्वत्रंत खोलीत होते. देवघरामध्ये अनेक सुवासिक, ताजी फुलं वाहिलेली होती, सुंदर धुपाचा सुवास पूर्ण देवघरात पसरला होता. एका हातात घंटी घेऊन पंतांनी आरती सुरू केली...
सकाळच्या या शुद्ध, सात्विक वातावरणात आणि मंद घंटी नादात, तिला हळूच जाग आली. घाबरून ती पटकन उठून बसली खरं!! पण तिला बसवत नव्हतं. आपण इथं कुठे? हे तिला न समजल्यामुळे ती गांगरून गेली. तिने आजूबाजूला पाहिले, ती काही तरी शोधत होती... त्या खोलीत अजून अंधारच होता.एकदम कोपऱ्यातील खोलीमुळे तिला फक्त दुरून काही आवाज येत होते. तिच्या अंगात, जागेवरून उठून दारापर्यंत जायचे त्राणही नव्हते.
"अगं अगं, उठू नकोस.....पडून राहा!!!"
"मी इथं कुठं आले जीsss"
"अगं, हो हो सगळे सांगते, आधी हे घे...तुला गरज आहे याची...."
वाटीमधुन कसले तरी पेय तिच्या हातावर दिले.
"पी हे गरम गरम..."
"ताई तुम्ही कोण जी?...मी इथं कशी?...आणि....माझं ..." असं म्हणत असतानाच तीच्या हातातील वाटी गळून पडली आणि ती बेशुद्ध झाली.
"अहोss, अहोss...या बरं इकडे, डॉक्टरांना बोलावणं पाठवा बरं पटकन"
"येईल तिला शुद्ध, अशक्तपणा आहे. हे द्या तिला आणि काही खाऊ घाला" डॉक्टरांनी औषधे दिले आणि सल्ला देऊन ते निघाले.
काही वेळाने तिला शुद्ध आली.
"ताईss ताईss. सांगा न कुठं हाय मी? आणिss माझं बाळ!!! ते कुठं हाय ? मला माझं बाळ द्या होss नाहीतर ती लोकं मारून टाकत्याल" ती प्रचंड आकांत करत होती.
"हो हो थांब, हे घे तुझे बाळ" असे म्हणून झोपलेले बाळ तिच्या हातात दिले.
तिने नाजूक हातांनी बाळाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि आपल्या उराशी घेतले. काही क्षण असेच गेले. तो प्रसंग पाहून कोणीच काही बोलू शकले नाही...सगळेच भावूक झाले.
"अगं पण तू कोण? कुठून आलीस? नाव काय तुझं? आमच्या घराकडे कशी आलीस?"
"अगं हो हो...जरा जरा धीराने घे...किती प्रश्न विचारशील. मी जरा खोलीतून बाहेर जातो. तुम्ही दोघी बोला. माझ्यासमोर तिला कदाचित संकोच वाटेल"
खरंच ती संकोचली होती, एकतर संपूर्ण अंग नीट झाकल्या जाईल असे वस्त्र नव्हते... अंथरुणात बसून तिने ते तात्पुरते गोधडीने झाकलेले होते. साधरण वय असेल १९-२० वर्ष, अगदी कोवळी पोरं होती. कृश देहयष्टी, केस विस्कटलेले, चेहरा पूर्ण काळवंडलेला... कसे बसे भिंतीला टेकून बसली होती...
"आता सांग बरं तू कोण?" मायेने पाठीवरून हात फिरवत वेणू ताईंनी विचारले.
" ही रात हाय, का दिस?"
"अगं, दिवस आहे, फक्त ही खोली जास्त अंधारी आहे."
"मग मी निघालो तवा तर दिस मावळतीचा होता...मग रात कधी झाली..आणि दिस कधी झाला?" बाळाकडे पाहत ती बोलत होती.
"म्हणजे!! तुला रात्रीच काहीच स्मरण नाही?"
"नाही जी !!! म्या अशीच दुपारी वस्तीतून जीव वाचवून बाहेर पडले...काय करायचं...कुठं जायाचं....काहीच उमजना....मग...जिकडं वाट फुटलं तिकडं चालत राहिले जी..." ती भरभरून बोलत होती.
"पण तुम्ही कोण? मला इथं कुणी आणलं?"
"अगं हे आमचे गाव आहे आणि माझे यजमान यांचे नाव विठ्ठलपंत कारखानीस आणि मी त्यांची पत्नी सौ वेणू काल रात्री तू आमच्या तुळशी जवळ आलीस आणि तुला ग्लानी आली...तुला आठवत नाही?"
बराच वेळ गप्पा मारल्या आणि मग त्या दोघी झोपी गेल्या आणि वेणू ताई खोलीतून बाहेर पडून घरातील इतर कामाला लागल्या.
आता दुपार होत आली होती. विठ्ठलपंत गावातील सरकारी कचेरीत नोकरीला होते. गावात त्यांच्या शब्दाला मान आणि किंमतही होती. ते कार्यालयामधून आज जरा लवकरच परतणार होते. घरी असलेल्या मुलीचे कोडे अजून सुटलेले नव्हते आणि त्या दोन जीवांची काळजीही त्यांना होतीच.
"साहेब, आज काही घरगुती कामानिम्मित जरा लवकर जाऊ शकतो का? माझी आता पावेतो सगळी कामे पुरी झाली आहेत."
विठ्ठलपंत प्रामाणिक आणि मेहनती होते, त्यांनी रीतसर साहेबांची परवानगी घेतली.
"अगदी जरुरी आहे का जाणे?"
"हो जरा आहे, साहेब...."
"बरं जा मग....आपण उद्या बोलू...."
कचेरीतून बाहेर पडून ते सरळ घरीच आले.
"अगं, मी आलो बरं का?" पंतांनी तुळशीवृंदावना जवळूनच घरात निरोप दिला.
"लवकर आलात आज?"
"होss तिच्याशी काही बोलणे झाले का?"
"अहो, आधी पाय धुवून आत या!!,बाहेरूनच काय विचारताय? हो झाले, सध्या झोपल्या आहेत दोघी पण!!!विश्रांतीची गरज आहे. लेकरू फार सोसत इथवर आली आहे हो, तिच्या बापाने म्हणे कोणत्या पुरुषाशी लग्न करून दिले हीचे लहान वयात....तो नंतर हिला सोडून परागंदा झाला ....वयात आली तशी सगळ्यांची वाईट नजर पडली हिच्यावर.. त्याचेच फलित पोटात वाढले...आणि वर लोकांनी हिलाच वाईट चालीची ठरवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला..पण देवाचीच कृपाss...वाचली हि...वाटेत कुठे तरी बाळाला जन्म दिला म्हणे....."
त्यांना तिच्या वेदनेने रडू येत होते, त्यामुळे पुढचे त्या काहीच बोलू शकत नव्हत्या... वेणू ताईंनी डोळ्याला पदर लावला आणि स्वतःला सावरत म्हणाल्या
"पोरंss माझ्याशी मनमोकळे पणाने बोलली. मन हलके झाले तिचे...त्यामुळे काही ताजे अन्न पोटात गेले आणि आता दोघी पण शांत झोपल्या आहेत....."
"करू देत!!!, करू देत विश्रांती...तू कोणाला काही बोलली नाहीस न अजून याबद्दल....?"
"नाही पण कधीतरी समजेलच कि, बाळ गप्प नाही राहणार ते भूक लागली की रडणार आणि त्याचा आवाज येणारच की"
"तेव्हा पाहू....तिला नीट कपडे केलेत का?"
"हो माझी साडी नेसवली तिला"
"छान....म्हणजे कोणी विचारले तर पाव्हणी आहे हे सांगता येईल...."
मध्ये काही दिवस गेले, कार्तिक महिना सुरू असल्यामुळे रोज पहाटे विठ्ठल मंदिरात काकड आरती सुरू होती. एकादशी आता जवळ येत होती.
" बाळ तुझे नाव नाही सांगितलेस अजून" पंत मायेने तिला विचारत होते.
"माझं नाव वाळकी, म्हणजे वस्तीत सगळे अशीच हाका मारत्यात."
"बाळsss हे काही नाव नाही, आम्ही तुला कार्तिकी म्हणून बोलावू ? नाहीतरी हा कार्तिक महिना सुरू आहे त्यामुळे आज पासून तुझे नाव कार्तिकी."
"अगं, आवडले का तुला?" काकूंनी आनंदाने तिला साखर भरवत 'कार्तिकीss' असे नाव झाल्याबद्दल " तुझे तोंड गोड कर" म्हणत साखर भरवली.
"बाबा, तुम्ही दोघं कोण कुठले!! मला राहायला दिलं. माझ्या अंगावर साडी दिली. माझ्या मुलीला आणि मला आसरा दिला"
"अहो, हिचे तर नाव कार्तिकी केले, पण या छोट्या मुलीला काय म्हणूयात?"
"अंssssss, राधा? रुख्मिणी?..नको!!
"अहो, वृंदाss. हे चालेल की, नाहीतरी त्या दोघी वृंदावना जवळच आपल्याला भेटल्या न!!!"
"वा, सुरेख नाव आहे....वृंदा" असे म्हणून पंतांनी तिला आपल्या हातात उचलले.
कार्तिकी आता कारखानीसांच्या घरात रुळली होती. तिची आणि छोट्या वृंदाची तब्येत पण सुधारत होती. काकूंच्या हातचे पौष्टिक अन्न खाऊन दोघींना पण बाळसे धरायला लागले होते. पण गावात मात्र सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली की पंतांकडे कोण पाव्हणी आली आहे ? परंतु कोणालाही पुढे येऊन त्यांना विचारायची हिम्मत होत नव्हती.
"पंत आहेत का घरात?"
"हो आलो....कोण, पाटील काका तुम्ही? या न असे आत या"
गावाचे एकदम ज्येष्ठ व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आले होते.
"पंत मी थेट विषयालाच हात घालतो...तुमच्याकडे आलेली मुलगी कोण? काय आहे, गावात तुमची खूप प्रतिष्ठा आहे. पण पूर्ण गावात याच गोष्टीची चर्चा आहेss, राग मानू नका, म्हणून मीच पुढाकार घेतला."
"काका आपण वयाने थोर आहात आणि समजून घ्याल म्हणून सांगतो. कार्तिक महिन्यात एका रात्री ही असाह्य घराच्या बाहेर तिच्या नवजात बालकाला घेऊन आली. अनेक हाल अपेष्टा सहन करत ती इथंवर पोहचली. मग आपल्यातील माणुसकी न मरू देता आमच्या हिने तिला घरात घेतली. आपल्या लेकी तिचा सांभाळ करत आहे. आज परमेश्वर कृपेने, ती व तीचे बाळ आमच्याकडे सुखरूप तर आहेच आणि आमच्या घरातील सदस्या प्रमाणे राहत आहे. बसsss हेच सत्य आहे" पंत अगदी सहज पणे सगळी हकीकत सांगत होते.
"मग असे का नाही करत, तुम्ही तिला दत्तक का नाही घेत!!!.वकील साहेबांना विचारून!!! नाही तरी तुम्हास कोणी...? आपण समजून घ्या!!!"
"होss, हा विचार पण योग्यच आहे."
हे बोलणे वेणूताई घरातून ऐकत होत्या, पाटील काका परतल्यावर पंत आणि वेणू ताई यांना हा विचार पटला. वकिलांच्या मार्फत सर्व कायदेशीर प्रकिया पूर्ण करून,त्यांनी कार्तिकीस दत्तक घेतले. मध्ये काही दिवस स्थिरस्थावर करण्यात गेले.
असेच एकदिवस कार्तिकी वृंदाला खेळवतं होती आणि अचानक पणे खेळता खेळता छोटी वृंदा पालथी पडली, कार्तिकीला खूप आनंद झाला आणि आनंदित होऊन तिने हाक मारली.
"बाबाsss...बाबाsss...आईsss...आईssss...इकडे लवकर या"
"बोल बेटा....."पंतांनी बाहेर येत विचारले.
"आई बाबा ,पहा पहा वृंदा पालथी पडली"
वेणू ताईंनी मायेने कार्तिकीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सगळ्यांचे डोळे पाणावले.
पाणावलेल्या डोळ्यांनी कार्तिकी म्हणाली...
"कोण कुठली मी...तुम्ही मला आसरा दिलात, तुमचं नाव दिलत... मला कधी देव दिसला नाही, पण तुम्ही त्याच्या परी आहात माझ्यासाठीss तुम्ही हे केलं ?"
"फक्त माणुसकी बेटा..फक्त माणुसकी...."पंतांनी तिच्याकडे पाहत सांगितले.
©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या (comment) प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Only the son of humanity, only humanity"
The month of Kartik had just started with Ashwin. The air was getting a little cold. But in a few days, the amount of cold increased. Due to this sudden increase in cold, the village was getting very quiet at night. It was already cold, with open fields near the village and abundant water in the river.
Even on that day there was peace in the whole village, everyone was huddled in their houses covered with blankets and blankets, the children slept with their mothers, the moon in the sky was also stealing their limbs, the animals in the barn were also stealing their limbs. By digging pits, otherwise Adosa was sleeping soundly in search. In the backyard of his house, no man could lie down on a bed. The flickering lights on the street start. It was not well lit, perhaps because of the smoke and mist from the fire before someone went to bed.
On that frightening night, all of a sudden the loud squeaking sound of the baby was breaking everywhere .... the baby was crying loudly .... his squeaking sound was disturbing the peace in the area.
"Hey, hey, get up !!! Hey get up quickly"
"Who is it? What happened?"
"It's me, can you hear the baby crying? Why do women feel like me?"
The two left the bed with the lamp in the house.
"Yeah, I'm coming too !!! But where is this sound coming from? Wait, I open the front window and you open the back window .... Surely the sound is coming from your own house.
The two were also searching the house to guess the sound.
"Oh, the sound is coming from the front ... !!!"
"How will you come to the front? In the house in front, only the old lady of the steps stays and no one came to her yesterday, so how will the sound come from her house?"
"Oh, but when I opened the window, I heard a clear voice."
The baby was crying even louder.
"See you?"
"Yes, isn't it ...?"
"Open the door ... but be careful ... first look through the crack in the door ... can anyone see in the courtyard ... the whole village is quiet ... worried ... so ..."
"Yes, yes, I see ..."
Peering into the courtyard through the crack of the door, they saw only a dung-covered courtyard in the dim light outside. The night sky and other trees moving in the wind all around, the beautifully decorated Tulshi Vrindavan in the middle of the courtyard, the basil in it and the lamp in the groove of the Tulsi Vrindavan moving in the wind. But what kind of baby voice is this? Didn't understand some of this? Now there was no choice but to go out and see what kind it was.
"Hey, isn't it a good day? Then go out. But the noise is coming."
"Yes, I have to go out."
Removed the obstruction of the wooden door, untied the chain ... If the door was opened a little, only cold wind came in.
"Oh, take my shawl and see ... it's cold outside ... bring the battery and the stick too. I'll shut the door until it's dark outside"
"Take this ..."
Immediately he came out with the shawl on his body.
A voice came from inside.
"Ho Ho"
As we got closer to the sound, the baby's voice still sounded heartbreaking.
Taking a step forward and peeking behind Tulshi Vrindavan, then ...... ??
"Oh, oh you but come out soon ......"
"Wait, wait, come. You wait, that's right, here it is ..."
It was still early in the morning. Outside, there was a thick fog, and the sun was shining like the moon. Tulshi Vrindavan in front of the house was not visible.
"Are you getting up? Do you want to cover up?"
"It's morning ??" Saying this, Vitthalpant got up and sat on the ground ... bowed to the ground ... and just sat down and recited the usual verse "|| Samudra Vasane Devi ..... Sorry May ||
"I can't sleep because of last night's incident.
"Yes no !!! Go back to the back now, I'll keep the tea till then"
"Hosss"
As he finished his tea, he asked his wife
"Did she get up?"
"No, she's still asleep. Then I put another blanket on her, it must be cold, poor thing."
"Yeah, let's go to sleep !!! Let's talk when he wakes up, I'll finish the rest of my anhik, bring flowers and break ...?"
"Yes, all the preparations for your puja have been completed.
God was properly worshiped. The temple was in a very beautiful, carved Sisvi wood, in a separate room. There were many fragrant, fresh flowers in the temple, the fragrance of beautiful incense was spread all over the temple. Pant started Aarti with a bell in one hand ...
In this pure, sattvic atmosphere of the morning and in the sound of a slow bell, she woke up side by side. Frightened, she got up quickly and sat down !! But she was not fit. Where are you here She groaned in disbelief. She looked around, she was looking for something ... It was still dark in that room. She could only hear some noise from a distance because of the room in the corner. She didn't even have the strength to get up and go to the door.
"Oh oh, don't get up ..... lie down !!!"
"Where did I come from?"
"Oh, yes, everyone says, take this first ... you need it ...."
Somehow the drink from the bowl was handed to her.
"Drink hot hot ..."
"Tai, who are you? ... How am I here? ... and ... mine ..." While saying that, the bowl in her hand fell off and she fainted.
"Come on, she's clean, she's weak. Give her this and give her something to eat."
After a while she came clean.
"Tai sss tai ss. Don't tell me where my hi is? And ss my baby !!! Where's that hi? Give me my baby yes ss otherwise she will kill people" she was crying loudly.
"Yes, yes, wait, take this, your baby," he said, handing the sleeping baby to her.
She wrapped her arms around the baby's face with delicate hands and took him in her arms. A few moments went by like that. Seeing that incident, no one could say anything ... everything became emotional.
"Oh, but who are you? Where did you come from? What's your name? How did you get to our house?"
"Oh yes yes ... just be patient ... how many questions are you asking. I'll just go out of the room. You two talk. She might be hesitant in front of me"
She was really shy, she didn't have clothes that would cover her whole body either ... She was sitting in bed and she was covering it with a temporary blanket. The average age would be 19-20 years, she was very young. Lean body, wispy hair, full blackened face ... how the bus was leaning against the wall
"Now tell me, who are you?" Maya asked Venu Tai, running her hand over her back.
"Hi tonight, why this?"
"Oh, it's day, only this room is much darker."
"Then I went to Tawa, but it was falling ... then when was the night ... and when was the day?" She was looking at the baby and talking.
"I mean !! You don't remember anything last night?"
"No sir !!! I came out of the village in the afternoon to save my life ... what to do ... where to go ... I don't know anything ... then ... I kept walking wherever I could ..." She was talking a lot.
"But who are you? Who brought me here?"
"Oh, this is our village and my host's name is Vitthalpant Karkhanis and I am his wife Mrs. Venu. Last night you came near our Tulsi and you got tired ... don't you remember?"
We chatted for a long time and then they both fell asleep and Venu Tai left the room and started doing other household chores.
It was getting late. Vitthalpant was employed in a government office in the village. His word was respected and valued in the village. He was coming back from the office a little early today. The puzzle of the girl at home had not yet been solved and she was also worried about those two souls.
"Sir, can I go for some housework a little early today? All my chores are done now."
Vitthalpant was honest and hardworking, he took permission from Ritsar Saheb.
"Why is it so important to go?"
"Yes, sir ..."
"All right then .... we'll talk tomorrow ...."
Leaving the office, he came straight home.
"Oh, why did I come?" Pant said goodbye to the house near Tulshi Vrindavana.
"Are you coming early today?"
"Did you talk to her?"
"Hey, wash your feet first and come inside !!, what are you asking from outside? Yes, they are both asleep now !!! We need rest. The boy has come here with a lot of pain. ... He later left her and became a paraganda .... As she got older, everyone looked down on her .. As a result, her stomach grew ... And the people above tried to kill her by declaring her to be a bad move .. He ... gave birth to a baby somewhere along the way ..... "
They were crying because of her pain, so she couldn't say anything further ... Venu Tai rolled her eyes and said to herself.
"The boys talked to me freely. Her mind became lighter ... so some fresh food went into her stomach and now both of them are sleeping peacefully ....."
"Let me do it !!!, let me rest ... you haven't told anyone about it yet ...?"
"No, but someday you will know that the baby will not be silent, he will cry when he is hungry and his voice will come
"Let's see then .... did you dress her properly?"
"Yes, she wore my sari."
"Well .... I mean, if someone asks, it can be said that it is Pavhani ...."
A few days passed in, as the month of Kartik started, Kakad Aarti was started in the Vitthal temple every morning. Ekadashi was approaching now.
"Baby you haven't said your name yet" Pant Maya was asking her.
"My name is Valaki, meaning everyone in the neighborhood is shouting like that."
"Baby sss is not a name, shall we call you Karthiki? Otherwise this Kartik month is starting so from today your name is Karthiki."
"Oh, do you like it?" Her aunt happily filled her with sugar, saying, "Sweeten your mouth" for being named 'Karthiki'.
"Dad, who are you two? Let me stay. You put a sari on my body. She gave shelter to my daughter and me."
"Hey, her name is Karthiki, but what do you call this little girl?"
"Anssssss, Radha? Rukmini? .. No !!
"Hey, Vrindavan. It will work, otherwise the two Vrindavanas will not meet you nearby !!!"
"Wow, that's a beautiful name ... Vrinda" Panta picked her up in her arms.
Karthiki was now roaming the factory house. Her health and that of the small group were improving. After eating nutritious food from their uncle's hand, both of them started having babies. But in the village, there was a loud discussion about who has come to Pant. But no one dared to come forward and ask them.
"Is Pant in the house?"
"Yes, I have come ... who are you, Patil uncle? Come in like this"
A very old man of the village had come to visit them.
"Pant, I directly touch on the subject ... Who is the girl who came to you? What is it, you have a lot of prestige in the village.
"Uncle, you are old and I want you to understand. One night in the month of Kartik, she brought her newborn baby out of the house. She came here after enduring many hardships. Then, without letting our humanity die, we took her home. Today, by the grace of God, she and her baby are safe with us and are living as members of our family. That's the truth. "Pant was simply telling the truth.
"Then why don't you do that, why don't you adopt her !!!. By asking Vakil Saheb !!! No one but you ...? You understand !!!"
"Yes, that's right."
Venutai was listening to this talk from home. When Patil's uncle returned, Pant and Venu Tai agreed. Having completed all the legal procedures through lawyers, he adopted Karthik. In a few days were stabilized.
One day Karthiki was playing with Vrinda and suddenly the little Vrinda fell while playing, Karthiki was very happy and she called out happily.
"Baba sss ... Baba sss ... I sss ... I ssss ... Come here soon"
"Speak son ....." Pant asked coming out.
"Mom and Dad, look, Vrinda Palthi has fallen"
Venu Tai Maya moved her hand over Karthiki's head and wiped everyone's eyes.
Said Karthiki with watery eyes.
"Who am I ... you sheltered me, gave me your name ... I have never seen God, but you are his angel, did you do this for me?"
"Only human son..only human ..." Pant said looking at her.
© Nikhil Devidas Vaze
9011096250
अरे वा ! हृदयस्पर्शी...
ReplyDeleteमाणुसकीची गोष्ट.खूप छान निखिल.
ReplyDeleteVery senti
ReplyDeleteKhup chhan
ReplyDelete