Sunday, May 09, 2021

"सखू"/"Sakhu"

 "सखू"


"सखूss अगं एss सखू....कुठे गेली बाई ही"
"सखूsss, अगं तारा ए ताराsss" 
"काय गं माई ? कशाला बोलावलेस मला!!! हातातले पत्ते उलटे करून यावे लागले. आधीच तो मधु प्रत्येक डाव जिंकतो आहे आज" ( जरा घुश्यातच छोटी तारा ड्रेस सावरत आली )
"अगं खेळात हार जीत हि होणारच!!!"
"ते जाऊ देत, मला का बोलावले ते सांग बरं आधी"
"अगं आपली सखू कुठे दिसतं नाहीये ते?"
"असेल गं इथेच कुठे तरी...कुठे जाणार आहे ती घर सोडून"
"तू जा बरं मधुला पण आण बोलावून. दोघं पण दूध प्या आणि शोधा तिला. आता बाबा पण ऑफिस मधून  येतील काही वेळात. हि सखू केव्हा पासून गायब आहे कोणास ठाऊक? संध्याकाळ पर्यंत आली म्हणजे मिळवली"
मांडी घालून तारा आणि मधु ( मधुसूदन ) यांनी," माझा... पहिला... नंबर" म्हणतं पटकन दूध पिलं.
"एss तारेsss, तुला पांढरी मिशी आली बघं, मोठ्या पुरुषांसारखी" छोटा मधु ताईला चिडवत म्हणाला.
"तारेsss काय!!! थांब म्हणतं " तिने त्याचा हात धरला आणि त्याच्या पाठीत जोरदार गुद्दा मारला.."मला तारे म्हणतोस काय?"
तो कळवला " माईss , ही बघ मला मारतीये"

    माई दोघांकडे रागाने पाहतच त्या दोघांवर ओरडल्या." अरे काय चाललंय तुमचे!!! मी आधीच काळजीत  आहे, सखुच्या विचाराने आधीच माझे चित्त थाऱ्यावर नाहीये...उठाss आधी तोंडाला पाणी लावा आणि शोधा पाहू तिला."

"हो" दोघे पण रागातच उठले..."हो बाई शोधतो..."

    असे म्हणून सगळ्या आजूबाजूला, वाड्यात, समोरच्या आणि पाठीमागच्या अंगणात, आजूबाजूच्या घरात शोधत सुटले.

"मधु, माईला कशाला हवी आहे रे सखू, नसली तर काय फरक पडेल ?"
"काय माहित, तारा ताई आपल्याकडे सखू कशी आली गं? तुला लक्षात आहे का? मला तर काहीच आठवत नाहीये." मधुने ताई कडे पाहत विचारले. 
पण तीला देखील ते आठवत नव्हते. शोधून शोधून पोरं घरी परत आली.
"माई, कुठे सापडली नाही बाई तुझी सखू!!!"
"तुझी की आपली?" डोळे मोठे करत माईने विचारले
"आपली, आपली सखू, बसss!!! पण माई तुला इतकी का गं तिची काळजी?"
"अगं ती पोटुशी आहे."
"म्हणजे काय माई?" मधुने विचारले.
"अरे म्हणजे तिला आता पिल्लं होणार आहेत. म्हणून मला तिची जास्त काळजी वाटते."
"माई पण त्यात काय आहे?"
"त्यात काय म्हणजे!!! आपल्या सखुला पिल्लं होणार, म्हणजे आपल्यावर तिची जबाबदारी नाही का? तिची काळजी घ्यावी लागेल" माईने दोघांना नीट सगळा विषय समजून सांगितला "पहा बरं परत एकदा आजूबाजूला कुठे दिसते का ते" 

    स्वयंपाकघरात पोळ्या करायला तवा गॅसवर ठेऊन माई भिजवलेल्या कणकेत हात खालून नुसताच विचार करण्यात गर्क होत्या.

" अगं !!! अगं लक्ष कुठे आहे ? मी घरात आलो, मुलांनी दार उघडले, तरी तुझं लक्ष नाही. कसला घोर पडला आहे म्हणे?" दामोदरराव देशपांडे म्हणजे  माईंचे पती त्यांच्या जवळ उभे राहून त्यांना विचारत होते.
" अहो, तुम्ही आलात!!! माझ्या लक्षातच नाही आले होss"
"तेच तर मी म्हणतोय"
" या हं तुम्ही आवरून, तोवर मी चहा ठेवते आणि लगेच स्वयंपाक करते. किती हो वाजले? माझं आज दुपार पासून कशात लक्षच नाही ये." 
"अगं, पण झाले तरी काय? लक्ष नसायला?"
"आपली सखूss"
"तिचे काय?"
" आज दुपार पासून ती कुठे दिसेनाशी झाली आहे हो"
" काय?"                        
                            

" होय हो, तुम्ही तिला आपल्या घरी आणली तेव्हा बिचारी जगेल का मरेल अशा अवस्थेत होती, मांजरीचे बारीक पिल्लू बिचारे, नुकतेच डोळे उघडलेले, शेजारच्या पाटलांचा तो तेव्हाचा गलेलठ्ठ पांढरा- तपकिरी बोका, कायम आपल्या अंगणातील प्राजक्ताच्या झाडात सावज मिळण्यासाठी दबा धरून बसणारा...या पिल्लाला मारायला टपलेला मेलाsss. आपल्या आई ( सासू बाई ) गेल्या आणि अगदी काहीच महिन्यात तुम्ही तिला आपल्या घरी आणले, तपकिरी रंगाचे तिचे मऊ शरीर, तिला आपल्या हातात घेतले की बारीक आवाजात ' म्याव म्यावं ' करायची. मग मीच हक्काने तिचे नामकरण 'सखू' असे केले." माईंची बोलताना तंद्री लागली होती. 
" माई जरा चहा मिळाला तर बरं होईल नं!!!"  बोलताना त्यांना मध्येच थांबवत दामोदरराव म्हणाले. 
"अगं बाई हो की, मी ठेवते हं चहा " बोलण्याच्या नादात माई विसरल्या होत्या.

   माई आणि दामोदरराव यांनी चहा घेतला आणि माई परत उरलेल्या स्वयंपाकात गुंतल्या. पोळ्या भाजताना, भाजी करताना त्यांच्या मनात एक सारखे विचार सुरूच होते. ही सखू आपल्याकडे यांनी (दामोदरराव) आणली तेव्हा किती असाह्य, भेदरलेले, नाजूक, गोंडस असे पिल्लू होते. आपण तिला मुलांसारखे  तासन्तास मांडीवर घेऊन लहान चमच्याने दूध पाजायचो...तेव्हा तिचे निरागस डोळे, शेपटीची हालचाल मनाला आनंद देऊन जात होते. तिच्या मानेखलील भागाला हात लावून जरा गुदगुल्या, जरा खाजवले की ती कशी पडकन आपले इवले इवले डोळे मिटायची. अंगणात मनसोक्त खेळायची, गवतातील किडे शोधताना अनेक पवित्रे घायची. लोखंडी कॉटला बांधलेली बांगडी किती वेळ खेळायची. रात्री निजानीज झाली की आपल्या पांघरुणात येऊन झोपायची..


"अगं आई गंsss" विचारांचे चक्र सुरू असतानाच चुकून तापलेल्या तव्याचा चटका त्यांच्या हाताला बसला..लगेच हात गार पाण्यात बुडवून उरलेले काम त्यांनी पूर्ण केले.

    सगळ्यांचीच जेवणं झाली, मुलं, दामोदरराव झोपायला गेले; तरी काही सखू परत आली नाही. आता मात्र माईंचा धीर सुटला आणि त्यांना रडू फुटलं.  त्यांचा तो रडणारा आवाज दामोदरराव यांच्या लक्षात आला.

"माई, अगं कशाला रडते आहेस ? सखू साठी ? अगं मांजरच ते!!! ते काय कायम घरात राहील?"
"अहोsss असं हो कसं बोलता ? मी तिला आज पर्यंत माझ्या दुसऱ्या मुली सारखीच सांभाळली आहे. आज अचानक कशी हो गायब झाली. मला न सांगता.."

    दामोदरराव यांनी माईला बरेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला..." परत एकदा सकाळी मीच शोध घेईन हं तिचा" असे समजावून त्यांनी माईंना झोपवले.

    सकाळ झाली तशी तांबूस रंगाची सखू 'म्याव म्याव' करत घरात परत आली पण तिचे पोट आत गेलेले माईंना दिसले...घरात आली तशी माईंनी तिला कुशीत घेतले. मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला दुधाजवळ नेऊन ठेवले.

" माई हिचे पोट गं? असे कसे कमी झाले?" तारा विचारत होती.
" अगं तिला पिल्लं झाली वाटतं!!! पण तिने पिल्लांना सुरक्षित जागी ठेवले असेल. कुठे ते शोधूयात?"

          

    बरीच शोध शोध केल्यावर सखू आणि तिची गोंडस चार पिल्लं सापडली. मधु आणि तारा पिल्लांना पाहून हरखून गेले. त्यांच्याशी खेळण्यात मुलांचा दिवस जात होता. मधे चार ते पाच आठवडे झाले  होते. त्या चार पैकी दोन बोक्याने मारली, एक शेजारच्या कुलकर्णी यांनी नेले, त्यामुळे आता एकच पिल्लू शिल्लक राहिले.  

   एक दिवस मागच्या अंगणात लहान पिल्लाचा 'म्याव म्याव' असा बारीक आवाज येत होता..पण कुठून येतो आहे हे काही केल्या लक्षात येत नव्हते. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. ते लहान पिल्लू आईच्या ओढीने ओरडलायला लागले...सखू पण त्याचा शोध घेऊ लागली. ती अंगणात सैरावैरा फिरत होती आणि सखूने बरोबर त्याचा शोध घेतलाच...

    अंगणातील बागेत लावलेल्या केळीच्या बुंधात ते पिल्लू अडकले होते, म्हणतात ना ' घार उडे आकाशी, चित्त तिचे पिल्ला पाशी' तसेच काहीसे सखू बाबतीत झाले. तिने तिचे पिल्लू शोधले...हे पिल्लू तिथे कसे गेले हे  घरातील  कोणालाच समजले नाही.

       

    आपले दात त्या करड्या रंगाच्या पिल्लाला न लागू देता. तिने अलगद पणे त्याच्या मानेला धरून घरात आणले.

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या (comment) प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या, सोबत आपले नावंं लिहावेे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Sakhu"


"Sakhu ss agan ass sakhu .... kuthe geli bai hi"
"Sakhu sss, agan tara a tara sss"
"What the heck, Ma'am? Why did you call me !!! I had to turn the cards in my hand. Already, Madhu is winning every inning today"
"Guys, victory in the game is bound to happen !!!"
"Let it go, tell me why you called me first."
"Oh, where can't you see your friend?"
"Maybe it's somewhere here ... somewhere she's going to leave home"
"You better go and call Madhu. Both of you drink milk and look for her. Now Baba will come from the office in a while. Who knows when this friend has been missing?
Tara and Madhu (Madhusudan) put on their thighs and said, "My ... first ... number".
"Ess stars, you see, you have a white mustache, like a big man," said little Madhu teasing Tai.
"What the heck !!! Stop saying" she grabbed his hand and punched him hard in the back .. "Do you call me stars?"
He told me, "Look, you're killing me."
My mother looked at them angrily and shouted at them both. "Oh, what's going on with you !!! I'm already worried, I'm not already in a good mood ... Wake up, put water in your mouth and look for her."

"Yes, they both got angry ..." Yes, the woman is looking for ... "

    So all around, in the castle, in the front and back yard, looking around the house.

"Madhu, what do I want, Ray Sakhu? If not, what difference does it make?"
"You know, Tara Tai, how did you get Sakhu? Do you remember? I don't remember anything." Madhune asked looking at Tai.
But she didn't even remember it. After searching, the boy returned home.
"Mai, where can't you find your friend !!!"
"Yours or yours?" My mother asked, widening her eyes
"Yours, your friend, that's it !!! But why do you care so much about me?"
"Oh, she's pregnant."
"What do you mean, Mai?" Madhune asked.
"Oh, she's going to have puppies now. So I'm more worried about her."
"Mai but what's in it?"
"What's in it !!! You're going to have puppies, so you don't have to take care of her?"

    Putting the frying pan on the gas to make honeycombs in the kitchen, I was just thinking about putting my hands in the soaked dough.

"Oh !!! Oh, where is the attention? I came to the house, the children opened the door, but you don't pay attention. Who is scared?" Damodarrao Deshpande, my husband, was standing near her and asking her.
"Hey, you came !!! I didn't even notice."
"That's what I'm saying."
"Come on, I'll put the tea down and cook right away. What time is it? I haven't noticed anything since this afternoon."
"Oh, but what happened? Not paying attention?"
"Your friend"
"What about her?"
"Where's she been since this afternoon?"
"What?"
"Yes, yes, when you brought her to your house, the poor cat was in a state of life and death, the poor kitten, the newly opened eyes, the fat white-brown goat of the neighbour's house, always pressing to get the greenery in the prajakta tree in your yard ... Your mother (mother-in-law) went to kill this puppy and in just a few months you brought her home, her soft brown body, you took her in your arms to soften meow meow, then I rightly named her 'Sakhu'. That's what happened. " My mother was drowsy while speaking.
"It would be nice if I could get some tea !!!" Damodarrao said stopping him in the middle while speaking.
"Oh lady, I keep tea," I forgot.

   Mai and Damodarrao took tea and Mai went back to cooking. While roasting the beehive, they kept thinking the same thing. When he (Damodarrao) brought this friend to us, he was such an unbearable, scared, delicate, cute puppy. We used to take her on our laps for hours like a child and give her a small spoonful of milk ... then her innocent eyes, the movement of her tail were making my mind happy. Touching her underarms with her hands, she would scratch her eyelids. I used to play in the yard, I used to find many insects in the grass. How long did the bracelet tied to the iron coat last? When I fell asleep at night, I would come and sleep in my blanket.

    While the cycle of "Aang I Gansss" thoughts was going on, the click of the heated tawa fell on his hand by mistake.

    Everyone ate, children, Damodarrao went to bed; However, some friends did not return. But now my mother lost her temper and started crying. Damodarrao noticed his crying voice.

"Mai, why are you crying? For a friend? It's a cat !!! Will it stay in the house forever?"
"Ahssss how do you say yes? I have treated her like my other daughters till today. How suddenly yes disappeared today. Without telling me .."
    Damodarrao tried to explain a lot to me ... "I will find her again in the morning," he explained and put her to sleep.

    As the morning wore on, the red-haired friend returned to the house with a 'meow meow', but her mother saw that her stomach had gone inside ... As soon as she came home, she hugged her. Maya moved her hand over her back and held her close to the milk.

"My stomach hurts? How did it get so low?" Tara was asking.
"Oh, she thinks she has puppies !!! But she must have kept the puppies in a safe place. Where can we find them?"
After much searching, Sakhu and her cute four cubs were found. Madhu and Tara went everywhere to see the chicks. Children's day was spent playing with them. It was four to five weeks in between. Two of the four were killed by a goat, one by a neighbor, Kulkarni, leaving only one puppy left.

   One day in the back yard, a small puppy was making a faint sound of 'meow meow'. The search began everywhere. That little puppy started screaming with mother's longing ... Sakhu but started looking for him. She was walking around the courtyard and Sakhu searched for her right away ...

    The puppies were stuck in a banana bush planted in the garden in the yard. She found her puppies ... No one in the house understood how these puppies got there.
   
    Without applying your teeth to that gray puppy. She grabbed his neck and brought him home.

© Nikhil Devidas Vaze
9011096250

7 comments:

  1. लेख छान लिहिला आहे. ह्यालाच माया म्हणतात मग ती मनुष्यावर असो अन्यथा प्राण्यावर. त्याच मूल्य मापन करता येत नाही. मात्र इथे फरक आहे. प्राणीमात्रावर प्रेम केलं तर तो ते शेवट पर्यंत लक्षात ठेवतो परंतु मनुष्य मात्र तसं करत नाही.

    ReplyDelete
  2. ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨👌🏻👌🏻खुप सुंदर लिखाण केले आहे,

    ReplyDelete
  3. खूप छान. यालाच माया म्हणतात.

    ReplyDelete

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले