" कारवी- एक दिव्य वनस्पती "
"राजगड तोरणा ट्रेक खूप प्रसिद्ध आहे रे, चला आपण जायचे का ?"
"अरे निख्या, आपल्यापैकी कोणीच, कधीच हा ट्रेक केला, पाहिला नाहीये ? मग आपण कसं जायचं?"
"अरे, मी काढतो सगळी माहिती, आपले बरेच ओळखीचे आहेत जे या पूर्वी जावून आलेले आहेत."
मी सर्व माहिती घेण्याची जबाबदारी घेतली. माहिती मिळाली आणि मोहीम पण पक्की झाली. पण रूमवर हे असेच असते, जो सुचवतो तोच त्यात फसतो ( म्हणजे अगदी बकरा होतो)
राजगड तोरणा ट्रेकची पूर्ण जबाबदारी आणि हवशे, गवशे, नवशे या सगळ्यांना घेऊन जाण्याचे काम माझ्याकडे आले. हss, आता मी पण ते मोठ्या आनंदाने स्वीकारले. गड म्हटलं की माझ्या मनात, शरीरात उत्साह संचारतो. सगळ्या नवख्या जणांना घेऊन स्वारगेट मधून राजगडच्या बसमध्ये बसलो. शारीरिक आणि मानसिक तयारी करून बसमध्ये बसलेले मित्र होतेच. तितक्यात बस कात्रजपर्यंत आली....आणि एक मित्र म्हणाला, "मी नाही येत बाबा, उतरतो" आणि तो गडी चक्क बस मधून उतरला पण, हे असे मित्र मंडळ घेऊन राजगड तोरणा ट्रेक करणे म्हणजे कठीण झाले असतेच,
" बरं झाले मायलाss इथचं उतरलं हेss, नाही तर आपला पूर्ण ट्रेक यालाच सांभाळण्यात गेला असता." एक मित्र पटकन बोलून गेला. पण या मुळे उरलेल्या मित्रांपैकी काही जणांच्या डोक्यात तात्पुरती नकारात्मकता आली. हे असे नकारात्मक विचार घातक असतात.
आता बसने वेग घेऊन ती तिच्या वेळेत 'गुजवणे'ला पोंचली, आम्ही रात्री पायथ्याच्या म्हसोबाच्या देवळातील मिणमिणत्या तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात आमच्या सोबतचे डब्बे उघडले ...जेवण झाले, तसे देवळाच्या समोरील पटांगणात शेकोटी पेटवली.

"काय भारी वाटतयं रे!! अरे, मी इतके वर्ष पुण्यात आहे, माझा जन्म पण पुण्यात, पण मी कधी कधी आलो नाही रे असे, रात्री कुठे?" एक नवखा मित्र म्हणाला.
"का, रे असे का म्हणतोय? कधीच रात्री बाहेर नाही राहिलास का? का म्हणे ? भीती ?
"अरे, नाही पण कधी संधी आणि प्रसंग नाही आला. पण बरं झाले मी आलो ते." आनंदी होत तो म्हणाला.
असे कितीतरी मुलं आहेत जे या भागात राहून पण कधी निसर्ग, त्याचे विविध रूपं जगत नाहीत. आमच्या शेकोटीच्या बाजूने म्हणजे काही अंतरावरून एक छोटा संथ ओढा वाहत होता, पावसाळ्यात मात्र याला नदीचे स्वरूप येते. गडावरून वाहत येणारे पाणी यात सामावून हा ओढा तेव्हा नदीप्रमाणे वाहतो, जेव्हा प्रचंड पाणी वाढते त्यावेळी याच ओढ्याचा छोटा धबधबा पण तयार होतो. माझ्या सुदैवाने मला याचे हे दोन्ही रूपं पाहायला, अनुभवता मिळाले आहे. (मला असा वाहता धबधबा एकदाच पहिला मिळाला आहे ज्याचा रात्री तीन वाजता काढलेला फोटो सोबत दिला आहे)

त्या रात्री देवळांचा अंगणात, शेकोटी , वाहणारा ओढा, आणि आकाशात सगळीकडे नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त तारे, चांदण्या, आम्हाला दिसत होत्या. झोपताना डोळे मिटले की मला तर तेच दिसत होते....राजगडाच्या चढायला सुरवात करून आता काही वेळ गेला होतो.सुरवातीच्या काही टेकड्या चढून वर आलो होतो.
तितक्यात आमच्या पैकी ओरडला"अरे ते पहा काय दिसतय?" पावसाला नुकताच सुरु झाला होता. डोंगर आता जरा हिरवे झाले होते. काही ढग वाऱ्याने बाजूला झाले आणि त्याच्या डोळ्यासमोर सुवेळा माचीवरील नेढ( सुईचा दोरा ओवायची जागा) त्याला दिसले होते. डोळ्याचे पारणे फेडणारे ते दृश्य आजही माझ्या लक्षात आहे.
सकाळी लवकर उठून आम्ही गडाकडे निघालो होतो, पुढील अंतर चढून वर आलो आणि लक्षात आले की आमचा एक मित्र हातात एक काठी घेऊन चढतोय, पण तो माझ्यापासून दूर खाली होता, सगळ्यात पुढे असल्यामुळे माझ्या मागून सगळे वर येत होते.
काही वेळाने एक डोंगर संपला आणि दुसरा सुरू झाला तेव्हा मध्ये घळ लागते, याच पुढील अंतरात साधारण ४-५ फूट उंचीची एक वनस्पती दिसली, याचीच काठी त्या मित्राने हातात आधार म्हणून घेतलेली होती, पायवाटेच्या दोन्ही बाजूला ही वनस्पती होती , याच चिंचोळ्या पायवाटेने जायचे होते, म्हणून मी सगळे एकत्र पुढे जाऊ यासाठी मागील मित्रांची वाट पाहत थांबलो.
आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्या चिंचोळ्या पायवाटेवरून चालू लागलो. या वाटेच्या डाव्या बाजूला डोंगर आणि उजव्या बाजूला खोल दरी होती. वाटेच्या दोन्ही बाजूला ४-५ फूट उंचीच्या वनस्पतींमधून वाट काढणे कठीण जात होते पण आम्ही खाली वाकून जायला लागलो.
मी सर्वात पुढे होतो सगळे नीट येत आहेत ना हे बघण्यासाठी मागे वळून पाहिले तर एक मित्र दिसला नाही! काळजीने मागे आलो आणि तो मित्र सापडला...तो मध्येच गायब कसा काय झाला? याच विचारात असताना लक्षात आले की आम्ही जी वनस्पती ओलांडून जात होतो, त्या वनस्पतीची झुडपे आम्ही पुढे सरकलो की आमच्या हाताने वा पाठीवरच्या बॅगमुळे फाकत होती आणि आम्ही तिला ओलांडून समोर गेलो की ती परत तिच्या जागेवर येत होती त्यामुळे पायवाट या दाट वनस्पतींमध्ये गायब होत होती.
आम्ही सगळे एकमेकांना सांभाळून गड सर करून वर आलो, मागे सांगितल्याप्रमाणे पद्मवती देवीच्या मंदिरात सामान टाकले.
डब्बे खाऊन क्षणभर विश्रांती घेतली आणि काही वेळात गडाची भ्रमंती सुरू केली.
संपूर्ण गड पाहण्यासाठी किमान ५-६ तास लागणार होते, आमच्यातील एकमेव मीच त्यापूर्वी राजगडावर येऊन गेलो असल्यामुळे मला माहित असलेला, भेटलेला गड सगळ्यांना दाखवला........ ! शेवटी दुर्गम बालेकिल्ला चे दर्शन घेतले. हा बालेकिल्ला केवळ अद्भुत तर आहेच पण सहज जिंकणे महाकठीण आहे. नुसता बालेकिल्ला पण नक्कीच शत्रूला झुंज देऊ शकेल असा आहे.
हे सगळे पाहत, मित्रांना दाखवत असताना एक गोष्ट नक्की दिसली ती म्हणजे वर उल्लेख केलेली ही वनस्पती सगळीकडे फोफावली होती. दरीत,पठारावर तिचेच जंगल तयार झाले होते....!
बालेकिल्ला पाहून उतरलो आणि परत पद्मावती मंदिरात आलो. आमच्यातील नवखे मित्र दमले, कंटाळले; पण आमचातील काहींचा उत्साह काही कमी झालेला नव्हता. दमलेल्या मित्रांना मंदिरात आराम करायला ठेऊन आम्ही २ जण सहज पद्मवती तळ्यात खाली उतरलो, त्यात मस्त हात बुडवून बसलो होतो, शांत, गारगार आणि स्वच्छ पाणी होते. आज पण राजगडला गेलो की तळ्यातील पाणी चाखल्या शिवाय तहान भागत नाही.
आम्ही असेच बसलेलो असताना एक आजोबा तळ्यातील पाण्याने त्यांचा हंडा भरायला आले. आजोबा काटक होते. उन्हामुळे, कष्टामुळे रापून तांबट काळे दिसत होते. त्यांनी विचारले......
"काय रे पोरांनो, कुठून आलात, पून्यातून का? आणि दोघच का ?
आज काय, मुक्काम का गडावर?"
" नाही आजोबा आम्ही दोघेच नाही, मित्र आहेत पद्मवती मंदिरात. आणि हो आज मुक्काम आहे, उद्या सकाळी तोरणा गडावर जाणार ,संजीवनी माची वरून"
"चला ss", असं म्हणून त्यांनी तो भरलेला हंडा आपल्या खांद्यावर घेतला, ते आमच्या सोबत मंदिरात आले.
" हे का तुमची दोस्त मंडळी? कायsss जात्याल का उतरून संजीवनी? लय लय बिकट वाट ! जपून जावाsss बाबाss होsss! तोरणाची वाट म्हणजे ' स्वर्गाची वाट' म्हणत्यात त्याला, तुमचा ह्योsss दोस्त तर आधीच मेंगळट दिसतोया. येss बाबा जपून जाय बरकाsss"त्या मित्राकडे पाहतं ते आजोबा म्हणाले.
अशा अस्सल गाववाल्या आजोबांचा प्रेमळ सल्ला ऐकला आणि आमचा पहिल्यांदा घराबाहेर पडलेला मित्र मात्र चिंतेत पडला....!
"हाss एक सांगायचे राहिलं बाबा, तुमच्यातला म्होरक्या कोण हाई रं ?"
मी पुढे सरकलो तसे ते म्हणाले "कोण ? तू का बाबा? संजावनीला जायच्या आधी ते झुडपे दिसतायत का?? ते तिकडं!!!"असे म्हणून त्यांनी दूर खालच्या बाजूला हात दाखवला.
"कोणते हो ?" मी विचारले.
"अरे ते दिसतंय का ते झुडूप उच उच वाढलेलं? त्याच्या काटक्या आणा मोडून आणि घ्या तुमच्या संग आधाराला, असून द्याद त्या काठ्या सगळ्यांच्या हातात आधाराला."
" हो आजोबा घेतो" असे म्हणून आम्ही मान डोलावली.
खरंच हे आजोबा कोण होते माहीत नाही? पण कदाचित त्यांच्यात वीर मावळ्यांचे रक्त असेल. जे कायम त्या गडांवर, राजावर आणि त्यांच्या प्रजेवर नितांत प्रेम करणारे आणि त्यांना आपुलकीने जपणारे असेल. त्यांनी आम्हाला अनेक लाखमोलाचे ज्ञान दिले आणि महत्वाचे म्हणजे बळ दिले.
आम्ही रात्री गडावर मुक्काम करणार होतो, पण सर्वांनी ठरवले की आजच गड सोडू आणि अंधार पडायच्या आत ' स्वर्गाची वाट ' उतरून तोरणाच्या वाटेवर जाऊ. अजून अंधार पडायला वेळ होता तसे आम्ही गतीने संजीवनी माची गाठली. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे त्या वनस्पतीच्या काटक्या आधारासाठी घेतल्या. गड चढताना हीच वनस्पती ओलांडून आम्ही वर आलो होतो ह्याची आठवण झाली. मात्र स्वर्गाची वाट पाहून आमच्यातील हौशी मित्र गळाले, पण आता मागे फिरणे शक्य नव्हते...!!!!
दोन्ही बाजूला प्रचंड दरी, जमतेम एक जण जाऊ येऊ शकेल इतकी पाऊलवाट, तीव्र उतार अशीच ती वाट खरोखर त्याचे नाव सार्थं करत होती. 'स्वर्गाची वाट' आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन वाट उतरत होतो आणि सूर्य पण अस्ताला जात होता. हळूहळू अंधार पडायला लागला होता, त्या मावळतीच्या सूर्याच्या गती समोर आमची गती अगदीच कमी होती....!
कसे बसे सगळे वाट उतरून खाली आलो. तोवर मिट्ट काळोख झाला होता...अंधारातच आम्ही जरा विसावा घेतला. आता मागे जाणेही शक्य नव्हते आणि पुढे अंधारामुळे काही दिसत ही नव्हते. आमच्या आठ जणांमध्ये फक्त २ विजेऱ्या होत्या. त्यातील आधी एकच वापरू असे ठरवले कारण मिट्ट अंधारात दोन्हींचे सेल संपले तर अजून कठीण झाले असते त्यामुळे एक विजेरी सुरक्षित ठेवणे आवश्यक होते.
मी आणि अजून एका मित्राने रस्त्याचा, पाऊल वाटेचा अंदाज घेतला....... गुरांचे शेण आणि काही ठिकाणी पाणी वाहण्याच्या खुणा दिसत होत्या. आम्ही मार्ग निश्चित केला आणि पुढे निघालो.
तो मित्र पुढे मध्ये सहा मित्र आणि एकदम शेवटी मी! हे असे मुद्दाम केले होते. आमच्या दोन मित्रांच्या मध्ये नवखे मित्र सुरक्षित होते. थोडा वेळ अशा पद्धतीने चालल्यावर पुढचा
मित्र अचानक थांबला.........!
"अरे निख्या !"
"काय रे ?" (मी मागून ओरडलो)
"अss बेss समोर ये रे,"
"आलोssरे" असे म्हणून मी मागुन पुढे गेलो आणि पाहतो तर काय एका पाऊल वाटेला अनेक छोट्या छोट्या वाटा फुटलेल्या होत्या......आता आली का पंचाईत????????
"अरे आता कोणता रस्ता पकडायचा?"
"थांब, मी जरा पुढे जाऊन पाहून येतो."
तितक्यात आमच्या दुसऱ्या एका मित्राने सूर काढला.....
"अरे तू आम्हाला सोडून पुढे जाऊ नकोस. आपण राहू रात्री इथेच, या जंगलात!"
"अरे हो हो घाबरु नका, आपण जेमतेम सगळे या वाटेवर कसेबसे उभे आहोत, ते ही एका मागे एक, इतकी लहान पाऊल वाट आहे. त्यात ही वनस्पती आहे ५-६ फुटांची, यातून बाहेर पडू आणि मोकळ्या पठारावर जाऊ मग पाहू काय करायचे ते?"
मी पुढे जाऊन वाट तपासून आलो. वाट तर सापडली आणि सगळ्यांना त्या जंगलातून बाहेर घेऊन आलो. मागे वळून पाहिले तर कोणतीच वाट दिसत नव्हती, आपण कुठून इथवर पोचलो?? ती वाटच या वनस्पतीने गुप्त करून टाकली.
आम्ही सुरक्षित जागी आलो पण ही नेमकी वनस्पती कोणती? एवढ्या प्रमाणात कशी काय? काही केल्या त्याचे नाव कळत नव्हते? पूर्वी कुठे पाहिल्याचे आठवत नव्हते.
वाटेत पूर्ण अंधार होता, त्यात या वनस्पतीचा हा जादूचा खेळ पाहून अवाक झालो होतो. पाऊल वाटेवरच्या दोन्ही बाजूला आपण त्यात शिरलो की ही वनस्पतींची झुडपे बाजूला व्हायची आणि आपण समोर गेलो की परत जागेवर येऊन ती वाट दिसेनाशी व्हायची.
दुर्दैवाने आमचा हा ट्रेक अर्धवट राहिला पण ही वनस्पती काही केल्या डोक्यातून जात नव्हती. त्यानंतर या वनस्पतीची उकल करण्यासाठी थेट मामाला संपर्क केला. तो ट्रेक मधील एकदम जाणकार! त्यानं कळवले 'अरे तुला दिसलेली ही वनस्पती म्हणजे 'कारवी ' ही एक दिव्य वनस्पती आहे. आपल्या पश्चिमघाटा मध्ये ही खूप येते, याचा गावाकडचे लोक आपल्या घराच्या, झोपड्यांच्या भिंतींसाठी वापर करतात. सात वर्षातून कधी कधी तर बारा वर्षातून एकदा फुलं येतात त्याला. कारवीची खासियत आहे की ती आपण त्याच्या मधून गेलो की फाकल्या जाते आणि आपण त्यातून बाहेर पडलो की परत जागेवर येते. हे तिच्यातील लवचिक पणा मुळे'.
या वनस्पती बाबत इतकी महिती मिळाली आणि लक्षात आले ..... "माझे सिंहगड प्रेम भाग १" (https://muktalikhan2021.blogspot.com/2021/04/my-sinhagad-love-part-1.html.) या लेखात लिहल्या प्रमाणे. चोर दरवाज्याचा शोध घेताना मला दरीत आधार देणारी हीच ती कारवी !!!!!! एक अफाट वनस्पती. जिने मला त्या धाडसातून वाचवले.
©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Karvi - A Divine Plant"
"The Rajgad Torna Trek is very famous. Ray, do you want to go?
"Hey Nikhya, have any of you ever done this trek, never seen it? So how do you go about it?"
"Hey, I get all the information, you know a lot of people who have been here before."
I took responsibility for getting all the information. Information was received and the campaign was confirmed. But that's the way it is in the room, whoever suggests it gets caught (that is, he becomes a goat).
I got the full responsibility of Rajgad Torna Trek and the task of taking all the Havashe, Gavashe, Navshe. Hs, now I accepted it with great pleasure. Gad said that in my mind, my body is full of excitement. We took all the newcomers and boarded the bus from Swargate to Rajgad. There were friends sitting in the bus with physical and mental preparation. Just then the bus came to Katraj .... and a friend said, "I'm not coming, Baba, get off" and he got off the bus, but it would have been difficult to trek to Rajgad Torna with such a circle of friends.
"It's good that Myla landed here, otherwise your entire trek would have been taken care of." A friend spoke quickly. But this led to temporary negativity in the heads of some of the remaining friends. These negative thoughts are dangerous.
Now the bus picked up speed and she reached 'Gujwane' in her time. We opened the cans with us in the light of the flickering oil lamp in the temple of Mhasoba at the foothills at night.
"What a heavy feeling Ray !! Hey, I've been in Pune for so many years, I was born in Pune, but I have never been here, Ray, where is the night?" Said a novice friend.
"Why, Ray, why do you say that? Have you never been out at night? Why? Fear?
"Oh, no, but the opportunity never came. But well, I came." He said being happy.
There are so many children who live in this area but never live in nature, its various forms. Beside our fire, a small stream was flowing from some distance, but in the rainy season, it looks like a river. This stream flows like a river by accommodating the water flowing from the fort. When a huge amount of water rises, a small waterfall of this stream is also formed. Luckily for me, I've been able to see and experience both of these forms. (This is the first time I've ever seen a waterfall with a photo taken at three in the morning)
That night in the courtyards of the temples, the fires, the flowing stream, and everywhere in the sky we could see only and only stars, moons, we could see. It was only a matter of time before I started climbing Rajgad. I had climbed some of the initial hills.
Suddenly one of us shouted, "Hey, look what it looks like." The rain had just begun. The mountains were green now. Some of the clouds were blown away by the wind, and before his eyes he could see the needle on the Suvela Machi. I still remember that eye-popping sight.
We got up early in the morning and went to the fort, climbed the next distance and noticed that one of our friends was climbing with a stick in his hand, but he was far away from me, being in the forefront, everyone was coming up behind me.
After a while, when one hill ends and the other starts, there is a mound in the distance. In the next distance, a plant about 4-5 feet high was seen. So I waited for my previous friends to move on together.
We all came together and started walking down that slippery path. The road had mountains on the left and a deep ravine on the right. It was difficult to get through the 4-5 feet high vegetation on both sides of the road but we started to bend down.
I was at the forefront. I looked back to see if everyone was coming. I didn't see a friend! Carefully came back and found that friend ... How did he disappear in the middle? It was while contemplating this that we noticed that the bushes of the plant we were crossing were moving forward because of the bags in our hands or on our backs and we went across the front that she was coming back to her place so the footsteps were disappearing in these dense plants.
We all took care of each other and came up to the fort, as mentioned earlier, put our belongings in the temple of Goddess Padmavati.
After eating the cans, he rested for a moment and after some time started wandering around the fort.
It would take at least 5-6 hours to see the entire fort, since I was the only one of us who had come to Rajgad before that, I showed everyone the fort I knew and met ........! Finally visited the remote Balekilla. This fort is not only amazing but also very difficult to conquer easily. It is just a stronghold but it can definitely fight the enemy.
Seeing all this, one thing I saw while showing it to my friends was that the above mentioned plant was everywhere. In the valley, on the plateau, her own forest was formed ....!
We got off after seeing Balekilla and came back to Padmavati temple. Our new friends are tired, bored; But the enthusiasm of some of us did not diminish. Leaving the exhausted friends to rest in the temple, the two of us easily descended into the Padmavati pond, immersed in it with cool hands, calm, calm and clean water. Today we went to Rajgad but the water in the pond does not quench our thirst.
While we were sitting, a grandfather came to fill his pot with water from the pond. Grandpa was a bitch. Because of the heat, the hard work made the copper look black. He asked
"Where are you from, Poonya? Why both?"
What about today, why stay at the fort? "
"No, Grandpa, we are not both, we are friends at the Padmavati temple. And yes, we are staying today, we will go to Torna fort tomorrow morning, from Sanjeevani Machi."
"Come on", so he took the full pot on his shoulder, he came to the temple with us.
"Why is this your friend Mandali? Why are you going to come down and revive it? Wait for the rhythm! Wait for the rhythm! Japa sss Baba sss yes sss! He said.
I listened to the loving advice of such a genuine village grandfather and our friend who was out of the house for the first time got worried ....!
"One more thing to say, Baba, who among you is the leader?"
As I moved forward, he said "Who? Why you Baba? Do you see those bushes before going to Sanjavani ?? That's over there !!!" So he showed his hand on the far side.
"Which one?" I asked.
"Hey, do you see that bush growing tall? Break its trunks and take the support with you, and put the sticks in the hands of everyone."
"Yes, Grandpa," we nodded.
Really don't know who this grandfather was? But maybe they have the blood of heroic Mavals. Who will always love and cherish those forts, the king and his subjects. They gave us many millions of valuable knowledge and, most importantly, strength.
We were going to stay at the fort for the night, but we all decided to leave the fort today and go down the 'path to heaven' on the way to the pylon before dark. As it was getting dark, we reached Sanjivani Machi. She took the cuttings of the plant for support, as her grandfather had said. As we climbed the fort, we remembered that we had come across the same plant. But waiting for heaven, our amateur friends fell, but now it was not possible to go back ... !!!!
The huge ravine on both sides, the footpath so far that only one person could go, the steep descent that really made his name meaningful. 'Waiting for heaven' We were all waiting and the sun was going down. It was slowly getting dark, our speed was very low in front of the speed of the setting sun ....!
How the buses all came down the aisle. By then it was pitch black ... We rested in the dark. It was not possible to go back now and nothing could be seen because of the darkness ahead. Of the eight of us, only two were lightning bolts. Decided to use only one of them first because it would have been even harder if both cells had run out in the dark, so it was necessary to keep a flashlight safe.
Another friend and I guessed the road, the footpath ....... Cattle dung and in some places there were signs of water flowing. We paved the way and moved on.
Six friends in that friend next and I at the very end! This was done on purpose. New friends between our two friends were safe. Next after walking like that for a while
Friend stopped suddenly .........!
"Oh Nikhya!"
"What the heck?" (I shouted from behind)
"Come on, let's go."
"Aloss re" so I went back and forth and saw if there were many small parts broken in one step ...... why did you come to the panchayat now ????????
"Which way to go now?"
"Wait, I'll go ahead and see."
Just then another friend of ours set the tone .....
"Oh, don't leave us. We'll stay the night here, in this forest!"
"Oh yes, don't be afraid, we are all standing on this path somehow, it is one step after another, such a small step. There is this plant of 5-6 feet in it. "
I went ahead and checked. We found the wait and brought everyone out of the forest. Looking back, there was no waiting, where did we get here ?? That plant was hidden by this plant.
We came to a safe place but what exactly is this plant? How so much? Some did not know his name? I don't remember where I saw it before.
There was complete darkness on the way, and I was amazed to see this magical game of this plant. On either side of the footpath we entered it so that the bushes of these plants would be on the side and when we went in front we would come back to the place and the path would be visible.
Unfortunately, our trek was incomplete, but the plant did not pass through our heads. He then approached Mama directly to unravel the plant. He is very knowledgeable in trek! He said, 'Oh, the plant you see is' Karvi', a divine plant. It comes a lot in our western ghats, it is used by the villagers for the walls of their houses and huts. It blooms sometimes in seven years and once in twelve years. The peculiarity of Karvi is that it is thrown away when we go through it and it comes back to the place when we go out of it. This is due to her flexibility.
I got so much information about this plant and realized ..... "My Sinhagad Love Part 1" (https://muktalikhan2021.blogspot.com/2021/04/my-sinhagad-love-part-1.html.) As written in the article. This is the caravan that supports me in the valley while searching for the thief's door !!!!!! A vast plant. Who saved me from that dare.
© Nikhil Devidas Vaze
9011096250
निख्या, तुझ्यासोबत गड पाहायला मजा येते राव... मी miss केला होता हा ट्रेक.... भारीच लिहिलेस, अगदी मला तुमच्या सोबत आल्याच्या भास झाला थोड्यावेळा साठी 😊👍👌
ReplyDeleteखरंच निखिल बरोबर आपणही फिरतोय
ReplyDeleteअसंच वाटतं तुझं प्रवासवर्णन वाचताना.धन्यवाद!
खूप छान लिहिले आहे. मला कारवी माहिती आहे. माझ्या लहानपणी गावी कारवाईचा भिंती सारखा उपयोग व्हायचा
ReplyDeleteYewdhya lahanpani Chan lihitos...all the best for your future
ReplyDeleteखूप छान लिहिलंय.
ReplyDeleteधन्यवाद.
ReplyDeleteआज एका नव्या व अद्भुत वनस्पती ची ओळख झाली. प्रत्यक्ष पाहण्याचा योग जळून येण्याची प्रतिक्षा.......
तुमचा लेख वाचताना मी स्वतः तुमच्या सोबत ट्रेक करत आहे मी हा अनुभव घेत आहे असं वाटतं. थोडी भिती वाटत चालत आहे.
ReplyDeleteकारवी वनस्पती ची गम्मत वाटली ती वनस्पती पहाण्याची व अनुभव घेण्यासाठी तरी हा ट्रेक करणार.
निखील सर
🌷🙏धन्यवाद
जरूर, पावसाळा सुरू झाला आणि सरकारी नियम बदल झाला की लगेच....
Delete