"संस्कार पुस्तकातून नाही, तर ते कृतीतून शिकायचे असतात"
"का ?"
"शाखा, जनसंपर्क आणि मग शाखेची बैठक आहे त्यामुळे उशीर होईल."
'बरं बरं या तुम्ही, असं पण आम्ही सगळे मुलं जेवून गेले की जेवतो.'
असा संवाद व्हायचा नि अनेकदा रात्री मी उशिरा मेस मध्ये जेवायला जायचो. कधी उशीर होईल असा निरोप देऊन तर कधी थेट उशिरा जायचो.
पण आमच्या मेसच्या माऊली ने कधी याबाबत तक्रार केली नाही. उलट त्या नेहमी म्हणायच्या,'तुम्ही बाहेरून शिकायला आलात आणि आमच्याच पोरांना घडवायचे काम करतात.( संघा बद्दलचा आदर), मग आम्हाला उशिर झाला तर त्यात काय एवढे?'
असाच एकदा मी हळू हळू जेवत होतो कारण खूप तोंड आले होते.( सुरवातीच्या दिवसात खूप तोंड येत होते ) त्यामुळे जेवण तिखट लागत होते, पण काही पर्याय नाही म्हणून जेवत होतो. मी नेहमी सारखा जेवत नाहीये हे काकूंच्या लक्षात आले...... त्यांनी सगळ्या मुलांच्या देखत मला एका मोठ्या भांड्यात दूध ,साखर आणून दिली ती ही मी न मागता!!!!!
मी जेवण झाल्यावर त्यांना विचारले,"काकू तुम्हाला कसं कळाले?," त्यावर त्या म्हणाल्या " मी पण दोन मुलांची आई आहे हो."
त्यांचे आणि माझे नाते, हे व्यवहाराच्या पलीकडचे आहे. खरंच अशा कितीतरी माऊली मला भेटल्या.
अशाच आमच्या जोशी काकू, आमच्या शिक्षकांची आई, कधीही त्यांच्या घरी गेलो की,त्यांचा पहिला प्रश्न, "पोटात कधी अन्न गेले आहे?दुपार नंतर काही खाल्ले आहेस का? "नाही न, वाटलच मला, कसे रे तुम्ही पोरं ?, थांब जरा......"असे म्हणून कायम काहीतरी खाऊ घालायच्या. तयार नसेल तर तयार करून खाऊ घालायच्या.
आम्ही लहान असताना माझी आज्जी पण हेच करत असे,घरी कोणीही आला तर त्याला काही खाऊ दिल्याशिवाय कधीच जाऊ देत नसे, जोशी काकूंना पाहिलं की आजीची कायम आठवण यायची, एकदा तर काकूंनी आम्हा मुलांसाठी किमान ५० तरी गुळाच्या पोळ्या केल्या होत्या. त्या आम्ही सगळ्यांनी मिळून फस्त केल्या. कोण होत्या त्या? रक्ताचं कोणतच नातं नाही, नातं फक्त माणुसकीचे,प्रेमाचे,जिव्हाळ्याचे!!!!
म्हणून वरती म्हणालो की संस्कार कृतीतून शिकायचे असतात. पुण्यातील या दोन्ही माऊलींनी एक संस्कार कायम स्वरुपी केला तो म्हणजे, कोणीही घरी आला तर काही तरी आपुलकीने त्याला खाऊ घातलेच पाहिजे. हीच माणुसकी, हेच प्रेम आहे. मी आज पर्यंत हे पाळत आलो आहे आणि पुढे पण पाळत राहीन.
९०११०९६२५०
**तळ टीप:- इंग्रजी भाषांतरा नंतर आपल्या (comment) प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या, सोबत आपले नावंं लिहावेे.-------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Rites are meant to be learned from action, not from books."
"Why?"
"There is a branch, public relations and then a branch meeting so it will be late."
'All right, you guys, but we all eat when the kids are done eating.'
I often went to dinner in the mess late at night. Sometimes I would say goodbye and sometimes I would go straight late.
But Mauli of our mess never complained about it. On the contrary, she always used to say, 'You have come to learn from outside and work to make our kids (respect for the team), so what if we are late?'
Once upon a time, I was eating slowly because I had a lot of mouth sores. (In the early days, I had a lot of mouth sores). My aunt noticed that I was not always eating the same food. She brought me milk and sugar in a big pot in front of all the children without asking me !!!!!
After the meal, I asked her, "How did you know Auntie?", To which she replied, "I am also a mother of two."
Their relationship with me is beyond transaction. Indeed, many such Mauli met me.
Our aunty Joshi, the mother of our teacher, used to go to her house and ask her, "Have you ever had any food in your stomach? Have you eaten anything in the afternoon?" .... "So we always want to add something to eat. If we are not ready, we should prepare and add food.
This is what my grandmother used to do when we were little. If anyone came home, she would never let him go without giving her something to eat. We all did it together. Who were they There is no relationship of blood, only relationship of humanity, love, intimacy !!!!
So it was said above that rites are to be learned through action. These two Maulis from Pune perpetuated a rite of passage which means that if anyone comes home, he must be fed with some affection. This is humanity, this is love. I have been following this till today and will continue to do so.
9011096250
हे अगदी बरोबर आहे..., संस्कार कृतीतून च घडतात....
ReplyDeleteखूप छान. संस्कार हे कृतीतून होतात.
ReplyDeleteहे अगदी बरोबर आहे.
ReplyDeleteलेख खुप छान लिहीला आहे
ReplyDeleteनकळत मला माझ्या बालपणी च्या आठवणी ताज्या झाल्या.
आमच्या घरी ही नेहमीच जास्तीचे दोन माणसांचे जेवण केलेल असायच येणारे जाणारे खुप असयाचे .अगदी शेजारचा अशोक ,छोटू आईलाही म्हणायचे आज काय भाजी काय केली आहे व अगदी हक्काने घेऊन जात.
कधी कधी आईच सागे अरे पुरणपोळ्या , लाडु, चिवडा अस काही केले म्हणजे शेजारी चार घरी पोहचायच्याच व आमच्या कडेही शेजारच्या काकू ही पाठवत....
पूर्वी वाड्या, चाळीत खुप घरोबा आपलेपणा असायचा , कधी आम्हाला पाळणाघराची गरज भासली नाही.
आता ब्लॉक पध्दतीने शेजार धर्म खुप कमी झाला आहे.
पण मला चांगले शेजारी मिळाले आहेत
आम्हाला एकमेकांची खुप मदत होते.
हे माझ्या आईने आमच्यावर केलेले संस्कार असावे.
धन्यवाद, खूप छान अभिप्राय दिला आहेतं.पुढल्या वेळी जमले तर शेवटी आपले नाव पण लिहावे.
DeleteAgree
ReplyDeleteआपण हा लेख लिहिला तो अगदी आचरणात आणला आणि त्या काकूंची जाणीव ठेवली काकूंनी पैशाकडे न बघता पोटाकडे बघितला आणि ह्याच आत्म्याने आशिर्वाद दिला.
ReplyDeleteसलाम लेख लिहिणार आणि सलाम त्या काकूंना.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा आणि मनस्वी कौतुक.
नलू अष्टेकर
धन्यवाद, अशीच लिखाणाची प्रेरणा कायम मिळो हीच इच्छा.
Delete