Monday, May 17, 2021

"शंकर ते शंकराचार्य"/"Shankar to Shankaracharya"

"शंकर ते शंकराचार्य" 


त्रिचुरच्या वृषाचलेश्वराकडे पती-पत्नी मनोभावे श्रद्धा युक्त अंतःकरणाने प्रार्थना करण्यास गेले. त्यांनी अनेक दिवस ईश्वर आराधना आणि सेवेत घालवले. एके दिवशी वृषाचलेश्वर रात्री झोपले असताना त्यांच्या स्वप्नात आले.

       शिवगुरू आणि त्यांची पत्नी आर्यांबा हे केरळ मधील पूर्णा निदीच्या तीरी असलेल्या कलाडी या छोट्या खेड्यात राहतं होते. दोघेही बुद्धिमान आणि शिक्षित होते.( स्त्री देखील त्या वेळी शिक्षण घेत असतं हे लक्षात येते) त्यांच्या विवाहाला अनेक वर्षे झाली होती. पण अजून संतती झालेली नव्हती. याच साठी ते मागील काही दिवसांपासून वृषाचलेश्वराची प्रार्थना आणि आराधना करत होते. 

   " हे शिवगुरु...मी तुम्हा दोघांच्या सेवेवर प्रसन्न आहे, तुमच्या मनातील इच्छा मी जाणतो. ती पूर्ण अवश्य होईल" ईश्वर स्वप्नात दृष्टांत देत होते.

" तुमची मनोकामना पूर्ण होईल पण त्यासाठी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. तुम्हाला सर्व जगाचा उद्धार करणारा, पण कमी आयुष्य असलेला एक पुत्र हवा, की सामान्य बुध्दी असणारे अनेक पुत्र हवे?" 

    हा प्रश्न तसा अवघड होता. पण शिवगुरु देखील चाणाक्ष होते. त्यांनी या प्रश्नाचे उत्तर "आपणच निर्णय घेऊन ठरवावे. आपण जे कराल ते योग्यच " असे ईश्वराच्या चरणी प्रार्थना करत सांगितले.

" तुमचा पुत्र हा शिवाचा अंश असेल आणि तो जगद्गुरु म्हणून त्याला जगात मान्यता मिळेल" असा आशीर्वाद देऊन ईश्वर अंतर्धान पावले.

  योग्य वेळी आर्यांबा यांना पुत्र जन्माला आला. शिवाचा अंश असल्यामुळे त्या बाळाचे नाव ' शंकर ' असे ठेवले. सौर कालगणनेनुसार तो दिवस होता वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ( साधारण ही घटना ख्रिस्त पूर्व ७८८- ८२० मध्ये झाली आहे)

      बाळ शंकर हा काही चमत्करिक शक्ती, असामान्य बुध्दी घेऊन पूर्व संचित घेऊन जन्माला आला होता. वयाच्या पहिल्याच वर्षी आपली मातृभाषा मल्याळी आणि वेदांची भाषा म्हणजे संस्कृत भाषा त्याने आत्मसात केली. पुढील एका वर्षात म्हणजे वयाच्या दुसऱ्या वर्षी त्याने या भाषांचे लेखन, वाचन सुरू केले. यात आणखीन भर त्याने पुढील वर्षात महाकाव्ये, पौराणिक कथा यांचे सोप्या भाषेत अर्थ सांगणे सुरू केले ते ही वयाच्या तिसऱ्या वर्षी.

   आपला मुलगा उत्तम बुध्दीचा आहे हे पाहून आई वडील प्रसन्न होते. आता त्याचे वय पाच वर्षे झाले आणि त्याची मुंज करण्याचे नक्की झाले. मुंज झाली आणि दुर्दैवाने वडील ( शिवगुरू) यांचे निधन झाले.

   वडीलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईची सगळी जबाबदारी लहानग्या शंकरवर आली.  त्याने आईचे वाक्य प्रमाण म्हणून तिची आज्ञा कधीही मोडली नाही. आपल्या घराजवळच असलेल्या पूर्णा नदीच्या काठावरील गुरुकुलात त्याचे पुढील शिक्षण सुरू झाले.

      आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनात त्याचे शिक्षण सुरू झाले. वेदाध्यायन सुरू झाले. सामान्य पणे गुरुकुलात शिकणारे विद्यार्थी हे रोज किमान पाच घरात जाऊन माधुकरी ( भिक्षा) मागून आणतात. त्याच प्रमाणे एक दिवस बाल शंकर एका घरात गेला. 

" माई भिक्षा वाढा, ओम भवतीsss..." हा मंत्र उच्चार केला.

पण त्या घरातून कोणीच बाहेर आले नाही.परत शंकर ने तसाच आवाज दिला.. असे दोन तीन वेळा घडले. 

शेवटी एक स्त्री रडतच त्या घरा बाहेर येत म्हणली.

" भू देवा, मी तुम्हास काय देऊ? माझ्या कडे तुमच्या भिक्षा पात्रात घालायला काही नाहीये" ती स्त्री दुःखी होत म्हणाली.

बाल शंकरला तिची सर्व आर्थिक अडचण समजली तरी तो म्हणाला.

" माई तुम्ही जे द्याल त्यात मी समाधान मानेन आणि तुम्हाला काही कमी पडू देणार नाही"

    या लहान मुलाचा हे बोल त्या स्त्रीच्या मनावर कोरले गेले, पण आपल्याकडे देण्यासारखे काहीच नाहीये हे तिला नक्की माहीत होते. पण तितक्यात तिला लक्षात आले की आपल्या अंगातील झाडाला एक फळं आले आहे, तेच आपण भिक्षा म्हणून देऊ शकतो.

" घ्या भूदेव" असे म्हणून ते फळ त्या स्त्रीने बाल शंकराच्या भिक्षा पात्रात टाकले. बाल शंकराने ते स्वीकारले आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना केली आणि त्या गरीब स्त्रीवर कृपा करण्याची विनंती केली. बाल शंकराचे ही प्रामाणिक, लोककल्याण करणारी, शुद्ध मनाने केलेली प्रार्थना देवीने मान्य केली आणि त्या स्त्रीच्या अंगणात त्याच फळांचा पण सोन्याच्या फळांचा सडा पडला. त्या स्त्रीची सर्व आर्थिक अडचण दूर झाली.

   वास्तविक या घटनेचा नीट विचार केला तर हे आपल्याला नक्की समजते की लोककल्याण करणे हे लहान वयापासून बाल शंकराच्या कर्मात होते.

   पुढे गुरुकुलातील शिक्षण पूर्ण करून ते घरी परतले. घरी आपल्यावर आईची सेवा, घरातील काही कामे आणि लहान मुलांना शिकवणे असे ते करू लागले. बाल शंकर आता आचार्य शंकर म्हणजे ' शंकराचार्य ' झाले.

   त्यांच्या माता यांचे एक नित्य व्रत होते. त्या कायम पूर्णा नदी मध्येच अंघोळ करत,एक दिवस त्या आजारी आणि अशक्त होत्या. तरी आपल्या व्रता साठी त्या पूर्णा नदीकडे पायी निघाल्या. नदीचे पाणी किनाऱ्या पासून बरेच आत गेलेले होते, त्यामुळे गरम वाळूत चालत जाऊन त्या नदीच्या पात्रात अंघोळ करून येताना शरीरातील अशक्तता पणामुळे त्यांना चक्कर आली. आपल्या आईची ही अवस्था आणि तिचे व्रत पाहून शंकराने पूर्णा नदीकडे प्रार्थना केली. " हे माते, तू पुन्हा नेहमी प्रमाणे आपल्या पूर्ण प्रवाहाने प्रवाहित हो " आणि काय आश्चर्य कदाचित नदीच्या वरील भागात अतीवृष्टी म्हणा की खरंच प्रार्थना स्वीकारली म्हणा. पूर्णा नदी परत आपल्या मूळ स्वरूपात वाहू लागली.

      पुढे आपल्या आईची परवानगी घेऊन शंकराने संन्यास घेतला. सुरवातीला आईची परवानगी मिळाली नव्हती पण नंतर ती एका घटनेनंतर मिळाली. संन्यास घेऊन, "आई तुला जेव्हा माझी गरज असेन. तेव्हा मी अवश्य येईल!!!" असे आईला वाचन देऊन त्यांनी घराचा त्याग केला. जगद्गुरु होण्यासाठीची ही पहिली पायरी होती.

   गुरूच्या शोधत अनेक हाल अपेष्टा सहन करत लहान वयातील शंकर नर्मदेच्या तीरावर येऊन पोहोचले.तिथे त्यांना आपले गुरू श्री गोविंद भगवत्पाद यांची भेट झाली. शंकराने गुरूंना स्वतःची ओळख करून दिली आणि मला शिष्य म्हणून स्वीकारावे ही विनंती केली. 

  गुरूंच्या कृपाशीर्वादाने शंकराने अनेक विषयातील अध्ययन पूर्ण केले. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते त्याच गुरुकुलात आचार्य म्हणून इतरांना शिकवू लागले. 

    आता मात्र आपल्याला भारत देशातील विविध पवित्र स्थळांना श्री शंकरांनी भेट देणे सुरू केले. प्रवास करत करत ते काशीला आले. शंकराचार्य अतिशय बुद्धिमान होते म्हणूनच त्यांच्या गुरूंनी एक मोलाचे काम त्यांच्यावर सोपवले होते. उपनिषदे, भगवदगीता, ब्रम्ह सूत्रे हे पवित्र ग्रंथ आहेत पण त्याचे आकलन करणे सोपे नाही. त्यामुळे शंकराचार्यांनी त्यावर सोप्या भाषेत भाष्ये लिहावीत अशी आज्ञा गुरूंनी केली होती.

   आपल्या पुढील आयुष्यात शंकराचार्यांनी अनेकांना वेदान्त चर्चा करून आपले शिष्य केले. त्यात मुख्य नाव मंडण मिश्र आणि त्यांची पत्नी यांचे घ्यावे लागेल.

   आपल्या प्रमुख चार शिष्यांना त्यांनी भारतातील धार्मिक आणि अध्यात्मिक उत्कर्षासाठी चार धर्मपिठे  स्थापन करण्यासाठी पाठविले. दक्षिण दिशेस कर्नाटकात शृंगेरीपीठ , पश्चिम दिशेला शरदापीठ, पूर्वेला जगन्नाथ पुरी येथे गोवर्धनपीठ स्थापन केले आणि उत्तरेला ज्योतीपीठ यांची स्थापना केली. आज याच पिठांचे चार शंकराचार्य आहेत. जे सनातन हिंदू धर्माचे मार्गदर्शन करतात. 

    आपल्या अगदी जेमतेम ३२ वर्षाच्या आयुष्यात श्री शंकराचार्यांनी अनेक ग्रंथांवर भाष्य केले, अनेक ग्रंथ, अनेक महाकाव्ये, अनेक श्लोक, अनेक प्रार्थना, अनेक धार्मिक अधिष्ठान, धर्मा बद्दल आस्था असलेले शिष्य निर्माण केले. आपल्या भारतात शंकराचार्य पूजनीय तर आहेतच पण काही पाश्चिमात्य देशात देखील त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते. 

  आज श्री शंकराचार्य जयंती निम्मित त्यांच्या चरणी वंदन.

©निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Shankar to Shankaracharya"

                   The couple went to Vrishchaleshwar in Trichur to pray with a sincere heart. He spent many days in worship and service to God. One day Vrishachaleshwar came in his dream while he was sleeping at night.

       Shivguru and his wife Aryamba lived in the small village of Kaladi on the banks of the Purna Nidi in Kerala. Both were intelligent and educated. (It is noticed that the woman was also studying at that time.) They had been married for many years. But there were no children yet. For this, he had been praying and adoring Vrishachaleshwar for the last few days.

   "O Shivguru ... I am pleased with the service of both of you, I know the desire in your heart. It will be fulfilled" Ishwar was giving a vision in a dream.

"Your wish will come true, but for that you have to answer one of my questions. Do you want a son who will save the whole world, but have a short life, or many sons with common sense?"

    The question was just as difficult. But Shivaguru was also shrewd. He said the answer to this question was "You have to decide for yourself. Whatever you do is right" and prayed at the feet of God.

God disappeared with the blessing that "your son will be a part of Shiva and he will be recognized in the world as Jagadguru".

  At the right time, Aryanba gave birth to a son. Being a part of Shiva, he named the baby 'Shankar'. According to the solar chronology, that day was the fifth day of Shukla Paksha in the month of Vaishakh (usually this event took place in 788-820 BC).

      Baby Shankar was born with some miraculous power, extraordinary intellect and pre-accumulated. At the age of one, he learned Malayalam, his mother tongue, and Sanskrit, the language of the Vedas. Over the next year, at the age of two, he began reading and writing in these languages. In addition, the following year, he began to interpret epics and myths in simple language, at the age of three.

   The parents are happy to see that their son is very intelligent. He was now five years old and had decided to go for it. Munj died and unfortunately his father (Shivguru) passed away.

   After the death of his father, all the responsibility of his mother fell on little Shankar. He never disobeyed her as the standard of a mother's sentence. His further education began at a gurukula on the banks of the river Purna, near his home.

      His teaching began under the guidance of his Guru. Veda studies began. Normally students studying in Gurukul go to at least five houses every day and ask for Madhukari (begging). Similarly one day Bal Shankar went to a house.

"Increase my begging, om bhavati sss ..." he chanted.

But no one came out of that house. Again Shankar gave the same voice .. This happened two or three times.

Finally a woman came out of the house crying.

"God, what can I give you? I have nothing to put in your begging bowl," said the woman sadly.

Although Bal Shankar understood all her financial difficulties, he said.

"I will be satisfied with what you give me and I will not let you down."

    The boy's words were engraved on the woman's mind, but she knew for sure that she had nothing to give. But then she realized that the tree in her body had a fruit, which we can give as begging.

The woman put the fruit in the begging bowl of Bal Shankara as "Ghya Bhudev". Bal Shankara accepted it and prayed to Goddess Lakshmi and begged for mercy on that poor woman. This sincere, public welfare, pure-hearted prayer of Bal Shankara was accepted by the Goddess and the same fruit but golden fruit rotted in the woman's yard. All the financial difficulties of that woman were gone.

   In fact, if we consider this incident carefully, we can understand that doing public welfare was in the karma of Bal Shankara from an early age.

   After completing his education in Gurukul, he returned home. At home, she began to care for her mother, do some housework, and teach her children. Bal Shankar now became Acharya Shankar meaning 'Shankaracharya'.

    His mother had a constant vow. Bathing in the full river forever, one day she was sick and weak. However, for his vrata, he set foot on the river Purna. The water of the river was very deep from the shore, so they felt dizzy due to the weakness of their body while walking in the hot sand and bathing in the river. Seeing this state of his mother and her fast, Shankara prayed to the river Purna. Say "Hey Mother, you flow with your full flow again as usual" and what a surprise maybe the overflow in the upper part of the river that really accepted the prayer. The river Purna began to flow back to its original form.

      Later, with the permission of his mother, Shankara retired. Initially the mother did not get permission but later she got it after an incident. Retiring, "Mom, when you need me, I'll come !!!" He left home after reading this to his mother. This was the first step to becoming a Jagadguru.

   In search of a Guru, after enduring many hardships, the young Shankar came to the banks of Narmada. There he met his Guru Shri Govind Bhagwatpad. Shankara introduced himself to the Guru and requested him to accept me as a disciple.

  With the grace of the Guru, Shankara completed his studies in many subjects. After completing his education, he started teaching others as Acharya in the same Gurukul.

    Now, however, Shri Shankara has started visiting various holy places in India. While traveling, he came to Kashi. Shankaracharya was very intelligent, so his guru had entrusted him with a valuable task. The Upanishads, the Bhagavad Gita, the Brahma Sutras are sacred texts but they are not easy to comprehend. Therefore, the Guru had instructed Shankaracharya to write commentaries on it in simple language.

   In his later life, Shankaracharya made many disciples by discussing Vedanta. The main names are Mandan Mishra and his wife.

   He sent his four leading disciples to establish four Dharmapithas for the religious and spiritual upliftment of India. He established Sringeri Peeth in Karnataka in the south, Sharadapith in the west, Govardhan Peeth in Jagannath Puri in the east and Jyoti Peeth in the north. Today, there are four Shankaracharyas of the same flour. Who guide Sanatan Hindu Dharma.

    In his very 32 years of life, Shri Shankaracharya commented on many scriptures, many scriptures, many epics, many verses, many prayers, many religious institutions, and made disciples with faith in religion. In our India, Shankaracharya is revered but his work is also remembered in some western countries.

  Today at the feet of Shri Shankaracharya on the occasion of his birth anniversary.

© Nikhil Devidas Vaze

9011096250

6 comments:

  1. छान लिहिले आहे, पण खूप संक्षिप्त आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. होय त्यांचे कार्य खूप मोठे आहेच. त्यामुळे एका वेळी लिहणे शक्य झाले नाही. पुढे कधी तरी नक्की लिहीन.

      Delete
  2. सुंदर संक्षिप्त लेख. 🙏🏻

    ReplyDelete

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले