"मुक्ततेची शंभर (१००) वर्षे "
प्रतिज्ञीत विनायक दामोदर सावरकर, होय ! वयाच्या चौदव्या वर्षीच छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा त्यांनी भगुर येथील त्यांच्या जन्मगावी आपल्या कुलदेवीच्या पायांवर हात ठेऊन घेतली.
![]() |
| याच देवी समोर शपथ घेतली |
सावरकरांचे पुण्यातील शिक्षण पूर्ण होत आले होते. आता शत्रूच्या म्हणजेच प्रत्यक्षात ब्रिटिश सरकारच्या देशात, लंडन येथे जाऊन आपले पुढील क्रांतिकार्य सुरू करावे हा विचार त्यांनी लोकमान्य टिळक यांना बोलून दाखवला. लोकमान्य टिळक यांनी पण त्या बाबत श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांना पत्र पाठवले. लवकरच सावकर लंडनमध्ये आपल्या पुढील शिक्षण आणि क्रांतिकार्य करण्यासाठी ' भारत भवन ' येथे दाखल झाले.
![]() |
| भारत भवन, लंडन |
सुरुवातीच्या दिवसात सर्व भारतीय तरुणांना ते एकत्र करू लागले. श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने अनेक देशभक्त लोकांचे एकत्रीकरण यशस्वीपणे सुरू झाले. आपल्या भाषणातून, विचारातून ते या सर्व तरुणांना देशभक्ती, प्रखर राष्ट्रप्रेम, हिंदुस्थानचा इतिहास याबद्दल नेहमी मार्गदर्शन करत.
अशातच इटलीचा महान क्रांतिकारक जोसेफ
मॅझेनी यांचे चरित्र सावरकर यांनी मराठीत अनुवादित केले...त्यांच्या मते जोसेफ
मॅझेनी हा इटलीचा महान क्रांतिकारक म्हणजे रामदास स्वामीच. हे मराठीतील अनुवादित
चरित्र भारतात त्यावेळी खूप गाजले. नाशिक,
पुणे,
मुंबई येथील अनेक तरुणांना या पुस्तकाची
प्रस्तावना पूर्ण पाठ देखील झाली होती. वक्तृत्व,
पुस्तक लेखन, लेख, कविता आणि इतर
साहित्य निर्मिती हे केवळ साधन म्हणून त्याकडे सावरकर पाहत होते. अनेकांना प्रेरणा
देण्यासाठी ते एक उत्तम साधन आहे हे त्यांनी लहानपणापासून ओळखले होतेच.
त्यांच्या 'माझे मृत्युपत्र' या कवितेत सावरकर
म्हणतात.
'हे
मातृभूमि! तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले
तुतेची अर्पिली नवी कविता रसाला
लेखाप्रती विषय तूंची अन्यन झाला||'
लंडनच्या वास्तव्यात त्यांनी अनेक देशभक्त
क्रांतिकारक घडवले, त्यात अग्रक्रम आहे तो मदनलाला धिंग्रा याचा, अत्याचारी कर्झन
व्हायली याचा वध धिंग्रा याने केला आणि हसत हसत,
प्रसन्न चेहऱ्याने, पुनर्जन्म घेऊन
आपल्या याच मातृभूमीची सेवा करण्याची इच्छा मनात बाळगून फाशीचा दोर आपल्या
स्वतःच्या हाताने गळ्यात फुलांच्या माळेसारखा घातला. मदनलाल धिंग्रा देखील
सावरकरांच्या आत्मबलिदान या विषयाचे विचार ऐकूनच हे धाडस करू शकला. अनंत कान्हेरे
या अगदी कोवळ्या वयातील मुलाने नाशिक मध्ये जे अलौकिक कार्य ज्या पिस्तुलाच्या
मदतीने केले ते पिस्तूल देखील याच लंडन मधून नाशिकला पाठवण्यात आले होते. पांडुरंग
( सेनापती ) बापट यांना बॉम्ब तयार करण्याची प्रक्रिया शिकून घेऊन, सगळ्यात सोप्या
पद्धतीने बॉम्ब निर्मिती तंत्र भारतातील आपल्या अभिनव भारत या संघटनेच्या तरुण
मुलांना शिकवले त्यांची प्रेरणा सावरकरच होते.
पण देशाचं दुर्दैव ......! भारतात अनेक
क्रांतिकारी पकडले जाऊ लागले. सावरकरांच्या मोठ्या भावाला बाबाराव सावरकर यांना
पकडुन, खटला चालवून अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली.
विनायक सावरकर तेव्हा लंडन मधून पॅरिस मध्ये आलेले होते. आपले सर्व साथीदार
पकडल्या जात आहेत आणि आता जर आपण परत भारतात गेलो नाही तर सर्व कार्य लयाला जाईल
या विचाराने त्यांनी पॅरिस मधून परत लंडनमध्ये येण्याचे नक्की केले. परतीचा प्रवास
सुरू झाला..
प्रवास करून दिनांक १३ मार्च १९१० रोजी
लंडनच्या रेल्वे स्टेशनवर सावरकर यांचे आगमन झाले आणि गाडीतून उतरता उतरताच इंग्रज
अधिकारी जॉन पारकर याने विनायक सावरकर यांना अटक केली. ब्रिटिश सरकारसाठी आवश्यक
असणारा माणूस, आपण कैद केला याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
त्यांना लंडन मधील तुरुंगात ठेवले आणि धूर्त
इंग्रज आपल्या वरील खटला हिंदुस्तानात चालवणार असल्याचे सावरकरांना समजले.
त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांना न्यायालयात लढून सोडवण्याचा प्रयत्न केला त्यात
दोन इंग्रज मित्र देखील होते. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि आपल्याला
आता भारतात हलवणार हे लक्षात आल्यावर आपल्याला भेटायला आलेल्या अय्यर या मित्राला
हिंदीमध्ये एक गुप्त संदेश दिला,
"
जर परिस्थिती अनुकूल असेल तर आपण
मार्सेलीस मध्ये भेटू" या वाक्याचा अर्थ चतूर मित्राला समजला.
सावरकरांना घेऊन ते भले मोठे ब्रिटिश जहाज
भारताकडे निघाले. या जहाजाचा प्रवास नेहमी मार्सेलीस मार्गे होत असे हे अभ्यासू
सावरकांना माहीत होते आपण या जहाजमधून यशस्वी निसटून जाऊ, हे धाडस करू शकू
म्हणूनच त्यांनी आपला मित्र अय्यर,
यांना तसा निरोप दिला होता.
पण नियती सावरकर यांच्या बाबत कायम वेगळेच
डाव मांडत होती. यावेळी मात्र या जहजाचा मार्ग बदलण्यात आला होता असे समजले तेव्हा
मात्र काही अंशी आपला मनसुबा उध्वस्त झाला अशी भावना त्यांच्या मनात आली, एका रात्री ते विशाल
जहाज काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडले आणि नेमके ते मार्सेलीस बंदराजवळ अडकले.
त्याने आपले भले मोठे नांगर पाण्यात सोडले,
ही बातमी सावरकर यांना समजताच, आता हीच ती वेळ, आता नाही केले तर परत
निसटू शकणार नाही......हे धाडस करावेच,
आपल्या या प्रयत्नातून अनेक तरुणांना
प्रेरणा, धीर मिळेल, ते ब्रिटिशांविरुद्ध पेटून उठतील असे अनेक विचार त्यांच्या
मनात येत होते.
दिनांक ७ जुलै १९१० ची पहाट झाली, शौचालयात जाण्याच्या
बहाण्याने त्यांनी सैनिकांना आपल्याला नेण्याची विनंती केली, त्या आधी रात्रभर या
नवकल्पनेने त्यांना झोप लागली नाही...आपले आदर्श छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी
आग्र्यातून त्यांची सुटका कशी करून घेतली?
श्री शिवाजी महाराज यांनी कसे हे धाडस
केले, आपण हे का आणि कसे केले पाहिजे!!! याचे चिंतन रात्रभर सावरकर
करत होते.
शौचालयात जाताच त्यांनी आपला रात्रीचा अंगातील झगा काढून दाराला लावला आणि त्या शौचालयात असलेल्या गोल खिडकी मधून बाहेर पडण्याची धडपड सुरू केली...पण त्या बारीक खिडकी मधून बाहेर पडता येत नव्हते, आपण हे दिव्य केलेच पाहिजे आणि स्वातंत्र्यासाठी आपल्याला हे केलेच पाहिजे या ईर्षेने त्यांनी त्या खिडकीतून अर्धे शरीर कसेबसे बाहेर काढेल, शरीराला अनेक जखमा झाल्या होत्या, पण आता त्या जखमांकडे दुर्लक्ष करून त्यांनी त्या विशाल, अथांग समुद्रात उडी मारली. आपण सुटलो, इंग्रज पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आपण सुटलो या भावनेने झपझप समुद्र पोहत किनाऱ्यावर आले, जहाजावरून आणि नावेतून इंग्रजी सैनिक त्यांच्या वर गोळ्यांचा मारा करत होते....दमलेल्या शरीराने फ्रान्सचा किनारा गाठला पण पाताळ यंत्री इंग्रज, यांनी लाच देऊन त्या फ्रान्स मधील सैनिकांकडून सावरकरांना परत पकडुन जहाजावर आणले.
![]() |
| मार्सेलीस येथील साहसी उडी |
भारतात आल्यावर सावरकर यांचा खटला सुरू झाला
तो ही एका विशेष न्यायालयात! आणि त्यांना दिनांक २४ डिसेंबर १९१० रोजी पहिली
शिक्षा सुनावण्यात आली पंचवीस वर्षे जन्मठेप आणि आणखीन एका केस करता दिनांक ३०
जानेवारी १९११ रोजी पुढील पंचवीस वर्षे जन्मठेप,
म्हणजे एकूण पन्नास वर्षे जन्मठेपेची
शिक्षा !!! ती देखील अंदमान येथील जेल मध्ये म्हणजेच काळ्या पाण्याची शिक्षा.
सावरकरांना जेव्हा लंडन मध्ये अटक झाली
त्याच वेळी त्यांना असे वाटले होते की आपल्याला नक्की फासावर देतील, त्यावेळी त्यांनी 'माझे मृत्युपत्र' या नावाची कविता
केली. भारतात त्यांना पन्नास वर्षे जन्मठेपेची शिक्षा झाली आणि या पन्नास वर्षात
आपण काय काय करू शकतो याचा विचार त्यांच्या मनात सुरू झाला.
स्वतःवरील आत्मविश्वास इतका प्रचंड होता की
ते नेहमी म्हणत. 'माझा कान धरण्याची हिम्मत आणि अधिकार फक्त छत्रपती श्री शिवाजी
महाराज यांनाच आहे' आपल्याला झालेल्या या प्रचंड मोठ्या शिक्षेत आणि ते देखील
अंदमान सारख्या ठिकाणी ती भोगताना मृत्यू आला तर...हा विचार सुद्धा त्यांच्या मनात
आला नाही. आपण या संपूर्ण शिक्षेत काय काय करू शकतो याची आखणी त्यांच्या मनात सुरू
झाली. अभेद्य सकारात्मकता आणि देश व मातृभूमीचाच विचार त्यांच्या जीवनाचा श्वास
होता.
अंदमानला जाण्यापूर्वी त्यांना प्रथम मुंबई
मग डोंगरी येथील कारागृहात ठेवण्यात आले. काय योगायोग असेल पहा, डोंगरीच्या
कारागृहातील ज्या खोलीत त्यांना ठेवले त्याच खोलीत काही महिने लोकमान्य टिळक आणि
गोपाळ आगरकर यांना ठेवले होते. आपल्या आदर्श व्यक्ती ज्या जागेत राहिल्या त्याच
जागेत वास्तव्य करण्याचे भाग्य त्यांना लाभले होते.
"बडे बाबू आपल्याला भेटायला घरचे लोक आले आहेत"
असे
म्हणत एक दिवस कारागृहातील रखवालदार ओरडला,
डोंगरी कारागृहात येऊन काहीच दिवस झाले
होते.
"आपण मला ओलखलेत?,
हे तर फक्त बाहेरचे कपडे आहेत, माझ्या अंगावर ते
शोभून पण दिसतायत न?" याही अवस्थेत न डगमगत,
हसऱ्या चेहऱ्याने आपल्या पत्नीला विनायकराव
बोलत होते. किती पण संकट आली तरी स्वतःचा आत्मविश्वास न ढळू देणे हाच आदर्श ते
आपल्या पत्नी समोर मांडत असावेत. आपण आपल्या घरात गप्पा मारत आहोत असेच वातावरण
त्यांनी तयार केले, लहान मेव्हणा देखील सोबत आला होता.
"मुलामुलींची संख्या वाढवणे व चार काटक्या एकत्र करून घरटी
बांधणे याला संसार म्हणायचे तर मग असा संसार कावळे - चिमण्या पण करतात, आपली चार चूल बोळकी
आपण फोडून टाकली, पण त्यायोगे पुढेमागे हजारो जणांच्या घरी सोन्याचा धूर
निघेल" किती मोठा विचार त्यांनी आपल्या पत्नीस दिला.
आता अंदमानाला जाण्यासाठी मद्रास (आताचे
चेन्नई) येथून दिनांक २७ जून १९११ रोजी त्यांना महाराजा बोटीत बसवण्यात आले.
अतोनात हाल, अपेष्टा, कुचंबणा, यातून हा जीवावर बेतणारा प्रवास सुरू झाला. सोबतचे प्रवासी
म्हणजे एका अगदीच लहान पिंजऱ्यात कोंडलेले अनेक राजबंदी, असल्ल दरोडेखोर, चोर आणि क्रांतिकारक.
या प्रवासातच अनेक जण आपला जीव गमावत असत. असा प्रवास करत एकदाचे अंदमान मधील
पोर्ट ब्लेअर बंदरावर सगळ्यांना उतरवण्यात आले आणि सेल्युलर जेल मध्ये नेण्यात
आले. सावरकर या कारागृहात प्रवेश करते झाले ती तारीख होती ४ जुलै १९११ म्हणजे
त्यांना एकूण सात दिवसांचा कठीण प्रवास करून येथे यावे लागले होते.
![]() |
| सेल्युलर जेल, राष्ट्रीय स्मारक |
सेल्युलर जेलचे ते एवढे मोठे अक्राळविक्राळ लोखंडी दार करकर आवाज करून उघडल्या गेले आणि पहिल्यांदा विनायक दामोदर सावरकर यांचा त्या विशाल जेल मध्ये प्रवेश झाला. सभोवतालच्या भिंतीवर भीतीदायक वाटेल असे क्रॉस बेडी, उभी बेडी, बंदुका, चाबूक याचीच सजावट भिंतीवर केलेली होती. आपल्या जेल मध्ये आलेल्या कैद्याच्या मनात भीती बसावी म्हणून जेलचा जेलर बॅरीने हे केलेले होते.
आता आपल्याला याच वास्तूत पुढील आयुष्य
काढायचे आहे हे लक्षात घेऊन, आपल्या मनाची धारणा सावरकरांनी येथे येण्याच्या आधीच केलेली
होती. डोंगरी व ठाणे येथे कारागृहात असतानाच त्यांनी अंदमान जेलचा बाय लॉ वाचला
होता. तसेच आपण या संपूर्ण तुरुंगवासात काय करायचे हे पण निश्चित केलेले होते.
लहानपणापासून कविता करणे हा त्यांचा छंद होता. लहान असताना महाभारत, रामायण, भागवत असे अनेक ग्रंथ
वाचले, ऐकले होतेच त्यामुळे आपण पण असेच एखादे महाकाव्य निर्माण करावे
असे त्यांना वाटे, पण ते इतके वर्षात ते शक्य झाले नव्हते...आता ते आपण निर्माण
करावे, तसेच आपल्याला अनेक लोकोत्तर महात्मांचे चरित्र निर्माण करता
येईल याचे नियोजन त्यांनी केले होते. गुरुगोविंद सिंग यांचे चरित्र त्यांना लिहायचे
होते, तसे डोक्यात आराखडा देखील तयार झालेला होता.
कायम लोकांच्या, तरुणांच्या सोबत राहणारे, लोकांना प्रेरणा देणारे असे विनायक सावरकर यांना तिसऱ्या मजल्यावरील एकदम शेवटची खोली देण्यात आली. त्या खोलीत ना उभे, ना आडवे झोपता येई, पाय जवळ घेऊन झोपावे लागे किंवा तिरपे झोपावे लागे, खोलीतून बाहेर पाहिले तर फक्त फाशीची कोठी दिसे, जेणे करून त्यांचे मनोबल कमी होईल .... याच साठी हि खोली त्यांना दिली होती. पण सावरकरांना मुत्यूचे ते अंतर देखील जास्त वाटायचे..आता पर्यंत ते मृत्यू सोबतच जगत होते, या त्यांच्या खोलीत लहान पाणी पिण्यासाठी, लघुशंका करण्यासाठी एकच मातीचे भांडे आणि जेव्हा अंघोळ करायला मिळेल तेव्हा त्याचा वापर ' मग' म्हणून करावा लागे,
सावरकरांना मुद्दाम पहिले सहा महिने एकटे ठेवण्यात आले, माणसांचा संपर्क झाला
नाही तर कदाचित हा माणूस तुटेल असा कयास या मागे होता.
या सेल्युरल जेल मधील शिक्षा अतिशय भयानक होत्या म्हणजे त्या भोगताना अगदी अस्सल दरोडेखोर, गुंड पण चळचळ कापत होते. काथ्या सोलणे, क्रॉस बार बेडी, खडी बेडी हे म्हणजे उभ्या उभ्या पोटाच्या बाजूने भिंतीला टेकून हात वर करून उभे राहणे, पण हातात बेडी बांधली जायची. याच अवस्थेत किमान चार तास उभे राहावे लागे. यात जर काही कारणाने वाढ झाली, जसे की कोणाशी बोलणे, लघु किंवा दीर्घशंका झालीच, तर अजून चार तास ही शिक्षा वाढत असे.
![]() |
| कोलू शिक्षा |
एका पेक्षा एक शिक्षा देऊन सर्व कैदांचे मनोबल कमी करणे, त्यांचा छळ करणे, हाच यामागील उद्देश होता. या सर्व शिक्षांचा कळस म्हणजे कोलू चालवून तेल काढणे, जे काम बैल करून देखील दमतील असे काम कैद्यांकडून दिवस रात्र करून घेतले जायचे.
एकदा विनायक सावरकर पण हे काम करताना या
सगळ्या अत्याचाराला कंटाळले, त्यांच्या मनात आत्महत्या करण्याची भावना झाली, त्यांचा आत्मविश्वास
ढळला, आपण या सगळ्या त्रासातून वाचावे,
सरळ आपला जीव देऊन टाकावा, असा विचार एका
क्षणासाठी त्यांच्या मनात आला, पण पुढील काही क्षणात त्यांची मनोदेवता जागी झाली आणि आपण
आपल्या कुलदेवी समोर घेतलेली शपथ त्यांना स्मरली,
" हे
मातृभूमी तुला गुलामगिरीतून मुक्त करून स्वराज्य मिळेपर्यंत मारिता मारिता मरेतो
झुंजेन " या ओळी त्यांच्या कानात घुमत होत्या
आणि त्याच जोमाने त्यांनी परत कोलू चालवायला सुरुवात केली.
कितीही संकट,
हाल,
अपेष्टा झाल्या तरी आपले ध्येय साध्य
होईपर्यत आपला आत्मविश्वास, प्रयत्न, चिकाटी न सोडण्याचा गुण सावरकरांनी आपल्या समोर ठेवलेला आहे.
आज आपण अनेक दिवसांपासून भयंकर अशा
करोनाच्या संकटाशी झुंज देत आहोत. आपल्या पैकी कित्येक जणांना अनेक दिवस या
आजाराशी झुंज द्यावी लागत आहे. आपल्या पैकी अनेकांना या रोगाची लागण झाली असेल, त्यातून ते बरे देखील
झाले असतील, काहींना ती होणार पण नाही.
या आजारपणामुळे ज्यांना आपल्याच सर्वसोयी
सुविधा उपलब्ध असलेल्या घरात..... एका खोलीत फक्त काही दिवस (१४-१७ दिवस) राहावे
लागत आहे. पण ज्याखोलीत राहणे देखील शक्यच नाही अशा खोलीत विनायक सावरकर राहिले, आज या आजारात पण आपण
उत्तम अन्न खाऊ शकतोय. पण जळवा,सापांची पिल्ले,
किडे असे बाजूला करून आपले मानसिक आणि
शारीरिक आरोग्य कमी न होऊ देता त्यांनी हे अन्न पचवले.
तुम्हाला वाटत असेल की, ते सावरकर होते, मी फक्त सामान्य
माणूस आहे, मला कसे जमेल? पण या निम्मिताने मला हेच सांगावेसे वाटते की अशाच लोकोत्तर
महात्म्यांचा आदर्श, त्यांची शिकवण आपण घेतली पाहिजे,
आपला आत्मविश्वास, आत्मसंयम कायम राखला
पाहिजे.
सेल्युलर जेल मधील सर्व शिक्षा, हाल, अपेष्टा सहन करत
सावरकर यांनी तेथे पण अनेक धर्म परिवर्तन झालेल्यांना परत स्वधर्मात आणले, अशिक्षित कैद्यांना
शिक्षित केले, जेलमधील अनेक अव्यवस्थां विरोधात सत्याग्रह, आंदोलन केले, सगळ्यांच्या साथीने चांगले बदल घडवून आणले, आपण भले ही एका जागी
असलो तरी सतत विधायक विचार करणे, कामात राहणे किंवा नवीन कल्पना करून ठेवणे हे त्यांनी सतत
केले. जेलच्या त्या लहान खोलीत, सतत समोर फाशीकोठी दिसत असताना सुद्धा ' कमला ' नावाचे अतिशय सुंदर ,प्रसन्न करणारे काव्य
त्यांनी निर्माण केले, हे ते का करू शकले?
याचे कारण मनाची शक्ती खूप मोठी असते, ते आपल्याला मुक्त
विहार, विचार करायला मदत करते हे त्यांना नक्की माहीत होते.
आज पण आपल्यापैकी अनेक जण गृह विलगीकरणात असतील, मी देखील काही दिवसांपूर्वी
असाच गृह विलगीकरणात होतो. माझ्या देखील पहिले दोन दिवस मनात भीती येऊन गेली. पण
आपले आदर्श विनायक सावरकर यांच्या यातना,
हाल मनात आणले आणि स्वतःला सावरले, कमी झालेला
आत्मविश्वास परत आला ते याच मनशक्तीच्या जोरावर....मी अशा गृह विलगीकरणात
असलेल्यांना स्वानुभवातून हे नक्की सांगू शकतो,
मनात फक्त सकारात्मकता ठेवा, पुढील काळातील नवीन
योजना ठरवा, त्या पूर्ण कशा करू शकतो याचे काही नियोजन ठरवा. सतत कामात
राहणे, लिखाण, वाचन, मनन करणे, आपल्या
मनात घडून गेलेल्या फक्त चांगल्या प्रसंगांची उजळणी करणे, इत्यादी गोष्टीमुळे
सकारात्मकता कायम ठेवा.
ज्या क्रूर इंग्रजांच्या अत्याचाराला सामोरे
जात सावरकर सेल्युलर जेल मध्ये राहत होते. त्याच इंग्रज सरकारवर त्यांना सेल्युलर
जेल मधुन मुक्त करण्यासाठी खूप दबाव आला आणि काही तात्पुरत्या अटींवर विनायक
दामोदर सावरकर आणि त्यांचे तेथेच असलेलं पितृ समान मोठे भाऊ बाबाराव सावरकर यांना
भारतात परत पाठविण्याचा आदेश देण्यात आला.
दिनांक २ मे १९२१ रोजी, ही दोन्ही
भावंडे त्या सेल्युलर जेलच्या मृत्यूच्या दाढेतून ( ४/०७/१९११ ते ०२/०५/१९२१) १०
वर्षानंतर बाहेर पडले. आज या ऐतिहासिक घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.
या श्री विनायक दामोदर सावरकर नावाच्या
मृत्युंजयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन,
शेवटी हेच सांगतो आपण देखील फक्त
सकारात्मकता, चिकाटी आणि आत्मबल ठेऊन या करोना नावाच्या मृत्यूच्या दाढेतून
नक्की बाहेर पडू शकतो.
|| वंदे
मातरम्, भारत माता की जयsssss||
![]() |
| स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर की जयsss |
--------------------------------------------------------------------------------------------------------------
"100 Years of Freedom "
Promised Vinayak Damodar Savarkar, yes! At the age of fourteen, like Chhatrapati Shivaji Maharaj, he took a vow to establish a Swarajya by placing his hands on the feet of his family goddess in his birthplace at Bhagur.
Savarkar's education in Pune was coming to an end. He told Lokmanya Tilak the idea of going to London, the country of the enemy, in fact the country of the British government, and starting his next revolutionary work. Lokmanya Tilak also sent a letter to Shri Shyamji Krishna Verma in this regard. Soon Savkar arrived at Bharat Bhavan in London for his further education and revolutionary work.
In the early days, it started gathering all the Indian youth. With the help of Shri Shyamji Krishna Verma, the unification of many patriots started successfully. Through his speeches and thoughts, he always guided all these young people about patriotism, intense patriotism and the history of Hindustan.
Similarly, Savarkar translated the character of the great Italian revolutionary Joseph Mazeni into Marathi ... According to him, Joseph Mazeni is the great Italian revolutionary Ramdas Swami. This Marathi translated character was very popular in India at that time. Many young people from Nashik, Pune and Mumbai had read the preface of this book. Savarkar was looking at rhetoric, book writing, essays, poetry and other literary creations only as a tool. He knew from an early age that it was a great tool to inspire many.
In his poem 'My Death Letter', Savarkar says.
'O motherland! Your mind is full
Vaktritva Vagvibhavhi Tuj Arpiyele
Tutechi Arpili new poem Rasala
Lekhaprati vishya tunchi anyyan jhala || '
In London, in fact, he created many patriotic revolutionaries, the first of which was Madanla Dhingra, the brutal Curzon Whale, who was assassinated by Dhingra and with a smile, a happy face, a desire to be reborn and serve his motherland, hang a rope around his neck with his own hands. . Even Madanlal Dhingra was able to do this after hearing Savarkar's thoughts on self-sacrifice. The pistol with which Anant Kanhere, a very young boy, performed the miraculous work in Nashik was also sent to Nashik from London. Savarkar was inspired by Pandurang (Senapati) Bapat to learn the process of making bombs and to teach the simplest method of bomb making to the young children of his organization Abhinav Bharat in India.
But the misfortune of the country ......! Many revolutionaries began to be caught in India. Savarkar's elder brother Babarao Savarkar was arrested and tried and sentenced to black water in the Andamans. Vinayak Savarkar had come to Paris from London at that time. All his comrades are being caught and now he decided to come back to London from Paris thinking that if we don't go back to India then all the work will be done. The return journey has started.
After traveling, Savarkar arrived at the London railway station on March 13, 1910, and as soon as he got out of the train, John Parkar, a British officer, arrested Vinayak Savarkar. A man needed for the British government, the joy of being imprisoned was visible on his face.
He was imprisoned in London and Savarkar understood that the cunning Englishman was going to prosecute him in India. Many of his friends tried to get him to fight in court, including two English friends. But his efforts were not successful and when he realized that he was going to move to India, he gave a secret message in Hindi to his friend who came to meet him.
The clever friend understood the meaning of the phrase, "If the situation is favorable, we will meet in Marseilles."
Taking Savarkar with him, he set sail for India. The learned sailors knew that the ship always sailed via Marseilles, so they said goodbye to their friend Iyer so that they could dare to escape from the ship.
But Niyati was always playing a different game with Savarkar. This time, however, when he realized that the ship's route had been changed, he felt that his intentions had been thwarted to some extent. One night, the huge ship capsized due to some technical problem and got stuck near the port of Marseilles. He left his big plow in the water, as soon as Savarkar understood this news, now is the time, if he doesn't do it now, he will not be able to escape again ...... it must be done, this effort will inspire many young people Many thoughts were coming to his mind.
On the morning of July 7, 1910, under the pretext of going to the toilet, he requested the soldiers to take him. Before that, he could not sleep all night because of this innovation ... How did your ideal Chhatrapati Shri Shivaji Maharaj get rid of him from Agra? How did Shri Shivaji Maharaj dare to do this, why and how should we do it !!! Savarkar was thinking about this all night.
As soon as he went to the toilet, he took off his nightgown and put it on the door and started struggling to get out of the round window in the toilet ... but that thin
Unable to get out of the window, jealous of the fact that we must do this divinely and that we must do this for freedom, he would somehow get half of his body out of that window. We escaped, the British police came to shore with the feeling that we escaped by blowing the trumpet, the English soldiers were shooting at them from the ship and the boat .... Savarkar was captured and brought back to the ship.
Savarkar's daring leap was reported in the newspapers all over the world, what courage the Indian revolutionaries could take in the face of a crisis, and the whole world understood the plight of the British Empire.
After coming to India, Savarkar's case started in a special court! And he was sentenced for the first time on December 24, 1910 to twenty five years of life imprisonment and for another case on January 30, 1911 to the next twenty five years of life imprisonment, which is a total of fifty years of life imprisonment !!! She was also sentenced to black water in a prison in the Andamans.
When Savarkar was arrested in London at the same time that he thought he would be hanged, he wrote a poem called 'My Death Letter'. In India he was sentenced to fifty years of life imprisonment and the thought of what we can do in these fifty years started in his mind.
His self-confidence was so huge that he always said. 'Only Chhatrapati Shivaji Maharaj has the courage and right to listen to me.' Even if he died in this great punishment and while suffering in a place like Andaman ... this thought did not even cross his mind. The plan of what we can do in this whole punishment started in their minds. Impenetrable positivity and the idea of country and motherland was the lifeblood of his life.
Before moving to the Andamans, he was kept in a jail in Mumbai and then in Dongari. Look what a coincidence, some in the same room in the hill prison where they were kept
Lokmanya Tilak and Gopal Agarkar were kept for months. They were fortunate enough to live in the same place where their ideal person lived.
"Babu, the family has come to see you."
Saying this, one day the prison guard shouted, it had been a few days since Dongri came to the prison.
"Did you recognize me? These are just outer garments, they don't look good on my body, do they?" Without hesitation, Vinayakrao was talking to his wife with a smiling face. No matter how difficult the situation may be, it is important for him to keep his confidence in his wife. They created an atmosphere where we were chatting in our house, little Mevhana also came along.
"Increasing the number of children and building a nest by combining four bites is called sansar, then such a world is done by crows and sparrows.
On June 27, 1911, he boarded the Maharaja's boat from Madras (now Chennai) to go to the Andamans. Atonat Hal, Apeshta, Kuchambana, this life-threatening journey began. Accompanying travelers are many politicians, genuine robbers, thieves and revolutionaries trapped in a very small cage. Many people lost their lives during this journey. Once on such a journey, everyone was unloaded at the port of Port Blair in the Andamans and taken to the Cellular Jail. The date Savarkar entered the jail was July 4, 1911, which meant that he had to travel here for a total of seven days.
The huge iron gates of the cellular jail were opened with a bang and Vinayak Damodar Savarkar entered the huge jail for the first time. The walls were decorated with cross beds, vertical beds, guns and whips that would look scary. This was done by Barry, the jailer of the prison, to instill fear in the minds of the inmates who came to his prison.
Now that we want to spend our next life in this building, Savarkar had made up his mind before he came here. While in jail at Dongri and Thane, he had read the by-law of Andaman Jail. It was also decided what we wanted to do in this whole prison. Poetry was his hobby since childhood. As a child, he had read and heard many books like Mahabharata, Ramayana, Bhagwat, so he thought that we should create an epic like this, but it was not possible in so many years ... He had planned what could be done. He wanted to write the character of Gurugovind Singh, just as he had a plan in his head.
Vinayak Savarkar, who lives with people and inspires people, was given the last room on the third floor. He could not stand in that room, he could not sleep horizontally, he had to sleep with his legs close or he had to sleep on his side, if he looked outside the room, he could only see the gallows, so that his morale would be lowered. But Savarkar also felt that the distance of death was too much. Until now, he was living with death. In his room, he had to use a small earthen pot for drinking small water, for urinating, and when he got a bath, he had to use it as "then".
2 photos
Savarkar was deliberately kept alone for the first six months. If people did not come in contact with him, Kayas was behind this.
The sentences in this cellular prison were so horrific that they were genuine robberies, hooliganism, but it was not easy. Kathya peeling, cross bar shackles, khadi shackles meant leaning against the wall on the side of the vertical abdomen with the arms raised, but the shackles were tied in the hands. I had to stand in this position for at least four hours. If for some reason it increased, such as talking to someone, short or long doubt, the punishment would increase for another four hours.
Cross Bar Bedi, and Colu Photo
The motive behind this was to demoralize all the prisoners by giving them more than one punishment. The culmination of all these punishments was the extraction of oil by running a kolu, which was done day and night by the prisoners.
Once Vinayak Savarkar got bored of all these atrocities while doing this work, he felt suicidal in his mind, his self-confidence plummeted, the thought came to his mind for a moment that we should save ourselves from all these troubles, just lay down our lives, but in the next few moments And they remembered the oath you took before your family goddess,
The lines "Marita Marita Mareto Jhunjen until this motherland frees you from slavery and you get self-government" were ringing in their ears and with the same vigor they started running Kolu again.
Savarkar has put in front of us the quality of self-confidence, effort and perseverance till our goal is achieved, no matter how many crises, difficulties and difficulties may arise.
Today we have been grappling with a terrible Corona crisis for many days. Many of us have been battling this disease for days. Many of us may have contracted the disease, some may have recovered from it, some may not.
Due to this illness, those who have to stay in the same room for a few days (14-17 days). But Vinayak Savarkar stayed in a room where it was not even possible to live, but today we can eat good food in this disease. But they did not allow their mental and physical health to be compromised by burning, snakes, and insects.
You may think that it was Savarkar, I am just a normal person, how can I? But on this occasion, I want to say that we should follow the example of such extraterrestrial Mahatmas, their teachings, maintain our self-confidence, self-control.
After enduring all the punishments in the cellular jail, Savarkar brought many converts back to Swadharma, educated the uneducated prisoners, carried out satyagraha, agitation against many disorders in the jail, and made good changes with the help of all.
However, even if we are in one place, they are constantly thinking, working or inventing new ideas. In that small cell of the prison, even while constantly hanging in front of the gallows, why did he compose a very beautiful, pleasing poem called 'Kamala'? This is because the power of the mind is so great, they know that it helps us to think freely.
Today, many of you will be in home separation, I was in a similar home separation a few days ago. My first two days were also filled with fear. But the torment of our ideal Vinayak Savarkar, brought to mind and recovered himself, the lost self-confidence came back on the strength of this mindset .... Decide on some planning of how you can accomplish that. Maintain a positive attitude by constantly working, writing, reading, meditating, reviewing only the good things that have happened in your mind, and so on.
Savarkar was living in a cellular jail while facing the cruelty of the British. The same British government came under a lot of pressure to release him from the Cellular Jail and on some temporary conditions Vinayak Damodar Savarkar and his elder brother Babarao Savarkar who was still there were ordered to be sent back to India.
On May 2, 1921, the two siblings were released from the Cellular Prison 10 years after their death (4/07/1911 to 02/05/1921). Today marks the centenary of this historic event.
Keeping in view the ideal of death of Shri Vinayak Damodar Savarkar, this is what I am saying in the end.
|| Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar ki Jai sss ||
|| Vande Mataram, Bharat Mata Ki Jai sssss ||










This comment has been removed by the author.
ReplyDeleteSuperb, bow down for Veer Savarkar.
ReplyDeleteShatashah Naman🙏
Very beautiful and fantastic example you had given to our citizens. How to fight in adverse situation and keep self strong and positive. Same thing i explain on our group by chanting of mrutyunjay mantra for healing of positivity. We may not be act like sawarkar but atleast we can try. I was also quarantine for 17 days and recovered sucessfully as you explained in your post. What i can say about sawarkar. I dont have word. What way they spend 10 years in Celluar jail we cant immagine. Salute to them. Most of the members of our group are intelligent and knowledgable. As you said, you are a good reader i dont believe you're not not only good reader you are also good writer.
ReplyDeleteखूप छान, माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteWow bhauji..atishay Sundar..and kharach aaj positivity chi garaj aahe ya situation madhe ..ani aapan he shikla pahije ..thanks for sharing this 🙏👌
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteअप्रतिम सुंदर असा हा लेख लिहिल्याबद्दल आपले अभिनंदन.
ReplyDeleteअतिशय उत्तम मांडणी आणि त्याच बरोबर कालानुरूप संदेश.
ReplyDeleteअत्युत्तम लिखाण.गेला महिना मी 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचत आहे. त्यामुळे या सर्व आठवणीही ताज्या असल्या सारखे वाटते. प्रत्येक माणसाने कोणत्याही परिस्थितीत कसे दृढ , आशावादी आणि कार्यमग्न राहावे .. आणि निडर होऊन राहिल्याने त्याचा प्रभाव आजूबाजूच्या परिस्थितीवर कसा सकारात्मक होत जातो.. याचा एक आदर्श हे पुस्तक आहे. आज त्यांच्या सुटकेला 100 वर्षे होत आहेत. आज त्यांचे स्मरण आणि त्यातून प्रेरणा संजीवन ..हे झालेच पाहिजे. धन्यवाद. खूप छान उपक्रम.
ReplyDelete*Vande Matram..!!!
ReplyDeleteI Salute to Mr.Swatantravir,
Vinayak D Sawarkar!!!!🇵🇾🇵🇾🙏
Mast Nikhil 👌👌
ReplyDeleteKeep it up!
Mast Nikhil👍👍
ReplyDeleteछान
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteसकारात्मक असली की आपले मनोबल निश्चित वाढते.
ReplyDeleteस्वा.सावरकर माझे आर्दश आहे.
लिखाणाची माडंणी उत्कृष्ट.
धन्यवाद 🙏
अत्यंत अभ्यासपूर्ण लेख.
ReplyDeleteसावरकर समजून घेण्यात जे काही जण कमी पडत आहेत. त्यांच्या साठी आपले लेखन हे उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे.
Good references...Keep it up...
ReplyDelete