" आपण राजगडला कधी
जातोय भाग ३"
मंदिरात
आलो आणि लगेच बॅगेतून कोरडे कपडे काढले आणि एका कोपऱ्यात जाऊन बदलून पुढील तयारीला
लागलो. राम खिचडीचा बेत होता, त्यासाठी एकांची आधीच पेटलेली
आयती चूल मिळाली,
सर्वांच्या सहकार्याने उत्तम स्वयंपाक
पार पडला, पोटाची गरम गरम राम खिचडी घाऊन शांती केली, आणि निवांत गप्पा, पद्य, मस्ती, उद्या दिवस भराचा कसा कार्यक्रम
असेल याबाबत चर्चा सुरू झाली. आता बाहेरचा पाऊस पण शांत झाला
होता, रात्री गडावर संपूर्ण अंधार, बेडकांचे
डsssराव,डsssराव, दुरून रातकिड्यांचे आणि नाकतोडे यांचे संगीत सुरू
झाले होते...
 |
| रात्र संगीत देणारा... |
आम्ही
मंदिराच्या बाहेर येऊन पद्मावती तलावाजवळ बसलो होतो, तर दूर
दरीत अंधारात काही मध्येच गायब होणारे लाईट दिसत होते ते दरीत मध्येच लुकलुकत आणि
गायब होत. कदाचित झाडीत लुप्त होत होते. मी घड्याळ पाहिले तर त्यावेळी जवळ जवळ रात्रीचा १
वाजला होता.
इतक्या
रात्री कोण येतंय असा मनात प्रश्न पडला? ,शेवटी मन जरी ताज असले तरी शरीर
खूप दमलेले होते आणि सकाळी संपूर्ण गड, दुर्दम्य बालेकिल्ला पहायचा
होता. आता मंदिरात झोपलेच पाहिजे असे ठरवून मंदिरात गेलो , पण झोप काही लागत नव्हती, सकाळी आपण अंधारात काय चढून आलो
आहोत, आजूबाजूला काय काय आहे.हे नीट पाहण्याची उस्तुकता होती.... काही वेळाने मंदिरात पूर्ण शांतता झाली, पेटत्या चुली, उबीसाठीच्या सगळ्या शेकोट्या
शांत झाल्या आणि परत मंदिरात काळोख झाला.... पण ही शांतता फार वेळ राहिला
नाही, काही लहान मुलांनी मंदिरात प्रवेश केला, जेमतेम ८-९ वी ची मुलं आणि काही ५-६ तरुण मुलं..ते आत आले आणि एका
शिल्लक कोपऱ्यात बसून गेले. त्यावेळी पहाटेचे ४ वाजत आले होते. मी मात्र त्या
अंधारात हलणाऱ्या त्यांच्या आकृती पाहिल्या होत्या.
सकाळ झाली, तसे आमच्यातील एक एक जण उठले, तेव्हा
समजले रात्री दरीतून दिसणारे लाईट मधील ते हेच मुलं.
"काय रे कोणती शाळा, कोणत्या वर्गात ?
" दादा आम्ही पुण्यातील
ज्ञानप्रबोधिनी शाळेतील ८ वी , ९वी ची मुलं आहोत आणि हे आमचे
दादा ११वी मध्ये." आमच्यातील एक अनुभवी मित्राने
विचारले,"
काय रे, तुम्ही
इतक्या उशिरा कसे आले.?"
आहो दादा, "आमची बस बंद पडली, मग मागुन दुसऱ्या बसने यायला
उशीरच झाला"
या
मुलांकडे पाहून मनात त्यांच्या बाबत खूप आदर जाणवत होता. किती धाडसी आणि सोबत पण
आलेले दादा म्हणजे ते ही लहानच. या मुलांना पाहून मला हे जाणवले
काल आपण जे कष्ट,
त्रास सहन करत गडावर आलो ते यांच्या
मानाने अगदीच कमी आहेत.
गडाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही
मंदिराच्या बाहेर पडलो, तर मागील बाजूस काही राहुट्या
दिसल्या , आता पाऊस नव्हता त्यामुळे वर निळे आकाश आणि खाली जिथं पर्यंत
नजर जाईल तिथं पर्यंत सगळे हिरवे हिरवे दिसत होते, शुभ्र
ढगात बालेकिल्ला ओझरता दिसत होता, बाकी काही दिसत नव्हते. मंदिर
खालील बाजूला असल्यामुळे चढून वर आल्याशिवाय काहीच दिसत नव्हते.
 |
| सुवेळा माची |
आमच्या
सोबत, जे लोक मंदिरात होते त्यांच्या सोबतच्या काही तरुणी, महिला या राहुट्यामध्ये होत्या. हे लोक बरेच वेळा मंदिर...ते...
राहुटी असे ये-जा करत होते. मी हे सगळे पाहत होतोच, तितक्यात
एक महिला म्हणजे साधारण ३५- ४० चे वय आणि तिच्या सोबत एक ३ वर्षाची मुलगी..( मुक्ता ) या दोघी त्या राहुटीमधून बाहेर आल्या.
मी
त्यांच्याकडे पाहतच राहिलो, अरेsss बापरेsss!!!, ही इतकी लहान मुलगी? ती ही असल्या पावसात?
"
नमस्कार, काय हो तुम्ही, हिला कसे काय गडावर आणले?"
"आम्ही मुक्ताला, ती एक वर्षाची असल्यापासून
गडावर घेऊन येतो,
मग तिला पण आपला इतिहास, गड, निसर्ग याबाबत आवड निर्माण
व्हायला नको का?"
मी मुक्तांच्या बाबांचे उत्तर
ऐकून आवाक झालो. त्यांच्या या विचाराने भारावून गेलो होतो, आणि माझ्या मनात विचार आला,"आपण राजगडला कधी जातोय"?
वयाच्या
१८ व्यावर्षी आणि ही मुक्ता पहा वयाच्या पहिल्या वर्षी पहिल्यांदा गडावर आली. म्हणूनच म्हणतो " आपण राजगडला कधी जातोय?".....म्हणजे, खूप उशीर करू नये आणि नका. त्यानंतर संपूर्ण गड फिरून
झाला...पण हा विचार काही पाठ सोडत नव्हता."आपण राजगडला कधी जातोय?"
(समाप्त)------------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"When are you going to Rajgad Part 3"
We came to the temple and immediately took out the dry clothes from the bag and went to a corner and changed it and started preparing for the next one. Ram Khichdi's plan was to get an already lit rectangle, with the cooperation of all, a great cooking was done, the hot Ram Khichdi was calmed down, and there was a chat, verse, fun, and a discussion about what the program would be like for the rest of the day. Now the rain outside was calm but at night, it was completely dark on the fort, the frogs' daarao, daarao, the music of nightingales from afar had started ...
We came out of the temple and sat near the Padmavati lake, while in the distant valley, in the darkness, we could see the lights disappearing in the middle of the valley, flickering and disappearing in the valley. Probably disappearing into the woods. If I looked at the clock, it was about 1 o'clock.
The question arose in my mind as to who is coming so late at night? Although the mind was finally crowned, the body was very tired and in the morning wanted to see the whole fort, the fortified Balekilla. Now we went to the temple deciding that we should sleep in the temple, but it didn't take much sleep, in the morning we got up in the dark, what was around us. It was interesting to see ... After a while there was complete silence in the temple, stoves, all the fires for Ubi They calmed down and it was dark in the temple again .... but this silence did not last long Gone. At that time it was 4 o'clock in the morning. I, however, had seen their figures moving in that darkness.
In the morning, one of us woke up and realized that these were the children in the night light in the valley. "What school, what class?"
"Dada, we are the children of 8th, 9th class of Jnanprabodhini school in Pune and this is our Dada in 11th class." An experienced friend of ours asked,
"Hey, how did you get so late?"
Hey Dada, "Our bus stopped, then another bus came late."
Looking at these children, I felt a lot of respect for them. How brave and accompanying Dada is that he is small. Seeing these children, I realized that the hardships we endured yesterday are very small.
We went out of the temple to see the fort, but at the back we saw some rahutas, now it was not raining so the blue sky above and as far as we could see all the greenery was visible, in the white clouds the fort was visible, nothing else was visible. Since the temple was on the lower side, nothing could be seen except the ascent.
 |
| Padmavati Lake |
Along with us, some of the young women who were in the temple were with us. These people used to come and go to the temple many times. While I was watching all this, a woman of about 35-40 years of age and a 3-year-old girl with her .. (Mukta) both came out of the house.
I kept looking at them, oh my gosh !!!, is this such a little girl? Is it in the rain?
"Hello, how are you, how did you get her to the fort?"
"We have been bringing Mukta to the fort since she was one year old, so shouldn't she also be interested in our history, fort, nature?"
I was shocked to hear Mukta's father's answer. I was overwhelmed by this thought, and the thought came to my mind, "When are you going to Rajgad"?
At the age of 18 and see this pearl came to the fort for the first time in the first year of age. That's why he says "When are you going to Rajgad?" ..... I mean, don't be too late and don't. After that, the whole fort was turned around ... but this thought did not leave any lesson. "When are you going to Rajgad?"
(Finished)
निखिलजी आपण राजगडला जाऊयात परिस्थिती सामान्य झाल्यावर.
ReplyDeleteहो अगदी नक्की जाऊ...पावसाळा सुरू झाला की लगेच जाऊ...
Deleteखूप छान लिहितोस निखिल... सगळं डोळ्यासमोर उभं रहातं...मला रायगडावर जायचंय... पण चढण्याचा त्रास आहे... पण जायचंच आहे...कोरोना गेल्यावर नेशील कां?
ReplyDeleteजरूर जाऊ की....फक्त रोप वे सुरू हवा
Deleteमी पहिल्यांदाच नवा नवा {नवीन} पहिलाच गढ पाहिला होता,.... जस जसे वाचत गेलो तस तसे आठवणी ताज्या झाल्या.... एकदम भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteआपले नाव कळवावे.
Delete