Saturday, April 24, 2021

"आपण राजगडला कधी जातोय भाग २"/ "When are you going to Rajgad? Part 2"

                         "आपण राजगडला कधी जातोय भाग २"

अशा सगळ्या अडचणी हळू हळू पार करत आम्ही पुढे पुढे जात होतो, अडचणी येतात आणि आपण त्याला तोंड देत पुढे पुढे कधी जातो हे कळत नाही, आणि त्या रात्रीच्या अडचणी तर मागे वळून पाहिल्या तर दिसत पण नव्हत्या.मागील अंधार इतका होता की मागे वळून अडचणी पाहिल्या तरी दिसल्या नाहीत.

ढगात हरवलेली सुवेळा माची,राजगड

हळू हळू अडचणीला आम्ही मागे टाकले होते आणि आता गडाच्या मध्यावर आलो होतो. निसर्ग हा कायम आपल्याला त्याची खूप वेगवेगळी रूप दाखवत असतो, आपण फक्त ती डोळसपणे पाहिली पाहिजेत, गडाच्या मध्यावर आलो की दोन्ही बाजूला दरी होती, त्यामुळे वारा गडाच्या अंगावर मनसोक्त खेळत होता, पावसाचा जोर जरा वाढला होता, त्यामुळे पाऊस आणि वारा मुक्तपणे आमचा सगळा क्षीण कमी करत होते. विजेरीच्या प्रकाशात पाहिले तर चक्क वारा पावसाला परत आकाशाकडे आणि चारी दिशांना फिरवत होता. हे निसर्ग साैंदर्य नेहमी नेहमी पाहायला आणि अनुभवायला मिळत नाही.                                    😃

मला नेहमी वाटते, काही काही वेळा, जागा, प्रसंग असे असतात की ते फक्त आणि फक्त आपण जगायचे, अनुभवायचे असतात,...असेच सगळे मित्र एकमेकांना सांभाळून गड चढत होते,आणि शेवटचे पण अतिशय अवघड( पहिली वेळ होती म्हणून, आता काहीच वाटत नाही ) चढण आले. अनुभवी मित्र सोबत होते त्यामुळे एक वाटाड्या पुढे जसे सांगत गेला तसे वर चढत गेलो. कधी पूर्ण पाय...कधी फक्त पायाचा चवडा....कधी फक्त हाताची पहिली पेर...कधी चारच बोटं , असे चढण चढून वर एका २*२ च्या दरवाज्यातून गडावर प्रवेश...म्हणजे माझे पहिले पाऊल पडले...

पद्मावती माची वरील एक बुरुज,राजगड

तेव्हा पासून आज पर्यंत कितीवेळ गेलो तरी त्या पहिल्या पायरीला वंदन केल्याशिवाय कधीच पुढे गेलेलो नाही. पद्मावती माचीवर आलो आणि पद्मवती देवीच्या मंदिरात रात्री मुक्काम करायचा होता, देवळात पूर्ण अंधार होता,आणि आमच्यासारखे अनेक जण त्यात आधीच आलेले होते , पण त्या रात्री मंदिरातील ही गर्दी बरी वाटत होती, कारण कोणी कोपऱ्यात चुली, स्टो, पेटविला होता, त्यामुळे मंदिरात जरा गरमी तयार झालेली होती.

पद्मावती मंदिर,राजगड
    आम्ही जवळ जवळ ५-६ तास पूर्ण भिजून आणि वाऱ्यातून वर आलो होतो......सगळेच पाऊस, वारा, थंडी याचा आस्वाद घेऊन आलो होतो.....

(क्रमशः)

----------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation      

          "When are you going to Rajgad? Part 2"

Going through all these difficulties slowly, we were moving forward, difficulties came and we don't know when we will face them, and the difficulties of that night were not visible even if we looked back. Although not seen.

Gradually we overcame the difficulty and were now in the middle of the fort. Nature always shows us its very different forms, we just have to look at it with our eyes, we came to the middle of the fort, there was a valley on both sides Was doing. Seen in the light of a flashlight, the chucky wind was blowing the rain back towards the sky and in all four directions. This beauty of nature is not always seen and felt.

I always think, there are times, places, occasions that are just and only you want to live, feel, ...

That's how all the friends were climbing the fort taking care of each other, and the last but very difficult (as it was the first time, now I don't feel anything) came. An experienced friend was with us, so we went upstairs as one of the walkers continued. Sometimes a full foot ... sometimes just a bite of the foot .... sometimes just the first foot of the hand ... sometimes only four fingers, climbing like this, entering the fort through a 2 * 2 door ... that is, my first step fell ...

No matter how much time has passed since then, we have never moved forward without paying homage to that first step. Padmavati came to Machi and wanted to spend the night in the temple of Goddess Padmavati, the temple was completely dark, and many like us had already come in, but that night the crowd in the temple felt good, because someone had lit a stove in the corner, so it was a little hot in the temple Was ready.

Padmavati Temple,Rajgad

We were soaked for about 5-6 hours and came up through the wind ...... all of us had tasted rain, wind, cold .....

(Respectively) 


9 comments:

  1. छान अनुभव लेखन, निखिल जी..👍👌

    ReplyDelete
  2. Replies
    1. अति उत्तम 👌🏻👌🏻👌🏻🌏खुप छान.....

      Delete
  3. मस्त !! एकदम उत्कंठावर्धक...

    ReplyDelete
  4. छान लिखाण ! पण थोडे जास्त लिहीत जा! मधेच वाचन थांबायला होतं।

    ReplyDelete

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले