Friday, April 23, 2021

"आपण राजगडला कधी जातोय भाग 1/"When are you going to Rajgad ..." Part 1




" आपण राजगडला कधी जातोय..." भाग 1

    पावसाळा ऐन रंगात आला होता, हो! रंगात म्हणजे डोंगर, दऱ्या हिरव्यागार झाल्या होत्या, जिकडे तिकडे फेसाळ धबधबे कोसळत होते, त्याचा आवाज सगळ्या दरीमध्ये घुमत होता, असे सगळीकडे वातावरण झाले होते. पेपरमध्ये , याचा आनंद घेऊन आलेले त्याचे वर्णन करत होते.

    शाखेत विषय झाला आता आपण सगळे तरुण राजगडला जाऊच. मागे म्हणालो तसे कोणताही प्रवास म्हटलं की मन स्वस्थ बसत नाही आणि आता तर राजगडला सहल न्यायची, असा नुसता विचार जरी सुरू झाला तरी उत्साह वाढला होता.

    ' राजांचा गड आणि गडांचा राजा' असा तो राजगड! सहल नक्की झाली.. त्याची तयारी पूर्ण झाली, आम्ही गडावर मुक्काम करणार होतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणाचा ठरलेला मेनू म्हणजे ' राम खिचडी ' आता तुम्हाला वाटले असेल हा कोणता प्रकार ? पण या खिचडीची चव कायम लक्षात राहते. श्री रामाने सर्व समाजाला एकत्र केले, कधी पण कोणता भेदभाव केला नाही, आणि जसे एक एक व्यक्ती एकत्र येऊन सेतू बांधला, सीता मातेची मुक्तता केली, तसेच सर्वांनी आपल्या कडील एक एक मुठ तांदूळ, डाळ असे आणून भक्ती आणि कोणताही भेद मनात न आणता केलेली खिचडी म्हणजेच 'राम खिचडी' पुढे कधीतरी करण्याची सविस्तर पद्धत कळवीन.

    या खिचडीचे साहित्य आणि तयार करायला एक मोठे पातेले, झाकण, एक मोठे उलथन हे सगळे गोळा केले आणि आमची स्वारी स्वारगेट बस Stand ला आली. येथे पेशव्यांचे, सरदारांचे घोडेस्वार आपले घोडे ठेवत म्हणून हे स्वारगेट, आमची बस २.३० ची होती जी संध्याकाळी सात ला पायथ्याच्या गावात घेऊन जाणार होती. आम्ही सगळे मुलं, सामान, घेऊन बस मध्ये डेपोतच जाऊन बसलो. असे गड किल्ले फिरणारे, बरोबर त्यांच्या फायद्याच्या ओळखी काढून घेतात, ओळखी कायम ठेऊन फायदा होतो. डेपोत बसमध्ये बसल्यामुळे जागा मिळाली.

    मी पहिल्यांदाच जात होतो, त्यामुळे नेमका अंदाज नव्हता. पाऊस कसा, किती असेल? गडाचे चढण कसे असेल? असे अनेक प्रश्न मनात येत होते. पण शाखेतील अनुभवी मित्र सोबत असल्यामुळे हा सगळा विचार त्यांच्यावर सोडला आणि मी आपले पातेले माझ्या मांडीवर हातात धरून बसलो. गाडीने जेमतेम वेग घेतला होता, बस मध्ये काही स्थानिक, आमच्यासारखे गड प्रेमी, काही हौशी तरुण तरुणी सगळे आपल्या आपल्या सीट समोरील दांडी ( पूर्वी आपल्या समोरील सीटच्या मागील बाजूस आडवी दांडी होती ) धरून तो वळणा वळणाचा, खाच खळगे असलेला रस्ता पार करत होतो...!

    तितक्यात एक हौशी तरुणी जोरात किंचाळली,

     " आई गssss""काय ग काय झाले?", 

    दुसरीने तिला विचारले, "काही नाही ग, This Road is.........."

    रस्ता आणि त्याचे खाचखळगे यामुळे बहुदा पहिल्यांदाच सार्वजनिक वाहनातून प्रवास करणारी ती वैतागली होती. असा प्रवास करून आम्ही रात्री आठ वाजता राजगडच्या पायथ्याच्या गावात म्हणजे गुंजवणेला आलो. भूरभुर पाऊस सुरू होता... बसमधून उतरलो आणि विजेरी( बॅटरी ) सुरू करून चालायला सुरुवात केली. काळोख होता, चंद्र, तारे काही काही दिसत नव्हते, दिसत होते ते म्हणजे समोरील काही मीटर वरील चिखल आणि वरून आपल्याला कायम भिजवणारा पाऊस,

    आज हे बोलताना देखील ती रात्र मला रोमांचित करून जात आहे. पायथ्या वरून जाताना आधी एक दोन, तीन ! हो, बहुतेक तीन छोटी भाताची शेतं ओलाडली, अंधार, चिखल, पाऊस यात काहीच अंदाज येत नव्हता त्यामुळे नेमके किती हे त्यावेळी समजले नाही. बांधावरून जात असताना एका मित्राचा पाय सरकला आणि सरळ शेतातील चिखलात पार मांडी पर्यंत आत रुतला, कसा बसा त्याचा तो चिखलाने भरलेला पाय आम्ही बाहेर काढला , त्यावेळी मनात एक विचार आला, हा असा गड चढायचा....?

(क्रमशः)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation

                    "When are you going to Rajgad ..." Part 1


       The rain was in full swing, yes! The mountains were in color, the valleys were green, the waterfalls were falling everywhere, its sound was reverberating all over the valley, the atmosphere was everywhere. In the paper, those who enjoyed it were describing it.

    It became a topic in the branch, now all of us young people will go to Rajgad. As mentioned earlier, any journey said that the mind is not at peace and now the thought of taking a trip to Rajgad, even if it was just the beginning, had increased the enthusiasm.

    That fort is the 'fortress of kings and the king of forts'! The trip was over .. Preparations were complete, we were going to stay at the fort. So what kind of dinner menu do you think 'Ram Khichdi' is? But the taste of this porridge is always remembered. Shri Rama brought all the society together, never discriminated, and just as one person came together and built a bridge, liberated Mother Sita, all of them brought a handful of rice, dal and khichdi without any discrimination. That is, I will tell you the detailed method of doing 'Ram Khichdi' sometime later.

    Gathered all the ingredients for this khichdi and a big bowl, lid, a big upturn to make it and our ride came to Swargate bus stand. As the horsemen of Peshwas and Sardars kept their horses here, our bus was at Swargate at 2.30 pm which was to take us to the foothills village at 7 pm. We took all the children, luggage, and sat in the bus at the depot. Those who walk around such forts, take away the identity of their advantage, by maintaining the identity is beneficial. Depot got a seat by sitting in the bus.

    I was going for the first time, so there was no exact guess. How much rain, how much? What will the climb be like? Many such questions came to mind. But being with an experienced friend in the branch, I gave up the idea and sat on my lap holding my bowl. The train was speeding, some locals in the bus, some fort lovers like us, some amateur youngsters were all crossing the winding road with their poles in front of their seats (previously there was a horizontal pole at the back of their front seats). .!

Just then an amateur young woman screamed loudly,

     "What happened?"

    Another asked her, "Nothing, This Road Is .........."

    The road and its ditches made it difficult for her to travel in public transport for the first time. After traveling like this, we came to Gunjavane, a village in the foothills of Rajgad, at 8 pm. It was starting to rain heavily ... I got off the bus and started walking with a flashlight (battery). It was dark, the moon, the stars were not visible, all that was visible was the mud a few meters in front and the rain that was constantly soaking us,

    Even speaking of it today, that night continues to thrill me. One two, three before going over the foothills! Yes, most of the three small paddy fields were flooded, dark, muddy, rain was unpredictable so I didn't know exactly how much at that time. While passing through the embankment, a friend's foot slipped and sank straight into the mud of the field up to his thigh.

(Respectively)

12 comments:

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले