" तळेगाव लोकल."
तसे माझे अनेक नातेवाईक पुण्यात आहेत, पण म्हणतात ना मावशी ही आपली दुसरी आई असते, तसेच काहीसे तळेगावच्या मावशी बाबत होते. रविवारी कॉलेजला सुट्टी असायची, कॉलेज पहिल्या वर्षी तसं.... फार निवांत होतं आणि आम्ही पण निवांतच होतो.
शनिवारी संध्याकाळी शाखा झाली की रूम वरून निवांत पायी निघायचो......शिवाजी नगर स्टेशन ला जाण्यासाठी! .........पायी का ???? कारण असे म्हणतात, की गावाची खरी ओळख पटवून घ्यायची असेल तर तिथे पायी फिरावे. तसे कॉलेज ते शिवाजीनगर स्टेशन गाठायला अर्धा तास लागत होता.....आणि तिथून पुढे तळेगाव पर्यंत लोकल!!!!! पहिलं वर्ष मी दर आठवड्याला तळेगावला चक्कर मारत असे.
![]() |
| अनेकांची जीवन लाईन, लोकल |
मी तळेगावला येणार असेल तर मावशी नेहमी विचारायची," एकटा रात्री ९.३० च्या लोकलला येशील का?" मला आधी आश्चर्य वाटले होते.....पण तळेगावला गेल्यावर ह्या विचारण्यामागचे कारण कळले.
तेव्हा तळेगाव रात्री ८ नंतर शांत होऊन जात असे. फक्त उशिरा लोकलमधील काही लोक स्टेशन वर दिसायचे,बाकी सगळीकडे शुकशुकाट असे. तसेही "तळेगाव" ची काही बाबतीत अपकिर्ती होती, त्यामुळे ९.३० च्या लोकलने मी येणार म्हंटल्यावर मावशी ला काळजी वाटत असे.
एकदा हॉस्टेल वर कोजागिरी पौर्णिमा केली, मी दूध आटवत बसलो होतो. बाकी पोरांची मस्ती सुरू होती, इतक्यात एका सिनिअर ने दूध कसे झाले आहे ते पिवून पहा अशी ऑर्डर सोडली. दुधाचा कप प्लॅस्टिकचा होता,त्यामुळे ते किती गरम आहे याचा अंदाज आला नाही. मी पहिला दुधाचा घोट घेतला,ते खूप गरम होते. पण पुढे काय करावे सूचेना, बाहेर थुंकून द्यावे तर परत सिनिअर ओरडणार, मी ते तसेच पिऊन टाकले. झालं...... इतके गरम दूध प्यायल्यामुळे दुसऱ्या दिवशी सगळा घसा लाल लाल झाला. काहीच खाता पिता येईना.
मग काय ९.३० ची तळेगाव लोकल पकडली
आणि सरळ मावशी कडे दोन दिवस मुक्काम.तिच्या कडे आलो म्हणून लवकर बरा झालो.
एकदा रविवारी मेस
मधील गोड जेवण( फिस्ट) यथेच्छ झोडून, दुपारी ३.३० च्या तळेगाव लोकलने निघालो. ही लोकल फक्त पुणे स्टेशन
ते तळेगाव पर्यंत जाते आणि तळेगाव वरून परत पुण्यात येते.
मी निवांत खिडकीत
बसून जात होतो, दुपारचे मस्त जेवण आणि खिडकीतून
येणारा वारा, यामुळे मला झोप लागली, ती पण इतकी गाढsss.की येणारे स्टेशन,आवाज काही काही लक्षात आले नाही.माझी मस्त झोप झाली डोळे उघडले,पाहतो तर काय लोकल परत पुण्याच्या दिशेने चालत होती. मला काहीच
समजेना, मनात विचार करत होतो, गाडी परत कशी काय चाललीये?
शेवटी बाजूच्या एका काकांना विचारले
"का हो काका, गाडी परत जाती आहे का?"
तर ते मला हसून म्हणाले,
" हो, तळेगाव वरून आता परत पुण्याला चालली आहे."
माझी चूक एकदम लक्षात आली, गाडी चुकली नाही तर मीच चुकलो आहे. घोरावाडी स्टेशनला लोकल मधून
उतरलो आणि रेल्वे रुळावरून चालत तळेगाव गाठले. दुसरा काहीच पर्याय माहीत नव्हता. रोड,बस काहीच माहीत नव्हते. ज्या रुळावरून लोकल जाते तोच पकडला आणि
तळेगाव स्टेशनवर पोंचलो
मला चटकन ससा कासवाचीच गोष्ट आठवली, ससा झोपला आणि......
![]() |
| ससा कासव गोष्टीतील.... झोपी गेलेला ससा |
--------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"Talegaon Local."
By the way, many of my relatives are in Pune, but they say that my aunt is our second mother, and also about my aunt from Talegaon. Sundays used to be a college holiday. The first year of college was like that .... It was very sleepy and we were also sleepy.
When there was a branch on Saturday evening, I used to walk from the room to sleep ...... to go to Shivaji Nagar station! ......... Pai ka ???? Because it is said that if you want to know the true identity of a village, you have to walk there. It used to take half an hour to reach Shivajinagar station from college ..... and local from there to Talegaon !!!!!
For the first year, I used to visit Talegaon every week.
If I was coming to Talegaon, my aunt would always ask, "Will you come to the local at 9.30 pm alone?" I was surprised before ..... but when I went to Talegaon, I understood the reason behind this question.
At that time, Talegaon used to calm down after 8 pm. Only a few people from the late locals would show up at the station, the rest would be dry everywhere. Even so, "Talegaon" was notorious in some respects, so my aunt was worried when I was told to come by the 9.30 local.
![]() |
| Kojagiri Pournima |
Once on the hostel at Kojagiri Pournima, I was sitting milking. The rest of the kids were having fun, just as a senior left an order to drink the milk. The milk cup was made of plastic, so I had no idea how hot it was. I took the first sip of milk, it was very hot. But the instructions on what to do next, if you spit it out, the senior will shout again, I drank it as well. Done ...... The next day, after drinking so much hot milk, my whole throat turned red. Nothing can be eaten.
Then I caught the Talegaon local at 9.30 am and stayed straight for two days with my aunt. We came to her and got well soon.
Once on Sunday, we left the sweet meal (fist) in the mess and left by Talegaon local at 3.30 pm. This local only goes from Pune station to Talegaon and back to Pune from Talegaon.
I was sitting by the window, having a nice lunch and the wind blowing through the window, it made me sleepy, but it was so dark that I didn't notice the oncoming station, the sound. Was running. I didn't understand anything, I was thinking in my mind, how did the car go back?
Finally asked an uncle on the side
"Why yes uncle, is the car going back?"
So he smiled at me and said, "Yes, I am going back to Pune from Talegaon now."
I realized my mistake, I didn't miss the car, I missed it. We got off the train at Ghorawadi station and reached Talegaon on foot. The other knew no other option. Road, just knew nothing. We caught the train on the local train and reached Talegaon station
I immediately remembered the story of the rabbit tortoise, the rabbit fell asleep and ......
not exactly the same happened to me ...... but I slept so much that the local reached Talegaon, stopped for 10 minutes and left, but I did not know.
My aunt, however, was worried about why I didn't reach her. When I told this story ..... I laughed but it was a speech .... I didn't have to tell it!





अरे वा..ताळेगावची लोकल छानच होती..काही का असोना तुम्हीं आठवणी खूप छान जपून ठेवल्या..😊
ReplyDeleteअनुभव मजेदार आता वाटतोय.तेव्हां किती वैताग आला असेल!
ReplyDeleteहो न...
DeleteAwesome 👌🏻👌🏻👌🏻👌🏻मजेदार किस्से आहेत,
ReplyDeleteधन्यवाद, आपल्याला आवडले तर नक्की लिंक शेअर करावी
Deleteबर्याच वेळेस आठवणी वाचताना गोड छान वाटतात पढ आपण कसा बावळट पणा केला होता हे लक्षात येत. यात ही मजा आहे.
ReplyDeleteछान लेखन आहे.... मी सुद्धा तळेगावात राहिलो आहे... लोकल चा अनुभव घेतला आहे...
ReplyDelete