Thursday, April 29, 2021

"माझे सिंहगड प्रेम भाग २”/"My Sinhagad Love Part 2"

 

                           "माझे सिंहगड प्रेम भाग २”

राजगड दर्शन, सिंहगड किल्ल्यावरून 

"चला रे आपण राजगड-तोरणा ट्रेक करू."
"
अरे नको निख्याआपल्याला कोणालाच याबाबत जास्त माहिती नाहीये."
"
मग काय झाले? माहिती शोधू आणि जाऊ"
"
पण आपल्यातलं कोणीच जाऊन पण आले नाही, ह्या ट्रेकला?"
"
अरे, कधी तरी पहिली वेळ असणारच की! जाऊया मी काढतो सगळी माहिती"

               असे अनेक वाद, संवाद,चर्चा झाल्या आणि वरील ट्रेक ठरला.(पुढे या बाबत नक्कीच बोलेन) पण हा ट्रेक करण्यासाठी शरीराला सराव हवा असा विचार समोर आला. कारण या ट्रेकसाठी किमान ८-९ तास सलग अनेक टेकड्यांची चढउतार करावी लागते.
मग काय!!! सरावासाठी पायी सिंहगडला जाण्याचे ठरवले. आपला किमान चालण्याचा सराव तरी होईल असा विचार केला.

                 मी आणि माझा एक मित्रआमच्या नारायण पेठेतील रूम वरून रात्री २.३० ला ( ही वेळ अनेक वर्षांची सोबती आहे) चालत चालत सिंहगडाला निघालो. साधारण ७.३० ला पायथा गाठला आणि पुढे गड ही चढला. काहीही त्रास न होता .....सिंहगडची पायी वारी चांगली झाली. त्यामुळे राजगड तोरणा ट्रेकचा आमचा कॉन्फिडन्स वाढला.
         मी असाच सिंहगडच्या कायम प्रेमात आहे. PMT ने, गाडीने, सायकलवर, चालत, दिवसा, रात्री, थंडीत, पावसात, उन्हात, एकटा, मित्रांसोबत, जे येतील त्यांना घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना सोडून मी सिंहगडवर गेलोय. असे सगळे प्रकार करून झाले तरी माझे समाधान होत नाही. देवळात जाऊन प्रत्येक वेळी देव वेगळाच भासतो,दिसतो तसेच काहीसे आहे हे !!!!!
                एकदा पुण्यातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार होते. पण पाहायला जागा नव्हती? मग काय रात्री सिंहगडाला मुक्काम केला, अशा खगोलीय घटनेचा आनंद घेण्यासाठी याहून सुंदर जागा ती कोणती? कदाचित अशा अनेक गोष्टींच्या अभ्यासासाठी , चिंतनासाठी, मनसोक्त वाचनासाठीच लोकमान्य टिळक गडावर येत होते.  

लोकमान्य टिळक बंगला,सिंहगड

      सूर्यग्रहण बघण्यासाठी गडावर गेलो तर खरं. पण काहीच जेवायला नव्हते,सोबत डब्बे ही नेले नव्हते. रात्री एका टपरी मध्ये आतून लाईट सुरू दिसला, त्या मालकाला विनंती केली, तो बिचारा सुरवातीला भीतीने दुकान उघत नव्हता. मनात विचार केला 'काय गम्मत आहे ना!!? ज्या गडावर शौर्यगाथा घडल्या, तेथील दुकान चोरांच्या भीतीनं उघडत नव्हते.

    असो, शेवटी त्याने हो - नाही करत दुकानातून हळूच बिस्कीटपुडे दिले. पण ते खायचे कसे? कोरडे बिस्कीट खायला नको वाटत होते. मग मावशींच्या झोपडीतून एक पोहऱ्याची बादली घेऊन देव टाक्याचे पाणी शेंदले आणि सरळ बादली मधील पाण्यात बिस्कीट बुडवून खायला सुरूवात केली, त्या रात्री बिस्किट्स वर आमचे जेवण झाले. देव टाक्याच्या पाण्यात बुडवून खाल्लेली त्या बिस्किटांची चव अजून ही आठवते. दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण पाहून मगच आम्ही गडावरून पायउतार झालो.

              असे एक ना अनेक किस्से........! आयुष्यात काही प्रसंग प्रेरणा देणारे असतात. तसाच सिंहगड माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. ट्रेकिंग साठी, आनंद साजरा करण्यासाठी , शारीरिक क्षमता आजमावण्यासाठी माझे नेहमी सिंहगडवर जाणे व्हायचेच. पण मन अशांत असले तरी मी सिंहगडवर यायचो. म्हणून मी नेहमी म्हणतो
"
सिंहगड हे माझे पहिले प्रेम आहे " आणि त्याने पण मला प्रेमाने जपलं आहे. अनेक प्रेमळ माणसं मला येथेच भेटले, सरबत विक्री करणारे काका, जेवू खाऊ घालणाऱ्या मावशी, दही विक्री करणारे, दर आठवड्याला (माझ्यासारखेच वेडे असलेले) सिंहगडावर न चुकता येणारे ' सिंहगड प्रेमी ' अगदी सगळे. 

    जुलै महिन्यात संततधार पाऊस लागून राहिला होता. असा छान पाऊस आणि सिंहगडला भेट नाही? असे क्वचित् व्हायचे. तसे....मला सिंहगडवर जायला कारण, वेळ आणि सोबत लागायचीच असे नाही.....पण तरी या वेळेस मात्र मी सवंगडी तयार केला.

"चल रे जाऊयात का?"

"कुठे रे निख्या?"(निख्या हे माझे मित्रांनी पाडलेले नावं)

"अरे कुठे काय? मस्त पाऊस पडतोय, जाऊ सिंहगडावर!!!!!"

"मला वाटलंच! एवढा पाऊस पडतोय आणि अजुन तू सिंहगडला कसं काय गेला नाहीस?"

"म्हणून तर विचारतोय जाऊया का?" "अरे आज जरा जास्तच पाऊस पडतोय, जरा कमी झाला की जाऊ."

"तू येणार आहेस की नाही? ते सांग नाहीतर मी निघतो."

"बरं बाबा, चल....! असं ही, तुझ्या सोबत जायचे म्हणजे काळजी नाही!"

    आम्ही दोघे एका छत्रीत रूम वरून PMT बस करिता शनिवारवाडा गाठला, तेव्हा पण रस्त्यावरून खूप पाणी वाहत होते. आम्ही फक्त पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी निघालो होतो. आता आमच्या कडे पण मोबाईल आला होतापण तो भिजू नये म्हणून रूमवर ठेऊनच बाहेर पडलो. रूम वरील बाकी मित्रांना निरोप देऊन आम्ही निघालो होतो. सोबत जेमतेम पैसे प्लॅस्टिक पिशवीत घेतले होते.

आम्ही PMT मध्ये बसे पर्यंतच निम्मे भिजलो होतो. सोबत घेतलेली छत्री बंद करून बॅगेत ठेऊन दिली कारण आता फक्त मनसोक्त भिजायचं होतं बसsss.!!!! जाताना सगळ्या रस्त्यांवर पाणी वाहत होते....गाड्यांचा वेग मंदावला होता......त्यांना समोरचा अंदाज घेऊन पुढे जावे लागत होते...काही लोक पावसात भिजत आपले आपले व्यवहार पूर्ण करत होते...काही चहाचे वाफाळलेले कप घेऊन टपाऱ्यांचा आडोसा घेऊन उभे होते... अशी सगळी रस्त्यावरची गडबड पाहण्यात रस्ता कटत होता. खडकवासला धरण आले.......काय सुंदर पाणी दिसत होते! ढग अलगद खाली उतरले होते. ढगांच्या पडद्याआडून पुसटशी सगळी कडे हिरवळ दिसत होती!....असा सगळा नजारा पाहण्यात रस्ता कधी संपून गडाचा पायथा आला कळलचं नाही.

आम्ही बस मधून उतरलो आणि लगेच चालायला सुरुवात केली. रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचे लोट वाहत होते, पायात बूट होते पण ते केव्हाच आतून ही भिजले होते. त्यामुळे या वाहणाऱ्या पाण्यातून जाताना पायांना थंड स्पर्श जाणवत होता. रस्त्यावरून जे पाणी वाहत होते ते सगळे पाणी वरील डोंगरदऱ्यातून खाली आले होते. त्या पाण्याचा इतका वेग होता की त्यात आपला तोल सांभाळणे कठीण जात होते. आम्ही दोघांनी एकमेकांचा हात गच्च पकडून तो प्रवाह पार केला. गडाच्या पायथ्यापासून माथ्याकडे कुच केले. खूप प्रसन्न, मनाला आनंद देणारे,आपली ऊर्जा, सकारात्मकता वाढवणारे वातावरण निर्माण झाले होते. पाय वाटेवरून माती,चिखल तुडवत पुढे जात होतो....! मध्येच पाऊस उघडायचा की सगळं आकाश स्वच्छ होत होते. पुढच्या काही क्षणात परत गच्च पाण्याने भरलेल्या ढगांचे आगमन व्हायचे आणि पाऊस असा सुरू व्हायचा की समोरचं काहीच दिसायचं नाही.  

असा पाऊस सुरू झाला की डोंगर माथ्यावरून पुन्हा पाण्याचा लोंढा खाली झेपावत असे. भरभरून चहाचे पिंप सोडून द्यावेत असा त्या पाण्याला रंग असायचा. चढतांना ही निसर्गाची वर्षा ऋतूतील गम्मत अनुभवत आम्ही चढत होतो. खाली आलेले ढग, सिंहगड माथा तोही पूर्ण ढगात झाकलेला, दूर दूरपर्यंत दिसणारी हिरवळ, खडकवासला धरणाचे बॅकवॉटर, चढण्याच्या वाटेवर पसरलेली झाडे ,वेली, मुक्तपणे आकाशात झेपावणारे पक्षी, पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि खळाळत खाली झेपावणारे छोटे धबधबे, सगळे अवर्णनीय!!!! या सगळ्याच्या सोबतीत नेहमी पेक्षा कमी वेळेत गड चढला...पुणे दरवाजाच्या भिंतीवर जरा विसाऊन खाली दरीत,वाटेत पडणारा मनसोक्त पाऊस पाहण्याचा मोह टाळताच आला नाही. स्वर्ग कसा असतो ते माहीत नाही..... पण हा अनुभव घेणे म्हणजे स्वर्ग सुखच!!!

बसsss स्वर्ग सुख हेच!!!

आता आम्ही दोघे पूर्ण ढगात होतो. कारण सिंहगड ढगांनी वेढलेला होता. जेमतेम ३ फुट पर्यंत दिसत होतं. पुणे दरवाजा ओलांडून गडावर आलो ते थेट मावशींकडे चहा प्यायला!!!! चहा मागवला तर खरा....पण हातात चहाचा कप धरताचं येत नव्हता!!! एक तर खूप भिजलो होतो, त्यात प्रचंड वारा.....त्यामुळे खूप थंडी वाजत होती. हाताची बोटं अाखडून गेली होती.

     

चुली जवळ बसून कसेतरी हात गरम केले आणि चहा प्यायला सुरूवात केली. पण हातातील कप काही एका जागी स्थिर होत नव्हता. अंगातील थंडीमुळे हात इतके थरथरत होते की निम्मा चहा हातावर सांडत होता.... तरी थंडीमुळे चटका काही बसला नाहीउलट चहा हातावर सांडल्यामुळे हात गरम होऊन पुढचा एक कप चहा मात्र पिता आला.


चहा घेऊन जरा गरमी आली, त्यामुळे गडावर एक फेर फटका मारायला झोपडीतून बाहेर पडलो. कोंढाणेश्वर महादेवाचे दर्शन घेतले, बालेकिल्ल्याचे दर्शन घेतले. मी कधीही गडावर गेलो की या दोन पवित्र ठिकाणांचे दर्शन घेतल्याशिवाय परतत नाही. या महादेवाच्या देवळात गाभाऱ्यात प्रवेश तर नाही त्यामुळे बाहेरून च नमस्कार करावा लागतो. तिथे गेलो की प्रत्येक वेळी मनात हाच विचार येतो की इथे कधी तरी आपल्या राजांनी दर्शन घेतले असेल!त्यांचे पाय या देवळात लागले असतील! महादेवाला हात जोडताना नकळतपणे त्या काळातील वातावरणात माझे मन संचार करून येते.

    बालेकिल्ल्याचे म्हणाल तर, तो जो पर्यंत सर करत नाही तोपर्यंत गड सर झाला असे मानत नाहीत. नुसता बालेकिल्ला पण लढवता येतो आणि त्याच्या बळावर गड जिंकता ही येतो. त्यामुळे गडाच्या या भागात आल्याशिवाय सिंहगडला जाऊन आलो असे वाटतच नाही.

    पुढे आम्ही पावसातच तानाजी कड्या (याच कड्यावरून/ दरीतून सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे गडावर आले) जवळ आलो. पाऊस मस्त सुरू होताच. आता तानाजी कडा ते कलावंतीणीचा बुरुज (wind point) असे जाऊन आम्ही लगेच परत फिरणार होतो. पण मनात विचार करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे व ती होणे यात खूप फरक असतो हे त्याचं दिवशी समजले.

   तानाजी कडा ते कलावंतीणीचा बुरुज हे अंतर साधारण १० मिनटात पार होते. पण त्या दिवशी खूप पाऊस पडत होताच आणि वाराही जोरदार वाहत होता. या दोघांनी (वारा आणि पाऊस) आमची परीक्षा घेतली आणि आमचा कस पाहिला. वारा आम्हाला एक पाऊल पुढे टाकु देत नव्हता, आम्ही पण इर्षेला पेटलो आणि चल आपण जाऊ पुढे असं म्हणून एकमेकांचे हात घट्ट पकडले.... तो एक पाऊल पुढे....मग मी एक पाऊल पुढे...असे करत हे अंतर ३०- ४० मिनटात पार केले. इतकं वारं असूनही आम्ही बुरुजावर आलो......आता त्या बुरुजाच्या भिंतीवर उभं राहायचं होतं....पण वाऱ्याचा जोर इतका होता की, ते शक्य झाले नाही. आम्ही तरी दरीच्या दिशेला तोंड करून उभे राहीलो. दरी मधून खालून वारा आमच्या तोंडावर आदळत होता, वरून पाऊस येत होताच; पण खाली पडणारे पाणी देखील त्या वाऱ्यामुळे खाली न पडता परत वर उडत होते. ( उलटा धबधबा म्हणा हवं तर...)

हे तुषार मनाला आनंद देत होते. तिथे खूप वेळ थांबवेना, शेवटी तेथून निघालो आणि गड पायउतार झालो.

सिंहगडच्या पावसाचा हा असाही एक अनुभव!!!!!! असे अनुभव आपल्याला खूप काही देऊन जातात, प्रत्येक वेळी ते बोलता येईल असे नाही.पण ते आत खोल जाणवतं , निरंतर सोबत करतं. फक्त पावसात मनसोक्त भिजायला मी अनेक वेळा गडावर गेलो आहे.

नयनरम्य निसर्ग

 मला बाबांना पावसात गड दाखवायची एकदा संधी मिळाली. आम्ही गाडीने गेलो खरं.....पण रस्त्यावर इतकी गर्दी होती की आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि सरळ ३- ४ किमी पायीच गेलो. बाबांना सगळा गड दाखवला, माझ्या माणसाची ओळख करून दिली. परत येताना ते खूप दामले होते. पण एकच वाक्य म्हणाले...

“खरंच तू का जातोस हे मला आज कळाले!!!......असाच जात जा...पण जरा जपून..!

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation

"My Sinhagad Love Part 2"


"Let's trek to Rajgad Torna."

"Oh no Nikhya, you don't know anyone much."

"So what happened? Let's find the information and go."

"But none of us went to this trek?"

"Hey, it's going to be the first time ever! Let's get some information."

               There were many debates, dialogues, discussions and the above trek came to an end. (I will definitely talk about this later.) It has to be done.

So what ........! Decided to go to Sinhagad on foot for practice ..... I thought it would be at least walking practice.

                 A friend of mine and I walked from our room in Narayan Peth to Sinhagad at 2.30 pm (this time is a companion for many years). Reached the base at around 7.30 am and then climbed the fort. There was no problem ..... Sinhagad's footsteps got better. So our confidence of Rajgad Torna Trek increased.

         I am always in love with Sinhagad. By PMT, by car, by bicycle, by walking, day, night, cold, rain, sun, alone, with a friend, taking those who will come and leaving those who will not come, I have gone to Sinhagad ..... Does not happen. Every time you go to the temple, God looks different, it looks the same !!!!!

                Once upon a time there would be a partial solar eclipse from Pune. Maybe Lokmanya Tilak used to come to the fort to study and meditate on many such things.

    If we went to the fort to watch the solar eclipse, in fact ...... but there was nothing to eat, no boxes were taken along. At night, a light was seen on the inside of a tapari, he requested the owner, the poor man was not opening the shop out of fear at first. Thought in my mind ........ 'What's funny !!? The shops on the fort where the heroic stories took place were not open for fear of thieves.

    Anyway, in the end he said yes or no and gave biscuits next to the shop ........ but how to eat it? I didn't want to eat dry. Then he took a bucket of water from his aunt's hut, poured water from the tank and dipped the biscuits in the water in the bucket and started eating. That night ..... we had dinner on biscuits. I still remember the taste of the biscuits dipped in the water of the god tank. The next day, after seeing the eclipse, we set foot on the fort.

     One or more such stories ........! Some events in life are inspiring. Sinhagad is also an inspiration for me. I always had to go to Sinhagad for trekking, to celebrate happiness, to try my physical abilities ...... but even though my mind was restless, I used to come to Sinhagad. So I always say

"Sinhagad is my first love" and he has loved me too. I have met many loving people here, uncles who sell syrup, aunts who sell food, yoghurt sellers, 'Sinhagad lovers' who go to Sinhagad every week (crazy like me). I also come to the fort.

        It had been raining incessantly since July. Such a nice rain and no visit to Sinhagad .... it was rare. By the way .... I don't want to go to Sinhagad because of time and time ..... but this time I made a companion:

"Shall we go?"

"Where is Nikhya?" (Nikhya is the name given to me by my friends)

"Hey, what's up? It's raining hard, let's go to Sinhagad !!!!!"

"I thought! It's raining so much, why haven't you gone to Sinhagad yet?"

"So let's go ask?" "Oh, it's raining a little too much today, let's go if it's a little less."

"Tell me if you're coming or I'll leave."

"Okay Dad, come on ....! Anyway, I don't care to go with you!"

    We both reached Wada on Saturday for the PMT bus from an umbrella room, but there was a lot of water flowing from the road. We had just set out to enjoy soaking in the rain. The mobile had arrived as mentioned earlier, but we left it in the room, saying goodbye to the rest of the friends in the room. We also took the same amount of money in a plastic bag.

    We were half soaked until we sat in the PMT. I closed the umbrella I took with me and put it in the bag because now I just wanted to get wet. On the way, water was flowing on all the roads .... The speed of the vehicles was slowing down ...... They had to go ahead with the forecast in front of them ... Some people were soaking in the rain and completing their business ... He was standing with Adosa ... The road was cut to see all the chaos on the road. Khadakwas came to the dam ....... what a beautiful water! The clouds had parted. From behind the curtain of clouds, greenery was visible everywhere with Pusat! .... I don't know when the road ended and the base of the fort came to an end.

    We got off the bus and started walking right away. Lots of rain water was flowing from the road, shoes were on the feet but it was always wet from the inside. All the water that was flowing from the road came down from the hill above. The water was so fast that it was difficult to keep our balance. We crossed the stream holding each other's hands. Marched from the base of the fort to the head. An atmosphere was created that was very pleasant, pleasing to the mind, enhancing our energy, positivity. I was walking on foot, walking on dirt and mud ....! It was raining and the sky was clear. In the next few moments, clouds of water would return and it would start raining so that nothing could be seen in front of them.

    It started raining so hard that water started pouring down from the top of the hill again. The water used to have a color that would leave a full pimp of tea. While climbing, we were experiencing the fun of this rainy season of nature. The clouds coming down, Sinhagad head is also covered in full clouds, greenery visible in the distance, backwaters of Khadakwasla dam, trees spread on the way to climb, vines, birds flying freely in the sky, the sound of falling rain and small waterfalls rushing down, all indescribable !!!! In the company of all this, the fort was climbed in less time than usual. I don't know what heaven is like ..... but to experience this is heavenly bliss !!!

    Now we were both in full cloud ..... because Sinhagad was surrounded by clouds. It was visible up to 3 feet. We came to the fort through the Pune gate to have tea directly with our aunts !!!! If you order tea, it's true ... but I couldn't hold a cup of tea in my hand !!! One was very wet, the wind was strong ..... so it was very cold. The fingers of the hand were gone ...... I sat near the stove, somehow warmed my hands and started drinking tea. But the cup in his hand was not fixed in one place. The hands were trembling so much due to the cold in the body that half of the tea was spilling on the hands .... However, due to the cold, the click did not sit on anything, on the contrary, due to spilling the tea on the hands, the hands became hot and the next cup of tea came.

    It was a little hot with tea, so we came out of the hut to hit the fort again. Kondhaneshwar took darshan of Mahadev, took darshan of Balekilla. I never went to the fort and never returned without visiting these two holy places. There is no entrance to the temple of this Mahadev, so one has to greet from outside. Every time we go there, the thought comes to our mind that some day our kings may have visited here! Their feet may have been in this temple! When I join hands with Mahadev, my mind unknowingly communicates with the atmosphere of that time.

    As far as Balekilla is concerned, they do not consider the fort to be Sir unless he is Sir. Nusta Balekilla can be fought and the fort can be conquered on its strength. Therefore, I don't think I came to Sinhagad without coming to this part of the fort.

    Next we came close to Tanaji Kadya in the rain. As soon as it started raining. Now we were going to go from Tanaji Kada to Kalavantin Buruj (wind point) and return immediately. But he realized in his day that there is a big difference between thinking in mind and taking action.

    The distance from Tanaji Kada to Kalavantin Buruj is about 10 minutes. But it was raining heavily that day, and the wind was blowing hard. These two tested us and saw our fertility. The wind was not letting us take a step forward, but we ignited jealousy and held each other's hands tightly so that we could go ahead .... He took a step forward .... Then I took a step forward ... Passed in 40 minutes. Despite all the wind, we came to the bastion ...... Now we had to stand on the wall of the bastion .... But the wind was so strong that it was not possible We, however, stood facing the valley. The wind from the valley below was blowing in our face, as if it was raining from above; But even the falling water was flying back up without falling due to the wind. (Say the reverse waterfall ...)

    This snow was giving joy to the mind. Not stopping there for long, we finally got out of there and descended the fort.

    This is such an experience of Sinhagad rain !!!!!! Such experiences give us a lot, it is not possible to talk about it every time. But it feels deep inside, it works with us constantly. I have visited the fort many times just to get wet in the rain.

    I once had a chance to show Baba the fort in the rain. We went by car ..... but the road was so crowded that we parked the car on the side of the road and went straight 3-4 km on foot. Baba showed the whole fort, introduced my man. He was very tired when he came back. But one sentence said ...

"I really understand why you are going today !!! ...... Go on like this ... but be careful ..!

4 comments:

  1. Very good experience written about as a treaker and lover of Sinhagad. In best word you have mentioned your experiences about your visit at different different time. All the best. Keep going on. Awaiting for your another experience to read.

    ReplyDelete
  2. व्हा..., मस्त लेखन केले आहे....

    ReplyDelete
  3. वा ..उत्तम.. आज सिंहगड ची वारी वाचायला मिळाली..👍👌

    ReplyDelete

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले