"माझे सिंहगड प्रेम भाग १"
नावात बहुतेक विषय समजला असेलच. मी पहिल्यांदा सिंहगड सातवी मध्ये
होतो तेव्हा पाहिला होता. आता त्याला खूप वर्ष झाली होती, पुण्यात आल्यापासून मात्र सिंहगड भेट व्हायला बरेच दिवस गेले.एक
दिवस शाखेत विषय झाला की आपण सिंहगडाला जाऊ, पण तो रद्द झाला आणि माझा हिरमोड झाला. पण मनात सिंहगड जायचे
ठरवलेच होते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी
भल्या पहाटे हॉस्टेल वरून सायकल
काढली आणि सिंहगडाची वाट धरली, ती माझी ( पुण्यातली
) पहिली सिंहगड वारी होती.
 |
| माझा घोडा |
मोठ्या उत्साहात
मी एकटाच निघालो होतो, त्यावेळी सिंहगडचा रस्ता पण नीट
माहीत नव्हता, विचारत विचारत पायथा गाठला. पायथ्याला गड चढायला जिथून सुरू होते तिथे नतमस्तक झालो आणि
गड चढायला सुरुवात करणार.......त्याचवेळी गड चढत एका आजोबांनी मला विचारले
"काय रे पहिलीच वेळ का?"
" हो आजोबा"
"छान!, चालू दे" असे म्हणून शुभेच्छा दिल्या आणि ते निघून गेले.
आजोबांच्या रूपांत मला गडाच्या वतीने शुभेच्छा मिळाल्या असे वाटून गेले.
गड चढून वर आलो
आणि पहिला थांब्यावर म्हणजे 'पुणे दरवाजा' जवळच्या पायरीवर विसावलो. तिथे मस्त लिंबू सरबत प्यायलो. येथे पण
माझे माणसं जोडण्याचे टेक्निक कामी आले, त्यावेळेपासून ते सरबत विक्री करणारे काका माझे कायमचे मित्र झाले
आहेत.
आज पर्यंत मी खूप वेळा गडावर गेलो
आहे, त्याची संख्या पण नीटशी आठवत नाही, पण प्रत्येक वेळेला 'सिंहगड' मला नव्याने कळलाय. संपूर्ण गड
फिरून झाला,तरी मन भरले नाही. शेवटी परत निघावे, असे ठरवून परतीची वाट धरली.
 |
| पुणे दरवाजा दोन |
खरं तर सिंहगड हे
माझ्यासाठी श्रद्धा स्थान आहे. परतीच्या वाटेवर मी कधीपण गडाकडे पाठ वळवून पाहत
नाही, माहीत नाही !!!!! माझ्यात ती
हिम्मतच नाही, माझे आपोआप डोळे भरून येतात. नंतर
एके दिवशी आम्ही २-३ मित्र रात्री गडावर जाण्याची तयारी करत होतो, त्यासाठी रात्री शेवटच्या PMT ने आम्ही जाणार होतो. मेसच्या काकूंकडून रात्रीचा डब्बा घेऊन गडावर
मुक्काम करायचा विचार होता त्यासाठी काकूंकडे डब्बा घ्यायला मेस मधे आलो तर
त्यांचा मुलगा (तेव्हा तो ६ वी मध्ये होता) माझ्या मागे लागला की मला पण घेऊन चला.
आधीच आम्ही
पहिल्यांदा रात्री गडावर जावून मुक्काम करणार होतो, त्यात ह्या लहान मुलाला कसे घेऊन जावे असा प्रश्न मनात होता? पण काकूंचा आमच्यावर खूप विश्वास होता,
"अहो जरी काही संकट आले तरी तुम्ही माझ्या
मुलाला संकटात घालणार नाहीत आणि त्यात तीन शाखेचे शिक्षक असताना मी कशाला
घाबरु." असा विश्वास त्यांनी दिला. त्यांच्या ह्या शब्दामुळे आमचा पण
आत्मविश्वास वाढला आणि आम्ही मार्गस्थ झालो.
रात्री गड
चढण्याचा अनुभव खूप साहसाचा होता. एखादा काजवा मध्येच येऊन आमचा फोटो क्लिक करून
जात होता. रातकिड्यांची संगीताची साथ सुरू होतीच.एका विजेरीच्या प्रकाशात आम्ही गड
चढत होतो. गडावर आलो आणि एका झोपडीत जेवण केले, आज तागायत त्याच झोपडीतील 'गुरव मावशी' यांच्या कडे जेवण करतो आम्ही.
 |
| कायम उब देणारी,गडावरची शेकोटी |
जेवण झाल्यावर
लाकड,काटक्या गोळा करून शेकोटीच्या गर्मीत बऱ्याच गप्पा मारल्या,' सिंहगड ' किती घटनांचा साक्षीदार आहे ...याची चर्चा केली, आमच्या सोबत असणाऱ्या बाल मावळ्याला गडाचा इतिहास सांगितला...! थोड्या
वेळाने गडावर जोरदार वारा सुटला आणि त्यामुळे थोडी थंडी वाजायला लागली. पण आम्ही
अंथरूण पांघरूण घेऊन गेलो होतो, खाली वृत्तपत्र
टाकले आणि त्यावर अंथरूण घालून झोपायची तयारी केली. झोपताना ही माझ्या मनात विचार सुरूच होते..कि....रात्रीचा मुक्काम
! तो ही गडावर .....! स्वतःच्या साहसाचे कौतुक वाटत होते......वगैरे, वगैरे. मला झोप लागणार.... तितक्यात कसला तरी आवाज यायला लागला.
मनात शंका यायला लागली, वाटलं..... अनपेक्षित पाहुण्यांची
भेट (साप, विंचू इ.) होते की काय? आणि मी हळूच पांघरूण वर करून पाहिलं तर एक प्लॅस्टिकची पिशवी, फडफडत होती, त्याचा आवाज येत होता आणि मी निवांत
झालो. पहिला गडावरचा असा मुक्काम आम्हाला भरपूर काही देऊन गेला.
सिंहगडला मी
बरेचदा अनेक साहसी कामं केलेली आहेत. पूर्वी दर वेळी, सिंहगडाला जाऊन आलो की मग घरी सांगायचो. जेव्हा मोबाईल आले तेव्हा
रविवारी माझा फोन लागला नाही, की बाबांना समजायचे...... 'पोरगा गडावर गेला वाटतं ', रात्री घरी फोन झाला की ते म्हणायचे,
' सकाळी तुझा फोन लगला नाही!! तेव्हा
मला वाटलचं हा नक्की गडावर गेला म्हणून....' माझे हे सिंहगड प्रेम त्यांना
सुद्धा माहीत होते.
 |
| सिंहगड दर्शन |
मला प्रत्येक
वेळी गड वेगळाच भासत आलेला आहे, जणू काही तो
आजोबा होऊन मला मायेने, प्रेमाने आपल्या खांद्यावर उचलून
घेतो. माझ्या बरोबर बोलतो, मला कुरवाळतो, मला रागावतो अशीच माझी समजूत आहे. प्रत्येक सिंहगड वारी मध्ये मी
गडाचा कोपरा न कोपरा धुंडाळून काढला आहे तरी आज ही सिंहगड वर गेलो तर अजून काहीतरी
वेगळं पाहायला मिळेल असा ठाम विश्वास आहे माझा. असाच शोध सुरू
असताना, मला चोर दरवाज्या विषयी कळले.( आज ' तानाजी' सिनेमा मुळे याची बरीच चर्चा झाली).
खरंतर ही गडावरील पाणी वाहून जाईल अशी जागा
आहे. इतिहासाची आवड असल्यामुळे त्याचा अभ्यास सुरू केला. याच अभ्यासामुळे त्या दरवाज्याची जागा,रचना,ठिकाण पाहून मला खात्री पटली की हा नक्की चोर दरवाजा आहे. कारण तो
गडाबाहेर ज्या जागी जातो तिथे एक मोठा कातळ आहे, बाहेरून हा कातळ चढून गडात येणे शक्य नाही.
ती जागा मला सापडल्यावर माझं मन मला
स्वस्थ बसू देईना. त्या चोर दरवाज्याचा शोध घेण्यासाठी मी कमीत कमीत ८ - १० वेळा गडावर गेलो होतो. हा सगळा अभ्यास पूर्ण झाला.
आता
प्रत्यक्ष कृती ची वेळ आली म्हणजे प्रत्यक्ष चोर दरवाज्यापर्यंत जाऊन यायचे होते.
मी रूमवर कोणाला या मोहिमे बाबत बोललो नाही. एके दिवशी रात्री २.३० ला सायकल काढली
आणि निघालो..... सोबत एक पाठीवर बॅग, पाण्याची बाटली आणि पायात साधी चामडी चप्पल, बसssss!!!
 |
| नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे स्मारक |
गडावर पोंचलो, तेव्हा वीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारका जवळ काही हौशी
तरुण-तरुणी होते, जे अतिशय चुकीचा इतिहास एकमेकांना
सांगत होते. मला राहवलं नाही, त्यांना खरा
इतिहास सांगून मी माझी मोहीम सुरू केली......!
चोर दरवाजा दरीत
जिथे मिळतो तेथे एक पिंपळाचे झाड आहे, त्याला खूण म्हणून लाल पिशवी बांधली आणि कल्याण दरवाज्यातून दरीत
प्रवेश केला. एक एक कपार, एक एक कडा,एक एक डोंगराचा उंचवटा ओलांडून पुढे पुढे सरकत होतो. मी साधारण गडाच्या २५ % भागातून पुढे
जात होतो आणि माझ्या खाली ७५% दरी होती........!
हा प्रवास सुरू
झाला तेव्हा डोक्यावर ऊन झाले होते, एकच पाण्याची बाटली होती ती पण पाणी पिऊन रिकामी झाली होती. पोटात
पण काही नव्हते,तरी पुढे सरकत होतो आणि पाहतो तर
काय? किमान १० ते १५ मधमाश्यांचे मोहळ
मला दिसले.यातील चुकून एखादे जरी उठले तर आपली जैत रे जैत सारखी हालत होईल हा विचार करून मी दरीत अजून खाली उतरलो.जेणे करून ते मोहळे आणि माझे अंतर वाढेल,असे साहस करताना आपले डोके खूप शांत ठेवावे लागते तेव्हाच अडचणीतून
बाहेर पडायला नवनवीन गोष्टी सुचतात.
 |
| मोहळ |
मी आणखीन पुढे सरकलो...तर माझ्या लक्षात आले की खुणेसाठी जी पिशवी बांधली होती
तिच्या मी बऱ्याच पुढे आलो. आता तिथून मागे फिरून वरचे चढण हे फक्त दोर असेल तर
आणि तरच चढू शकणार होतो. माझा हिरमोड झाला हार पत्करून मागे फिरलो. मागे येत होतो तेव्हा मनात हार, चिडचिड, वैताग अशा भावना होत्या. अपयशाचा विचार
करताना माझा मनावरचा ताबा सुटला, लक्ष विचलित झाले
आणि एका क्षणाला कातळ पार करता करता एक जागा अशी आली की शरीराला हेलकावा देऊन
डाव्या हाताने पकड करावी लागणार अशी ती जागा होती! मी दरीत पोटाचा आधार घेऊन कसा
बसा उभा होतो, त्यात पायातील चप्पल काढून बॅगेत
टाकली व त्या बिकट जागेवर हे दिव्य केले. शरीराला हेलकवा देऊन डावा हात पकडीसाठी
टाकला....आणि....आणि....डाव्या हाताची पकड घेतली पण उजवा हात सोडता सोडता दोन्ही
हात सुटले...........!!! आणि ....मी सरळ
खाली सरकलो ते थेट १०-१५ फूट .....नशीब मला एका जागी पकड घट्ट करता आली आणि मी एका
कपारीत अडकलो फक्त तोल जाऊन पाठीवर पडलो नाही बसsss.!
मी दरीत जेव्हा हे दिव्य करत होतो, तेव्हा काही मुलांनी कल्याण दरवाजाच्या बाजूने फक्त दरीत माती
उडालेली पाहिलेले होते पण ते मला पाहू शकले नाहीत. त्यांची नजर मात्र तिथे टिकून
असावी. अत्यंत दुःखी,कष्टी होऊन परत कल्याण दरवाजा गाठला
आणि अपयशामुळे अश्रू अनावर झाले.
तेव्हा त्याचं मुलांनी माझं सांत्वन केले. पण मनास प्रचंड खिन्नता आली आणि आपली
हार झाली ही भावना नंतर बरेच दिवस टोचत राहिली.
हे सगळे पार करून
रूमवर आलो, तेव्हा पाहिले तर माझ्या हातात,बोटांच्या मध्ये अनेक बारीक बारीक काटे गेले होते, जे मी पुढे काही दिवस काढत होतो.वरील दिव्य मी कोणत्या भरात केले
माहित नाही. आज पण मागे वळून पाहिले की वाटते सिंहगड आपल्याला पूर्ण कळायला हवा
ह्या आठ्ठहासापोटी आणि सिंहगड वरील प्रेमापोटी मी हे धाडस करू शकलो. पण हे धाडस करताना मी जरा आयोजन करण्यात चूक केली. ह्यातून धडा
घेऊन पुढच्या वेळी सतर्क राहिलो.
(क्रमशः)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"My Sinhagad Love Part 1"
The name must have understood most of the topics. I first saw Sinhagad when I was in seventh grade. It had been many years since he came to Pune, but it took him many days to visit Sinhagad. But I had decided to go to Sinhagad, so the next day
Good morning, I took a bicycle from the hostel and waited for Sinhagad, it was my (Pune's) first Sinhagad Wari.
 |
| Pune Darwaja 1 |
I had left alone with great enthusiasm. At that time, I did not know the road to Sinhagad, but I reached the base by asking. I bowed at the foot of the fort where it starts to climb and will start climbing the fort ....... At the same time a grandfather asked me while climbing the fort
"Are you come first time?"
"Yes grandpa"
"Nice !, let's go," he said, and they left. As a grandfather, I felt that I had received good wishes from the fort.
We climbed up the fort and stopped at the first stop, the 'Pune Darwaza'. We drank a lot of lemon juice there. Here, too, the technique of connecting my men came in handy.
Till today, I have visited the fort many times, I don't remember the exact number, but every time I came to know 'Sinhagad' anew. The whole fort was turned around, but the mind was not full. Finally, he decided to go back and waited for his return.
In fact, Sinhagad is a place of faith for me. On the way back, I never look back at the fort, I don't know !!!!! I don't have that courage, my eyes fill up automatically.
Then one day 2-3 of us friends were preparing to go to the fort at night, for which we were going to go by the last PMT at night. I was planning to take a night box from Mess's uncle and stay at the fort, so I came to Mess to take a box to my uncle, but his son (when he was in 6th grade) followed me and asked me to take him too.
We were already going to stay at the fort for the first time at night, the question was how to take this little boy? But my uncle had a lot of faith in us,
"Hey, even if there is a crisis, you won't put my child in trouble, and why should I be afraid when there are three branch teachers in it." He gave such faith. His words boosted our confidence and we were on our way.
The experience of climbing the fort at night was very adventurous. A firefly was coming in and clicking our photo. We were climbing the fort in the light of a flashlight. We came to the fort and had a meal in a hut. Today we have a meal at 'Gurav Mavshi' in the same hut.
After the meal, they gathered wood and chopsticks and chatted a lot in the heat of the fire.
Discussed how many incidents 'Sinhagad' has witnessed, told the history of the fort to Bal Mavalya who was with us ...! After a while a strong wind blew on the fort and it started getting a little cold. But we took the bed cover, put the newspaper downstairs and put the bed on it and got ready for bed. While sleeping, I kept thinking in my mind..that .... overnight stay! He is on the fort .....! Appreciating his own adventures ...... etc, etcetera. I was about to fall asleep .... Suddenly something started coming. Doubts began to arise in my mind, I thought ..... did unexpected visitors meet (snakes, scorpions etc.) or not? And I looked up at the cover, and there was a plastic bag, fluttering, its sound coming, and I fell asleep. The first stop at the fort gave us a lot.
I have done many adventures in Sinhagad many times. In the past, every time we came to Sinhagad, we would tell him at home. When the mobile came, my phone did not ring on Sunday, that Baba wanted to understand ...... 'I think Porga has gone to the fort', when he called home at night, he used to say,
'Your phone didn't ring in the morning !! So I thought it was because he went to the fort ....
He also knew my love for Sinhagad. The fort seems different to me every time, as if he becomes my grandfather and carries me on his shoulders with love and affection. My understanding is that he speaks to me, caresses me, makes me angry. In every Sinhagad Wari, I have searched every nook and corner of the fort, but I firmly believe that if we go to Sinhagad today, we will see something different.
While searching like this, I came to know about the thief's door. In fact, it is a place where water can be carried away from the fort.
He started his studies because he was interested in history. This study showed me the location, design, and location of the door, and I was convinced that it was a thief's door. Because there is a big rock wherever he goes outside the fort, it is not possible to climb the rock from outside and come to the fort.
When I found that place, my mind would not let me rest. I had gone to the fort at least 8-10 times to find that burglar door. All this study was completed.
Now it was time for action, so the real thief had to go to the door. I didn’t talk to anyone in the room about this campaign. One day at 2.30 pm I took out my bicycle and left ..... along with a backpack, water bottle and simple leather slippers on my feet, just !!!
When we reached the fort, there were some amateur youths near the monument of Veer Tanaji Malusare, who were telling each other a very wrong history.
I didn't stay, I started my campaign by telling them the true history ......!
There is a pipal tree where the thief finds the door in the valley, tied a red bag to it as a sign and entered the valley through the Kalyan door. One by one, one by one, one by one, one by one, one by one, one by one, one by one. I was passing through 25% of the fort and 75% of the valley was below me ........!
When this journey started, there was only wool on her head, she had only one bottle of water but she was empty after drinking water. There was nothing in the stomach, but what if he was moving forward and looking? I saw at least 10 to 15 bee hives. I went further down the valley thinking that even if one of them got up by mistake, it would move like olives. There are new things to do to get out of trouble.
I moved further ... then I realized that I came a long way from the bag I had tied for the trail. From now on, I would be able to climb back and forth only if it was a rope. I was overwhelmed and turned around.
Feeling we have 'Run out of gas' emotionally.
Thinking of failure, I lost control of my mind, my attention was distracted, and after a moment of crossing the cliff, there was a place where I had to shake my body and hold it with my left hand! As I was standing on my stomach in the valley, I took off my slippers and put them in a bag and made it divine in that difficult place. He put his left hand to hold the body by shaking it .... and .... and .... grabbed the left hand but let go of the right hand and both hands escaped ........... !!! And .... I moved straight down to 10-15 feet straight ..... Luckily I was able to tighten my grip in one place and I got stuck in a cupboard, I just lost my balance and didn't fall on my back.
When I was doing this Divya in the valley, some of the children had just seen the soil blown into the valley by the side of Kalyan Darwaza but they could not see me. But their eyes should be fixed on it. Extremely sad, suffering, he reached the door of welfare and tears were shed due to failure. Then his children comforted me. But the feeling of great sadness and defeat continued for many days.
After crossing all this, I came to the room and saw that there were many fine thorns in my hands and fingers, which I was removing for a few days. Looking back today, I think I was able to do this because of the desire to know Sinhagad and the love for Sinhagad. But in doing so, I made a mistake in organizing. Taking a lesson from this, we remained vigilant next time.
(Respectively)
Apratim ..hats off to you and your love for sinhgad..👌👍
ReplyDeleteव्वा! आठवले जुने दिवस
ReplyDeleteसिंहगड ... खरोखरच श्रद्धास्थान ... लेखनशैली जबरदस्त ... वाचताना अंगावर काटा आला🙏
ReplyDeleteअप्रतिम... लेखन आहे 👌🏻
ReplyDeleteछान
ReplyDeleteकाय काय कारनामे केलेस बे 😄
ReplyDeleteहे सांगितले होतेस एकदा तु.. पण हे वाचल्यानंतर काटा आला रे अंगावर !!!
खुप धाडसी अहात.
ReplyDelete