Sunday, December 28, 2025

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.
             खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण त्या निम्मित बराच अभ्यास,वाचन करता आले. अनेक व्यक्तींचे भाषणे, बौद्धिक देखील ऐकले. 
             आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळेच हिंदू धर्म टिकला आणि वाढला हे आपण नक्कीच मानतो. तसेच पंजाब, राजस्थान, दिल्ली येथे देखील गुरुतेगबहादुर, गुरू गोविंद सिंह जी आणि त्यांच्या चार मुलांच्या शौर्य आणि बलिदाना मुळे हिंदू धर्म टिकला. हे सर्व प्रसंग, त्यावेळचं राजकारण, धर्मकारण नक्कीच सर्व इतिहास वाचण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. 
           अभ्यासात एक संदर्भ मिळाला तो म्हणजे सन १६६६ मध्ये शिवाजी महाराज हे आग्र्याच्या कैदेतून सुटले आणि त्याच वर्षात म्हणजे सन १६६६ मध्ये गुरु गोविंद जी यांचा जन्म झाला. कदाचित पुढील आयुष्यात या दोन महान व्यक्तीचा परिचय झाला होता का? काही पत्र व्यवहार, किंवा या दोघांना एकमेकांची काही माहिती असेल का? असे काही प्रश्न उपस्थित झाले. इतिहास अभ्यासकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.
        धर्माच्या नावावर हिंदू लोकांचे  छळ,हाल,अमानुष हत्या, मंदिरे,मुर्त्या फोडणे, बळजबरीने धर्मांतर करणे हे सर्व बाबर, जहांगीर, औरंगजेब यांनी केले हा इतिहास मनाला वेदना देणारा तर आहेच पण सर्व गुरुंच्या शौर्य आणि त्यागातून कायम प्रेरणा देणारा देखील आहे. 
       गुरुअर्जुन देव, गुरु तेगबहादुर, गुरु गोविंद सिंह जी, त्यांचे चार बाल वीर अजित सिंह, जुझार सिंह, जोरावर सिंह, फत्तेह सिंह. माता गुजरीदेवी यांचा धर्मासाठीचा त्याग खूप मोठा आहे..
         १४ व्या शतकात सुरू झालेली ही परंपरा आज पर्यंत म्हणजे २०२५ सालात देखील पहायला मिळते. 
फैजपूर येथील छोटा दहा वर्षांचा मुलगा श्रवण सिंह याने तर कमालच केली. ऑपरेशन सिन्दुर सुरू असताना त्याने आपल्या गावात आलेल्या भारतीय सैनिकांना चहा, ताक, लस्सी देऊन त्यांची सेवा केली..याचा कोणताही मोबदला देखील घेतला आहे..ही राष्ट्र भक्ती इतकी आहे की त्याने आपण मोठे होईन सैन्य अधिकारी होणार आहोत हेच ध्येय नक्की केले आहे.
म्हणूनच या परंपरेतील सर्व वीरांना विनम्र अभिवादन🙏🏻🚩

निखिल देविदास वझे 
आवडल्यास लाइक आणि शेअर करावे

Sunday, December 14, 2025

पुणे पुस्तक महोत्सव २०२५



 मागील दोन वर्षांपासून सुरू झालेल्या **पुणे पुस्तक महोत्सवाचे** हे यंदाचे तिसरे वर्ष 📚

आज दिनांक १४/१२/२५ रोजी सकाळपासूनच—अगदी **१०.३० वाजता**—सपत्नीक **फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारात** दाखल झालो.

पुस्तकांच्या आकाराच्या भव्य कमानीतून, जणू **मराठी भाषेच्या अभेद्य किल्ल्यात** प्रवेश केल्यासारखे वाटले 🏰📖

प्रवेश करताच डाव्या-उजव्या बाजूला सुंदर अशा विविध **कलाकृती**, आणि डोक्यावर अप्रतिम कलाकुसर केलेल्या **छत्र्या, माळा व अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे असलेले छत** पाहून मन प्रसन्न झाले ✨🎨


पुढे गेल्यावर उजव्या बाजूला **भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त** आयोजित केलेले आदिवासी समाजाचे भव्य प्रदर्शन पाहायला मिळाले 🌿. त्यांची **बोलीभाषा, दैनंदिन वस्तू, घरे, वर्णमाला** यांचे अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रभावी सादरीकरण होते. ते सर्व वाचण्यात आणि पाहण्यात आमचा बराच वेळ गेला. नेहमीप्रमाणे बायकोने आपला अभिप्राय लिहिला 📝 आणि मग आम्ही मुख्य पुस्तक प्रदर्शनाकडे वळलो.

तेथे उजव्या हाताला **बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’** या पुस्तकाचा स्टॉल होता. नोंदणी करून ते पुस्तक **भेट स्वरूपात** स्वीकारले 📘. यावर्षी **‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षाचे** औचित्य असल्याने हे पुस्तक मिळणे खूपच आनंददायी ठरले 🇮🇳

गेली कित्येक वर्षे स्वतः पुस्तक विक्री करताना अशा प्रदर्शनात स्टॉल असतो, तेव्हा इतर स्टॉल पाहणेही होत नाही. यावर्षी ती जबाबदारी नसल्यामुळे मात्र **फक्त आणि फक्त पुस्तके पाहणे, जुने प्रकाशक, पुस्तक व्यावसायिक मित्रांना भेटणे**—हाच विचार मनात होता 😊

इतक्या मुक्तपणे प्रदर्शन पाहिले की **तीन कधी वाजले ते समजलेच नाही** ⏳

**राजहंस, रोहन, मनोविकास, विश्वकर्मा, डायमंड, माय मिरर, विवेकानंद, विवेक, पद्मगंधा, इंद्रायणी साहित्य, छत्रपती सेवा प्रतिष्ठान NBT, गमभन, प्रसाद, रायगड स्मारक, भारत इतिहास मंडळ, रामकृष्ण मठ, नाविन्य प्रकाशन, दिलीपराज** अशा कितीतरी प्रकाशन संस्था व पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल पाहिले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या 💭 तसेच काही मान्यवर देखील भेटले अच्युत गोडबोले,अनय जोगळेकर( MH 48 यूट्यूब चॅनेल), अरविंद गोखले सर, मनोज अंबिके सर, मुख्य संयोजक श्री राजेश जी पांडे

खरंच, सर्व वाचकांनी या प्रत्येक स्टॉलवर जाऊन पुस्तके पाहिलीच पाहिजेत आणि शक्य असेल तेव्हा ती विकतही घेतली पाहिजेत 🙏

एक स्टॉल उभा करण्यामागे प्रकाशक आणि विक्रेते खूप मेहनत घेत असतात. त्यांची माफक अपेक्षा इतकीच असते की वाचकांनी **लावलेला डिस्प्ले पाहावा आणि पुस्तकांशी संवाद साधावा** 📚❤️

या पुस्तक महोत्सवात **लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत** सगळ्यांसाठी भरपूर काही आहे 👶👨‍🦳

म्हणूनच सर्वांनी आवर्जून भेट द्यावी.

फक्त एक छोटी **विनंती**—

पुस्तकांचे दोन मोठे दालन आहेत. त्यापैकी **E, F, G, H सिरीजमधील दुसऱ्या मांडवातील स्टॉल** नक्की पाहा 👀

बहुधा पहिल्या मांडवातील **A, B, C, D सिरीज** पाहून अनेक जण थकून परत जाताना दिसले.

पण दोन्ही मांडव पाहिल्याशिवाय अनेक **विषय, लेखक, विचारवंत आणि प्रकाशन संस्था** आपल्या लक्षात येणार नाहीत.

पूर्ण दिवस काढून जाता आला तर उत्तमच 🌞

डोक्याची **वैचारिक भूक भागवणारी** अनेक दालने आहेत, तसेच पोटाची भूक भागवण्यासाठीही खाद्यपदार्थाची भरपूर स्टॉल उपलब्ध आहेत 🍽️😄


**मग तुम्ही कधी जाताय?** 🤔📚


ता. क.

आज आम्ही घेतलेली पुस्तके **फोटोसोबत जोडली आहेत*📸📖




वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले