Friday, April 30, 2021

"...पण इथं तर जीवनच मिळाले/"... but here's life !!!"

   

"...पण इथं तर जीवनच मिळाले!!!"

        मालवणमध्ये येई येई पर्यंत सकाळचे अकरा वाजत आले होते. अजून मला गाडीतून पूर्ण सामान बाहेर काढायचे राहिलेले होते. 'नगर वाचन मंदिरा'च्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये दोन दिवसांनी नेहमी प्रमाणे पुस्तक प्रदर्शन सुरू होणार होते, त्याचे अजून बरेच काम बाकी होते.

                        

 "जोशी काका, टेबल किती वाजेपर्यंत देताय?"
 मी घामाने निधळलेल्या अवस्थेतच कानाला मोबाईल लावला,
 "आले का तुम्ही!!!"
 "हो, मग काय? तुम्हाला म्हटलं होते, मी आज येणार म्हणून!!!" ( जरा रागातच बोललो )
 "पाठवतो पाठवतो लगेच, माझो टेम्पोवालोsss रेती भरता. तो रोकामो झालो, की धाडता त्याकाsss, येईल मरे   लवकर"
 "बरं बरं पाठवा, काका लवकर...."

    साधारण पंधरा ते वीस पुस्तकांच्या पिशव्या,  गठ्ठे , बॉक्स आणि  इतर सामान 'वन Man आर्मी' प्रमाणे पहिल्या मजल्यावर हळू हळू  नेले.  काही वेळ तसाच बसलो, तितक्यात टेम्पोवाला सदा खालून माला आवाज देत आला.

" काय दादा नूsss बराय माsss, अलाव काय? अन् टेबला?"
"अरे, आणायची आहेत न!!!....जा बरं पटकन जोशी काकांकडे...."
      
    अनेक वर्षांपासूनची कोकणात हक्काची माणसं जोडलेली आहेत. हल्ली फक्त फोन वरून यंत्रणा उभी राहते. पूर्वी जरा त्रास झाला. पण आता गाडी रुळली आहे, तरी देखील आज काय झाले होते माहीत नाही ??? सगळ्याच गोष्टीला उशीर होत होता. तरी बरं उद्याचा एक दिवस तयारीसाठी रिकामा ठेवला होता...

    आमची नेहमीची जाड, वजनदार लाकडी अगदी खानदानी म्हणा हवं तर, अशी टेबलं टेम्पोतून सदा घेऊन आला. त्याने खालूनच मला आवाज दिला.

" दादाss, आज आपल्याकच वर नेवूची लागताs, माका कोण सोबतीक नाही गावलोsss" 
"बरंsss चलाss...."

    भर उन्हात आणि त्यात मालवणच्या दमट वातावरणात, ते जाड टेबलं त्या अरुंद जिन्यावरून पहिल्या मजल्यावर नेताना माझे प्राण अगदी कंठाशी आले. पण सदा अगदी निवांत होता, शेवटी त्याचे हे रोजचे अंग मेहनतीचे काम होते.

"सदा, दमत कसा नाहीस रे...?"
"माका रोजचा असाss हे, काय होत नाय मरेss"( ' मरे ' म्हणजे जसा विदर्भ, मराठवाड्यात ' बे ' तसाच भाषेला चव आणणारा शब्द आहे )
        
साहित्य
    हॉलमध्ये पुस्तकांच्या पिशव्या, पुस्तकांचे गठ्ठे, काही बॉक्स, इतर सजावटीचे सामान असे सगळे सामान आले आणि महत्वाचे म्हणजे  सगळे टेबलं आले. ते वर घेऊन येताना  आम्ही दोघे पण घामाने चिंब भिजलो. लगेच झक्कास पैकी पंखा लावला आणि हॉल मध्येच निर्लज्जपणे उघडा झालो, घामाने भिजलेला टी शर्ट तिथेच टेबलावर वाळवत टाकला. इतके श्रम आणि तेही इतक्या उन्हात केल्यामुळे घसा अगदी कोरडा पडला.

"दादा, येताव....भाडे हा माकाss" सदा उठला
"सदा, ती पाण्याची बाटली दे रे जाता जाता....."

   त्याच्या काडून पाण्याची बाटली हातात घेतच, त्याच्या कामाचा मोबदला दिला आणि डायरेक्ट पाण्याची बाटली तोंडाला लावली, गटागटा पाणी पिले. त्या गार पाण्याने जरा जीव शांत झाला.

    अनेक वर्ष कोकणात जाऊन जाऊन आता मालवणी भाषेची गोडी, आत्मीयता आणि मज्जा कळायला लागली आहे. काही विशेष शब्द ( म्हणजे अगदी ठेवणीतले ) सोडले तर बऱ्यापैकी बोली आता समजायला लागलो आहे, सदा काय किंवा जोशी काका काय, बरेच लोक माझ्याशी मालवणीत बोलायचे. 

    पोटात कावळे म्हणा नाहीतर संपूर्ण जंगल म्हणा ओरडायला लागले होते. पण अशा घामेजलेल्या शरीराने जेवायला जावे हे योग्य वाटेना. मग काय लॉजवर आलो, तिथे फोनवरून आधीच सूचना दिलेली होती.                       जेमतेम  दहा बाय दहाची खोली, त्यात एकच खिडकी अन तीही रस्तावर उघडणारी....रूम मध्ये कछवा छापचा वास, कुठे  भिंतीवर मारलेल्या ढेकणांचे डाग, कळकट्ट शहाबादी फरशी अशा त्या रूममध्ये पाऊल टाकले. खरं तर विचार केला होता की जरा रूमवर आराम करावा आणि मग जेवायला बाहेर पडावे, पण हे सगळे पाहून विचार बदलला. खोलीतील कछवा छापचा वास जावा म्हणून खिडकी जरा उघडी केली, त्यामुळे खोलीत जरा उजेड आला. नाहीतर खोली अंधार करूनच बसलेली होती आणि नेमके बोंबलायला लाईट गेलेले. खरंतर हे नेहमीचेच लॉज पण नेमकी माझी नेहमीची रूम उपलब्ध नव्हती म्हणून या पाहुण्या खोलीत राहावे लागणार होते.

    घामाने निथळलेल्या शरीराला झक्कास गार पाण्याच्या अंघोळीने शीतलता मिळाली आणि लगेच जेवायला रुमच्या बाहेर पडलो. आता तीन वाजायला आले होते. भूक तर लागली होतीच, जवळच एक खानावळ दिसली. नेहमीच्या खानावळीत जाऊन जेवावे, इतका त्राण काही शरीरात शिल्लक नव्हता. यथेच्छ जेवून सरळ जोशी काकांकडे आलो...

"येऊ का काका?"
" या या, आज जरा उशीरच झाला बरं का!!..टेबलासाठी"
"ठीक!!! अजून एक दिवस बाकी आहे"
"जेवलात?"
"हो आताच झाले काका"
"यंदा किती दिवसss प्रदर्शन?"
"नेहमी प्रमाणे आठ दिवस. काका, तुमचे पैसे!!!"
"शेवटच्या दिवशी द्या कि"
"बरंss...या कधी तरी प्रदर्शनात भेटायला....."
"हो हो येईल की...दोन एक दिवस जरा देवगडला जाऊन येतयं मग येतो..."

    मालवणमध्ये आलो आणि समुद्र किनारा नाही पाहिला हे मुळी शक्यच नाही आणि मालवणचा धक्का माझ्या खूप जिव्हाळ्याचा आहे. एक अनुभव, घटना या धक्क्यावर फार पूर्वी घडली आहे. जीची आठवण मनात कायम आहे, पण असो नंतर केव्हा तरी बोलेन त्यावर. जेवण झाले पण रूमवर परत जावून आराम करण्यापेक्षा समुद्र किनारा- धक्का बरा, नाहीतरी आता पाच वाजयला आलेच होते. मग असाच फिरत फिरत किनारा गाठला. समुद्राच्या लाटा येत जात होत्या, दूरवर सिंधुदुर्ग किल्ला दिसत होता.

सिंधुदुर्ग किल्ला

        सूर्य आता अस्ताला जाणार होता. अनवाणी पायाने किनाऱ्यावरून फिरत होतो... मध्येच एखादी लाट पाय भिजवत होती, बहुदा हि वेळ ओहटीची असावी, कारण लाटा संथ गतीने पाय भिजवत होत्या.

    मावळतीच्या आकाशात विविध रंग फुटलेले होते, कुठे काही कोळी आपल्या लहान नावा काठावर आणत होते, कोणी आणलेल्या नावा झाकत होते, लहान पोरं पाण्यात मुक्तपणे खेळत होती, माझे मन मात्र जुन्या आठवणीत गुंतले होते. ती घटना अगदी काल परवा घडून गेल्याप्रमाणे एकदम ताजी भासत होती. त्याच विचारात मी धक्क्यापासून खूप लांब चालत आलो, अगदी मौनी महाराजांच्या मंदिराजवळ. आता सूर्य पूर्णपणे अथांग समुद्रात बुडाला. अंधारात परत जाणे शक्य नाही हे ध्यानात आल्यामुळे माघारी फिरलो.

    दुरून अस्पष्ट दिसणारा किल्ला पाहिला आणि एकदम डोळ्यात पाणी आले. कसे बसे मन आवरून निघालो!!!डोक्यात विचार, आठवणी  सुरूच होत्या

"आईsssगं, आss...." पायाला असह्य वेदना झाल्या....काय लागले.....?

    पाण्यातून जाताजाता तळपायाला काहीतरी जोरात टोचले, पण नेमक्या अंधारात काहीच दिसले नाही. एकदम पायातून रक्त आले आणि ते समुद्रात मिसळले. आता अंधाराने किनारा व्यापला होता, समुद्रातील नावांवरचे दिवे मात्र एकदम छान दिसत होते. 

                             

    मी ते पाहत पाहत तसेच हळू हळू चालत धक्का गाठला. धक्क्यावरील लाईटच्या खांबाजवळ टेकून, पायाच्या जखमेकडे पाहत होतो. तळपायाला जखम झाली होती,काही तरी जोरात टोचले होते....पण नेमके काय? हे काही केल्या लक्षात येत नव्हते.

"काय झालंsss मरे?" 
धक्क्यावरील  दुकानदार माणसाने दुकान बंद करत करत विचारले.
"काहीतरी टोचले आणि रक्त पण येत आहे..." मी जखम जरा गच्च दाबून धरत त्यांना सांगितले.
"अरे तुका, तो टोकदार शंख लागला, होताss नीट. काय काळजी करू नको मरे" ( मालवण मधील बरेच दुकानदार गिऱ्हाईक स्पेशल भाषा बोलतात म्हणजे मध्येच मालवणी,मध्येच मराठी तर कधी हिंदी पण ) तसाच हळू हळू  पाय टेकत लॉजवर आलो. अंधारातच खोलीचे दार उघडले तर मधमाश्यांचे मोहळ उठल्याप्रमाणे रूममध्ये सगळीकडे घोंगवणारा आवाज ऐकू आला. लाईटच बटण दाबले आणि पाहतो तर कायsss???

    लहान असताना संध्याकाळी मैदानात खेळायला गेलो की डोक्यावर डासांचे मोहळ यायचे,  मग आम्ही ते दुसऱ्या मित्रापर्यंत पळत जाऊन त्याच्या डोक्याला आपलं डोकं लावायचो आणि मग आपले डोकं रिकामं होऊन त्या मित्राच्या डोक्यावर ते डासांचे गोलाकार मोहळ यायचं. तसेच हे डासांचे मोहळच खोलीत आले होते.

    माझ्या दुपारच्या चुकीमुळे खिडकीतून ही सगळी सेना खोलीच्या आश्रयाला आली होती. आता पुढे काय??? आधीच काही तरी उपाय करायचे लक्षात आले नाही. मग पाहू, असा विचार करून ते सगळे तसेच सोडून, सरळ जेवायला गेलो. जेवण करून येताना खालच्या मेडिकलमधून काळे Hit ( सॉलिड उपाय) विकत आणले आणि संपूर्ण खोलीत अक्षरशः कोपरा न कोपरा फवारणी केली.

    आज पुस्तकांची मांडामांड करण्यासाठी लवकरच हॉलवर आलो. दुपारी चार पर्यंत सर्व तयारी पूर्ण झाली आणि मगच हॉलच्या बाहेर पडलो, एव्हाना सगळ्या मेस जेवणासाठी बंद झाल्या होता. मुख्य रस्तावर एक जुने हॉटेल होते. संपूर्ण वाड्यात बांधलेले लाकडी हॉटेल, लाकडी बाक टेबल, काचेच्या कपाटात ठेवलेले पदार्थ, आत मोठा भटारखाना, असे हे हॉटेल होते, तसे गिऱ्हाईक नव्हतेच, मी आपला पंखा पाहून टेबल निवडला.

"मालक जरा पंखा लावता का? मालक, काय हाss खायला ?"
"गरम भजी, उसळ पाव असा"
"कसली उसळ हा?"
"काळ्या वाट्याण्याची हाss"
"द्या माका, एक उसळ पाव ,नंतर चहा पण द्यावा."

    मी मोडक्या तोडक्या मालवणीत बोललो, त्यामुळे जरा सराव होतो. पोटात चार घास ढकलून बाजारात एक फेरफटका मारला, कुठे मासे, कोणी भाजीचे वाटे घेऊन बसलेल्या बायका, कपड्याचे दुकानं, कोकण मेवा विकणारे दुकानदार, पैश्याची घासाघीस करणारे पर्यटक असे वातावरण पाहून मजा येत होती. खरं तर मी पण येथे परकाच पण जरा रुळलेला... इतकाच काय तो फरक. त्यामुळे मी हे सगळं गावकरी किंवा मालवणी असल्यासारखा पाहत फिरत होतो.

    असाच फिरत फिरत आधी मौनी महाराज मंदिर आणि मग कालनिर्णयकार साळगावकरांच्या गणेश मंदिरा पर्यंत चालत गेलो. याच मौनी  महाराजांचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला. पूर्ण जांबा दगडात बांधलेलं मंदिर पहिले आणि याच जागेत कधी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले असतील असे वाटून गेले. साळगावकरांच्या गणेश मंदिरात जाऊन सरळ रूमवर परत आलो.

मौनी महाराज मंदिर

गणेश मंदिर

        मागच्या दोन दिवसात संपूर्ण मनाजोगती तयारी झाली. गावातील फेरफटका झाला आणि आज सकाळी बरोबर नवाला भव्य पुस्तक प्रदर्शन व विक्री सुरू झाली. आदल्या दिवशीच सर्व मांडणी पूर्ण झालेली होती त्यात संपूर्ण दिवस गेला. काही जुजबी गोष्टी बाकी होत्या त्या सकाळी हॉलवर लवकर येऊन पूर्ण केल्या. आज सकाळी रिक्षातून भोंगा ( एकदम खास शैलीत ) फिरायला सुरुवात झालेली होती. हे काका संध्याकाळ पर्यंत सर्व मालवण शहर आणि आजूबाजूच्या काही वाड्या येथे छान पैकी चौका चौकात, मंदिराबाहेर, बाजारपेठ येथे थांबून एकदम झक्कास आवाजात लोकांना पुस्तक प्रदर्शन व विक्री याची माहिती देण्याचे काम करणार होते. त्यांनी या कामाची सुरुवात नगर वाचन मंदिराच्या बाहेरूनच केली. आपले नाव संपूर्ण शहरात वाजतय हे ऐकून फार भारी वाटत होते.

                          

    प्रदर्शन सुरू होऊन काही तास झाले होते...लोक येत होते, पाहून काही खरेदी पण करत होते.  तितक्यात हॉल मध्ये एक गलेलठ्ठ काका, साधारण ५८ ते ६३ मध्ये वय असेल, उंच, पोट सुटलेले, झकास इस्त्री केलेली पँट, इन केलेला फुल शर्ट तो पण कडक इस्त्रीचा. डोक्याचा अर्धा गोटा झालेला आणि सोबत दोन चार लहान पोरं पोरी ती पण साधारण आठ ते दहा वर्षातील असतील. 

"काका दमलात? बसा जरा....." मी माझी लाकडी अगदी जुन्या टाईप मधील हात असलेली खुर्ची त्यांच्या पुढे सरकवली.
"हो, जिना चढून जरा दम लागला...."
काकांच्या बोलण्यातून , त्यांच्या राहणीतून ते इकडचे राहणारे वाटत नव्हते. मला वाटलं पर्यटक असतील.
दम घेतल्यावर तेच म्हणाले.
"मीss डॉ. डी डी कांबळे"
"नमस्कार", मी रीतसर त्यांना अभिवादन केले.
"मी मूळचा इथलाच, पण आमच्या अनेक पिढ्या मुंबईत गेल्या, जरा पाहतो हं पुस्तके, पोरांनो तुम्ही पण पहा रेss आवडले तर घ्या. मी देतो पैसे पण आधी सगळे नीट पहा...."

    मुलं सुरुवातीला उत्साहात संपूर्ण भरलेल्या त्या हॉल मधील टेबलांवर लावलेल्या पुस्तकांकडे पाहायला लागली. हळूहळू त्यांचा उत्साह कमी व्हायला लागला. कारण एकतर संपूर्ण टेबलं वरील पुस्तकं पाहायची, म्हणजे किमान एक तास तरी लागणार. त्यांनी एवढे मोठे प्रदर्शन या आधी कधीच पाहिले नव्हते. एकूण किमान वीस टेबलं पुस्तकं पाहणे त्यांना कंटाळवाणे वाटायला लागेल.

"मी इथं  सेवा निवृत्त झाल्यावर राहायला आलो. मुंबईच्या एका रुग्णालयात होतो नोकरीला"

    कोकणचा माणूस हा मनापासून मुंबईला आपली कर्मभूमी मानतो हे काकांच्या बोलण्यातून लक्षात येत होते.ते पुस्तक पाहत पाहत माझ्या बरोबर त्यांचे मुंबईतील वास्तव्य, मालवणला कसा, का परत आलो....कुठे रहातो....हे सगळं मनमोकळे पणाने सांगत होते.

"ही पोरं आमच्या घराजवळ राहतात. उगीच उनाडक्या करत फिरण्यापेक्षा चांगल काहीतरी पाहायला मिळेल म्हणून आणले यांना, मी रोज यांना सकाळी आणि संध्याकाळी पोहायला शिकवतो...."
"कुठे? नदी आहे का जवळ?"
"छे होss..समुद्रात !!!!....ही राधा आहे न दहा वर्षाची, मागच्याच महिन्यात किल्ल्यापर्यंत गेली पोहत. पण दमली बिचारी. मग येताना बोटीमधून आणले तिला"
"काका तुम्ही पण पोहता समुद्रात?" मी काकांच्या शरीर यष्टीकडे पाहून विचारले.
"हो मग!! मी तर पाठीवर पण पोहतो समुद्रात"

    डॉ काका माझ्याशी बराच वेळ बोलत होते. आता मात्र पोरं दोन्हीला कंटाळली होती. काकांच्या गप्पांना आणि हॉलमध्ये फिरून

" तुम्ही जातास काय, घराकडे?" काकांनी मुलांना विचारले.
पोरं वाटतच पाहत होते, लगेच चप्पल घालून...पटापटा पायऱ्या उतरून गेले पण...
"बघलास? ही अशी पोरं आहेत!!!"
काका नंतर येतो म्हणून गेले ते काही प्रदर्शन संपेपर्यंत परत आले नाहीत...

    खरंतर पुस्तक प्रदर्शन हे उपजीविका किंवा व्यवसाय म्हणून मी त्याच्याकडे कधीच पाहिले नाही. कधी लोकांचा परिचय, त्यांचे चांगले वाईट अनुभव, पोरांची निरागसता,एखादे लहान पोरं कोणते पण चित्र असलेले पुस्तकं  घेऊन लगेच जमिनीवर मांडी घालून मन लावून ते पुस्तकं पाहत बसतं, मग त्याच पुस्तकासाठी ते मूल आई वडीलांना हट्ट करत, आई वडिलांचे पुस्तक खरेदीसाठी केलेले पैशा पैशांचे हिशोब, असे अनेक अनुभव घेता येतात. हेच अनुभव माझ्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत..

    माझ्या सुदैवाने मी अनेक हक्कांची  घरं मालवणमध्ये अशाच अनेक प्रदर्शनात आत्मीयतेने आणि सकारात्मक पणे जोडली आहेत...

"कधी पासून सुरू झाला हेss?" 
सकाळी सकाळी एक साधारण मध्यम वयाच्या पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या, ताई घाईघाईत हॉलमध्ये येऊन मला विचारत होत्या.
"काल पासून....."
"किती दिवस असाss?"
"आहे अजून सहा, सात दिवस...."
"असा नss!!!...मग येते मी संध्याकाळी....."

    ज्या घाईने त्या ताई आल्या, त्याच घाईने त्या जिना उतरून खाली पण गेल्या. मी त्यांच्या मागे दारापर्यंत गेलो, तर त्यांनी भिंतीला टेकून ठवलेली लेडी बर्ड सायकल पटकन काढली आणि निघाल्या देखील....मला वाटले त्या काही परत यायच्या नाहीत. प्रदर्शनात असे अनेक लोक पाहायला मिळतात. नुसतेच आपल्याला हुलकावणी देतात.                


    रिकाम्या हॉल मधील पुस्तकं एकमेकांच्या आजूबाजूला पडलेले होते. मला अशा वेळी नेहमी असे वाटतं आले आहे, की हे आपल्या अपरोक्ष ही पुस्तकं एकमेकांना म्हणत असतील

" काय रेss तुझा विषय काय?"
"मी तर बाबा रतन टाटांचे चरित्र आहे"
जर त्यांच्या  बाजूलाच एखादे संत चरित्र असेल तर ते, त्या दोघांना एखादी ओवी ऐकून दाखवत असेल का? 
हा विचार मला रिकाम्या हॉल मधील प्रत्येक पुस्तकं हाताळून त्याचा नेमका विषय काय? हे समजून घेण्याची कायम प्रेरणा देत आला आहे.

    संध्याकाळी त्या ताई परत आल्या तेव्हा पाच वाजले असतील...

" अरे , या या..."
"मला ओळखलतं तुम्ही?"
"अहो, सकाळी आला होतात न"
"मला वाटलं तुमच्या लक्षात नसेल."
"असं कसं, होत की लक्षात, पहा, तुम्ही पुस्तकं"
त्यांनी साधारण अर्धा तास पुस्तकं पाहिली आणि मनात काही अंदाज बांधला.
"हे घ्याss किती झाले?"
मी पैसे सांगितले....

    त्यांनी आपल्या एकदम लहान पर्समधून बारीक घड्या केलेल्या दहा आणि वीस रुपयांच्या काही नोटा बाहेर काढून पुस्तकाची रक्कम माझ्या हातावर टेकवली आणि काही न बोलता निघून गेल्या....

    त्या ताईंचा चेहरा कृश, कोणत्यातरी भीती खाली किंवा दडपणात असल्याचा भासत होता. मी फक्त विक्री यासाठी कधीच या व्यवसायाकडे पाहत नाही. मला लोकांशी संवाद करून त्यांना जाणून घेण्याचा छंदच लागला आहे.

    पुढील काही दिवस रोज त्या ताई नेहमीच्या वेळी यायच्या.पुस्तकांचे तसेच पैसे द्यायच्या आणि निघून जायच्या. त्यांचे असे वागणे माझे कुतूहल वाढवत होते.

" आलात ताई, एक प्रश्न विचारू? म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर"
"हो हो"
"तुम्ही रोज एक दोन पुस्तकं विकत घेता असे का? एकदम का नाही घेत?"
"दादा, मला वाटलंच तुम्ही हा प्रश्न विचारणार, आपले आयुष्य फार बिकट आणि त्रासदायक आहे हो"

    त्यांनी, मला आपल्या भावाप्रमाणे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील सर्व हकीकत सांगितली.
"अहो आज जीव देऊ का उद्या? याच विचारात मी सकाळी उठायची!!! मग एक दिवस, एक पुस्तकं सहज रस्त्यात पडलेलं भेटलं काय आहे म्हणून चाळल...आवडलं...आणि....आज मी तुमच्या समोर जिवंत आहे हो......"

    त्यांचा तो विलक्षण अनुभव ऐकताना माझ्या अंगावर काटा येत होता.
"हो..मग....पुढे?" कुतूहलाचे विचारले.
"आता एक मेस आहे माझी, तेव्हापासून मनात नक्की केले, जेव्हा जेव्हा पुस्तकं विकत घेता येतील... तेव्हा ती घ्यायचीच. आपल्या ऐपती प्रमाणे रोज काही पैसे साठवते. हे सगळे तेच पैसे आहेत जे  कुठे कुठे लपून ठेवलेले  आहेत.

    त्या भरभरून बोलत होत्या मी त्यांचे बोलणे एका जागी निःशद्ध उभा राहून ऐकत होतो. माझ्या डोळ्यासमोर त्यांचे ते जुने दिवस येत होते आणि मन कुठे तरी हरवलेले होते. कुठे तरी वाचले होती की 'पुस्तक वाचनामुळे जीवनाचा आनंद मिळतो'...पण इथं तर जीवनच मिळाले होते.

    मध्येच माझ्या पायांना स्पर्श झाल्याचा भास झाला, म्हणून खाली पाहिले तर त्या ताईंनी पायाला हात लावून नमस्कार केला.....

"अहो अहो हे काय??? मला कशाला नमस्कार करता?"
"अहो दादा, मला तुम्ही जीवन दिले आहे. तुमच्यामुळे मला रोज पुस्तक घेऊन, जगायची प्रेरणा मिळते आणि माझे मागील दिवस विसरता येतात. तुम्ही असेच नेहमी येत जाss नेहमी याss मी येईल प्रदर्शनात....मी येईल प्रदर्शनात......" 
© निखिल देविदास वझे
९०११०९६२५०
----------------------------------------------------------------------------------------------------------------
English Translation
"... but here's life !!!"

        It was eleven o'clock in the morning till I came to Malvan. I still had to get the whole thing out of the car. The book exhibition was to start as usual in two days in the hall on the first floor of 'Nagar Vachan Mandir', with a lot of work to be done.
                     
 "Uncle Joshi, what time do you set the table?"
 I put the mobile in my ear while I was sweating,
 "Are you here !!!"
 "Yeah, so what? You said, so I'll come today !!!" (Spoke angrily)
 "Send as soon as possible, fill my tempovalo sss sand. He stopped, that dhatta his sss, will die soon"
 "Send it well, uncle soon ...."

    About fifteen to twenty books bags, bundles, boxes and other belongings were slowly carried to the first floor like 'One Man Army'. We sat like that for a while, then the tempo was always making noise to me from below.

"What's up, Grandpa? What's up? What's up?"
"Hey, you don't want to bring it !!! .... Go to Uncle Joshi quickly ...."
      
    Right people have been connected in Konkan for many years. Nowadays only the system stands on the phone. It was a bit of a hassle in the past. But now the train is rolling, I still don't know what happened today ??? Everything was getting late. However, one day tomorrow was left empty for preparation ...
    Our usual thick, heavy wood, even noble, has always brought such tables out of tempo. He gave me a voice from below.

"Grandpa, you have to take care of yourself today, who doesn't have a companion?"
"Let's go ..."
    In the scorching sun and the humid atmosphere of Malvan, my life came to a screeching halt as I carried those thick tables up the narrow stairs to the first floor. But he was always very relaxed, and in the end, his daily routine was hard work.

"Always, how are you ...?"
"Maka rojcha asa she he, kaya hota nai mare ss"
The hall was packed with bags of books, bundles of books, some boxes, other decorative items and most importantly tables. We both soaked in sweat as we brought it upstairs. Immediately the fan of Zakkas turned on and opened the hall unabashedly, leaving the sweat-soaked T-shirt drying on the table right there. So much work and so much sun exposure made my throat very dry.

"Grandpa, come on .... rent is makass" always got up
"Always, give me that water bottle ..."

   He took a bottle of water from his hand, paid for his work and put a bottle of direct water in his mouth, drank a lot of water. The cold water calmed the life a little.
    After going to Konkan for many years, now I am beginning to understand the sweetness, intimacy and fun of Malvani language. With the exception of a few special words (that is, even in the context), most of the dialect is now understood, whether it is Sada or Joshi Kaka, a lot of people used to talk to me in Malvani.

    The crows in the stomach or the whole forest was screaming. But it was not right to eat with such a sweaty body. Then we came to the lodge, where instructions had already been given over the phone. Just like a ten by ten room, with only one window open on the street .... The smell of turtle prints in the room, where the stains on the walls, the staggering Shahabadi floor, I stepped into that room. In fact, the idea was to relax in the room and then go out to eat, but seeing all this changed my mind. I opened the window a little to smell the tortoise print in the room, so there was some light in the room. Otherwise, the room was sitting in the dark and the lights went out to bomb. Actually it was the usual lodge but I didn't have my usual room available so I had to stay in this guest room.

    The sweat-soaked body was cooled by a zakkas cold water bath and immediately rushed out of the room to eat. It was three o'clock. I was hungry, and I saw a restaurant nearby. There was not enough energy left in some body to go and eat in the usual restaurant. After eating here, we came straight to Uncle Joshi ...

"Come on, uncle?"
"Come on, it's a little late today !! .. for the table"
"Okay !!! One more day left"
"At dinner?"
"Yes, it's just done, uncle."
"How many days ss performance this year?"
"Eight days as usual. Uncle, your money !!!"
"Give it to me on the last day."
"Okay ... see you at the exhibition sometime ....."
"Yes, it will happen ... I will go to Devgad for a day or two and then come ..."
    It is not possible to come to Malvan and see the beach and the shock of Malvan is very close to me. An experience, an event has happened long before this shock. The memory of which remains in my mind, but I will talk about it sometime later. The meal was over, but instead of going back to the room and relaxing, the beach-shock was over, otherwise it was now five o'clock. Then he reached the shore. The waves of the sea were coming and going, Sindhudurg fort was visible in the distance.
I stared at it and walked slowly. I was leaning against the light pole and looking at my foot wound. The sole of the foot was injured, something was pierced .... but what exactly? Some of this was not noticed.

"What happened?"
The shopkeeper in Dhaka asked as he closed the shop.
"Something pierced and blood was coming ..." I told them, holding the wound tightly.
"Hey Tuka, it was a sharp conch, it was fine. Don't worry, Mare" (Many shopkeepers in Malvan speak a special language, meaning Malvani in the middle, Marathi in the middle, but sometimes in Hindi). When the door of the room was opened in the dark, a buzzing sound could be heard all over the room as bees swarmed. Search for light button, what sss ???
    Went to play on the field in the evenings when I was younger. We used to run to the other friend and put our head on his head and then our heads would be empty and the round mosquito would come on that friend's head. Also, the mosquitoes had come into the room.

    Because of my mistake in the afternoon, all this army had come to the shelter of the room through the window. What next ??? Already nothing has been done to remedy this. Then let's see, thinking that we left it all and went straight to dinner. Coming in after the meal, he bought a black Hit Solid solution from the lower medical and sprayed the entire room literally from corner to corner.

    We came to the hall soon to order books. By four in the afternoon all the preparations were complete and then we left the hall, all the mess was closed for dinner. There was an old hotel on the main road. There were wooden hotels built all over the castle, wooden bak tables, glassware, a large kiln inside, not a shopkeeper, I chose the table after seeing your wings.

"Owner, do you have a fan? Owner, did you eat this?"
"Garam bhaji, usal pav asa"
"What kind of jump?"
"It's a blackout."
"Give me maca, a loaf of bread, then some tea."
    
    I spoke in broken Malvani, so it was a bit of practice. I walked around the market with four haystacks in my stomach, where I was enjoying the atmosphere of fish, women sitting with some vegetables, clothes shops, shopkeepers selling Konkan fruits, tourists squandering money. In fact, I'm a bit of a stranger here. That's the difference. So I was looking at all this as if it was a villager or a Malwani.

    We walked like this, first to the Mauni Maharaj Temple and then to the Ganesh Temple of the chronologist Salgaonkar. With the blessings of Mauni Maharaj, Chhatrapati Shivaji Maharaj built Sindhudurg fort. I saw a temple built of full Jamba stone and I wondered when Chhatrapati Shivaji Maharaj would have visited this place. We went to the Ganesh temple of Salgaonkar and came back to the simple room.

In the last two days, the whole mental preparation was done. The village was hit again and a grand book exhibition and sale started this morning. The whole day was spent in the previous day. He came to the hall early in the morning and completed some of the leftovers. This morning, the buzzer (in a very special style) started moving from the rickshaw. This uncle was going to stop at Chowka Chowk, outside the temple, at the market, in all the Malvan city and some of the surrounding villages till evening and inform the people about the book exhibition and sale in a very zakkas voice. He started this work from outside the Nagar Vachan Mandir. It was overwhelming to hear your name ringing all over the city.
               
    It had been a few hours since the exhibition started ... People were coming, seeing and doing some shopping. At the same time, there was a fat uncle in the hall, about 58 to 63 years old, tall, with a loose stomach, well-ironed pants, a full shirt, but with a tight iron. The head is half round and with two or four small children, but they are about eight to ten years old

"Uncle, are you tired? Sit down ..." I pushed my wooden chair in the old type with my hands in front of him.
"Yes, I climbed the stairs and took a deep breath ..."
From his uncle's words, from his living, he did not feel like a resident of Ikad. I thought there would be tourists.
That's what he said when he took a deep breath.
"I'm Dr. D. D. Kamble."
"Hello", I greeted them regularly.
"I am originally from here, but many of our generations have gone to Mumbai, just look at the books, you guys, if you like the race, take it. I'll pay, but first look at everything ...."
    The children initially looked at the books on the tables in the hall, which was full of excitement. Gradually, their enthusiasm began to wane. Because either it would take at least an hour to look at the books on the whole table. He had never seen such a big exhibition before. They will find it boring to look at at least twenty tables of books in total.

"I came to live here after retirement. I was working in a hospital in Mumbai."

    It was evident from his uncle's words that a Konkan man sincerely considers Mumbai as his karma bhoomi. While looking at the book, he was telling me all about his stay in Mumbai, how he came to Malvan, why he came back ....

"These guys live near our house. I teach them to swim in the morning and in the evening every day so they can see something better than walking around."
"Where? Is the river nearby?"
"Che hosss .. in the sea !!!! .... this is Radha who is not ten years old, she went swimming to the fort last month. But she was very poor.
"Uncle, do you swim in the sea?" I looked at my uncle's body and asked.
"Yes then !! I swim in the sea on my back"
    Dr. Kaka was talking to me for a long time. Now the boys were both bored. Uncle's chats and walking around the hall

"Are you going home?" Uncle asked the children.
The boy was just looking, he immediately put on his slippers ... he went down the stairs but ...
"Look? These guys are like that !!!"
Uncle comes later so he didn't come back till the end of some exhibitions ...
    In fact, I never saw the book exhibition as a livelihood or a business. Sometimes people get acquainted, their good and bad experiences, the innocence of the kids, a little boy takes books with pictures but immediately puts his knees on the ground and looks at the books, then he insists on the parents for the same book, the calculation of the money made by the parents to buy the book. Many such experiences can be had. These are the experiences that inspire me.

    Luckily for me, I have sincerely and positively linked many rights houses in many such exhibitions in Malvan ...

"When did it start?"
Early in the morning, wearing a simple middle-aged Punjabi dress, Tai hurried into the hall and asked me.
"Since yesterday ....."
"How many days like this?"
"There are still six, seven days ...."
"Nass !!! ... then I come in the evening ....."
    She hurried down the stairs as fast as she came. I went to the door behind them, they quickly removed the Lady Bird bicycle leaning against the wall and even left .... I thought some of them would not come back. There are many such people in the exhibition. They simply dismiss you.

The books in the empty hall were lying around each other. I've always felt that these books were telling each other indirectly

"What's your subject?"
"I am the character of Baba Ratan Tata"
If there is a saintly character by their side, will he be showing them an ovi?
What exactly is the idea of ​​handling every book in an empty hall? It has always been an inspiration to understand.
    When she came back in the evening, it must have been five o'clock ...

"Hey, come on ..."
"Do you know me?"
"Hey, don't come in the morning."
"I thought you might not remember."
"Remember how it happens, look, you books"
He looked at the books for about half an hour and made some guesses.
"Take this, how much is it?"
I said money ....
He took out some finely folded notes of Rs. 10 and Rs. 20 from his very small purse, handed the book to me and left without saying anything ....

    Her mother's face was thin, she seemed to be under some kind of fear or oppression. I never look at this business just for sale. I enjoy interacting with people and getting to know them.

    For the next few days, she would come at the usual time every day. She would pay for the books and leave. Their behavior aroused my curiosity.

"Come on Tai, can I ask you a question? I mean if you don't get angry"
"Yes yes"
"Why do you buy a book or two every day? Why not at once?"
"Grandpa, I thought you would ask this question. Your life is very difficult and stressful."
He took out some finely folded notes of Rs. 10 and Rs. 20 from his very small purse, handed the book to me and left without saying anything ....

    Her mother's face was thin, she seemed to be under some kind of fear or oppression. I never look at this business just for sale. I enjoy interacting with people and getting to know them.

    For the next few days, she would come at the usual time every day. She would pay for the books and leave. Their behavior aroused my curiosity.

"Come on Tai, can I ask you a question? I mean if you don't get angry"
"Yes yes"
"Why do you buy a book or two every day? Why not at once?"
"Grandpa, I thought you would ask this question. Your life is very difficult and stressful."

    He, like his brother, told me all the facts of his personal life.
"Hey, should I give up my life today or tomorrow? I used to get up in the morning with the same thought !!! Then one day, I found a book lying on the road. ..... "

    Listening to their wonderful experience was a thorn in my side.
"Yes..then .... next?" Asked out of curiosity.
"I have a mess now, I have made up my mind ever since, to buy books whenever I can. She saves some money every day like her appetite. It's all the money that's hidden somewhere.
    While they were talking, I was listening to them. Those old days were coming before my eyes and my mind was lost somewhere. I had read somewhere that 'reading a book brings happiness to life' ... but here life was found.

    In the meantime, I felt my feet being touched, so when I looked down, she touched my feet and greeted me .....

"Hey hey what's this ??? Why do you greet me?"
"Hey Grandpa, you have given me life. You inspire me to take a book every day, to live and to forget my past days. You always come and go like this.

© Nikhil Devidas Vaze
9011096250

Thursday, April 29, 2021

"माझे सिंहगड प्रेम भाग २”/"My Sinhagad Love Part 2"

 

                           "माझे सिंहगड प्रेम भाग २”

राजगड दर्शन, सिंहगड किल्ल्यावरून 

"चला रे आपण राजगड-तोरणा ट्रेक करू."
"
अरे नको निख्याआपल्याला कोणालाच याबाबत जास्त माहिती नाहीये."
"
मग काय झाले? माहिती शोधू आणि जाऊ"
"
पण आपल्यातलं कोणीच जाऊन पण आले नाही, ह्या ट्रेकला?"
"
अरे, कधी तरी पहिली वेळ असणारच की! जाऊया मी काढतो सगळी माहिती"

               असे अनेक वाद, संवाद,चर्चा झाल्या आणि वरील ट्रेक ठरला.(पुढे या बाबत नक्कीच बोलेन) पण हा ट्रेक करण्यासाठी शरीराला सराव हवा असा विचार समोर आला. कारण या ट्रेकसाठी किमान ८-९ तास सलग अनेक टेकड्यांची चढउतार करावी लागते.
मग काय!!! सरावासाठी पायी सिंहगडला जाण्याचे ठरवले. आपला किमान चालण्याचा सराव तरी होईल असा विचार केला.

                 मी आणि माझा एक मित्रआमच्या नारायण पेठेतील रूम वरून रात्री २.३० ला ( ही वेळ अनेक वर्षांची सोबती आहे) चालत चालत सिंहगडाला निघालो. साधारण ७.३० ला पायथा गाठला आणि पुढे गड ही चढला. काहीही त्रास न होता .....सिंहगडची पायी वारी चांगली झाली. त्यामुळे राजगड तोरणा ट्रेकचा आमचा कॉन्फिडन्स वाढला.
         मी असाच सिंहगडच्या कायम प्रेमात आहे. PMT ने, गाडीने, सायकलवर, चालत, दिवसा, रात्री, थंडीत, पावसात, उन्हात, एकटा, मित्रांसोबत, जे येतील त्यांना घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना सोडून मी सिंहगडवर गेलोय. असे सगळे प्रकार करून झाले तरी माझे समाधान होत नाही. देवळात जाऊन प्रत्येक वेळी देव वेगळाच भासतो,दिसतो तसेच काहीसे आहे हे !!!!!
                एकदा पुण्यातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार होते. पण पाहायला जागा नव्हती? मग काय रात्री सिंहगडाला मुक्काम केला, अशा खगोलीय घटनेचा आनंद घेण्यासाठी याहून सुंदर जागा ती कोणती? कदाचित अशा अनेक गोष्टींच्या अभ्यासासाठी , चिंतनासाठी, मनसोक्त वाचनासाठीच लोकमान्य टिळक गडावर येत होते.  

लोकमान्य टिळक बंगला,सिंहगड

      सूर्यग्रहण बघण्यासाठी गडावर गेलो तर खरं. पण काहीच जेवायला नव्हते,सोबत डब्बे ही नेले नव्हते. रात्री एका टपरी मध्ये आतून लाईट सुरू दिसला, त्या मालकाला विनंती केली, तो बिचारा सुरवातीला भीतीने दुकान उघत नव्हता. मनात विचार केला 'काय गम्मत आहे ना!!? ज्या गडावर शौर्यगाथा घडल्या, तेथील दुकान चोरांच्या भीतीनं उघडत नव्हते.

    असो, शेवटी त्याने हो - नाही करत दुकानातून हळूच बिस्कीटपुडे दिले. पण ते खायचे कसे? कोरडे बिस्कीट खायला नको वाटत होते. मग मावशींच्या झोपडीतून एक पोहऱ्याची बादली घेऊन देव टाक्याचे पाणी शेंदले आणि सरळ बादली मधील पाण्यात बिस्कीट बुडवून खायला सुरूवात केली, त्या रात्री बिस्किट्स वर आमचे जेवण झाले. देव टाक्याच्या पाण्यात बुडवून खाल्लेली त्या बिस्किटांची चव अजून ही आठवते. दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण पाहून मगच आम्ही गडावरून पायउतार झालो.

              असे एक ना अनेक किस्से........! आयुष्यात काही प्रसंग प्रेरणा देणारे असतात. तसाच सिंहगड माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. ट्रेकिंग साठी, आनंद साजरा करण्यासाठी , शारीरिक क्षमता आजमावण्यासाठी माझे नेहमी सिंहगडवर जाणे व्हायचेच. पण मन अशांत असले तरी मी सिंहगडवर यायचो. म्हणून मी नेहमी म्हणतो
"
सिंहगड हे माझे पहिले प्रेम आहे " आणि त्याने पण मला प्रेमाने जपलं आहे. अनेक प्रेमळ माणसं मला येथेच भेटले, सरबत विक्री करणारे काका, जेवू खाऊ घालणाऱ्या मावशी, दही विक्री करणारे, दर आठवड्याला (माझ्यासारखेच वेडे असलेले) सिंहगडावर न चुकता येणारे ' सिंहगड प्रेमी ' अगदी सगळे. 

    जुलै महिन्यात संततधार पाऊस लागून राहिला होता. असा छान पाऊस आणि सिंहगडला भेट नाही? असे क्वचित् व्हायचे. तसे....मला सिंहगडवर जायला कारण, वेळ आणि सोबत लागायचीच असे नाही.....पण तरी या वेळेस मात्र मी सवंगडी तयार केला.

"चल रे जाऊयात का?"

"कुठे रे निख्या?"(निख्या हे माझे मित्रांनी पाडलेले नावं)

"अरे कुठे काय? मस्त पाऊस पडतोय, जाऊ सिंहगडावर!!!!!"

"मला वाटलंच! एवढा पाऊस पडतोय आणि अजुन तू सिंहगडला कसं काय गेला नाहीस?"

"म्हणून तर विचारतोय जाऊया का?" "अरे आज जरा जास्तच पाऊस पडतोय, जरा कमी झाला की जाऊ."

"तू येणार आहेस की नाही? ते सांग नाहीतर मी निघतो."

"बरं बाबा, चल....! असं ही, तुझ्या सोबत जायचे म्हणजे काळजी नाही!"

    आम्ही दोघे एका छत्रीत रूम वरून PMT बस करिता शनिवारवाडा गाठला, तेव्हा पण रस्त्यावरून खूप पाणी वाहत होते. आम्ही फक्त पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी निघालो होतो. आता आमच्या कडे पण मोबाईल आला होतापण तो भिजू नये म्हणून रूमवर ठेऊनच बाहेर पडलो. रूम वरील बाकी मित्रांना निरोप देऊन आम्ही निघालो होतो. सोबत जेमतेम पैसे प्लॅस्टिक पिशवीत घेतले होते.

आम्ही PMT मध्ये बसे पर्यंतच निम्मे भिजलो होतो. सोबत घेतलेली छत्री बंद करून बॅगेत ठेऊन दिली कारण आता फक्त मनसोक्त भिजायचं होतं बसsss.!!!! जाताना सगळ्या रस्त्यांवर पाणी वाहत होते....गाड्यांचा वेग मंदावला होता......त्यांना समोरचा अंदाज घेऊन पुढे जावे लागत होते...काही लोक पावसात भिजत आपले आपले व्यवहार पूर्ण करत होते...काही चहाचे वाफाळलेले कप घेऊन टपाऱ्यांचा आडोसा घेऊन उभे होते... अशी सगळी रस्त्यावरची गडबड पाहण्यात रस्ता कटत होता. खडकवासला धरण आले.......काय सुंदर पाणी दिसत होते! ढग अलगद खाली उतरले होते. ढगांच्या पडद्याआडून पुसटशी सगळी कडे हिरवळ दिसत होती!....असा सगळा नजारा पाहण्यात रस्ता कधी संपून गडाचा पायथा आला कळलचं नाही.

आम्ही बस मधून उतरलो आणि लगेच चालायला सुरुवात केली. रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचे लोट वाहत होते, पायात बूट होते पण ते केव्हाच आतून ही भिजले होते. त्यामुळे या वाहणाऱ्या पाण्यातून जाताना पायांना थंड स्पर्श जाणवत होता. रस्त्यावरून जे पाणी वाहत होते ते सगळे पाणी वरील डोंगरदऱ्यातून खाली आले होते. त्या पाण्याचा इतका वेग होता की त्यात आपला तोल सांभाळणे कठीण जात होते. आम्ही दोघांनी एकमेकांचा हात गच्च पकडून तो प्रवाह पार केला. गडाच्या पायथ्यापासून माथ्याकडे कुच केले. खूप प्रसन्न, मनाला आनंद देणारे,आपली ऊर्जा, सकारात्मकता वाढवणारे वातावरण निर्माण झाले होते. पाय वाटेवरून माती,चिखल तुडवत पुढे जात होतो....! मध्येच पाऊस उघडायचा की सगळं आकाश स्वच्छ होत होते. पुढच्या काही क्षणात परत गच्च पाण्याने भरलेल्या ढगांचे आगमन व्हायचे आणि पाऊस असा सुरू व्हायचा की समोरचं काहीच दिसायचं नाही.  

असा पाऊस सुरू झाला की डोंगर माथ्यावरून पुन्हा पाण्याचा लोंढा खाली झेपावत असे. भरभरून चहाचे पिंप सोडून द्यावेत असा त्या पाण्याला रंग असायचा. चढतांना ही निसर्गाची वर्षा ऋतूतील गम्मत अनुभवत आम्ही चढत होतो. खाली आलेले ढग, सिंहगड माथा तोही पूर्ण ढगात झाकलेला, दूर दूरपर्यंत दिसणारी हिरवळ, खडकवासला धरणाचे बॅकवॉटर, चढण्याच्या वाटेवर पसरलेली झाडे ,वेली, मुक्तपणे आकाशात झेपावणारे पक्षी, पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि खळाळत खाली झेपावणारे छोटे धबधबे, सगळे अवर्णनीय!!!! या सगळ्याच्या सोबतीत नेहमी पेक्षा कमी वेळेत गड चढला...पुणे दरवाजाच्या भिंतीवर जरा विसाऊन खाली दरीत,वाटेत पडणारा मनसोक्त पाऊस पाहण्याचा मोह टाळताच आला नाही. स्वर्ग कसा असतो ते माहीत नाही..... पण हा अनुभव घेणे म्हणजे स्वर्ग सुखच!!!

बसsss स्वर्ग सुख हेच!!!

आता आम्ही दोघे पूर्ण ढगात होतो. कारण सिंहगड ढगांनी वेढलेला होता. जेमतेम ३ फुट पर्यंत दिसत होतं. पुणे दरवाजा ओलांडून गडावर आलो ते थेट मावशींकडे चहा प्यायला!!!! चहा मागवला तर खरा....पण हातात चहाचा कप धरताचं येत नव्हता!!! एक तर खूप भिजलो होतो, त्यात प्रचंड वारा.....त्यामुळे खूप थंडी वाजत होती. हाताची बोटं अाखडून गेली होती.

     

चुली जवळ बसून कसेतरी हात गरम केले आणि चहा प्यायला सुरूवात केली. पण हातातील कप काही एका जागी स्थिर होत नव्हता. अंगातील थंडीमुळे हात इतके थरथरत होते की निम्मा चहा हातावर सांडत होता.... तरी थंडीमुळे चटका काही बसला नाहीउलट चहा हातावर सांडल्यामुळे हात गरम होऊन पुढचा एक कप चहा मात्र पिता आला.


चहा घेऊन जरा गरमी आली, त्यामुळे गडावर एक फेर फटका मारायला झोपडीतून बाहेर पडलो. कोंढाणेश्वर महादेवाचे दर्शन घेतले, बालेकिल्ल्याचे दर्शन घेतले. मी कधीही गडावर गेलो की या दोन पवित्र ठिकाणांचे दर्शन घेतल्याशिवाय परतत नाही. या महादेवाच्या देवळात गाभाऱ्यात प्रवेश तर नाही त्यामुळे बाहेरून च नमस्कार करावा लागतो. तिथे गेलो की प्रत्येक वेळी मनात हाच विचार येतो की इथे कधी तरी आपल्या राजांनी दर्शन घेतले असेल!त्यांचे पाय या देवळात लागले असतील! महादेवाला हात जोडताना नकळतपणे त्या काळातील वातावरणात माझे मन संचार करून येते.

    बालेकिल्ल्याचे म्हणाल तर, तो जो पर्यंत सर करत नाही तोपर्यंत गड सर झाला असे मानत नाहीत. नुसता बालेकिल्ला पण लढवता येतो आणि त्याच्या बळावर गड जिंकता ही येतो. त्यामुळे गडाच्या या भागात आल्याशिवाय सिंहगडला जाऊन आलो असे वाटतच नाही.

    पुढे आम्ही पावसातच तानाजी कड्या (याच कड्यावरून/ दरीतून सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे गडावर आले) जवळ आलो. पाऊस मस्त सुरू होताच. आता तानाजी कडा ते कलावंतीणीचा बुरुज (wind point) असे जाऊन आम्ही लगेच परत फिरणार होतो. पण मनात विचार करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे व ती होणे यात खूप फरक असतो हे त्याचं दिवशी समजले.

   तानाजी कडा ते कलावंतीणीचा बुरुज हे अंतर साधारण १० मिनटात पार होते. पण त्या दिवशी खूप पाऊस पडत होताच आणि वाराही जोरदार वाहत होता. या दोघांनी (वारा आणि पाऊस) आमची परीक्षा घेतली आणि आमचा कस पाहिला. वारा आम्हाला एक पाऊल पुढे टाकु देत नव्हता, आम्ही पण इर्षेला पेटलो आणि चल आपण जाऊ पुढे असं म्हणून एकमेकांचे हात घट्ट पकडले.... तो एक पाऊल पुढे....मग मी एक पाऊल पुढे...असे करत हे अंतर ३०- ४० मिनटात पार केले. इतकं वारं असूनही आम्ही बुरुजावर आलो......आता त्या बुरुजाच्या भिंतीवर उभं राहायचं होतं....पण वाऱ्याचा जोर इतका होता की, ते शक्य झाले नाही. आम्ही तरी दरीच्या दिशेला तोंड करून उभे राहीलो. दरी मधून खालून वारा आमच्या तोंडावर आदळत होता, वरून पाऊस येत होताच; पण खाली पडणारे पाणी देखील त्या वाऱ्यामुळे खाली न पडता परत वर उडत होते. ( उलटा धबधबा म्हणा हवं तर...)

हे तुषार मनाला आनंद देत होते. तिथे खूप वेळ थांबवेना, शेवटी तेथून निघालो आणि गड पायउतार झालो.

सिंहगडच्या पावसाचा हा असाही एक अनुभव!!!!!! असे अनुभव आपल्याला खूप काही देऊन जातात, प्रत्येक वेळी ते बोलता येईल असे नाही.पण ते आत खोल जाणवतं , निरंतर सोबत करतं. फक्त पावसात मनसोक्त भिजायला मी अनेक वेळा गडावर गेलो आहे.

नयनरम्य निसर्ग

 मला बाबांना पावसात गड दाखवायची एकदा संधी मिळाली. आम्ही गाडीने गेलो खरं.....पण रस्त्यावर इतकी गर्दी होती की आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि सरळ ३- ४ किमी पायीच गेलो. बाबांना सगळा गड दाखवला, माझ्या माणसाची ओळख करून दिली. परत येताना ते खूप दामले होते. पण एकच वाक्य म्हणाले...

“खरंच तू का जातोस हे मला आज कळाले!!!......असाच जात जा...पण जरा जपून..!

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation

"My Sinhagad Love Part 2"


"Let's trek to Rajgad Torna."

"Oh no Nikhya, you don't know anyone much."

"So what happened? Let's find the information and go."

"But none of us went to this trek?"

"Hey, it's going to be the first time ever! Let's get some information."

               There were many debates, dialogues, discussions and the above trek came to an end. (I will definitely talk about this later.) It has to be done.

So what ........! Decided to go to Sinhagad on foot for practice ..... I thought it would be at least walking practice.

                 A friend of mine and I walked from our room in Narayan Peth to Sinhagad at 2.30 pm (this time is a companion for many years). Reached the base at around 7.30 am and then climbed the fort. There was no problem ..... Sinhagad's footsteps got better. So our confidence of Rajgad Torna Trek increased.

         I am always in love with Sinhagad. By PMT, by car, by bicycle, by walking, day, night, cold, rain, sun, alone, with a friend, taking those who will come and leaving those who will not come, I have gone to Sinhagad ..... Does not happen. Every time you go to the temple, God looks different, it looks the same !!!!!

                Once upon a time there would be a partial solar eclipse from Pune. Maybe Lokmanya Tilak used to come to the fort to study and meditate on many such things.

    If we went to the fort to watch the solar eclipse, in fact ...... but there was nothing to eat, no boxes were taken along. At night, a light was seen on the inside of a tapari, he requested the owner, the poor man was not opening the shop out of fear at first. Thought in my mind ........ 'What's funny !!? The shops on the fort where the heroic stories took place were not open for fear of thieves.

    Anyway, in the end he said yes or no and gave biscuits next to the shop ........ but how to eat it? I didn't want to eat dry. Then he took a bucket of water from his aunt's hut, poured water from the tank and dipped the biscuits in the water in the bucket and started eating. That night ..... we had dinner on biscuits. I still remember the taste of the biscuits dipped in the water of the god tank. The next day, after seeing the eclipse, we set foot on the fort.

     One or more such stories ........! Some events in life are inspiring. Sinhagad is also an inspiration for me. I always had to go to Sinhagad for trekking, to celebrate happiness, to try my physical abilities ...... but even though my mind was restless, I used to come to Sinhagad. So I always say

"Sinhagad is my first love" and he has loved me too. I have met many loving people here, uncles who sell syrup, aunts who sell food, yoghurt sellers, 'Sinhagad lovers' who go to Sinhagad every week (crazy like me). I also come to the fort.

        It had been raining incessantly since July. Such a nice rain and no visit to Sinhagad .... it was rare. By the way .... I don't want to go to Sinhagad because of time and time ..... but this time I made a companion:

"Shall we go?"

"Where is Nikhya?" (Nikhya is the name given to me by my friends)

"Hey, what's up? It's raining hard, let's go to Sinhagad !!!!!"

"I thought! It's raining so much, why haven't you gone to Sinhagad yet?"

"So let's go ask?" "Oh, it's raining a little too much today, let's go if it's a little less."

"Tell me if you're coming or I'll leave."

"Okay Dad, come on ....! Anyway, I don't care to go with you!"

    We both reached Wada on Saturday for the PMT bus from an umbrella room, but there was a lot of water flowing from the road. We had just set out to enjoy soaking in the rain. The mobile had arrived as mentioned earlier, but we left it in the room, saying goodbye to the rest of the friends in the room. We also took the same amount of money in a plastic bag.

    We were half soaked until we sat in the PMT. I closed the umbrella I took with me and put it in the bag because now I just wanted to get wet. On the way, water was flowing on all the roads .... The speed of the vehicles was slowing down ...... They had to go ahead with the forecast in front of them ... Some people were soaking in the rain and completing their business ... He was standing with Adosa ... The road was cut to see all the chaos on the road. Khadakwas came to the dam ....... what a beautiful water! The clouds had parted. From behind the curtain of clouds, greenery was visible everywhere with Pusat! .... I don't know when the road ended and the base of the fort came to an end.

    We got off the bus and started walking right away. Lots of rain water was flowing from the road, shoes were on the feet but it was always wet from the inside. All the water that was flowing from the road came down from the hill above. The water was so fast that it was difficult to keep our balance. We crossed the stream holding each other's hands. Marched from the base of the fort to the head. An atmosphere was created that was very pleasant, pleasing to the mind, enhancing our energy, positivity. I was walking on foot, walking on dirt and mud ....! It was raining and the sky was clear. In the next few moments, clouds of water would return and it would start raining so that nothing could be seen in front of them.

    It started raining so hard that water started pouring down from the top of the hill again. The water used to have a color that would leave a full pimp of tea. While climbing, we were experiencing the fun of this rainy season of nature. The clouds coming down, Sinhagad head is also covered in full clouds, greenery visible in the distance, backwaters of Khadakwasla dam, trees spread on the way to climb, vines, birds flying freely in the sky, the sound of falling rain and small waterfalls rushing down, all indescribable !!!! In the company of all this, the fort was climbed in less time than usual. I don't know what heaven is like ..... but to experience this is heavenly bliss !!!

    Now we were both in full cloud ..... because Sinhagad was surrounded by clouds. It was visible up to 3 feet. We came to the fort through the Pune gate to have tea directly with our aunts !!!! If you order tea, it's true ... but I couldn't hold a cup of tea in my hand !!! One was very wet, the wind was strong ..... so it was very cold. The fingers of the hand were gone ...... I sat near the stove, somehow warmed my hands and started drinking tea. But the cup in his hand was not fixed in one place. The hands were trembling so much due to the cold in the body that half of the tea was spilling on the hands .... However, due to the cold, the click did not sit on anything, on the contrary, due to spilling the tea on the hands, the hands became hot and the next cup of tea came.

    It was a little hot with tea, so we came out of the hut to hit the fort again. Kondhaneshwar took darshan of Mahadev, took darshan of Balekilla. I never went to the fort and never returned without visiting these two holy places. There is no entrance to the temple of this Mahadev, so one has to greet from outside. Every time we go there, the thought comes to our mind that some day our kings may have visited here! Their feet may have been in this temple! When I join hands with Mahadev, my mind unknowingly communicates with the atmosphere of that time.

    As far as Balekilla is concerned, they do not consider the fort to be Sir unless he is Sir. Nusta Balekilla can be fought and the fort can be conquered on its strength. Therefore, I don't think I came to Sinhagad without coming to this part of the fort.

    Next we came close to Tanaji Kadya in the rain. As soon as it started raining. Now we were going to go from Tanaji Kada to Kalavantin Buruj (wind point) and return immediately. But he realized in his day that there is a big difference between thinking in mind and taking action.

    The distance from Tanaji Kada to Kalavantin Buruj is about 10 minutes. But it was raining heavily that day, and the wind was blowing hard. These two tested us and saw our fertility. The wind was not letting us take a step forward, but we ignited jealousy and held each other's hands tightly so that we could go ahead .... He took a step forward .... Then I took a step forward ... Passed in 40 minutes. Despite all the wind, we came to the bastion ...... Now we had to stand on the wall of the bastion .... But the wind was so strong that it was not possible We, however, stood facing the valley. The wind from the valley below was blowing in our face, as if it was raining from above; But even the falling water was flying back up without falling due to the wind. (Say the reverse waterfall ...)

    This snow was giving joy to the mind. Not stopping there for long, we finally got out of there and descended the fort.

    This is such an experience of Sinhagad rain !!!!!! Such experiences give us a lot, it is not possible to talk about it every time. But it feels deep inside, it works with us constantly. I have visited the fort many times just to get wet in the rain.

    I once had a chance to show Baba the fort in the rain. We went by car ..... but the road was so crowded that we parked the car on the side of the road and went straight 3-4 km on foot. Baba showed the whole fort, introduced my man. He was very tired when he came back. But one sentence said ...

"I really understand why you are going today !!! ...... Go on like this ... but be careful ..!

वीर बाल दिवस

काल योगायोगाने शीख धर्म (संप्रदाय) आणि वीर बाल दिवस या विषयी बोलायची संधी मिळाली.              खरंतर या पूर्वी हा विषय कधी मांडला नव्हता. पण...

वाचकांना जास्त आवडलेले